Nashik Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज नाशिक दौऱ्यावर आहेत. महिनाभरापूर्वी शरद पवार वीज कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात ते उपस्थित होते. त्यानंतर आज ते नाशिक शहरातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. नागालँडमध्ये राष्ट्रवादी पक्षाने भाजपाला पाठिंबा दिल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर शरद पवार काय बोलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर येणार असून दुपारी 1 वाजता त्यांचे नाशिक शहरात आगमन होणार आहे. यानंतर शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. दुपारी 3 वाजता शहरातील गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात नाशिक जिल्हा कॉलेज टीचर्स सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाचे लोकार्पण पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे, निफाडचे आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar), मविप्र संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे आदी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर शरद पवार हे कळवणला रवाना होणार आहेत. कळवण शहरात आमदार नितीन पवार यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी पालकमंत्री दादा भुसे देखील उपस्थित राहणार आहे.
दरम्यान, यापूर्वी जुलै महिन्यात शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) याचंं नाशकात (Nashik Political News) आगमन झालं होतं. मराठा विद्या प्रसारक निवडणुकीच्या (Maratha Vidya Prasarak Elections) पार्श्वभूमीवर त्यांनी दोन दिवस मुक्काम ठोकला होता. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये वीज कर्मचाऱ्यांच्या महाअधिवेशनाचे उद्घाटना प्रसंगी शरद पवार हे नाशिकमध्ये आले होते. त्यानंतर आज ते पुन्हा विविध कार्यक्रमांना संबधोत करण्यासाठी नाशिकध्ये येणार आहेत.
कळवणला शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे उद्घाटन
उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच असलेल्या अश्वारुढ पुतळ्याचा अनावरण सोहळा आज पार पडणार आहे. कळवण येथील शिवतीर्थवर छत्रपती शिवाजी महाराजांचा 21 फूट उंच पुतळा बसवण्यात आला आहे. पद्मभूषण राम सुतार या मराठमोळे शिल्पकार यांनी कळवणच्या अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराज यांचा उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच पुतळ्याला आकार दिला आहे. शिवरायांच्या पुतळ्याची उंची 21 फूट असून लांबी 17 फूट आहे. ब्राँझ धातूच्या पुतळ्याचे वजन 7 टन असून चबुतऱ्याची उंची 18 फूट तर लांबी 25 व रुंदी 15 फूट आहे. आज शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.