Nashik Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) नाशिक विभाग पदवीधर (Nashik Padvidhar Election) मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 29 उमेदवारांनी 44 नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती. त्यापैकी सात उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे नामंजूर झाली आहेत, याबतची माहिती सहा.निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त रमेश काळे यांनी दिली आहे.


महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक (Nashik) विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवार दि.12 जानेवारी, 2023 रोजी  20 उमेदवारांनी 31 नामनिर्देशन पत्र सादर केले असून आत्तापर्यंत 29 उमेदवारांनी 44 नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. मात्र नामनिर्देशन पत्रे दाखल करणाऱ्या 29 उमेदवारांपैकी सात उमेदवारांचे नामनिर्देशन पत्रे नामंजूर झाली असून 22 उमेदवार शिल्लक आहेत. यामध्ये सोमनाथ नाना गायकवाड, भागवत धोंडिबा गायकवाड, सुनील शिवाजी उदमळे, इंजि. शरद मांगा तायडे, राजेंद्र मधुकर भावसार, यशवंत केशव साळवे, छगन भिकाजी पानसरे या उमेदवारांची नामनिर्देशन अर्ज बाद करण्यात आले आहेत.  


दरम्यान भागवत धोंडीबा गायकवाड यांनी अपक्ष म्हणून दोन नामनिर्देशन पत्र सादर केले होते. शरद मंगा तायडे यांनी बहुजन समाज पार्टी, नाशिक या पक्षातून दोन नामनिर्देशन पत्रे सादर केले आहेत. राजेंद्र मधुकर भावसार यांनी धुळ्यातून, यशवंत केशव साळवेनाशिक येथून, छगन भिकाजी पानसरे यांनी अहमदनगर मधून, सुनिल शिवाजी उदमळे यांनी अहमदनगर येथून अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले होते. या सात उमेदवारांचे अर्ज सहा.निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे यांनी छाननी करून नामंजूर करण्यात आले आहेत. दरम्यान आता नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी 22 उमेदवार रिंगणात असून सुरेश भीमराव पवार, दादासाहेब हिरामण पवार, रत्न कचरू बनसोडे हे तीन उमेदवार नवीन पक्षांकडून निवडणूक लढवीत असल्याचे सांगण्यात आले आहे. 


हे आहेत आताचे उमेदवार 
नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यामध्ये नितीन नारायण सरोदे,नाशिक व संजय एकनाथ माळी,जळगाव, राजेंद्र दौलत निकम, नाशिक (अपक्ष). डॉ.सुधीर सुरेश तांबे, पनवेल, जि.रायगड (अपक्ष), पोपटराव सीताराम बनकर, अहमदनगर यांनी अपक्ष, बाळासाहेब घोरपडे, नाशिक अपक्ष. अविनाश महादू माळी, नंदूरबार, इरफान मोहमंद इसाक, नाशिक (अपक्ष). सुभाष राजाराम जंगले,अहमदनगर व अमोल बाबासाहेब खाडे, अहमदनगर यांनी प्रत्येकी दोन (अपक्ष). धनराज देविदास विसपुते, धुळे (भारतीय जनता पक्ष). तसेच सत्यजित सुधीर तांबे, अहमदनगर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व अपक्ष). अनिल शांताराम तेजा (अपक्ष) . तसेच धनजंय कृष्णा जाधव,अहमदनगर (भारतीय जनता पक्ष व अपक्ष). बाळासाहेब रामनाथ घोरपडे, नाशिक (भारतीय जनता पक्ष)