Saptshrungi Devi Mandir : वणीच्या सप्तशृंगी मंदिरात (Saptshrungi Mandir) वस्त्रसंहिता लागू होणार का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळणार असून याबाबत गुरुवारी विश्वस्तांची महत्वपूर्ण बैठक संपन्न होणार आहे. सद्यस्थितीत वणी ग्रामपंचायतीकडून (Vani Grapanchayat) मंदिर प्रशासनाकडे ठराव सुपूर्द करण्यात आला असून आता मंदिराचे विश्वस्त काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मंदिरामध्ये वस्रसंहिता लागू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यभरातून प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. अशातच नाशिक (Nashik) जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी देवी मंदिरात (Saptshrungi Devi Mandir) ड्रेसकोड लागू करण्याबाबत मंदिर प्रशासन अनेक दिवसांपासून चर्चा आहे. लवकरच या चर्चेला पूर्ण विराम मिळणार आहे. वणी ग्रामपंचायतीने यापूर्वीच ड्रेसकोड लागू करावा याबाबत ठराव करून सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्टकडे दिला आहे. त्यावेळी मंदिर समितीकडून ड्रेसकोड लागू करण्याबाबत कोणताही घेतला नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र आता याबाबत गुरुवारी विश्वस्तांमध्ये महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे.
साडेतीन शक्तीपिठापैकी अर्धपीठ तसेच खान्देशची कुलदेवता म्हणून वणीच्या सप्तशृंगी देवीची ओळख असून या मंदिरातही वस्रसंहिता लागू करण्याबाबत चर्चा आहेत. वणीच्या सप्तशृंगी देवी मंदिरात वस्त्रसंहिता लागू होणार की नाही? याचा निर्णय आता गुरुवारी होणार आहे. गुरुवारी सप्तशृंगी निवासिनी संस्थानचे नवनियुक्त अध्यक्ष अतिरिक्त सत्र न्यायाधीश बीव्ही वाघ यांच्या उपस्थितीत मंदिरांच्या विश्वस्तांची बैठक संस्थान कार्यालयात पार पडणार आहे. त्यामुळे त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या निर्णयाच्या बाबतीतील बैठकीकडे ग्रामस्थांसह लाखो भाविकांचं लक्ष लागल आहे.
गुरुवारी महत्वपूर्ण बैठक
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सप्तशृंगी देवी मंदिर (Saptshurngi Devi Mandir) हे देशभरात प्रसिद्ध असून रोजच हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्याचबरोबर वणी गडावर दर्शनासह इतरही अनेक पर्यटनस्थळे असल्यानं अनेक भाविक पर्यटनस्थळांना भेटी देत असतात. दरम्यान वस्त्रसंहिता लागू करावी, असा ठराव 29 मे च्या मासिक बैठकीत सप्तशृंगीगड ग्रामपंचायतीने करत तो संस्थानकडे सुपूर्द केला होता. ग्रामस्थासोबतच पुरोहित संघाने देखील या निर्णयाचे स्वागत केले होते. दर्शनासाठी येतांना महिलांसोबतच पुरुषांनी पूर्ण पेहराव परिधान करावा, असे या ठरावात नमूद करण्यात आले होते.
बैठकींनंतर वस्रसंहितेबाबत अंतिम निर्णय
सप्तशृंग गडावर दर्शनासह इतरही अनेक पर्यटनस्थळे असल्याने अनेक भाविक पर्यटनस्थळांना भेटी देत असतात. मात्र पर्यटनस्थळांबरोबरच धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी आलेले काही भाविक येताना तोकडे कपडे घालून येतात. त्यामुळे अशा भक्तांना आळा घालण्यासाठी सप्तशृंगगडावर भाविकांना ड्रेस कोड लागू करण्याबाबत सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ भाविक सकारात्मक, विचाराधीन असून लवकरच त्यावर निर्णय होईल, असे सूतोवाच विश्वस्तांनी व्यक्त केले आहे.