Nana Patole On Balasaheb Thorat: बाबाळासाहेब थोरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. बाळासाहेब थोरात यांचा कोणताही राजीनामा आमच्याकडे आलेला नाही. तसेच त्यांनी कोणतेही पत्र दिले नसून, दिले असेल तर मला दाखवा असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला. सोबतच बाळासाहेब थोरात सध्या आमच्यासोबत बोलतच नसल्याचे नाना पटोले म्हणाले आहे.


काय म्हणाले नाना पटोले...


बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत असताना यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांनी आमच्याकडे राजीनामा दिलेला नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेब थोरात आमच्यासोबत बोलत नसल्याचं पटोले म्हणाले आहे.पण पत्रकारांशी बोलत असतील तर तुम्ही सांगा असा खोचक टोलाही पटोले यांनी लगावला आहे. 


बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा...


काँग्रेसचा (Maharashtra Congress) अंतर्गत कलह मोठ्या वळणावर येऊन पोहोचलाय. काँग्रेस नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Congress Leader Balasaheb Thorat) यांच्याकडून विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा सादर करण्यात आल्याची माहिती दिल्लीतील काँग्रेस सूत्रांकडून मिळत आहे. नाशिक पदवीधर निकालाच्या दिवशी नाराजी व्यक्त करतानाच राजीनामा दिल्याचीही माहिती मिळत आहे. आता दिल्ली हायकमांड याबाबत काय निर्णय घेणार? थोरातांचं मन वळवणार की, नवा बदल घडवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.