CM Eknath Shinde : नाशिकच्या (Nashik) कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना अचानक काही विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्याने गोंधळ उडाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हि बाब लक्षात येताच त्यांनी भाषण थांबवून 'विद्यार्थ्यांना काय पाहिजे, त्यांना व्यासपीठावर घेऊन या' असे आदेश दिले. त्यांनतर पोलिसांनी विद्यार्थ्यांना व्यासपीठाकडे घेऊन गेल्यानंतर गोंधळ निवळला. आणि पुन्हा मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरवात केली. 


आदिवासी विकास विभागाकडून जनजातीय गौरव दिवस आणि आदिवासी सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे तर घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांचे व्यासपीठावर बोलून घेतले. त्यांना त्रास देऊ नका व्यासपीठावर घेऊन या, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना यावेळी दिले. आपल्या मागण्यांसाठी हे विद्यार्थी कार्यक्रमादरम्यान घोषणाबाजी करत होते दरम्यान मुख्यमंत्र्यांचे विद्यार्थी कडे लक्ष जातच त्यांनी आपले भाषण मध्येच थांबून त्यांना काय पाहिजे त्यांना विचारा त्यांना व्यासपीठावर घेऊन या असे आदेश दिले त्यानंतर पोलीस या विद्यार्थ्यांना व्यासपीठाच्या दिशेने घेऊन गेले.


नाशिकमध्ये आज ईदगाह मैदानावर बिरसा मुंडा (Birsa Munda) यांच्या जयंतीच्या निमित्ताने जनजातीय गौरव दिवसाचे (Adivasi Gaurav Divas) आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांचे भाषण सुरू असताना अचानक कार्यक्रमादरम्यान पाठीमागील काही विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. 'आमच्या मागण्या मान्य करा, आम्हाला न्याय द्या, आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय हवा, अशा प्रकारच्या घोषणा हे विद्यार्थी देत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू होते. घोषणांचा आवाज त्यांच्या कानावर जातच त्यांनी भाषण थांबवले. त्या विद्यार्थ्यांना व्यासपीठावर घेऊन येण्यास पोलिसांना सांगितले. दरम्यान पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर घोषणा बंद झाल्या. त्या विद्यार्थ्यांना व्यासपीठावर घेऊन जाण्यात आले. 


महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून जनजाती गौरव दिवस आणि आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी विद्यार्थ्यांनी अचानक घोषणा देण्यास सुरुवात केली.  'आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय द्या, पीएचडी धारकांना न्याय द्या' अशा पद्धतीच्या घोषणा या विद्यार्थ्यांकडून दिल्या जात होत्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाषण मध्येच,थांबून त्यांना वेळा त्रास देऊ नका, व्यासपीठावर घेऊन या, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी तैनात असलेल्या पोलिसांनी विद्यार्थ्यां जवळ जात त्यांना शांत केले. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना व्यासपीठाकडे घेऊन गेले. दरम्यान कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. 


आदिवासी भागात कनेक्टिव्हिटी वाढविणार ... 
राज्य सरकार पुढील काळात कालबद्ध कार्यक्रम याकडे यासाठी तयार करेल आणि कनेक्टिव्हिटी प्रत्येक ठिकाणी मिळेल असा प्रयत्न राज्य सरकारचा असेल. यामध्ये न जोडलेली गाव पाडे वाड्यावर वस्ती यांना रस्त्याने जोडणारे तसेच जे रस्ते सहामायी आहेत, ते बारमाही करण्यासाठी राज्य सरकार पुढील काळात कालबद्ध कार्यक्रम तयार करेल आणि कनेक्टिव्हिटी प्रत्येक ठिकाणी मिळेल असा प्रयत्न राज्य सरकार करेल. त्याचबरोबर केंद्र सरकार प्रमाणे इतर राज्यात देखील आदिवासींसाठी स्वतंत्र अशा महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची आवश्यकता असून यासाठी सरकार सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.