Nashik News : नाशिक (Nashik) शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार अपघातांनंतर नाशिक वाहतूक पोलीस (Nashik Traffic Police) प्रशासन सतर्क झाले आहे. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी वाहतूक शाखेला शहरातील रस्त्यावरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर चालवल्यास नाशिक वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. 


एकीकडे कोरोना (Corona) काळात अनेक मार्गावरील वाहतूक बंद होती. नागरिक देखील अनेकदा पोलिसांना डावलून बेशिस्त पद्धतीने वाहन चालवत होते. मात्र आता वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पुन्हा एकदा बेशिस्त नाशिककरांवर चाप लावण्याची वेळ आल्याचे नाशिक वाहतूक विभागाने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी बैठक घेत नाशिक वाहतूक पोलिसांना सुचना दिल्या. त्यादरम्यान वाहतूक पोलिसांना नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी आणि रस्त्यावर होणारे अपघात रोखण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 


यावेळी नाईकनवरे म्हणाले की, कोरोनामुळे मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांना रोखण्यासाठी श्वास विश्लेषकांचा वापर शहरात आणि राज्यात इतरत्र मनाई मारण्यात आली होती. मात्र यापुढे वाहतूक पोलीस बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. शिवाय अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी रस्त्यावर वाहतूक पोलिसांची टीम तैनात राहील, त्यामुळे नागरिकांना वाहनचालक नियमांच्या अधीन राहून चालवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. 'अनेकदा वाहनचालक मद्य पिऊन वाहन चालविले जातात. कोरोना काळात श्वास-विश्लेषक चाचणी घेण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे श्वास विश्लेषक वापरण्याचा निर्णय आतापर्यंत घेण्यात आलेला नाही. मात्र आता जर मोटार चालक मद्यधुंद असल्याचे स्पष्ट झाले तर त्याला रक्ताचे नमुने गोळा करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले जाईल, असा इशारा देखील देण्यात आलेला आहे. 


दरम्यान दोन दिवसांपूर्वी नाशिक शहरात एका प्राध्यापकाने बेदरकारपणे कार चालवत अनेकांना उडविले. लेखानगर ते चांडक सर्कल दरम्यानच्या 5 किमी मार्गावर बेदरकारपणे वाहन चालवून तीन जणांना जखमी केले, त्यापैकी दोन गंभीर जखमी आहेत. आज दुसऱ्या देखील या प्राध्यापकाची नशा उतरली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मुंबई नाका पोलिसांच्या पथकाने 4 किमी पाठलाग केल्यानंतर कार अडवली, परंतु त्यापूर्वीच चालकाने अनेक वाहनांना धडक दिली. मुंबई नाका पोलिसांनी नाशिक शहरातील रहिवासी असलेल्या कार चालकाविरुद्ध वैयक्तिक सुरक्षेसाठी जीव धोक्यात घालणाऱ्या कृत्यामुळे दुखापत करणे या कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे.याच पार्श्वभूमीवर आता बेशिस्त वाहनचालकांना पुन्हा एकदा कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. 


ग्रामीण पोलिसांची कारवाई सुरु 
एकीकडे नाशिक पोलिसांनी बेशिस्त चालकांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला असताना दुसरीकडे नाशिक ग्रामीण पोलिसांनी या कारवाईला आरंभ केला आहे. ग्रामीण पोलिसानी विशेष दंडात्मक कारवाई सुरु केली असून तालुकानिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान ग्रामीण आठवडाभरातच अकरा लाखांचा दंडही वसूल केला आहे. तर कोविड काळात, पोलिसांनी किमान 150 मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई केली. तर गेल्या वर्षी असे केवळ आठ गुन्हे दाखल झाले होते. यंदाही संख्या कमी आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांनी लवकरात लवकर अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई अशी मागणी जोर धरू लागली आहे.