Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) त्र्यंबक जवळील अंजनेरी येथील आधारातीर्थ आश्रमातील (Adhartirth Ashram) खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. चार वर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणात (Murder) आश्रमातीलच एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Trimbakeshwer Police) आता संशयित अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. 


नाशिकी-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अंजनेरीजवळ हा आधारतीर्थ आश्रम असून या ठिकाणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची (Farmers) साठहून अधिक मुले वास्तव्यास आहेत. या मुलांच्या शिक्षणासह राहण्या खाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाते. मात्र अनेक कारणांमुळे हा आश्रम सतत चर्चेत असतो. दरम्यान मंगळवारी पहाटे एका चार वर्ष बालकांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला होता. या घटनेनंतर खळबळ उडाली होती. त्र्यंबक पोलिसांनी प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करून मंगळवारी रात्री अज्ञाता विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. 


या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपास सुरू होता. मंगळवार बुधवार व गुरुवार अशा तीन दिवसात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्रंबक पोलिसांनी अथक तपास केला होता. कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्याकडून पोलीस माहिती घेत होते. वीस बालकांसह 60 विद्यार्थी आश्रमात असल्याने त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अत्यंत संयमाने कौशल्याने तपास करीत होते. अखेर तपासाच्या तीन दिवसानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मयत आलोकचा अकरा वर्षाचा भाऊ आणि संशयित बालक या दोघांमध्ये वारंवार भांडण होऊन शिविगाळ केली जात होती. याचा राग मनात धरून त्याचा काटा काढण्यासाठी आलोकची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी या 13 वर्षीय बालकास ताब्यात घेतले असून त्याची रवानगी बालसुधारगृहामध्ये करण्यात आली आहे. संशयितास आज बाल न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती त्र्यंबकेश्वर पोलिसांनी दिली आहे.


या प्रकरणी पोलिसांनी हे जरी कारण हे दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार मात्र आता अजूनही या प्रकरणात काय कारण आहेत का? या गुन्ह्यामध्ये इतर कोणाचा समावेश आहे का? ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीत जर अशी गुन्हेगारी कृत्ये आधार आश्रमात होत असतील. एवढ्या लहान मुलांमध्ये जर अशा वृत्ती बळावत असतील? आधारतीर्थ आश्रमात नेमके कोणते शिक्षण आणि संस्कार मुलांवर केले जातात? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. 


नावालाच 'आधार'तीर्थ आश्रम?
त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अंजनेरी गावाच्या पुढे हा शेतकऱ्यांच्या मुलांसाठीचा आधारतीर्थ आश्रम आहे. त्र्यंबक गायकवाड हे याआधारतीर्थ आश्रम चालवितात. या ठिकाणी राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिकविण्याची जबाबदारी घेतली जाते, असा दावा संस्थेकडून केला जातो. दरम्यान अनेक सहारे भागातील नागरिक बड्डे किंवा इतर आनंदाचा उत्सव या मुलांबरोबर साजरा करतात. मात्र दुसरीकडे आश्रमातील कारभार नीटसा नसल्याने अनेकदा चर्चेत आला आहे. येथील बालकांना योग्य सुविधा नसल्याचे समोर आले आहे. अशातच या प्रकरणाने आश्रम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.