Nashik Gudhipadwa : मराठी नववर्षाचे (Marathi New Year) स्वागत यंदा उत्साहात जल्लोषात केले जात आहे. सोन्याचा (Gold Rate) भाव कमी अधिक होत असल्याने तरी सोने खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल दिसून येत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या अनेक नवीन व्हरायटीज दिसून येत आहेत. त्याचबरोबर नाशिककरांनी सोने खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे.
गुढीपाडव्याला (Gudhipadwa) अनेकजण सोनेखरेदी करतात. सणाच्या मुहूर्तावर सोने खरेदी (Gold Purchase) करणे चांगले असल्याचे सांगत अनेक गृहिणी सोने खरेदीला प्राधान्य देतात. सण, उत्सव, समारंभ प्रसंगी सोने चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. तसेच उत्तम गुंतवणूक म्हणूनही सोने चांदीचा विचार केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चांदीचे दर रोजच्या रोज बदलत असतात. नाशिकमधील बाजारपेठेतही सोन्या चांदीच्या दरात दररोज चढउतार होत असतात. नाशिकमध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने चांदीच्या काहीशी घट झाल्याने ग्राहकांची सोने खरेदीला गर्दी झाल्याचे चित्र आहे.
नाशिकमध्ये काल 24 कॅरेट प्रती तोळा सोन्याचा दर हा 60 हजार रुपये होता. आज तोच दर 59 हजार 160 रुपयांवर आला आहे. यामुळे तोळ्या मागे 840 रुपये कमी झाले आहेत. तसेच काल 22 कॅरेट प्रती तोळा सोन्याचा दर हा 55 हजार रुपये होता. आज तोच दर 54 हजार 230 रुपयांवर आला आहे. यामुळे तोळ्या मागे 770 रुपये कमी झाले आहेत. त्यामुळे आज सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी कमी पैसे मोजावे लागणार आहेत. गुढीपाडव्याला टेम्पल आणि ज्वेलरीला अधिक मागणी असते. शिवाय आगामी काळात लग्नसराई असल्याने लोकांचा काळ सोने खरेदीसाठी असणार आहे.
आज गुढीपाडवा आज सोने खरेदी केले तर ते लाभते, असं म्हणतात. म्हणून आज सोने खरेदीसाठी आम्ही आलो आहोत. कायमस्वरूपी गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची असते. त्यामुळेच ग्राहक हे नेहेमीच गुढीपाडव्याला सोने खरेदी करत असल्याचे अलका गायकवाड यांनी सांगितले. तर मागच्या वर्षी गुढीपाडव्याला 51 हजार 600 भाव होता, यंदा 60 हजाराच्या वर भाव आहे. त्याचबरोबर शेअर मार्केट कोसळले आहे, त्यामुळे लोकांचा कल सोनेखरेदीकडे आहे.. सोन्याला चांगल्याप्रकारे खरेदी करत आहेत, शिवाय आगामी काळात सोन्याचा भाव वाढण्याची शक्यता असून त्यामुळे गुढीपाडव्याला अधिकाधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यावसायिकांना यंदाचा गुढीपाडवा चांगला असल्याचे व्यवसायीकांनी सांगितले.