Maharashtra News LIVE Updates: महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
अयोध्येला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटात वाढ केलेली आहे. दहा हजारांचे तिकीट चाळीस हजार करण्यात आलेत. विमानसेवा अशी महागली आहे, अशावेळी कोणी अयोध्येला गेला नाही तर त्या व्यक्तीला श्रीरामांबद्दल आस्था नाही, असा अर्थ काढणे चुकीचे राहील, असे शरद पवार म्हणाले.
अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, मला त्याचं आमंत्रण आलेलं नाही. मी म्हटलं काही हरकत नाही, पण मी जाणार. मात्र 22 जानेवारीला नाही जाणार, नंतर नक्की जाईन. श्रीराम हे सर्वांचे आहेत, असे शरद पवार म्हणाले.
राम मंदिराचे काम पूर्ण होत नाही, तो पर्यंत आम्ही जाणार नाही. अशी भूमिका चार शंकराचार्य यांनी घेतली आहे. आता मंदिराचे काम पूर्ण व्हायला आणखी दोन वर्षे तरी लागतील.
पंतप्रधान काल येऊन गेले. त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले घराणेशाही आलीये, ती मोडीत काढायला हवी. आता घराणेशाही म्हणजे नेमकं काय? डॉक्टर चा मुलगा डॉक्टर, व्यापाऱ्यांचा मुलगा व्यापारी आणि शेतकऱ्यांचा मुलगा शेतकरी होतो. मग राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर ही कशी काय घराणेशाही झाली. त्यामुळे पंतप्रधानांनी घराणेशाही बाबत बोलणं योग्य नाही. त्यांनी मूलभूत प्रश्नांवर बोलायला हवं.
अहमदनगर येथील सैन्य प्रशिक्षण केंद्र के के रेंज येथे सैनिकी युद्ध सराव पार पडला...अत्याधुनिक शास्त्रांचे प्रात्यक्षिके काळजाचा ठोका चुकवणारे होते...या प्रात्यक्षिकात 'टी-90' आणि 'टी- 72', अजेय, एमबीटी अर्जुन,बीएमपी-11, हेलिकॉप्टर , वायु सेनेचे विमानांनी यात भाग घेतला... अहमदनगर येथील आर्मड कोर्स सेंटर अँड स्कूल आणि मेकॅनाइज्ड रेजिमेंटल सेंटरमधील यांच्या वतीने हा युद्धसराव करण्यात आला... शत्रूचा मुकाबला करण्यासाठी लष्कर कसे सज्ज आहे, याचा अनुभवच उपस्थितांना आला.... रणगाड्यांमधून डागण्यात येणारे तोफगोळे, पायदळाचे चित्तथरारक युद्ध कौशल्य, आकाशात घिरट्या घालून जमिनीवरील लक्ष्यावर अचूक मारा करणारी हेलिकॉप्टर, धुळीच्या लोटातून वाट काढतानाच लक्ष्याचा अचूक वेध घेत त्यांच्यावर तोफगोळे डागणारे रणगाडे, अशी प्रात्यक्षिके यानिमित्त दाखवण्यात आली. ही युद्धाची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध ठिकाणाहून आलेल्या पाहुण्यांनी सहभाग घेतला...प्रात्यक्षिक झाल्यानंतर त्याचे सादरीकरण करणाऱ्या जवानांचे कौतुक करतानाच त्यांना टाळ्यांची दाद दिली.
चार वर्षांपूर्वी पंजाब, राजस्थानसह काही राज्यातील शेतकरी दिल्लीत रस्त्यावर उतरले होते. त्यांनी दिल्लीचा प्रवेशद्वार रोखला होता. सरकारच्या शेती धोरणाविरोधात आवाज उठवला, मग सरकारला नमावे लागले. आपण सगळे एक आहोत, आपली एकजूट असायला हवी. असा नारा पवारांनी दिला.
नितीन गडकरी केंद्रातील मंत्री आहेत. त्यांना आम्ही देशात किती साखर शिल्लक आहे, हे आम्ही त्यांना दाखवून दिलं. त्यामुळं साखर निर्यात धोरणात बदल करण्याची गरज असल्याचं सांगितलं. गडकरी शेतकऱ्यांच्या कामात मदत करतात, समोरची व्यक्ती कोणत्या पक्षाची आहे. हे ते पाहत नाही, मदत करण्याची त्यांची इच्छाशक्ती असते. त्यामुळं ते हा निर्णय घेऊ शकणार नसले तरी ते केंद्रात जाऊन हा मुद्दा नक्कीच मांडतील, असे शरद पवार म्हणाले.
रोजच्या जेवणात कांद्याचा खर्च हा पाच टक्क्यांपेक्षा ही कमी आहे. मग त्याचं उत्पादन करणाऱ्यांना शेतकऱ्यांना थोडा भाव मिळाला तर काय फरक पडतो. म्हणून मी कधीच कांदा निर्यात बंदी धोरण आणलं नाही, असे म्हणत शरद पवारांनी भाजप सरकारच्या कांदा निर्यात धोरणावर टीका केली.
Sharad Pawar : ब्राझील मध्ये साखर निर्मितीचे धोरण वेगळे आहे. त्यांच्याकडे साखरेचे भाव वाढले की ते इथेनॉल ची निर्मिती वाढवतात. इथेनॉलची किंमत वाढली की साखरेचे उत्पादन वाढवतात. जागतिक बाजाराचा अभ्यास करून हे त्यांचं धोरण ठरवतात आणि त्यांचं सरकार ही त्यांच्या पाठीशी उभं असतं, हा जमीन अस्मान चा फरक आहे. ब्राझील सीएनजी ची ही निर्मिती करतात, त्यामुळं त्यांना पेट्रोलची गरज कमी भासते, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार बोलायला उभं राहतात, मंचासमोरील उपस्थितांपैकी एक वृद्ध शेतकरी उठले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. शरद पवारांचा जयघोष त्यांनी सुरू केला. त्यानंतर शरद पवारांनी स्मिथ हास्य केलं आणि घोषणाबाजी करणारे कोंडाजी वाघ आहेत का? असा प्रश्न विचारला. पवारांनी त्यांचं नाव घेतलं असता उपस्थित सगळेच अवाक झाले. पवार गावागावातील व्यक्तींची ओळख कशी ठेवतात अन त्यांच्या मनावर कसं राज्य करतात, हे यानिमित्ताने अधोरेखित झालं.
साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल, वीज आणि त्यासोबतच इतर निर्मिती व्हायला हवी. याबाबत आम्ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कॉन्फरन्स सुरुये. साखर एक्के साखर हे करून चालणार नाही. मशिनरी मध्ये सुधारणा करून साखर उत्पादनात खर्च कमी करायचे आणि उरलेला पैसा शेतकऱ्यांना कसा मिळेल. हे त्यामागचे सूत्र आहे, असे शरद पवार म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असतानाच कुठल्याही तरुणांनी टोकाचे पाऊल उचलून नाही असं प्रशासन, मनोज जरांगे यांच्याकडून सांगण्यात येत असलं तरी तरुण आत्महत्या कडे वळत आहेत परभणीच्या सनपुरी गावात 34 वर्षीय तरुनाने मराठा आरक्षणासाठी आपली जीवन संपवले आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी स्वतःला संपवत आहे अशा आशयाची चिठ्ठी लिहून सचिनने शेतात गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण सनपुरी गावावर शोककळा पसरली आहे.
Solapur News : सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा आजपासून सुरू होत आहेत. आज तैलाभिषेक सोहळा पार पडणार आहे. यात्रेच्या पूर्वसंध्येला महाराजांच्या मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. जवळपास 900 वर्षांपासून हि परंपरा चालत आलेली आहे.
Ambhora Bridge: भंडाऱ्यात उभारण्यात आलेल्या अमेरिकेतील गोल्डन गेट ब्रीजच्या प्रतिकृतीचं आज लोकार्पण होणार आहे. आंभोरा येथील ब्रीजमुळे नागरिकांच्या वेळ आणि अंतराची होणार बचत होणार आहे. तर 40 फूट उंचीच्या स्काय गॅलरीतून निसर्गाचं विहंगम दृश्ये बघता येणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकार्पणासाठी उपस्थित राहणार आहेत.
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांची तयारी काँग्रेसने सुरू केलीय. काँग्रेसच्या विभागवार बैठका सुरू होत आहेत. 18 जानेवारीपासून होणार विभागवार बैठका होणार आहेत. उमेदवारांची चाचपणी, मतदारसंघांची बांधणी, स्थानिक मुद्दे यांसह लोकसभा निवडणूकीकरता विभागनिहाय तयारीचा आराखडा तयार केला जाणार आहे. विदर्भातून विभागवार बैठका सुरू होतायत. नागपूर विभागाची बैठक गडचिरोलीत 20 जानेवारीला होणार आहे. काँग्रेसने विभागवार मतदारसंघनिहाय आढावा घ्यायला सुरूवात केलीय.
Nagpur News: नागपूर हे विमानांच्या मेंटेनन्स, रिपेअरिंग आणि ऑपरेशनचे सर्व्हिसेस हब म्हणून विकसित होत आहे. केंद्रीय नागरीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदीच्या यांच्या हस्ते एएआर- एन्डेमार या कंपनीच्या एमआरओ सर्व्हिस सेंटरचे उदघाटन झाले. मिहानमध्ये आधीच एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे एमआरओ सेंटर सुरु आहे. त्यामुळे सध्या नागपूरच्या मिहानमध्ये महिन्याला सरासरी सहा ते आठ विमानांच्या देखभाल दुरुस्तीचे काम होत आहे. हेलिकॉप्टरचे दुरुस्ती केंद्र नागपूरमध्ये सुरु करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. त्यामुळे नागपूर हे विमानाच्या देखभाल दुरुस्तीचे हब म्हणून विकसित होत आहे.
Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतेय. दक्षिण मुंबईवरील जागेवर ठाकरे गटाने दावा केल्याने मिलिंद देवरा नाराज असल्याच्या चर्चा आहेत. काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेची असल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. महाविकास आघाडीत दक्षिण मुंबई मतदारसंघ ठाकरे गटाकडे आहे. अरविंद सावंत गेल्या दोन निवडणुकांमध्ये याच मतदारसंघातून निवडून आलेत. शिवसेनेतील फुटीनंतर अरविंद सावंत ठाकरे गटासोबत राहिलेत. त्यामुळे उद्धव ठाकरे हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडणार नाहीत. तिकडे भाजपही दक्षिण मुंबईची जागा सोडण्यास तयार नसल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे दक्षिण मुंबईतून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले देवरा एक दोन दिवसांत शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
Pune News: ललित पाटील प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात असलेले पुण्यातील ससुन रुग्णालयाचे तत्कालीन डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करून त्यांना अटक करण्याची परवानगी पुणे पोलिसांकडून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला मागण्यात आलीय. पुणे पोलिसांकडून तसे पत्र वैद्यकीय शिक्षण विभागाला सादर करण्यात आलय. आता वैद्यकीय शिक्षण विभाग यावर काय अभिप्राय देतो यावर डॉक्टर संजीव ठाकूर यांच भवितव्य अवलंबून असणार आहे. पुणे पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीत डॉक्टर ठाकूर हे दोषी आढळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलय. डॉक्टर ठाकूर यांनी ललित पाटीलवर उपचार करण्याच्या नावाखाली त्याचा ससुन रुग्णालयातील मुक्काम जास्तीत जास्त वाढेल यासाठी मदत केल्याच पोलिसांना चौकशीत आढळलय. त्याचबरोबर ललित पाटीलला त्याच्या टोळीसह ससुन रुग्णालयातून ड्रग रॅकेट चालवताना अटक केल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी त्याचे पित्ताशयाचे ऑपरेशन करण्याचा निर्णय डॉक्टर संजीव ठाकूर यांनीच घेतल्याच निष्पन्न झालय. या ऑपरेशनसाठी एक्स रे काढताना ललित पाटील ससुन रुग्णालयातून पळून गेला होता.
Maharashtra News: मुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात आज ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे. शिंदेसोबतच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच कल्याण दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यासाठी अंबरनाथ, कल्याण आणि डोंबिवली भागात ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत.
उद्धव ठाकरेंचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी कंबर कसली आहे. उद्धव ठाकरे हे अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण,आणि डोंबिवलीसह कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील शाखांना भेट देऊन स्थानिक शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. हा दौरा पूर्ण दिवसभर असून, कल्याण मतदारसंघात आपल्या गटाची ताकद किती आहे याचा अंदाज उद्धव ठाकरे घेणार आहेत.
Maharashtra News: मुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात आज ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे. शिंदेसोबतच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच कल्याण दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यासाठी अंबरनाथ, कल्याण आणि डोंबिवली भागात ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. उद्धव ठाकरेंचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी कंबर कसली आहे. उद्धव ठाकरे हे अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण,आणि डोंबिवलीसह कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील शाखांना भेट देऊन स्थानिक शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. हा दौरा पूर्ण दिवसभर असून, कल्याण मतदारसंघात आपल्या गटाची ताकद किती आहे याचा अंदाज उद्धव ठाकरे घेणार आहेत.
PM Modi Maharashtra Dura : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या आठवड्यात पुन्हा महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. सोलापुरातल्या कुंभारी येथे साकारलेल्या रे नगर या प्रकल्पचं 19 जानेवारी रोजी उदघाटन होणार आहे. त्यासाठी मोदींना निमंत्रित करण्यात आलं आहे. मोदी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत, अशी माहिती माजी आमदार आणि रे नगरचे मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम यांनी दिली. जवळपास 30 हजार घरं या प्रकल्प अंतर्गत साकारली जातं आहेत. यातील पहिल्या टप्यातील 15 हजार घरांचं काम पूर्ण झालं आहे. याच 15 हजार घरांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. जिल्हा प्रशासन आणि रे नगर फेडरेशनने जोरदार तयारी सुरू केलीये.
Ram Mandir Inauguration : माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी (Lal Krishna Advani) यांनी 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिरच्या प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratistha ) कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त केलाय. भगवान प्रभू श्रीरामचंद्राचं भव्य मंदिर (Ayodhya Ram Mandir) तयार करण्यासाठी नियतीने आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Modi) निवड केली होती, असेही आडवणी म्हणाले आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -