Nashik Air Service : स्टार एअरने नाशिक-बेळगाव विमानसेवेचे बुकिंग पुन्हा सुरू केले असून दि.३ फेब्रुवारी २०२३ पासून नाशिक स्टार एअरची नाशिक-बेळगाव विमानसेवा सुरू होणार आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी उड्डाण योजने अंतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केल्यानंतर केंद्रीय नागरी उड्डायन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या निर्देशानुसार, स्टार एअरने बेळगाव-नाशिक-बेळगाव विमानसेवेसाठी बुकिंग पुन्हा सुरू केली असल्याची माहिती उद्योजक मनीष रावल यांनी दिली आहे.


दरम्यान नाशिक ते बेळगाव विमानसेवा जानेवारी 2023 पासून सुरु होणे अपेक्षित होते. मात्र कोविडमुळे उडान योजनेचा कार्यकाळ पूर्ण न करू न शकलेल्या अलायन्स एअरला उडान योजनेअंतर्गत कालावधी वाढवून देण्याचे विचाराधीन असल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी पत्राद्वारे माहिती दिली होती. त्यानुसार आता स्टार एअरची नाशिक बंगळुरू ही विमानसेवा लावकारच्या नाशिकरांच्या सेवेत हजर होणार आहे. सद्यस्थिती विमानतळ हे २० नोंव्हेबर पासून बंद करण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम सुरु असल्याने साधारण तेरा दिवस हे काम चालणार आहे. त्यामुळे त्यानंतर ही सेवा सुरु होणार असल्याचे समजते. 


दरम्यान छगन भुजबळ यांनी नुकतीच केंद्रीय नागरी उड्डायन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे नाशिक विमानतळावरून उड्डाण योजनेला पुन्हा मुदतवाढ देऊन विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून  3 फेब्रुवारी 2023 पासून स्टार एअरलाइन प्रत्येक शुक्रवार आणि रविवारी नाशिक बेळगाव विमानसेवा सुरू करणार आहे. त्यासाठी त्यांनी बुकिंग देखील सुरू केली आहे. तसेच दुसऱ्या कंपन्यांच्या देखील विमानसेवा सुरू करण्यासाठी छगन भुजबळ यांचे प्रयत्न सुरू आहेत. 


असे आहे वेळापत्रक 
त्यानुसार एस 5.145 ही फ्लाइट बेळगावहून शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता निघेल नाशिक येथे 10.30 पोहचेल तर रविवारी सायंकाळी 5.05वाजता सुटेल आणि  सायंकाळी 06.05 वाजता नाशिकला पोहोचेल. तर एस 5. 146 ही फ्लाइट नाशिकहून शुक्रवारी सकाळी 10.45 वाजता निघेल 11.45 ला बेळगाव येथे पोहचेल. रविवारी सायंकाळी 6.30 वाजता निघेल आणि सायंकाळी 7.30 वाजता बेळगावला पोहचेल. या मार्गावर 50 सीटर एम्ब्रेअर 145 विमाने धावणार आहेत.


दुरुस्तीसाठी तेरा दिवस बंद 
नाशिकच्या (Nashik) विमान प्रवाशांसाठी महत्वाची बातमी असून ओझर (Ozar Airport) विमानतळ येत्या 20 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या 13 दिवसांच्या कालावधीत देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पूर्ण बंद राहणार आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड प्रशासनाने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार येथे हा 20 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत विमानतळाच्या धावपट्टीच्या रिसर्फेसिंग चे काम केले जाणार आहे. ही नियमित प्रक्रिया असून त्यात हवाई वाहतूक संचालनालयाच्या निर्देशानुसार धावपट्टीची देखभाल दुरुस्ती व अन्य कामे केली जातात. परिणामी या धावपट्टीवरून विमाने येजा करू शकणार नाहीत.