Tripurari Purnima : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराची (Trimbakeshwer) त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त (Tripurari Purnima) गेली 155 वर्षांची परंपरा असलेली रथयात्रा सोमवारी होत आहे. दोन वर्षानंतर यात्रा निर्बंधमुक्त असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती असणार आहे. सद्यस्थितीत रथयात्रेची तयारी सुरू असून 40 हजारांवर भाविक सहभागी होण्याचा अंदाज त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे पेशव्यांचे सरदार विंचुरकर यांनी मंदिरास दिलेल्या एकतीस फूट उंचीच्या भव्य व आकर्षक रथाला तीन बैल जोड्या जुंपल्या जाणार आहेत.


दिवाळीनंतर (Diwali) येणारा हा सर्वात मोठा उत्सव नाशिक जिल्ह्यातील (Nashik) त्र्यंबकेश्वरमध्ये दिवाळीप्रमाणे साजरा होत असतो. त्रिपुरारी पौणिमेच्या दिवशी शहरात रथोत्सव आयोजित केला जातो. भगवान शिवशंकराने त्रिपुरा सुद्धा तीन दिवस भीषण युद्ध झाले. यात शिवशंकराने त्रिपुरासुराचा वध केला तो दिवस कार्तिक शुद्ध पौर्णिमा होय. या युद्धातील विजयाचे प्रतीक म्हणून त्र्यंबकेश्वरला रथोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. भगवान शंकराचा विजय व्हावा, म्हणून माता पार्वतीने कठोर आराधना करून या पौर्णिमेच्या दिवशी वाती प्रज्वलित करून जाळल्याशिवायिका आहे. विशेष म्हणजे गेले दोन वर्ष कोरोनातील निर्बंधामुळे हा 155 वर्षाची परंपरा असलेला रथोत्सव झाला नव्हता. यंदा निर्बंध मुक्त वातावरणामुळे तयारी पाहायला मिळत असून भाविकांची संख्याही वाढणार आहे. या मार्गावर जागोजागी आरत्या केल्या जातात, पण यंदाच्या आरती न करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे. परंपरेनुसार तुंगार ट्रस्टच्या आणि देवस्थानचे चार सदस्य यांच्या व्यतिरिक्त कोणीही चढणार नाही, याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे.


असा असेल कार्यक्रम
श्री त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट त्रंबकेश्वर तर्फे दरवर्षी पूर्वपार चालत आलेल्या परंपरेनुसार याही वर्षी कार्तिक पौर्णिमा निमित्त संपन्न होणारा रसोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे रविवारी सकाळपासून ते रात्री दीड वाजेपर्यंत विशेष महापूजा पालखी सोहळा व हरिहर बेट असेल त्यानंतर सोमवारी चतुर्दशीच्या दिवशी सरदार विंचूरकर यांच्या वतीने महापूजा करण्यात येईल तर तीन माळीच्या सुमारासरी सभा सुरुवात होणार असून श्री त्रंबक राज्याची रथातून सवाद्य मिरवणूक कुशावर्त तीर्थावर महापूजा व सायंकाळी मंदिरात परतीचा प्रवासाचा कार्यक्रम असून रात्री आठ वाजता सुमारास दीपमाळ प्रज्वलन व पूजन होणार आहे. 


त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टची नियमावली 
स्थानिक ग्रामस्थान व्यतिरिक्त दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी पूर्व दिशेच्या असल्या नूतन मंडपातून दर्शनाचे दक्षिण दिशेने म्हणजेच गायत्री गेटणे बाहेर पडावे. स्थानिक ग्रामस्थांनी मंदिर कोठाच्या उत्तर महाद्वाराने पटांगणात प्रवेश केल्यावर मंदिराच्या उत्तर दरवाजाने म्हणजेच सभा मंडपाचे उत्तर दरवाजाने सर्व ग्रामस्थांनी जावयाचे आहे. दर्शनासाठी येताना स्थानिक मंडळाने आपले ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. कोणालाही कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सभामंडपाच्या दक्षिण दरवाजाने त्र्यंबकराज दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नाही. तसेच दर्शन झाल्यानंतर मंदिर परिसरात बाहेर जाण्यासाठी दक्षिण दरवाजा व पश्चिम दरवाजाचा वापर करावा. तसेच वरील दोन्ही प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिराच्या पटांगातून नेमून दिलेल्या जागेतच त्रिपुर वाती पेटवाव्यात. 


यंदा रथाला तीनच बैलजोड्या 
पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून परंपरेनुसार रथ ओढण्यासाठी गाजर यांच्या दोन बैलजोडी व अडसरे यांची एक बैल जोडी अशी कून तीनच बैलजोडी असतील. तसेच रथासमोर घोडे नाचवण्यास पोलीस प्रशासनातर्फे प्रतिबंध करण्यात आला आहे. त्र्यंबक राज्याच्या रथावर तुरुंगात ट्रस्टचे चार सदस्यांनी देवस्थानचे दोन सदस्यांना व्यतिरिक्त आणि कोणीही ग्रामस्थ चढणार नाहीत असे आवाहन करण्यात येत आहे. पोलिस प्रशासनाच्या निर्देशाचा रथोत्सवासाठी होणारी लक्षात घेता चोरी व अनुचित प्रकार घेऊन घडू नये, याकरता मार्गावर आरती कोठेही होणार नाही, तरी कोणी आरतीसाठी आग्रहा धरू नये असे आवाहन देखील देवस्थानतर्फे करण्यात येत आहे.