Har Har Mahadev : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatarapati shivaji Maharaj) जीवन चरित्रावर आधारित हर हर महादेव (Har Har Mahadev) हा चित्रपट प्रसारित करण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व मनसे 9MNS) आमने सामने आले आहेत. तर काल मनसेच्या मागणीवरून आज नाशिक (Nashik) शहरात दोन शोचे आयोजन करण्यात आल्याने राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये वाद होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर चित्रपट गृहाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. 


गेल्या दोन दिवसांपासून हर हर महादेव आणि वेडात मराठे वीर दौडले सात (Vedat Marathe Veer Daudale Sat) या दोन्ही मराठी चित्रपटांवर राजकीय वातावरण तापले आहे. याचे पडसाद नाशिकमध्ये देखील उमटले आहेत. काल राष्ट्रवादी च्या वतीने हर हर महादेव चे शो न दाखवण्याचे साठी निवेदन देण्यात आले होते तर त्याच सुमारास मनसेकडून हर हर महादेवचे शो सुरु करण्याचे निवेदन चालकांना देण्यात आले होते. त्यानंतर आज मनसेच्या मागणीला यश आले असून शहरात दोन शोचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे राष्ट्रवादीने देखील आक्रमक भूमिका घेत विरोध दर्शवला आहे. 


दरम्यान हर हर महादेव या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याची तक्रार छत्रपतींचे वंशज युवराज संभाजीराजे यांनी केल्यानंतर या चित्रपटावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. नाशिक येथील पीव्हीआर चित्रपटगृहात गेल्या तीन चार दिवसांपासून हर हर महादेव दाखवला जात असल्याची माहिती मिळाल्यावर सकाळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी चित्रपटगृह चालकाची भेट घेऊन चित्रपट दाखवण्यात येऊ नये अशी मागणी केली. तर त्याच ठिकाणी राज ठाकरे यांचा आवाज लाभलेल्या हरहर महादेव हा चित्रपट बंद केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी चित्रपटगृह चालकाला दिला. 


दरम्यान आज नाशिकमध्ये दोन शोचे आयोजन करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत आंदोलनांचा पवित्रा घेतला. राष्ट्रवादी आणि मनसे यांनी आमने सामने आल्यानंतर नाशिकच्या सिटी सेंटर मॉलमध्ये राष्ट्रवादीने पीव्हीआरकडे चित्रपट पुन्हा प्रदर्शित करू असं निवेदन हे दिलं होतं. मात्र त्यानंतर मनसेचे पदाधिकारी इथे धडकले होते आणि त्यांनी हा चित्रपट तात्काळ प्रदर्शित करा, जर तुम्ही केला नाही तर मनसे आपल्या स्टाईल आंदोलन करेल असा त्यांनी इशारा हा दिला होता. त्यानंतर आज शहरातील रेजिमेंटल प्लाझा आणि पीव्हीआर सिनेमा सिटी सेंटर मॉल येथे सायंकाळी या चित्रपटाच्या शोचे आयोजन हे करण्यात आले आहे. रेजिमेंटला सहा वाजून 55 मिनिटांनी तर सिटी सेंटरला सात वाजेचा हे शो आहेत. खरंतर आता यामुळे पुन्हा एकदा वादाची शक्यता निर्माण झाली आहे. 


स्वराज्य संघटनेने शो बंद पाडला
राष्ट्रवादी सोबत स्वराज्य संघटना ही आक्रमक झाली असून चित्रपट पुन्हा प्रदर्शित करू नये, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र मनसेच्या इशारा नंतर हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत आहे.या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांकडून देखील खबरदारी घेतली जात आहे. पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहेत. दुपारनंतर इथे मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त देऊन थेटरला सुरक्षाही पुरवली जाणार आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी, स्वराज्य संघटनेचे पुढच पाऊल काय असणार आहे हे फक्त महत्त्वाचा ठरणार आहे. स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी नाशिक-पुणे महामार्गावरील आयनॉक्स चित्रपटगृहात या चित्रपटाचे प्रसारण बंद पाडले. यावेळी चित्रपटगृहाची व्यवस्थापकाशी चर्चा करून भविष्यात अशा प्रकारचा चित्रपट प्रसिद्ध करू नये, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला होता.