Nashik Crime : नाशिक (Nashik) जिल्ह्यात लुटीच्या घटना दिवसेंदिवस समोर येत असताना घोटी पोलिसांनी (Ghoti Police) सुमार कामगिरी केली आहे. घोटी परिसरात कंटेनर चार-पाच बेशुद्ध करत कंटेनर्स बियरच्या बॉक्सची लुटमार करणाऱ्या नऊ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. एक संशयित फरार असून कंटेनरसह चोरी केलेल्या बियरचे बॉक्स 24 तासात हस्तगत करण्यात आले आहेत. इगतपुरी न्यायालयाने (Igatpuri Court) संशयिताना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 


दरम्यान दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद (Aurangabad) येथून निघालेला कंटेनर घोटी परिसरात आला असत यातून प्रवास करणाऱ्या संशयितांनी चालकास शिवीगाळ, दमदाटी करून कंटेनर नाशिकरोड व सिन्नर (sinner) असा फिरवू आणला. सिन्नर-घोटी रोडला एचपी पेट्रोलपंपाजवळ उभा करून  दिला. त्यानंतर आर्टिगा कारमधून आलेल्या इतर साथीदारांनी फिर्यादीला बेशुद्ध केले. त्याच्या ताब्यातील कंटेनर व त्यातील किंगफिशरचे 2200 बॉक्स पळवून नेत फिर्यादीला डांबून ठेवले. 


या प्रकरणी कंटेनर चालक मोहम्मद साजिद अबुल जैस शेख यांनी घोटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार या गुन्ह्यात संशयितांनी औरंगाबादच्या गंगापूर येथून कंटेनरमध्ये प्रवास केला होता. दरम्यान कंटेनर घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्यानंतर या संशयितानी कंटेनर चालकास मारहाण करत कंटेनरमधील बिअरचे बॉक्स चोरून नेले होते. या गुन्ह्याचा तपास करताना नांदगाव जवळील अस्तगाव येथे शेतात बिअरचा साठा ठेवल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी याबाबतची माहिती मिळताच पिकप बिअरचा साठा व संशयित दीपक बच्छाव यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता निलेश जगतापच्या सांगण्यावरून बिअर ठेवल्याचे सांगितले. यातील काही मुद्देमाल हरसुल येथून ताब्यात घेण्यात आला. वाहतूक करण्यासाठी वापरलेला आयशर टेम्पो व पिकप एर्टिगा कार, कंटेनर असा 55 लाख 22 हजार 936 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. 


याप्रकरणी दहा संशयितांना अटक करण्यात आले असून संशयितांसह १०५४ बियरचे बॉक्स हस्तगत करण्यात आले. यामध्ये निलेश विनायक जगताप, आकाश विनायक जगताप, चेतन अशोक बिरारी, दीपक शिवाजी बच्छाव, महेश शिवाजी बच्छाव, विकास भिमराव उजगरे, धीरज रमेश सानप, गणेश निंबा कासार, मनोज शांताराम पाटील अशी संशयितांची नावे आहेत. यातील एक साथीदार फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान पोलिसांनी 24 तासात बोलण्याचा शोध लावत नऊ संशयितांना ताब्यात घेतले. या सर्व संशयितांना एकत्र न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.