Nashik News : देशातील पहिल्या हायब्रीड रॉकेट मिशनमध्ये (Rocket Mission) नाशिकच्या (Nashik) 25 विद्यार्थ्यांनी सहभागी होत शहरासह जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. तर देशभरातील सहावी ते बारावीच्या पाच हजार विद्यार्थ्यांनी मोहिमेत सहभाग नोंदविला. याच सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल 150 पिको ग्रह तयार करण्यात येऊन ते अवकाशी सोडण्यात आले.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन, डॉ. मार्टिन फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडिया (Space Zone India) यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिले हायब्रीड रॉकेट मिशन तयार हाेत आहे. देशभरातील इयत्ता सहावी ते बारावीच्या 5 हजार विद्यार्थ्यांनी एकूण 150 पिकाे सॅटेलाइट (Pico Satellite) विकसित केले. महत्त्वाचे म्हणजे, उपग्रह अवकाशात यशस्वीरीत्या सोडण्यात आले. नाशिकच्या 25 विद्यार्थ्यांनी या माेहिमेत सहभागी हाेऊन संशाेधक वृत्तीला बळकटी दिली. नाशिकच्या प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल, धनलक्ष्मी बाल विद्यामंदिर व ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक संस्थेच्या महिरावणी (Mahiravani) येथील मातोश्री गि. दे. पाटील माध्यमिक विद्यालयाच्या बालवैज्ञानिक कृतिका खांडबहाले आणि ऋतुजा काशीद या विद्यार्थिनींनी पिको उपग्रह निर्मितीत सहभाग घेतला.
तसेच नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिरावणी येथील ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक संस्थेच्या महिरावणी येथील मातोश्री गि. दे. पाटील माध्यमिक विद्यालयाच्या आठवीतील बालवैज्ञानिक कृतिका खांडबहाले व नववीची ऋतुजा काशीद या विद्यार्थिनींचा त्यात समावेश आहे. या दोघींनी देशात महिरावणी शाळा व गावाचे नाव उज्ज्वल केले असून, विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यावेळी महिरावणी शाळेच्या कृतिका खांडबहाले, ऋतुजा काशीद यांनी पालकांसह उपस्थित राहून पट्टीपलम् येथील कार्यशाळेत पिको सॅटेलाइटची यशस्वी चाचणी केली. त्यांनी तयार केलेले पिको सेटॅलाइट हे आकाशात उंचावर जाऊन काही काळ तेथील माहिती गोळा करू शकतील.
'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये नोंद....
दरम्यान राज्यातील पहिली बालवैज्ञानिकांची कार्यशाळा पुणे येथील एमआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे आयोजित करण्यात आली होती. डॉ एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशन 2023 साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नामवंत शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 20 जानेवारी 2023 रोजी पुणे येथे एक दिवसीय विभागीय कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी 150 'पिको सॅटेलाइट' प्रत्यक्षरीत्या बनविले होते. या उपक्रमाने एकूण 5 रेकॉर्ड केले असून याची नोंद 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये नोंद घेण्यात आली आहे. मुलांनी तयार केलेले पिको सॅटेलाइट आकाशात उंचावर जाऊन काही काळ तेथील माहिती संकलित करणार असल्याने आगामी उपक्रमासाठी ते उपयुक्त ठरणार आहे.