Nashik Chhagan Bhujbal : शरद पवार (Sharad Pawar) यांना दिलेली जाणता राजा हि उपाधी मला मान्य असून अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत फिरतो आहे. शरद पवार यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं आहे. जो जनतेचे प्रश्न सोडवतो, त्याला जाणता राजा म्हणायला काय अडचण आहे? आम्ही म्हणतो, तुम्हाला म्हणायचं असेल तर म्हणा अशा शब्दांत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्यामागील कारण सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून चागंलेच रान पेटले आहे. छत्रपती संभाजीराजे यांना धर्मवीर (Dharmveer) म्हणायचं कि स्वराज्यरक्षक म्हणायचं या प्रश्नावरूनच एकमेकांमध्ये चिखलफेक सुरु आहे. तर दुसरीकडे शरद पवारांना लोक जाणता राजा म्हणतात, यावर भाजपाकडून आक्षेप घेतला जातो, या प्रश्नांवरून अजित पवार यांनी मिश्किल टिपण्णी केली. यावरून आता राजकिय नेते स्तुतीसुमने उधळत आहेत. अशातच या प्रश्नाचे उत्तर नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी दिले आहे. ते म्हणाले गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार हे तळागाळातील लोकांची कामे करत आहेत. त्यामुळे लोक त्यांना जाणता राजा म्हणतात, असे उत्तर भुजबळांनी दिले आहे.
छगन भुजबळ आज नाशिकमध्ये (Nashik) असून त्यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर चर्चा केली. ते यावेळी म्हणाले, जाणता राजा ही पदवी मान्य असून शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्षांपासून फिरतो आहे. त्यांनी महाराष्ट्रातील सामाजिक प्रश्नांवर त्यांनी मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं. महिलांचे प्रश्न असतील, विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं. जो जनतेचे प्रश्न सोडवतो, त्याला जाणता राजा म्हणायला काय अडचण आहे? आम्ही म्हणतो, तुम्हाला म्हणायचं असेल तर म्हणा, असे ते म्हणाले. तसेच शिवाजी महाराज यांचा इतिहास खूप मोठा आहे, मात्र एक एक दोन दोन पानांमध्ये मुलांना इतिहास समजतो का? चौथी पासून सातवी पर्यंत एक एक धडा अभ्यासक्रमात टाकायला हवा, पण काही वेळा इतिहास गाळला जातो. या विषयावर इतिहासकार, लेखक यांनी नेमकं मार्गदर्शन करावं, इतिहासात नाव कोरलेली ही सर्वच आपली दैवतं आहे. कुणी धर्मवीर म्हणा, तर कुणी स्वराज्य रक्षक म्हणा काही फरक पडत नसल्याचे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर..
फेब्रुवारीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर येणार असून जाहीर सभा घेणार आहेत. ठाकरे गटातून अनेकांना काढता पाय घेतला, यामुळे पोकळी निर्माण झाली आहे, ही पोकळी भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरे नाशिकमध्ये येत आहेत. जे लोकं सोडून गेले, त्यामुळे खड्डा पडला, तो भरून काढण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहे. यामुळे महा विकास आघाडीला बळ मिळेल. सगळीकडे महाराष्ट्र भवन करा, काही हरकत नाही. मुंबई हे उद्योगपतींचे हब आहे, ज्याला जे न्यायचं, ते न्यावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त कामाचा झपाटा कमी होऊ देऊन नका, काशी आहे, रामेश्वर आहे अष्टविनायक आहे, सगळीकडे जा आणि आशीर्वाद घेऊन या, असा सल्ला भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Nashik Asaduddin Owaisi : वंचित बहुजन आघाडीसोबतची युती का तुटली? ओवेसींनी सांगितली मोठी गोष्ट