Nashik News : नाशिक (Nashik) महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Nashik NMC) यांनी थेट 'सलामे इश्क मेरी जान जरा कबूल कर लो' हे गाणे गाऊन सर्वांनाच अचंबित केले आहे. त्याचबरोबर मनपातील अनेक अधिकाऱ्यांनी यावेळी गाणे गात सांस्कृतिक कार्यक्रमाला रंगत आणली. 


दरवर्षी महापालिकेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला जातो. यंदा प्रशासकीय राजवटीत हा वर्धापन दिन वेगळ्याच थाटात संपन्न झाल्याचे बघायला मिळाले. विशेष म्हणजे महापालिकेत नेहमी ज्यांचा दरारा बघायला मिळतो, त्या महापालिका आयुक्तांची एक वेगळीच कला अधिकारी आणि कर्मचारी वर्गासह नाशिककरांनी अनुभवली. सोमवारी सायंकाळी कालिदास नाट्यगृहात संगीत रजनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या कार्यक्रमात 'सलामे इश्क मेरी जान जरा कबूल कर लो' गाणे गाताच उपस्थितांनी गाण्याला उस्फुर्त दाद दिली. 


दरम्यान 7 नोव्हेंबर 1982 रोजी नाशिक महानगरपालिकेची स्थापना झाली. तेव्हापासून आतापर्यंत नाशिक महानगरपालिका नाशिककरांच्या सेवेत आहे. या महानगरपालिकेला आता 40 वर्ष पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर नाशिक मनपामध्ये नेहमीच महापालिकेत धीर गंभीर रूपात वावरणाऱ्या महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकंडवार यांनी स्टेजवर येत असते. माळी हातात घेत हिंदी गाण्याने सुरुवात केली आणि सर्वांनाच आश्चर्य चकित केले. त्यांनी गायला सुरुवात करतात संपूर्ण कालिदास कला मंदिरात टाळ्यांचा कडकडाट झाला. मनपा आयुक्तांसह अनेक मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत कार्यक्रमाला रंगत आणली. 


नाशिक महापालिकेच्या चाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गेल्या वर्षभरापासून नाशिक महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने दरवर्षीपेक्षा यंदा महापालिकेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाच्या वर्धापन दिनानिमित्त अनेक स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते. मनपा आयुक्तांनी अमिताभ बच्चन अभिनेता आणि किशोर कुमारच्या स्वरातील 'सलामे इष्क  गाण्याने सुरुवात केल्याने कार्यक्रमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. मनपा आयुक्तांबरोबर आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड तसेच प्रख्यात गायिका रागिनी कामतीकर यांनी यावेळी साथ दिली. त्याशिवाय शहर अभियंता शिवकुमार वंजारी, उपअभियंता रवी बागुल यांनी सादर केलेला 'मदहोश दिल की धडकन' या गाण्याला देखील प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. त्याशिवाय सुनील आव्हाड, मयूर पाटील, समीर रकते यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी अत्यंत तालासुरात गाणी सादर करत उपस्थित त्यांची मने जिंकली