वर्धा : विदर्भातील काही जिल्ह्यात उल्कापात सदृष्य आगीचे लोंढे आकाशातून पडतांना  गुढीपाडव्याच्या रात्री विविध गावकऱ्यांनी पाहिले. जेवढे कुतूहल तेवढाच संभ्रम नागरिकांत कायम असतांना 3 मार्च रोजी समुद्रपूर तालुक्यातील वाघेडा आणि धामणगाव येथे अवकाशातून पडलेले यंत्र अवशेष आढळून आले. सदर यंत्र पाहण्यास नागरिकांची गर्दी पाहवयास मिळाली.सदर यंत्राचे अवशेष समुद्रपूर आणि गिरड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


रात्री आकाशात दिसणारा प्रकार त्यांनर जमिनीवर पडलेले हे अवशेष हा काय प्रकार आहे. हाच संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. शेतकरी नितीन सोरते हे सकाळी आपल्या शेतात गेले असता त्यांना एक सिलेंडरसारखी आकृती असणारी काळ्या रंगाच्या धाग्याने गुंडाळलेली वस्तू अंदाजे 3 ते 4 किलो वजनाची आढळून आली. त्यांनी लागलीच या संबंधी समुद्रपूर पोलिस ठाण्याला माहिती दिली पोलिस उपनिरीक्षक राम खोत यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी जाऊन हे अवशेष ताब्यात घेतले. तर धामणगाव येथील शेतकरी भाऊराव ननावरे यांच्या गावाशेजारच्या शेतामध्ये सकाळी अवशेष आढळून आले.  


यावेळी गावातील नागरिकांनी हे अवशेष बघण्यासाठी एकच गर्दी केली. सदर घटनेची माहिती पत्रकार गजानन गारघाटे यांना मिळताच त्यांनी गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनिल दहिभाते यांना कळवले.  ठाणेदार सुनिल दहिभाते यांनी आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन सदर अवशेष ताब्यात घेतले आहे. मात्र अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले असून कोणत्याही नागरिकांमध्ये चुकीचा संभ्रम निर्माण करू नये असे आवाहन गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनिल दहिभाते यांनी नागरिकांना केले आहे.


चंद्रपूर जिल्ह्यात उपग्रहाचे अवशेष कोसळल्याची खगोलशास्त्रज्ञांना शंका


आकाशात दिसलेला लाल लोळ चंद्रपूरपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावात कोसळला. लाडबोरी ग्रामपंचायतीच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत  लोळ कोसळला.  त्या ठिकाणी 8 x 8 आकाराची लोखंडी रिंग सदृश वस्तू आढळून आली  . सध्या ही रिंग सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या आवारात ठेवण्यात आली असून तपासणीनंतर बाकी गोष्टी कळणार असल्याची  माहिती चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 


संबंधित बातम्या :