Nashik News : नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) सूत्र अखेर राज्य गुप्त वार्ता विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर (Sharmistha Valawalkar) यांच्याकडे शासनाने सोपवले आहे. वालावलकर यांनी नाशिक येथील (Nashik) शरणपूर येथील कार्यालयात हजेरी लावत पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. मावळते अधीक्षक सुनील कडासने यांनी मंगळवारी आपला पदभार सोडला.
राज्याच्या पोलिस दलातील (Maharashtra Police) रखडलेल्या बदल्या गृह विभागाने गेल्या सात जुलै रोजी केल्या. राज्यातील 104 पोलीस अधीक्षक व उपायुक्त दर्जांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांचीही बदली नागपूर लोहमार्गाच्या पोलीस अधीक्षक पदी करण्यात आली तर नाशिक लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अध्यक्षपदी राज्य गुप्त वार्ता विभागाच्या शर्मिष्ठा वालावलकर यांची नियुक्ती केली होती. मात्र या बदलांना 24 तासांचा अवधी उलटत नाही, तोच वालावलकर यांना हजर न होण्याची आदेश देण्यात आले होते.
दरम्यान महासंचालक कार्यालयाकडून स्थगिती हटवल्यानंतर वालावलकर यांनी मंगळवारी रात्री उशिरा पदभार स्वीकारला. बुधवारी त्यांनी नियमित वेळेत कार्यालयात हजेरी लावून अधिकारी कर्मचाऱ्यांना दालनात बैठक बोलून कारवाईचा आढावा घेतला. नाशिक राज्य गुप्त वार्ता विभागाच्या अधीक्षक पदाचा पदभार मुंबई तत्कालीन उपायुक्त गीता चव्हाण यांनी बुधवारी स्वीकारला. तर वालावलकर यांनी एसीबीची सूत्रे हातात घेताच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठकी घेत परिक्षेत्रातील भ्रष्टाचार, अपसंपदा सापळे या सर्व कारवाईचा आढावा घेण्यात आला. नाशिक परिक्षेत्राचा सापळा कारवाईचा आलेख आतापर्यंत चांगलं राहिला असून तो अधिकाधिक उंचावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे वालावलकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे नाशिक परिक्षेत्रात सर्वाधिक कारवाई होत असल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले आहे. ही समाधानकार बाबा असून गुन्हे तपासासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना वालावलकर यांनी दिल्या आहेत.
महासंचालकाकडून स्थगिती हटवली
राज्य शासनाने गृह विभागाच्या (Home Minister) भापोसे व मपोसे पोलीस अधिकारी यांच्या बदल्यांचे आदेश पारित केले होते. यानुसार नाशिक आयुक्तालयांचे दोन उपायुक्त लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाचे अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक, राज्य गुप्तवार्ता विभागाचे अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी मधील दोन उपायुक्त यांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्या आदेशात राज्य गुप्तवार्ता विभागाच्या वालावलकर यांची नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक पदी बदली करण्यात आली. तसेच तात्कालीन अधीक्षक सुनील कडासने यांची नागपूर येथील लोहमार्ग पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. या बदली आदेशातील नऊ अधिकारी यांची बदली होऊ नये, आहे त्या ठिकाणी पदावर पुढील आदेश येईपर्यंत पदभार न स्वीकारण्याचे आदेश दिले होते.