सातारा : ह.भ.प. बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या संगतीत राहून बिघडले असं म्हटलं आहे. यावेळी बंडातात्या कराडकर यांनी म्हटले की, ''मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पूर्वी तसे नव्हते मात्र आता या महाविकास आघाडीत आल्यामुळे ते बिघडले.'' कराडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ढवळ्या आणि पोवळ्याची उपमा दिली आहे. ''ढवळ्या शेजारी बांधला पोवळा'' ही म्हण सांगताना त्यांनी उध्दव ठकरे हे 'ढवळ्या' असून अजित पवार 'पोवळा' असल्याचं म्हटले आहे. 


कराडकर म्हणाले की ''ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला. उद्धव ठाकरे चांगले माणूस आहेत. बाळासाहेब ठाकरे असा हिंदुत्वाचा पुरस्कार घेतलेला हिंदुह्रदयसम्राट अशी ज्यांची पदवी होती असा एक हिंदुत्वावादी पुढाऱ्यांचे उद्धव ठाकरे मुलगा आहेत. दारु आणावी, मंदिरं बंद करावीत सप्ते बंद करावेत, वाऱ्या बंद कराव्यात अशा विचारांचे उद्धव ठाकरे पुढारी नाहीत. पण ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला. हा ढवळ्या म्हणजे अजित पवार. अजित पवारांच्या संगतीत उद्धव ठाकरे बिघडले.''


राज्य सरकारने (Maharashtra Govt) घेतलेल्या वाईनच्या (Wine) बाबतीतल्या निर्णयावर राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज साताऱ्यात बंडातात्या कराडकर  यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्ती संघटनेचे 'दंडवत आणि दंडूका' आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यातील सर्वच नेत्यांची मुले ही दारु पितात असे सांगताना बंडातात्या कराडकर यांनी आरोप केला. या आरोपामुळे वाईनच्या विरोधाबरोबर आता बंडातात्या कराडकर हे महाविकास आघाडीच्या रडारवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha