मुंबई : आयकर विभागाने (Income Tax Department ) मोठी कारवाई केली आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azmi ) यांचे निकटवर्तीय गणेश गुप्ता आणि त्यांच्या पत्नी आभा गुप्ता यांच्या संबंधित जवळपास 30 ठिकाणी छापे टाकले आहेत. अबू आझमी महाराष्ट्रात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आहेत. तर गणेश गुप्ता हे समाजवादी पक्षाचे सचिव होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही छापेमारी बेहिशोबी मालमत्तेच्या संदर्भात आहे. मुंबई, वाराणसी, कानपूर, दिल्ली, कोलकाता आणि लखऊ येथे ही छापेमारी सुरू आहे.  
 
प्राप्तिकर विभागाने वाराणसी येथील विनायक निर्मल लिमिटेड या कंपनीवरही छापा टाकला आहे. या कंपनीत आभा गुप्ता यांनी मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता निर्माण केल्याचा आरोप आहे. काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी जीएसटीच्या दिल्ली पथकाने छापा टाकला होता. छापा टाकणारे पथक काही कागदपत्रे शोधत असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या  आयकर पथकाची शोधमोहीम सुरू आहे. कुलाब्यातील कमल मॅन्शनवरही आयटीने छापा टाकला आहे. आभा गुप्ता आणि अबू आझमी यांचे कार्यालय येथे आहे.

  


आयकर विभागाने अबू आझमी यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत या पूर्वी दिले होते. परंतु तरीही आझमी सावध झाले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईसह जवळपास 30  ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर समाजवादी पक्षाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.  


आयकर विभागाने एसएनके पान मसाला बनवणाऱ्या कानपूर येथील कुरेले ग्रुप देखील छापा टाकला आहे. याबरोबच कुरेले ग्रुपच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या दिल्लीतील जागेवरही छापे टाकण्यात आले आहेत. छाप्यादरम्यान आयटी पथक कुरेल ग्रुपची सर्व कागदपत्रे तपासत आहे.  


कोण आहेत आभा गुप्ता?
आभा गुप्ता या अबू आझमी यांच्या जवळच्या आणि सपाचे सरचिटणीस गणेश गुप्ता यांच्या पत्नी आहेत. गणेश गुप्ता यांचे निधन झाले आहे. सध्या आभा गुप्ताच्या अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. वाराणसीतील विनायक निर्माण लिमिटेड कंपनीच्या परिसरात छापे टाकण्यात आले आहेत. आभा गुप्ता यांनी कंपनीत मोठी गुंतवणूक केल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच विनायक निर्माण लिमिटेडही आयटीच्या रडारवर आहे.


महत्वाच्या बातम्या


G20 Summit: ते आले, त्यांनी पाहिलं, अन्..., पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाजवलं इंडोनेशियन पारंपरिक वाद्य; व्हिडीओ होतोय व्हायरल