Amalenr MangalGrah Mandir : एकीकडे राज्यातील मंदिरप्रवेशावरून (Maharashtra Mandir) वाद सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwer Mandir) प्रकरण चांगलेच गाजले. त्यानंतर तुळजापूर मंदिर बाहेर प्रवेशासाठी नियमावलीचा फलक लावण्यात आल्याने खळबळ उडाली होती. आता प्रसिद्ध अमळनेर येथील मंगळग्रह मंदिराबाहेर (MangalGrah Mandir) अशाच पद्धतीचा फलक चर्चेत असून तो सहा महिन्यापूर्वी लावण्यात आला आहे. 


गेल्या काही दिवसांपासून मंदिर प्रवेशाचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. नुकताच त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथील मंदिर प्रकरणावरून चांगलाच वाद रंगल्याचे दिसून आले. तो वाद मिटत नाही तोच तुळजापूर देवी मंदिराबाहेर (Tuljapur Devi Mandir) प्रवेश नियमावलीचा फलक लावण्यात आला. यात उत्तेजक कपडे, तोकडे कपडे परिधान करून नये, अंग प्रदर्शन करून नये, भारतीय संस्कृती जपावी अशा आशयाचा फलक लावण्यात आला होता, मात्र 24 तासांत प्रशासनाने हा फलक काढून टाकण्याचे आदेश दिले. मात्र आता जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील मंगळग्रह मंदिराबाहेर अशाच आशयाचा फलक दिसून येत आहे. भाविकांसाठी लावण्यात आलेल्या उत्तेजक कपडे, तोकडे कपडे परिधान करून नये, अंग प्रदर्शन करून नये, भारतीय संस्कृती जपावी असाच फलक लावण्यात आल्यामुळे चर्चेचा विषय बनला आहे. 


दरम्यान, अमळनेरसह (Amalenr) इतर परिसरातील भाविक मोठ्या संख्येने मंगळग्रह मंदिर दर्शनासाठी येत असतात. यावेळी अनेक महिलांशी संवाद साधल्यानंतर 'तोकडे पकडे घालून, अंगप्रदर्शन करण आणि मंदिरात येणं, हे भारतीय संस्कृतीला शोभून दिसणार नाही. त्यामुळे हा फलक योग्य असल्याचं सांगत मंदिर संस्थानच्या फलक लावण्याच्या निर्णयाचे समर्थन महिलांनी केलं आहे. प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीने ठरल्याप्रमाणे आपण कपडे परिधान करतो, त्याच प्रमाणे मंदिराच पावित्र्य जपण्यासाठी, संस्कृती जपण्यासाठी मंदिराचा हा निर्णय योग्य असल्याचं तरुणी धनश्री हिने बोलताना सांगितलं आहे. 


फलक लावणे योग्यच 


कपडे आणि देवावरील श्रद्धा यांचा थेट संबंध नाही. मात्र संस्कृती जपण्यासाठी घेतलेला हा निर्णय योग्यच आहे, अशी प्रतिक्रिया एका तरुणीने दिली आहे. भारतीय संस्कृती ज्या आधारावर टिकली आहे, त्याचा एक भाग म्हणजे आपले कपडे. मंदिरात अंगप्रदर्शन करणारे कपडे घातले, त्याचा परिणाम होतो, इतरांचे लक्ष वेधून घेतात, त्यामुळे वातावरण हे दूषित होत, अस सुद्धा धनश्री हिने म्हटल आहे. आणि त्यामुळेच मंदिराचे नियम पाळले पाहिजे, असं आवाहन तिने इतरांना केलं आहे. त्यामुळेच फलक लावणे योग्यच असल्याचं तीन म्हटलं आहे. 


मंदिराचे ट्रस्टी दिगंबर महाले म्हणाले... 


दरम्यान, फलक लावण्याच्या विषयावर मंदिराचे ट्रस्टी दिगंबर महाले यांनी बोलताना म्हटल आहे की, राज्यात अशा प्रकारचे फलक हा पहिल्यांदा मंगळग्रह या मंदिरावर लावण्यात आला. त्यांनतर इतरांनी त्याच अनुकरण केलं. प्रत्येक देशाची एक संस्कृती आहे, त्याच प्रमाणे आपली सुद्धा संस्कृती आहे, कुणी कसेही कपडे  घालावे, त्याला विरोध नाही. मात्र मंदिरात तोकडे, उत्तेजक तसेच अंगप्रदर्शन करणारे कपडे घालण्यास आमचा विरोध आहे. त्यासाठी आम्ही तो नियम केला असून हा फलक लावला असल्याचं दिगंबर महाले यांनी म्हटलं आहे. फॅशनच्या विरोधात नाही, कुणाच्याही व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातलेला नाही,  शाळेत मुलांना ड्रेस कोड असतो. त्यावर आपण काही बोलत नाही, कारण तो त्यांचा नियम आहे, त्याच प्रमाणे मंगळग्रह मंदिर याठिकाणी भारतीय संस्कृती जपण्यासाठी हा नियम आम्ही केला असून याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला तो पाळावाच लागेल, असं सुद्धा महाले यांनी म्हटलं आहे.