Aurangabad News: औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या औद्योगिक प्रदर्शन अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोसाठी (Advantage Maharashtra Expo 2023 Aurangabad) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हजेरी लावणार होते. मात्र विमानातील तांत्रिक बिघाडामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस या दोघांनीही औरंगाबाद दौरा रद्द केला आहे. विशेष म्हणजे विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडानंतर मुख्यमंत्री तासभर विमानतळावर थांबले होते. मात्र बिघाड दुरूस्ती न झाल्याने त्यांनी औरंगाबाद दौरा रद्द केला आहे. 


औरंगाबादच्या शेंद्रा एमआयडीसीतील डीएमआयसी ऑरिक (DMIC) येथे 5 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान उद्योजकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते या अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोचं 'ऑनलाइन उद्घाटन' होणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकूण आठ मंत्री हजेरी लावणार होते. मात्र मुंबई मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुंबई विमानतळावर पोहचल्यावर त्यांच्या विमानाच्या जनरेटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले. तासभर प्रयत्न करून देखील यात दुरूस्ती होऊ न शकल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी औरंगाबाद दौरा रद्द केला आहे. तर दोन्ही नेते मुंबई विमानतळावरून पुन्हा परत निघून गेले.  


Aurangabad: अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 'ऑनलाइन उद्घाटन'