Nashik-Pune Railway : महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पो रेशनने पुणे नाशिक सेमी हायस्पीड (Nashik-Pune railway) रेल्वे संदर्भात रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करून त्याच्या पूर्ततेसाठी आवश्यक कार्यवाही करावी. त्यानंतर महारेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत रेल्वेमंत्र्यासमोर या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात येईल आणि प्रकल्प मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी स्पष्ट केले. 


गेल्या अनेक दिवसांपासून प्रस्तावित असलेला नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प सुरु असून बारगळण्याच्या स्थितीत आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी हा प्रकल्प रेल कम रोड धर्तीवर साकारला जाणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे या प्रकल्पाला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, याबाबत हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी पुन्हा रेल्वेमंत्र्याशी भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे सध्यातरी हा प्रकल्प तळ्यात मळ्यात असल्याचे दिसून येत आहे. 


दरम्यान मंत्रालयात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महारेलच्या (Maharail) विविध प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे संदर्भात प्रकल्पाची उपयुक्तता पटवून देण्यासाठी येत्या काही दिवसांत पुन्हा रेल्वेमंत्र्यांची भेट देणार आहोत. त्यांना या प्रकल्पाची व्यवहार्यता पटवून दिली जाईल. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्ण करताना या मार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीनेसर्व ती काळजी घेतली गेली आहे. या संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचे काहीही आक्षेप असतील तर त्याचे निराकरण करून हा प्रकल्प मंजूर होईल, यासाठी आवश्यक ती पाऊले उचलली जातील, असे फडणवीस यांनी या बैठकीत सांगितले. 


नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करुन त्याच्या पूर्ततेसाठी आवश्यक कार्यवाही करावी. त्यानंतर त्वरित महारेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसमोर या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात येईल आणि प्रकल्प मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पुणे - नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे संदर्भात प्रकल्पाची उपयुक्तता पटवून देण्यासाठी येत्या काही दिवसात पुन्हा रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार आहोत. त्यांना या प्रकल्पाची व्यवहार्यता पटवून दिली जाईल. पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्ण करताना या मार्गावर सुरक्षिततेत्या दृष्टीने सर्व ती काळजी घेतली गेली आहे. यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्रालयाचे काहीही आक्षेप असतील तर त्याचे निराकरण करुन हा प्रकल्प मंजूर होईल, यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
            
याशिवाय, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर (इटवारी)-नागभीड प्रकल्पाच्या कामांसंदर्भातही माहिती घेतली. या मार्गाचे काम प्रगतीपथावर असून इटवारी येथील रेल्वे स्टेशनचे काम पूर्ण झाल्याची माहिती महारेलच्या अधिकाऱ्यांनी दिली. या मार्गावर ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी महारेलच्या अधिकाऱ्यांनी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प, नागपूर (इटवारी)-नागभीड मार्ग आणि राज्यातील विविध ठिकाणच्या रेल्वेमार्गावरील उड्डाणपुलांच्या कामांच्या सद्यस्थितीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.