Adarsh Scam in Aurangabad : काही वर्षांपूर्वी राज्यात आदर्श घोटाळा (Scam) गाजला होता. दरम्यान आता औरंगाबादमध्ये (Aurangabad) सुद्धा 200 कोटींचा एक 'आदर्श' घोटाळा समोर आला आहे. नियमबाह्य कर्जवाटप करुन ओळखीतल्याच लोकांना, स्वतःच्याच इतर संस्थांना कोट्यवधींच्या कर्जाची खैरात वाटल्याचा ठपका शहरातील आदर्श नागरी सहकारी संस्थेवर ठेवण्यात आला आहे. तर या प्रकरणात तब्बल 200 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे 2016 ते 2023 यादरम्यान झालेल्या उपनिबंधक कार्यालयाच्या लेखापरीक्षणात हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे सिडको पोलीस ठाण्यात मंगळवारी (11 जुलै) रोजी मुख्य संचालक अंबादास आबाजी मानकापेंसह अन्य मंडळ, कर्जदारांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


अधिक माहिती अशी की, एप्रिल 2003 मध्ये स्थापन झालेल्या आदर्श ग्रुप अंतर्गत आदर्श नागरी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली होती. काही कालवधीतच पतसंस्था चर्चेत आली आणि ठेवीदारांची संख्या वाढू लागली. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून या पतसंस्थेतील गैरव्यवहारांविषयी चर्चा सुरु होत्या. त्यामुळे ठेवीदारांनी पैसे काढण्यासाठी बँक गाठली. पण पैसे मिळत नसल्याने ठेवीदारांनी बँक समोरच आंदोलन सुरु केले होते. तर अनेक ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशावरुन विशेष लेखा परीक्षक धनंजय चव्हाण यांनी 2016  ते 2019  कालावधीतले लेखापरीक्षण केले. तसेच जून 2023 मध्ये त्यांनी याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला. त्यामध्ये मानकापे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अनेक कारनामे समोर आले. त्यामुळे या प्रकरणात सिडको पोलीस ठाण्यात मंगळवारी (11 जुलै) रोजी मुख्य संचालक अंबादास आबाजी मानकापेंसह अन्य मंडळ, कर्जदारांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


नेमका घोटाळा काय?


संचालक मंडळाने ठराविक ठेवीदारांना नियमबाह्य कर्जाची खैरात वाटली. आदर्श ग्रुप अंतर्गत येणाऱ्या जवळपास 15 संस्थांना ते वाटप केले तर काही नातेवाईक, ओळखींच्या नावे कर्ज उचलले. यासाठी विनातारण, विनाजामीनदार, बनावट तारण व सभासद उभे करण्यात आले. ज्यात 2016 ते 2019 मध्ये 103 कोटी 16 लाख 73 हजार 381 रुपयांचा घोटाळा केला. तर 2018 ते 2023 मध्ये 99 कोटी सात लाख 90 हजार 579 रुपयांचा घोटाळा केला. 2019 मध्ये 23 कर्ज प्रकरणात कागदपत्रेदेखील अपूर्ण आहेत, तर 2021 मध्ये अर्ज अपूर्ण असताना कर्जवाटप झाले असल्याचे तपासात समोर आले आहेत.


यांच्यावर गुन्हा दाखल... 



  • अंबादास आबाजी मानकापे (प्लॉट क्र. 31, शिवज्योती कॉलनी, एन-6, सिडको, औरंगाबाद)

  • देशमुख महेंद्र जगदीश (रा. प्लॉट क्र. 88, शिवानी, महाजन कॉलनी, एन-2, सिडको, औरंगाबाद)

  • काकडे अशोक नारायण, संचालक, (मु. वडखा पो. वरझडी, ता. जि. औरंगाबाद)

  • काकडे काकासाहेब लिंबाजी (मु. वडखा पो. वरझडी, ता. जि. औरंगाबाद)

  • मोगल भाऊसाहेब मल्हारराव (मु. पो. निलजगाव ता. पैठण जि. औरंगाबाद)

  • पठाडे त्रिंबक शेषराव (मु. पो. वरझडी ता. जि. औरंगाबाद)

  • जाधव रामसिंग मानसिंग (मु. गिरनेरा तांडा पो. गेवराई ता. जि. औरंगाबाद)

  • दौलनपुरे गणेश ताराचंद (रणजितगड, सारा प्राईड, चेतना नगर, गारखेडा, औरंगाबाद)

  • मुन ललिता रमेश (मु. पो. एकोड पाचोड रोड, पो. भालगाव ता. जि. औरंगाबाद)

  • निर्मळ सपना संजय (एन-3, सी, रामनगर, सिडको, औरंगाबाद)

  • पाटील अनिल अंबादास (प्लॉट क्र. 31, शिवज्योती कॉलणी, एन-6, सिडको, औरंगाबाद)

  • जैस्वाल प्रेमिलाबाई माणिकलाल (मु. आपतगाव पो. भालगाव ता. जि. औरंगाबाद) अ. क्र. 2 ते

  • मुख्य व्यवस्थापक देविदास सखाराम आधाने (रा. प्लॉट क्र. 9, के सेक्टर, नवजीवन कॉलनी, औरंगाबाद)


इतर महत्वाच्या बातम्या:


Aurangabad : गांजाचे व्यसन असलेल्या निवृत्त क्लर्कने पत्नीला संपवलं; डोक्यात बॅट घालून चाकूने केले वार