Nashik Pik Vima : केंद्र सरकारच्या पीक विमा योजनेला (Pik Vima Yojana) मुदतवाढ मिळाल्याने राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा भरता येणार आहे.  नाशिक (Nashik) जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला असून जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून आज सकाळपर्यंत 4 लाख 67 हजार 457 शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. तसेच अर्ज करण्यासाठी 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने अर्जदारांची संख्या वाढणार आहे.


राज्य शासनाच्या एक रुपया पीक विमा (Pik Vima) योजनेमध्ये आजपर्यंत दीड कोटी शेतकऱ्यांनी (Farmers) सहभाग नोंदवला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ही 31 जुलैपर्यंतची होती. मात्र, यामध्ये मुदतवाढ करण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना तीन ऑगस्टपर्यंत पीक विम्यासाठी अर्ज भरता येणार आहे. एक रुपयात पीक विमा योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी भाग घ्यावा, म्हणून कृषी विभाग (Forest Department) प्रयत्नशील आहे. पीक विमा नोंदणी ऑनलाईन (Pik Vima Registration) असल्याने शेतकऱ्यांना त्यासाठी थोड्याफार प्रमाणात पैसे मोजावे लागतात. नोंदणी करताना कागदपत्रे अपलोड करण्यास वेळ लागतो. पीक विमा भरण्याचे सर्व्हरच डाऊन झाल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करताना अडचणी निर्माण झाली होती. यानंतर राज्य सरकारने तीन दिवस मुदतवाढ दिली आहे. 


दरम्यान आज 1 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील चार लाख 67 हजार 457  शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे. त्यांच्यासाठी विमा कंपनीला साधारणतः 1055 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील एक लाख 65 हजार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला होता. यंदा ही संख्या तिप्पट झाली आहे. त्यामुळे नाशिक महसूल विभागात जिल्ह्याचा एक नंबर लागतो आहे. अजूनही तीन दिवस पीक विमा भरण्यासाठी अवधी असल्याने साडे पाच लाखांपर्यत शेतकऱ्यांचा सहभाग होण्याची अपेक्षा कृषी विभागाने वर्तवली आहे. साधारण जिल्ह्यात सोयाबीन, भात, मका, कापूस या चार पिकांचा विमा उतरवला जातो. यात सोयाबीन 91 हजार हेक्टर क्षेत्र, भाताचे 3 लाख हेक्टर क्षेत्र, मका सव्वा दोन लाख हेक्टर क्षेत्राला पीक विमा संरक्षण मिळत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. 


आतापर्यंत दीड कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा सहभाग 


शेतकरी बांधवांनी या खरीप हंगामात एक रुपयात पीक विमा (Pik Vima) भरण्यास उत्तम प्रतिसाद दिला असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. आतापर्यंत दीड कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत. तांत्रिक कारणांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा विमा भरणे मागे राहू नये, यासाठी ऑनलाईन विमा अर्ज करण्यासाठी तीन दिवसांची मुदत वाढ देण्यात आली असल्याचे मुंडे म्हणाले. उर्वरित शेतकरी बांधवांनी आपला विमा अर्ज 3 ऑगस्टच्या आत ऑनलाईन भरुन घ्यावा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं. 


ईतर संबंधित बातम्या : 


Dhananjay Munde : आत्तापर्यंत दीड कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज भरले, कृषीमंत्री धनंजय मुंडेंची माहिती