Nashik Political News : नाशिकच्या (Nashik) शिंदे ठाकरे गटाचा वाद थांबला असला तरी अंतर्गत धुसफूस सुरूच आहे. त्यामुळे ठाकरे गटातील पदाधिकारी शिंदे गटाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मात्र इथं गणितच बिघडलं असून ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेने विकास कामांच्या उदघाटनाला थेट शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना निमंत्रण दिल्याने शहरभर या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा आहे. 


एकीकडे राज्यात ठाकरे शिंदे गट (Shinde Sena) यांच्या जोरदार वाद सुरु आहे. हीच परिस्थिती स्थानिक पातळीवर देखील पाहायला मिळत आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये सुरवातीपासून वादाची ठिणगी आहे. ही आग रस्त्यावर नसली तरी अंतर्गत सुरु असल्याचे दिसून येत असताना नाशिकमधील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका असलेल्या हर्षदा गायकर (Harshada Gaikar) यांच्या प्रभागातील कामांच्या उदघाटनासाठी थेट हेमंत गोडसे याना पाचारण करण्यात आल्याने ठाकरे गटाच्या गोटात खळबळ उडाली आहे. मात्र हे काम खासदार निधीतले असल्याने हेमंत गोडसे यांना निमंत्रण दिलं असल्याचे स्पष्टीकरण संबंधित नगरसेविककेकडून देण्यात आले आहे. 


नाशिकच्या डीजीपी नगर तीन क्रमांकमधील रस्त्यांचा काँक्रिटीकरण करणे, सीसीटीव्ही बसवणे असे विकासकामे खासदारांच्या विकास निधी मधून होत आहेत. कार्यक्रमाचे उदघाटन होणार असल्याने या प्रभागात बँनरबाजी करण्यात आली आहे. या फलकांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटोसह दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे इतर नेत्यांचे फोटो आणि त्यानंतर खालील बाजूस शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांचे फोटो झळकलेले आहेत. माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांचा देखील फोटो पाहायला मिळतो आहे. त्यामुळे एकीकडे राज्यभरामध्ये शिंदे आणि ठाकरे गटांमध्ये अनेक प्रचंड वाद सुरू असताना या बॅनरवर मात्र दोन्ही गटाची युती असल्याचा आपल्याला बघायला मिळतं आहे. 


एकीकडे राज्यभारत शिंदे ठाकरे गटात एवढे वाद सुरू आहेत, अशातच शिंदे गटाच्या खासदारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येत आहे. यावर बोलताना माजी नगरसेविका गायकर म्हणाल्या कि, मंडप किती भव्य असला तरी झालरशिवाय त्याला कुठली शोभा येत नाही. त्याचप्रमाणे नगरसेवक हा त्याच्या प्रभाग किती रुबाब किंवा त्याचा किती प्रभाव असला तरी त्याच्या विकास कामांशिवाय त्या प्रभागाला कुठली शोभा येत नाही. आज ज्या विकासकामांचे उद्घाटन होत आहे, यासाठी गेली वर्षभरा पासून कामाचा पाठपुरावा करत होतो. गटातटाच्या राजकारणात जर पडले असते तर बहुतेक राहणारा ठिकाणी, माझ्या नागरिकांना एक विकसित दृष्ट्या न्याय मिळवून देऊ शकले नसते, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. हर्षदा गायकर म्हणाल्या, खासदारांशिवाय हा कार्यक्रम होऊ शकला असता तर अर्थात नाही. कारण हेमंत गोडसे यांच्या खासदार हा निधीतून भूमिपूजन आज पार पडते आहे. त्यामुळे खासदारांचा हजर राहणं अपेक्षित होतं. शेवटी शिवसेनेची शिस्त असून वरिष्ठांशी हितगुज करूनच हा निर्णय घेतला आहे. विकास कामात वरिष्ठांनी समजून आज हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.