Mumbai Harbour Local Line Updates: मुंबई लोकलच्या हार्बर मार्गावर (Harbour Line) शनिवारी आणि रविवारी 14 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. जोगेश्वरी (Jogeshwari) आणि गोरेगाव (Goregaon) स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर मध्यरात्री 12 ते दुपारी 2 पर्यंत विशेष मेगाब्लॉक (Special Megablock) असणार आहे. जोगेश्वरी आणि गोरेगावदरम्यान पुलाच्या कामासाठी (रि-गर्डरिंग) पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे वांद्रे (Bandra) आणि गोरेगावदरम्यान (Goregaon) हार्बर मार्गावरील काही अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. लांब पल्ल्याच्या काही गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
वांद्रे आणि गोरेगाव दरम्यान हार्बर लाईनवरील उपनगरीय सेवा खालील प्रमाणे असतील
- शनिवारी रात्री 11.55 ते रविवारी दुपारी 1.55 पर्यंत वांद्रे ते गोरेगाव हार्बर मार्गावरील डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहतील.
- शनिवारी रात्री 11.33 ते रविवारी दुपारी 2.05 पर्यंत गोरेगाव ते वांद्रे अप लोकल फेऱ्या रद्द राहतील.
शनिवारी शेवटची लोकल
- सीएसएमटीपासून गोरेगावसाठी - रात्री 10.54
- गोरेगावपासून सीएसएमटीसाठी - रात्री 11.06
रविवारी पहिली लोकल
- गोरेगावपासून सीएसएमटीसाठी - दुपारी 2.33
- सीएसएमटीपासून गोरेगावसाठी - दुपारी 2.18
- रेल्वे विभागाने हे पॉवर ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आणि सुरक्षिततेसाठी घेतले आहेत.
हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक
डाउन हार्बर मार्गावर (बेलापूर/नेरुळ-खारकोपर मार्ग वगळून) पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मेगा ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहील.
ब्लॉकमुळे लोकल बदल
- पश्चिम रेल्वेवरील अप-डाऊन लोकल फेऱ्या अंधेरी ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार.
- मध्य रेल्वेवरील हार्बर मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या वांद्रे स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार.
- चर्चगेट-बोरिवलीदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अंधेरी स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार. अंधेरी रेल्वे स्थानकातूनच चर्चगेट-बोरिवली दरम्यान लोकल रवाना होतील.
- चर्चगेट ते विरार दरम्यान अतिरिक्त लोकल चालवण्यात येणार.
- ब्लॉक वेळेत मेल-एक्स्प्रेस 15 मिनिटे विलंबाने धावणार.
हेही वाचा: