Maharashtra News LIVE Updates: राज्यासह देशभरातील विविध महत्वाच्या बातम्या, वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
धुळे : जिल्ह्यातील गावं, खाजगी बाजार समित्यांमध्ये माथाडी कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी आज धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेने कडकडीत बंद पाळला आहे. या पार्श्वभुमीवर सर्व हमाल कामगारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला, या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडे तीन प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या. तसेच मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास बेमुदत संप पुकारण्याचा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष गंगाधर कोळेकर यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, धुळे जिल्ह्यातील संपूर्ण खाजगी बाजार समित्यांमध्ये (साक्री, पिंपळनेर, मोराणे) माथाडी कायदा लागू करुन खाजगी बाजार समितीमधील काम आमच्या कामगारांना मीळाले पाहिजे. यासाठी अनेक वर्षापासून आमचे प्रयत्न सुरु आहे. मात्र, आजपावेतो त्या ठिकाणी माथाडी कायदा लागू केलेला नाही, तरी जिल्ह्यात संपूर्ण खाजगी बाजार समित्यांमध्ये माथाडी कायदा लागू करावा अशा प्रमुख मागण्या घेऊन हा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन जाण्यात आला.
मुंबई : अक्कलकोटमधील बियर शॉपी च्या परवान्यावरून विधानसभेत सचिन कल्याणशेटी आक्रमक झाले. अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिराच्या बाहेर असणाऱ्या बिअर शॉपीच्या परवान्यावरून सचिन कल्याणशेट्टी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक वाद झालेत. बनावट कागदपत्राद्वारे बिअर शॉपीस परवानगी दिल्याची माहिती कल्याणशेट्टी यांनी लक्षवेधीत मांडली. तीर्थक्षेत्र श्री स्वामी समर्थ मंदिरापासून 300 मीटरवर बिअर शॉपी असल्याचा सचिन कल्याणशेट्टींचा दावा तर संबंधित बियर शॉपी दीड किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. तर लक्षवेधीत सोलापुरातील एक्साईज अधिकाऱ्यांवर आमदार कल्याणशेट्टी यांनी तीव्र नाराजी दर्शवली. सदर प्रकरणाची चौकशी करून अधिकारी दोषी असतील तर कारवाई करणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला.
लातूर : जिल्ह्यातील औसा शहरातील महात्मा फुलेनगर भागात औसा पोलिसांनी छापा मारून 116 किलोग्राम वजनाचा गांजा वाहनासह जप्त केलाय. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 116 किलोग्राम वजनाचा ओला आणि सुखा गांजा, एक स्कॉर्पिओ गाडी आणि दोन मोबाईल असा एकूण 15 लाख 81 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. याप्रकरणी औसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. एकजण फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
अखेर अपहरण झालेल्या 14 वर्षीय अनिकेतचा सापडला मृतदेह....
वाशिम – पुसद मार्गावर सापडला मृतदेह...
१२ मार्चला झाले होते अपहरण...
वाशिमच्या बाभुळगाव येथून अनिकेत सादुडेचे झाले अपहरण...
चार जिल्ह्यातील १२ पोलिस पथकं शोधकार्यात लावली होती...
९ व्या दिवशी सापडला मृतदेह...
घटनास्थळी पोलिस दाखल...
औरंगजेबाच्या कबरी च्या वादाच्या पार्श्वभूमी वर एनआयचे पथक संभाजी नगरात; संशयित हालचालीवर असणार लक्ष
मराठवाड्यातील जालना,परभणी, नांदेड, बीड,उदगीर याही ठिकाणी एनआयएची टीम लक्ष ठेवण्यासाठी दौरा करीत असल्याचीही माहिती सूत्रांनी दिलीय
पत्रांच्या शेडवरून आता तारांचेही करण्यात आला संरक्षण कुंपण; अनुचित प्रकार घडू नये यासाठी योग्य ती खबरदारी
- नाशिकच्या पिंपळगाव मध्ये बांबूच्या गोडाऊनला भीषण आग
- बांबूच्या गोडाऊनला आग लागल्यानंतर आजूबाजूचे काही दुकानं देखील आगीच्या भक्ष्यस्थानी
- आग लागण्याचे कारण अस्पष्ट
- आग वीजवण्यासाठी अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल
- आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती
धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी 29 मार्चपर्यंत तहकूब
करूणा मुंडे प्रकरणी वांद्रे दंडाधिकारी कोर्टानं दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेकडून सत्र न्यायालयात आव्हान
करुणा मुंडे यांनी आपलं उत्तर दाखल करण्यासाठी मागितला वेळ
पुढच्या सुनावणीत करुणा मुंडे यांच्यावतीनं युक्तिवाद करण्याची तयारी
दंडाधिकारी कोर्टानं करूणा यांचे धनंजय मुंडेंविरोधातील आरोप अंशत: मान्य करत त्या पोटगीसाठी पात्र असल्याचं म्हटलं होतं
करूणा मुंडे यांना दरमहा दोन लाख रूपये भत्ता देण्याचे कोर्टाचे आदेश
नांदेड : युरिया खताची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्याने ट्रकचे व खताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये ड्रायव्हर वाचला आहे. नांदेडच्या इस्लापूर - किनवट या महामार्गावर ही घटना घडली आहे. काल रात्रीच्या वेळी समोर येणाऱ्या वाहनाचा अंदाज आल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला पाच ते सहा फूट जाऊन पलटी झाला आहे.
सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण
सोलापूरच्या बाजारात कांद्याच्या दरात एकाच आठवड्यात प्रति क्विंटल सुमारे 800 ते 1000 रुपयांची घसरण
मागील आठवड्यात ज्या कांद्याला साधारण 22 ते 25 रुपये भाव होता त्याचं कांद्याला आज 12 ते 14 रुपये प्रति किलो मिळतोय दर
बाजारात कांद्याची आवक घटलेली असताना देखील दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा
आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ इत्यादी भागातून व्यापारी बाजारात आले नसल्याने दर घसरले असल्याची माहिती
जीव धोक्यात घालून विद्यार्थी घेत आहे शिक्षण....
भिंतीला भेगा आणि छताला लाकडाचा आधाराखाली चिमुकले विद्यार्थी घेत आहे शिक्षण.....
पर्यायी व्यवस्था नसल्याने जीव मुठीत धरून शिक्षण घेण्याची विद्यार्थीवर वेळ....
नंदुरबार जिह्यातील मांडवी खुर्द जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रकार....
288 पटसंख्या असलेल्या शाळेत 7 खोल्यांपैकी 5 खोल्या जीर्ण अवस्थेत....
शाळा निर्लेखित झाल्या असल्या तरी त्यावर उपायोजना नाही....
शाळेची भिंत आणि पत्रे कधीं पडून येतील याची शाश्वती नाही....
विद्यार्थ्यांवर भिंत कोसळल्यास याला जबाबदार कोण पालकांचा संतप्त सवाल....
शासनाला वारंवार तक्रार देऊन ही दखल घेतली जात नसल्याचा पालकांचा आरोप....
- नागपूर शहरातील सहा पोलीस ठाण्यांतर्गत कर्फ्यू मध्ये देण्यात आलेली 2 तासांची शिथिलता रद्द करण्यात आली आहे..
- पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी जारी केले आहे आदेश
- काल लकडगंज, सक्करदरा, पाचपावली, शांतीनगर, इमामवाडा, यशोधरानगर या सहा पोलीस स्टेशन अंतर्गत दुपारी दोन ते संध्याकाळी चार या दोन तासासाठी शिथिलता प्रदान करण्यात आली होती..
मात्र आता जूना आदेश रद्द करत त्या सहा पोलीस स्टेशन मध्ये पुन्हा पूर्ण वेळ संचारबंदी चा आदेश देण्यात आला आहे..
- नागपुरात हिंसाचार झाल्यानंतर एकूण 11 पोलीस स्टेशन हद्दीत कर्फ्यू आणि जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते
- त्यापैकी दोन पोलीस स्टेशन हद्दीतील कर्फ्यू काल उठवण्यात आला, तर तीन पोलीस स्टेशन हद्दीत कर्फ्यू कायम ठेवण्यात आला होता
- त्यामुळे आता एकूण नऊ पोलीस स्टेशन हद्दीत कर्फ्यू कायम करण्यात आलेला आहे
- गणेशपेठ, तहसील, कोतवाली, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, इमामवाडा आणि यशोधरानगर या नऊ पोलीस स्टेशन हद्दीत कर्फ्यू कायम राहणार आहे
प्रशांत कोरटकरची अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव
न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या एकलपीठापुढे सुनावणीला सुरूवात
कोल्हापूर सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाला कोरटकरकडून हायकोर्टात आव्हान
छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याबद्दल पत्रकार प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या जुनावाडा पोलीस ठाण्यात दाखल आहे गुन्हा
गुन्हा दाखल झाल्यापासून प्रशांत कोरटकर फरार
Nagpur : नागपूरच्या मुस्लिम बहुल मोमीनपुरा परिसरातही आज पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.. मोमीनपुरा परिसर नागपुरातला मुस्लिम बहुल भाग असून तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या या भागात संचारबंदी मध्ये कुठलीही शिथिलता देण्यात आलेली नाही... आज शुक्रवारच्या दिवशी मोमीनपुरा मधील जामा मशीदीत मोठ्या संख्येने लोक नमाज पठण करण्यासाठी येतील अशी शक्यता लक्षात घेऊनही पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे... स्थानिक तहसील पोलीस स्टेशनच्या पथकासह, राज्य राखीव पोलीस दल तसेच नागपूर पोलिसांचा दंगा नियंत्रण पथक या ठिकाणी तैनात आहे... नागपूर पोलिसांनी रमजानचा महिना आणि शुक्रवारचा दिवस लक्षात घेत नमाज पठण करण्यासाठी कुठलेही निर्बंध लावलेले नाही.. फक्त नमाजींनी त्यांच्या घराजवळ असलेल्या मशिदीत नमाज पठण करण्यासाठी जावं लांबच्या मशिदीत जाऊ नये अशी अपेक्षा प्रशासनाला आहे...
2029 पर्यंत पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित करण्याचा सरकारचा मानस आहे. परंतु ज्या गावांमध्ये हे विमानतळ होणार आहे त्या गावांचा या विमानतळाला विरोध आहे.पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये विमानतळ प्रस्तावित आहे. या विमातळाला जमीन देण्यास गावकऱ्यांनी विरोध केला आहे. पुरंदर तालुक्यातील पारगाव येथे ग्रामस्थांनी पुरंदर विमानतळाला विरोध करण्यासाठी ग्रामसभा देखील बोलवली आहे. काही जरी झालं तरी विमानतळ होऊ देणार नाही आम्ही आमच्या जमिनी देणार नाही ही गावकऱ्यांची भूमिका आहे.
सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीतच
'परभणीमधील खेमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीसच जबाबदार', दंडाधिका-यांचा चौकशी अहवाल एबीपी माझाच्या हाती
परभणी जिल्ह्यातील नवामोंदा पोलीस ठाण्यातील मारहाणाचं प्रकरण
न्यायदंडाधिकाऱ्यांचा 451 पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर
आयोगानेही त्याची गंभीर दखल घेत संबंधित सर्व पोलीसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे
सोमनाथ यांचा 15 डिसेंबर रोजी कोठडीत असताना तुरुंगात मृत्यू झाल्यापासून हे प्रकरण तापलेलं आहे
अमानुष मारहाणीतच हा मृत्यू झाला आहे. त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत्या, असं शवविच्छेदन अहवालातून समोर आलंय
नाशिकच्या एच ए एल मध्ये भारतीय बनावटीचे पहिले तेजस लढाऊ विमान एप्रिल महिन्यात तयार होणार
विमानाचे काम अंतिम टप्प्यात, वायुसेनेला सुपूर्द केले जाणार
दरवर्षी केली जाणार आठ लढाऊ तेजसची निर्मिती
नाशिक मध्ये उभारण्यात आली आहे दीडशे कोटीच्या खर्चातून स्वतंत्र प्रोडक्शन लाईन
हजारो कोटीच्या करारा अंतर्गत 83 तेजस विमानांची होणार निर्मिती
70 प्रशिक्षण विमाने सुद्धा बनवण्या ची एच ए एल ला मिळाली आहे ऑर्डर
सातारा: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांनी केली अटक
हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची केली होती मागणी
1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना केली अटक
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशिक दौऱ्यावर
मुख्यमंत्री घेणार कुंभमेळाच्या तयारीचा आढावा
दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या कुंभमेळाची तयारी युद्धपातळीवर सुरू
नाशिक आणि त्रंबकेश्वरमध्य केल्या जाणाऱ्या नियोजित कामाचा घेणार आढावा
मुख्यमंत्रीपदी विराजमान झाक्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नाशिकमधे येणार
याधी मुंबईत सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर दोन बैठका पार पडल्या आहेत
नाशिकच्या पालकमंत्री ची अद्याप घोषणा झालेली नसल्याने मुख्यमंत्रीच्या नाशिक दौऱ्याला विशेष महत्व
मुख्यमंत्रीच्या अधिकृत दौरा अद्याप प्राप्त झाला नसला तरी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर यंत्रणाची तयारी सुरू
गेल्या चार महिण्यापासुन परंडा तालुक्यात धुमाकुळ घालत असलेला व २० ते २२ जनावरांची शिकार करणारा बिबट्या गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला. वनविभागाच्या सतर्कतेमुळे आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे ही मोहिम यशस्वी ठरली. बुधवार दि १९ रोजी बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात शेळीचे पिल्लू ठेवण्यात आले होते. पिल्लाने पिंचाऱ्याच्या गजातून बाहेर डोके काढले होते. त्यामुळे बिबट्या पिंजऱ्यात न येता बाहेरून पिल्लावर हल्ला केला होता. यावेळी पिंचाऱ्याचे लोखंडी गज तुटल्याने बिबट्या बोकडाच्या पिल्लाला घेऊन पसार झाला होता. मात्र वन विभागामार्फत तात्काळ पिंचऱ्याची दुरुस्ती करून बिबट्याला पकडण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. अखेर गुरुवारी रात्री ११ च्या दरम्यान बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण
तपास पूर्ण झाल्यानंतरही सहआरोपी केल्याविरोधात नायर रुग्णालयाच्या माजी विभागप्रमुखाची हायकोर्टात याचिका
या प्रकरणी नव्यानं आरोपी करण्यात आलेल्या नायर रुग्णालयातील स्त्रीरोग आणि प्रसूती विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ. चिंग लिंग यी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे
तपास पूर्ण होऊनही त्यांना विशेष सत्र न्यायालयाने सहआरोपी करण्याचे आदेश दिल्याने डॉ. चिंग यांनी याविरोधात हायकोर्टात दाद मागितली आहे
डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तीन महिला डॉक्टरांविरोधात 23 मे 2019 रोजी गुन्हा दाखल करण्यात होता
सहकारी डॉक्टर जातीवाचक टिप्पणी करून मानसिक छळ करत असल्यानं नैराश्यातून डॉ. पायल तडवी यांनी उचललं होतं टोकाचं पाऊल
चिपळूण : जुगार आणि मटका धंदे समूळ नष्ट करण्यासाठी चिपळूण मध्ये युवक काँग्रेसचे अनोखे अभियान.
तरुणांना उद्धवस्त करणाऱ्या जुगार मटक्याची माहिती देणाऱ्यांसाठी युवक काँग्रेसकडून बक्षीस जाहीर.
Live लोकेशन्स सहित माहिती पुरवणाऱ्यांना 5 हजाराचे रोख इनाम.
रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष साजिद सरगुरो यांच्याकडून चिपळूण शहरात बॅनरबाजी.
शहरातील वाढते अवैध जुगार मटका व्यवसायाकडे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसची नामी शक्कल.
नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कोडीन खोकल्याच्या बाटल्यांची चोरटी वाहतूक करणाऱ्या तिघा संशयितांना मालेगाव आझादनगर पोलिसांनी अटक केली आहे. बडा कब्रस्तान परिसरात रात्री केलेल्या कारवाईत ३०० बाटल्या आणि एका इको कारसह तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.अटकेतील तिघे संशयित हे जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथील रहिवासी आहेत.
दुपारी १२ वाजता नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडणार
विधान परिषदेचे नियमित कामकाज सुरु होताच शपथविधी
दादाराव केचे, संजय केणेकर, संदीप जोशी, चंद्रकांत रघुवंशी आणि संजय खोडके आमदारकीची शपथ घेतील
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा हस्तक्षेप ?
ड्रग्ज प्रकरणाबाबतची लक्षवेधी सभागृहात चर्चेला येण्याअगोदरच उत्तर स्वीय सहाय्यकाकडून सोशल मीडियावर व्हायरल
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटलांची ड्रग्ज प्रकरणाबाबत लक्षवेधी
दरम्यान, राणाजगजीतसिंह पाटील यांचे कार्यकर्ते ड्रग्ज प्रकरणात आरोपी असल्याचा काँग्रेसचा आरोप
काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटलांकडून आरोपी पिंटू मुळे आणि राणाजगजीतसिंह पाटील यांचे फोटो दाखवत स्वतंत्र पथकाकडून तपासाची मागणी
नागपूर हिंसाचारानंतर छावा सिनेमावर बंदीची मागणी
नागपूर पोलिसांच्या हाती लागलेल्या चिथावणीखोर पोस्टमध्ये छावाविरोधात प्रचार
तणावाला कारण झाल्याचा आरोप करत 'छावा'वर बंदीची मौलानांची मागणी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे बंदीची मागणी
छावा सिनेमात सत्याशी फारकत घेतल्याचा पत्राद्वारे आरोप
नागपूर तणावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार नमाजानिमित्त शहरात अलर्ट
नागपुरात मशिदींबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था
नागपुरात चौकाचौकात पोलिसांचा जागता पहारा
नागपुरात अजूनही काही भागात तणावग्रस्त स्थिती
पुन्हा तणाव टाळण्यासाठी नागपूर पोलीस डोळ्यात तेल ओतून बंदोबस्तावर
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचे आढळून येत असून, हा प्रकार टाळण्यासाठी आता ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी स्वामित्व भरण्यापेक्षाही अधिक प्रमाणात उत्खनन होत असून, यात अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात दिली. ते म्हणाले, राज्यभर सर्वेक्षण करून सरकार अनधिकृत खाणकाम उघडकीस आणेल आणि कठोर कारवाई केली जाईल. विशेषत: पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये मोठ्या कंपन्यांनी अनधिकृत उत्खनन केल्याचे निदर्शनास आले आहे.
औरंगजेब कबरीवरून सुरू असलेल्या वादामुळे नागपुरात दंगल झाली. मराठवाड्यातही तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे एनआयए दिल्लीचे एक पथक छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाले आहे. परभणी, जालना, नांदेड या ठिकाणीदेखील पथक गेले असून तेथील संशयित हालचालींवर लक्ष आहे. एटीएस अधिकाऱ्यांची मदत घेतली जात असल्याची माहिती आहे.
परळ स्टेशनचा कायापालट करण्यात आला आहे. मध्य रेल्वेने गेल्या 2 वर्षात अनेक नवीन बदल परळ स्थानकात केल्याने प्रवाश्यांना नवीन सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत मध्य रेल्वेच्या परळ स्थानकात नवीन इमारती उभारण्यात आली असून, त्याचा वापर सुरू करण्यात आला आहे. या इमारतीत उन्नत बाइक पार्किंग, बुकिंग ऑफिससह इतर अनेक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. या कामासाठी रेल्वेल १९ कोटी ४१ लाख रुपयांचा रुपये खर्च आला आहे. परळ स्टेशनचा विकास अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत करण्यात आला आहे. त्यात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, स्वच्छ वातावरणासाठी आकर्षक लँडस्केपिंगसह सुसज्ज प्लॅटफॉर्म आणि आधुनिक प्रवासी सुविधांचा समावेश आहे. याशिवाय, अतिरिक्त लिफ्ट, एस्केलेटर, साइन बोर्ड, कार्यालये आणि अपंगांसाठी अनुकूल सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. नवीन इमारतीच्या टेरेसवर बाइक पार्किंगची सुविधा निर्माण करण्यात आली असून, त्यासाठी देखील कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचे काम सुरू आहे. तेथे साधारण १०० पेक्षा जास्त बाईक एकाचवेळी पार्क करणे शक्य होणार आहे. मात्र या स्थानकात येणाऱ्या रुग्णांसाठी अजूनही लिफ्ट, सरकते जिने यांची गरज आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates: नागपूर हिंसाचारातील प्रमुख आरोपी फहीम खानसह 36 आरोपींना आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नागपुरातील राड्याआधीचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे. काही तरुण रेकी करत असल्याचं चित्रीत, तर याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घडामोडींसह राज्यासह देशभरातील इतर महत्वाच्या बातम्या, एका क्लिकवर...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -