Nashik News : अखेर गोदावरीला (Godawari) न्याय मिळणार असून लवकरच गोदावरी नदी प्रदूषण होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. पुणे येथे झालेल्या दोन दिवसीय शहरी नद्यांच्या आंतरराष्ट्रीय बैठकीत नाशिकचा समावेश 'रिव्हर सिटीज' (नद्यांचे शहर) म्हणून करण्यात आला असून सन 2027 पर्यंत गोदावरीचे पुनरुज्जीवन करण्याची योजना त्यात आहे.


पुणे (Pune) येथे दोन दिवशीय शहरी नद्यांच्या (River) व्यवस्थापनासाठी धारा 2023 ही आंतरराष्ट्रीय बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत शहरी नद्यांच्या व्यवस्थापनासाठी धोरणे ठरविणाऱ्या रिव्हर सिटीज अलायन्समध्ये नाशिकचा समावेश केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या उपस्थितीत झाला. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंग शेखावत (Gajendra Singh Shekhavat) यांनी केले. ते म्हणाले, भारत जल संबंधित क्षेत्रात जगात सर्वाधिक 240 बिलियन निधी खर्च करत आहे. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी गोदावरीला मिळणाऱ्या सर्व 19 नाल्यांमधून येणारे दूषित पाणी थांबवून त्यावर प्रक्रिया करण्यात येईल. या कामी नीरी, तसेच आयआयटी पवई यांची मदत घेण्यात येत आहे. 


दरम्यान नदीकिनारी सौंदर्यीकरण करण्यासाठी नमामी गोदावरी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. साधारणत: तीन महिन्यांमध्ये हा अहवाल पूर्ण होईल. त्यानंतर जलशक्ती मंत्रालयाकडे सादर करण्यात येईल. नमामी गोदावरी अंतर्गत प्रस्तावित करण्यात येणारी सर्व कामे आगामी 2027 च्या सिंहस्थापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. या दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय बैठकीत देशातील नवीन 12 शहरे 'रिव्हर सिटीज अलायन्स'चे सदस्य झाले आहेत. नव्या शहरांमध्ये राज्यातील नाशिक आणि नांदेड- वाघाळा या दोन शहरांचा समावेश आहे. 


देशातील 30 शहरांच्या सहभा गातून शहरी नद्यांच्या व्यवस्थापनासाठी 25  नोव्हेंबर 2021 ला रिव्हर सिटीज अलायन्सची सुरुवात झाली. गेल्यावर्षी ही सदस्य संख्या 95 पर्यंत पोहचली आणि आता 107 शहरे आरसीएचे सदस्य झाले आहेत. सदस्य शहरांचे आयुक्त, कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी शहरी नद्यांच्या व्यवस्थापनाबाबत चर्चा आणि चांगल्या कार्यपद्धतीचे सह-शिक्षण होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आरसीएचा उद्देश आहे.


आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले... 


गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी गोदावरीला मिळणाऱ्या सर्व 19 नाल्यांमधून येणारे दूषित पाणी थांबवून त्यावर प्रक्रिया करण्यात येईल. यामध्ये परिसरातील सर्व नागरिकांचा सक्रीय सहभाग घेऊन लोकसहभागातून हे काम पूर्ण करण्यात येईल. या कामी नीरी तसेच आयआयटी पवई यांची मदत घेण्यात येत आहे. या व्यतिरिक्त दूरगामी परिणाम करणाऱ्या उपाययोजना, तसेच नदीकिनारी सौंदर्यीकरण करण्यासाठी नमामी गोदावरी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे. साधारणतः तीन महिन्यांमध्ये हा अहवाल पूर्ण होईल. त्यानंतर जलशक्ती मंत्रालयाकडे सादर करण्यात येईल. नमामी गोदावरी अंतर्गत प्रस्तावित करण्यात येणारी सर्व कामे आगामी 2027 च्या सिंहस्थापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे आयुक्तांनी सांगितले.