Nashik Crime : नाशिकमध्ये (Nashik) गुन्हेगारी थांबायचं नाव घेत नसताना आता नाशिक शहरात पाहुणा आलेल्या एका युवकाचा निघृणपणे खून (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना देवळाली कॅम्प (Deolali Camp) परिसरात घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस संशयितास शोध घेत आहेत. 


मूळचा हिंगोलीचा (Hingoli) रहिवासी असलेला तरुण आपल्या बहिणीला देवळी कॅम्प परिसरातील भगूर शिवारात सासरी सोडण्यासाठी आला होता. मात्र अज्ञात इसमांकडून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवार रात्री उघडकीस आली आहे. गणेश पंजाब पठाडे (Ganesh Pathade) असे या मृत तरुणाचे नाव आहे. देवळाली कॅम्प पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेश पठाडे हा दिवाळीसाठी हिंगोली आपल्या गावी आलेल्या बहिणीला म्हणेजच प्रज्ञा सिद्धार्थ कांबळे यांना सासरी भगुर येथे सोडण्यासाठी आला होता. सकाळी नाश्ता झाल्यानंतर त्याच्या मोबाईलवर फोन आला आणि तो बोलत घराबाहेर पडला. मात्र त्यानंतर कुठे गेला कोणालाच माहिती झाले नाही. शिवाय सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. 


दरम्यान बहिणीने संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजता सुमारास भगूर देवळाली कॅम्प रस्त्यावर एक युवक बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती देवळाली पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह गोंदेश्वर पथक घटनास्थळी पोहोचले. तेव्हा त्यांना गणेश पठाडे हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला पोलिसांनी तातडीने नाशिकरोडवरील देवळाली छावणी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. प्रथमोपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे लक्षात येताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना त्याला जिल्हा रूग्णालयात  दाखल करण्यास सांगितले.  


त्यानुसार देवळाली पोलिसांनी तात्काळ छावणी रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून गणेशला जिल्हा रुग्णाला दाखल केले. जिल्हा रुग्णालयाच्या अति दक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू असताना रात्री उशिरा वैद्यकीय अधिकारी नेत्यास महेश घोषित केले. दरम्यान दोन्ही गुन्हे शाखांच्या पथकांसह देवळाली कॅप पोलिसांच्या पथकाने मयत गणेशच्या संशयित मारेकऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. संशयित मारेकऱ्यांची ओळख पटली असून तो पोलिसांच्या यादीवरील सराईत गुन्हेगार असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तसेच युवकाची बहीण तक्रारदार बहीण प्रज्ञा कांबळे यांनी त्याच्या नात्यातील एका युवकावर खुनाचा संशय व्यक्त केला आहे. त्यानुसार पोलिसांची तपासाची चक्रे फिरवली असून रात्री उशिरापर्यंत संशयितास शोध सुरू होता.


मालमत्तेच्या वादातून खुनाचा संशय
दरम्यान मयत युवक गणेश हा नाशिक शहरात नवखा असल्याने त्याची शहरात ओळख नव्हती. त्यामुळे बहिणीने केलेल्या तक्रारीनुसार त्याचा खून हा जवळच्या नातेवाईकांनी केला असावा असा कयास बांधला जात आहे. मालमत्तेच्या वादातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी प्रथमदर्शनी व्यक्त केला आहे.