Nashik Manas Pagar : नाशिकमधील (Nashik) युवक काँग्रेसच्या (Youth Congress) नेतृत्वाला मोठा धक्का बसला असून नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार (Manas Pagar) यांचे अपघाती निधन झाले आहे. शहरातील पंचवटी डेपो परिसरात झालेल्या अपघातात त्यांचे निधन झाल्याने राजकीय वर्तुळातील युवा नेतृत्वाला मुकल्याची भवन अनेक राजकीय नेत्यांनी व्यक्त केली आहे. तर मानस पगार हे युवक काँग्रेसमधील चर्चेतला चेहरा म्हणून ओळख होती. 


एकीकडे आज नाशिक पदवीधर (Nashik Graduate Constituency) मतदारसंघातील निवडणुकीचा मतमोजणीचा दिवस आहे. आजच काँग्रेसच्या युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या पगार यांच्या अपघाती निधनाने राजकीय क्षेत्रात मोठी हानी झाली आहे. बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात त्यांनी आपले प्राण गमावले. मानस पगार हे काँग्रेस पक्षाचे नाशिकचे युवक जिल्हाध्यक्ष होते. काँग्रेसमध्ये येण्याच्या आधीपासून पुरोगामी, धर्मनिरपेक्ष विचारांसाठी त्यांनी काम सुरू केले होते. युथ फॉर डेमोक्रसी या संघटनेच्या माध्यमातून सेक्यूलर विचारांना अधिक युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते आणि त्यांचे सहकारी कार्यरत होते. भाजपकडून करणाऱ्या येणाऱ्या आरोपांना, दाव्यांना पुराव्यासहीत खोडून टाकण्याचे प्रसंगी प्रतिवाद करण्याची भूमिका मानस घेत असत. त्यांच्या लिखाणामुळे अनेक तरुण काँग्रेससोबत जोडले गेले होते.






सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांचे निकटवर्तीय मानले जात होते. काँग्रेसची भूमिका सोशल मीडियावर अत्यंत आक्रमकपणे मांडत. त्यामुळे पक्षानेही त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्यावर युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात त्यांनी आपले प्राण गमावले. त्यांच्या निधनानंतर सत्यजीत तांबे यांनी शोक व्यक्त केला आहे. पगार यांच्या निधनानंतर सत्यजीत तांबे यांनी ट्वीट करुन श्रद्धांजली अर्पण केली आहे. "माझा खंबीर पाठीराखा, सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे", असं तांबे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


पगार हे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्याने काँग्रेसची भूमिका अत्यंत आक्रमकपणे मांडत असत. त्यामुळे पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्यावर युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. तर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घराबाहेर मानस पगार यांनी दीर्घकाळ केलेल्या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली होती. दानवेंनी शेतकऱ्यांसाठी वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेमुळे त्यांच्या घरासमोर उपोषण करण्यात आले होते. त्यात मानस पगार आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या सुटकेसाठी युवक काँग्रेसने सोशल मीडियावर मोहीम सुरू केली होती.


कुठे झाला अपघात?


नाशिक शहरातील पंचवटी डेपोसमोरील उड्डाण पुलावर बुधवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात नाशिक ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचा मृत्यू झाला. अपघातामुळे एक उमदे युवा नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पंचवटी डेपोसमोरील उड्डाण पुलावर बुधवारी रात्री सव्वा बारा वाजता ही घटना घडली. मानस पगार हे सहकाऱ्यांसमवेत पिंंपळगावकडे परतत होते. मागून आलेल्या वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या मानस पगार यांचे निधन झाले. तर सहकारी सूरज मोरे हा गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मानस पगार यांचं अपघाती निधन झाल्याने समजताच राज्य आणि देशपातळीवरील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोशल मिडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे.