Sharad Pawar : शरद पवार (Sharad Pawar) यांचे मिशन नाशिक मोहीम सुरु झाली असून त्याची आज त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यापासून होत आहे. आज त्र्यंबकेश्वर येथील पदाधिकाऱ्यांची पहिली बैठकी होत असून तालुक्याचा आढावा घेऊन तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात येणार असल्याचे समजते आहे. त्यानुसार शरद पवार यांनी नाशिक (Nashik) जिल्ह्यावर फोकस करण्याचे ठरवले आहे. मुंबईमध्ये राहून ते नाशिक जिल्ह्याची रणनीती आखत असल्याचे दिसून येत आहे.
येवला येथील (Yeola) सभेनंतर शरद पवारांनी नाशिकमधल्या पक्ष बांधणीवर विशेष जोर दिला आहे. शरद पवार गटाचा आजपासून नाशिकमध्ये बैठकांचा धडाका पाहायला मिळणार आहे. आज त्र्यंबकेश्वर तालुक्यात पहिली बैठक होत असून त्र्यंबकेश्वर, पेठ, हरसूल, सुरगाणा (Surgana), कळवण, सटाणा, मालेगाव, चांदवड या क्रमाने इतर बैठका ही पार पडणार आहेत. शरद पवारांसोबत पदाधिकाऱ्यांची तालुका निहाय यादी तयार करण्याचे काम सध्या सुरु आहे आणि येत्या पंधरा दिवसात संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेऊन नवी कार्यकारणी सुद्धा जाहीर केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात नव्याने पदाधिकारी नियुक्त करण्याच्या शरद पवार यांच्या सूचना आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या (Maharashtra NCP) फुटीनंतर शरद पवार गटाची पहिली सभा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मतदारसंघात झाली. त्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद शरद पवार (Sharad Pawar) यांना मिळालेला होता. त्यामुळे निश्चितच शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास हा दुणावलेला आहे. अजित दादा यांच्या गटामध्ये नाशिकचे आमदार आणि काही पदाधिकारी गेले असले तरी जनता आपल्यासोबत असल्याचा विश्वास त्यांना वाटतो आहे. त्यातून पुन्हा एकदा नव्याने पक्ष बांधणी करण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला असून नाशिकच्या काही पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये बोलावून घेत चर्चा देखील केली आहे. विधानसभा मतदारसंघ निहाय बैठका घेण्याचं आदेश देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर तरुणांना आपल्याकडे शहरी भागामध्ये जास्तीत जास्त काम करणं, अशा स्वरुपाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
पहिली बैठक त्र्यंबकला
त्यानुसार आज त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक होत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शरद पवार गटाची त्र्यंबक राजाच्या दर्शनानंतर पहिली बैठक होत आहे. या बैठकीनंतर जिल्ह्याच्या इतर भागातील जे तालुके आहेत. त्या सर्व तालुक्यांची एक एक दिवसांनी बैठक होणार आहेत. आपल्यासोबत कोण आणि अजित पवार गटाकडू कोण? याची गोळा बेरीज केली जात आहे. त्यानंतर पदाधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती केली जाणार आहे. जिल्ह्यातील विविध भागातून सर्वांना या पक्ष संघटनेमध्ये सामावून घेतले जाईल. हा विचार ठेवून संपूर्ण पदाधिकारी आता कामाला लागलेले आहेत. त्यामुळे आज त्र्यंबकेश्वरमध्ये बैठक झाल्यावर जिल्ह्याच्या इतर भागांमध्ये देखील बैठका होणार आहेत.
हेही वाचा