बीड : परळीतील जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयात मध्ये शिक्षक आणि कर्मचारी भरतीवरून मागच्या काही दिवसापासून मोठा वाद सुरु आहे. आता या वादात राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार संजय दौंड यांनी उडी घेतली संजय दौंड यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे वैद्यनाथ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भरती संदर्भात चौकशी करण्याची मागणी केली आहे
मंत्री उदय सामंत यांना दिलेल्या पत्रामध्ये संजय दौंड यांनी मागणी केली आहे की, 2005 च्यानंतर जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या सर्वसाधारण सभासदा मधून निवडणूक झालेली नाही. आजपर्यंतचा चेंज रिपोर्ट सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे प्रलंबित आहेत. कोणत्याही कार्यकारी मंडळाला कर्मचारी भरतीचे अधिकार नसताना 2008 पासून 2021 पर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. ती नियमबाह्य असून सदरील प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी संजय दौंड यांनी केली आहे.
याच मागणीनंतर सहसंचालक उच्च शिक्षण यांच्या औरंगाबाद कार्यालयाने वैद्यनाथ महाविद्यालयाच्या प्राचार्यला पत्र पाठवले आहे. ज्यामध्ये नऊ फेब्रुवारी रोजी स्वतःला सहसंचालक हे वैजनाथ महाविद्यालयाला भेट देणार असून यावेळी 2008 पासून आतापर्यंत महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या नियुक्त्या दिल्या आहेत. त्या या संदर्भातली चौकशी करण्यात येणार असल्याचे ह कळवले आहे.
यापूर्वीच वैद्यनाथ महाविद्यालयावर प्रशासक नेमण्याच्या चालू होत्या हालचाली
परळीच्या राजकारणातील मुंडे बहीण-भावाच्या वादात परळीमधील नामांकित जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयावर प्रशासक नेमण्यात येणार आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यातील ही शिक्षण संस्था आता नेमकी कोणाच्या ताब्यात जाईल? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
परळी शहरातील सर्वात जुनी व नामांकित शिक्षण संस्था असलेल्या जवाहर एज्युकेशन सोसायटीत संचालक मंडळावरुन पालकमंत्री धनंजय मुंडे व भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यामध्ये संघर्ष सुरु झाला असून संस्थेत सुरु असलेल्या वादामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुसचिवांनी चौकशीसाठी 4 जानेवारीला त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे.
दरम्यान वैद्यनाथ महाविद्यालयातील चौकशी समितीने चौकशी पूर्ण केल्यानंतर या चौकशी समितीचा अहवाल आणखी येणे बाकी आहे. तत्पूर्वीच पंकजा मुंडे गटातील सदस्यांनी हायकोर्टात धाव घेतली असून सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. वैद्यनाथ महाविद्यालयातील कारभाराच्या चौकशा लावून या संस्थेवर प्रशासक आणण्यासाठीच ही सगळी खटाटोप असल्याची राजकीय चर्चा आहे. पण निवडणुकीतील संघर्षापासून थेट शैक्षणिक संस्थेत तील संघर्ष पर्यंत पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :