Mumbai Local Megablock: मुंबईकरांनो, आज रविवार सुट्टीचा दिवस. आज घराबाहेर पडणार असाल आणि त्यातही मुंबई लोकलनं (Mumbai Local News) प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच. रविवारी ट्रान्सहार्बर मार्गावर (Trans Harbour) मेगाब्लॉक आहे, तर मध्य (Central Railway), पश्चिम (Western Railway) आणि हार्बर (Harbour Railway) मार्गावर कुठलाही मेगाब्लॉक (Megablock News) नसणार आहे. त्यामुळे या रविवारी रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) प्रवाशांना दिलासा देण्यात आला आहे.
मध्य रेल्वेकडून परिपत्रक जारी करत यासंदर्भात माहिती देण्यात आली. 28/05/2023 रोजी देखभालीचे काम करण्यासाठी मध्य रेल्वे ट्रान्स-हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सकाळी 10.35 ते दुपारी 4.07 वाजेपर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या सर्व डाऊन मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सकाळी 10.25 ते दुपारी 4.09 वाजेपर्यंतच्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेवरही मेगाब्लॉक घेण्यात आला होता. शनिवारी मध्यरात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला होता. माहीम ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आलं होता. आज रविवारी मात्र पश्चिम रेल्वेवर दिवसभरात कोणताही ब्लाॅक नसेल, असं रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
मेन लाईन आणि हार्बर लाईनवर मेगाब्लॉक नाही
मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार नाही. हे ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती, या कामांसाठी आज ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे.