Nashik PFI : नाशिकमधून (Nashik) आणखी एक महत्वाची माहिती समोर येत असून पीएफआयची (PFI) संबंध असल्याच्या संशयावरून एटीएसने (ATS) पुन्हा एकदा मालेगावातून (Malegoan) एकाला अटक केली आहे. मौलाना इरफान नदवी (Maulana Irfan Nadvi) असे या व्यक्तीचे नाव असून त्यास मुंबईच्या दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली आहे. मौलाना त्यामुळे नाशिक जिल्ह्यात पीएफआय संघटनेची पाळेमुळे रुजल्याचे या प्रकरणावरून दिसून येत आहे.
सप्टेंबर महिन्यांपासून देशभरात छापेमारी सुरु झाल्याने पीएफआय संघटना चर्चेत आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यातून अनेकांना एटीएसने ताब्यात घेतले होते. यांत्रिक काही संशयितांना न्यायालयात हजर केले असताना धक्कादायक खुलासे समोर आले होते. त्यानंतर नाशिकमधून पुन्हा एका पदाधिकाऱ्याला एटीएसने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे पीएफआयची पाळीमुळे नाशिकमध्ये खोलवर रुसल्याचे दिसून येत आहे. इमाम कौन्सिलचे अध्यक्ष मौलाना नदवी यांना ताब्यात घेण्यात आला असून पुन्हा एकदा पीएफआयचे मालेगाव कनेक्शन अधोरेखित झाले आहे.
साधारण दीड महिन्यांपूर्वी राष्ट्रीय तपास संस्था व एटीएसने देशभरात छापेमारी केल्यानंतर केंद्र सरकारने देखील गंभीर दाखल केले. पीएफआय संघटनेवर बंदी घातली. त्यानंतर राज्यातील अनेक भागातून देखील पीएसआयच्या पदाधिकाऱ्यांना एटीएसने ताब्यात घेतले. तर राज्यातील जिल्ह्यात असलेल्या पीएफआयच्या कार्यालयांना देखील टाळे ठोकण्यात आली. मात्र त्यानंतर देखील एटीएसची कारवाई सुरू असून नाशिकमधून पीएफआयच्या आणखी एकाला ताब्यात घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रकरणाची नाशिकमधील व्याप्ती अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे.
अशात पीएफआयसी संबंधित असल्याच्या संशयावरून एटीएसने मालेगावातून पुन्हा एकाला अटक केली आहे. मौलाना इरफान नदवी असे त्याचे नाव असून तो इमाम कौन्सिलचा अध्यक्ष आहे. एक महिना अगोदर त्यास मालेगाव शहर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. मात्र त्यानंतर एटीएसची करडी नजर मौलाना इरफान नदवी याच्यावर होती. त्यानुसार संशयास्पद हालचाली आढळून आल्याने एटीएसने त्यास अटक केली आहे. नदवी हे इमाम कौन्सिलचे अध्यक्ष असून एक महिन्या अगोदर त्यांना मालेगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली होती. त्यांच्यावर एसटीएस नजर असल्याने आज अखेर त्यांना अटक करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये पीएफआयची पाळेमुळे
इस्लामिक संघटना म्हणून नावारूपास आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संबंधित कार्यालय, व्यक्ती आणि महत्त्वपूर्ण ठिकाणांवर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यांपासून सुरुवात करण्यात आली. राज्यातून नाशिक, नवी मुंबई, भिवंडी, पुणे, कोल्हापूर, जळगाव, परभणी, औरंगाबाद, नांदेड या ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. या ठिकाणाहून पीएफआयच्या सदस्यांना ताब्यात घेण्यात आले होते. तेव्हापासून अद्यापही एटीएस पथक पी एफ आय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार आतापर्यंतच्या कारवाईनंतर नाशिकमध्ये पीएफआय संघटनेची पाळेमुळे रुजल्याचे निदर्शनास येत आहे.