Maharashtra News LIVE Updates : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा फक्त एका क्लिकवर....

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Feb 2024 03:14 PM
Narendra Modi : काँग्रेसने सैन्यादलाचे मनोबल तोडले, नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका

Narendra Modi : काँग्रेसने सैन्यादलाचे मनोबल तोडले
- हिंदुस्तान एरोनॉटिक्स विकणार म्हणून यांनी प्रचार केला
- HAL च्या बाहेर फोटो काढायला गेले
- आज त्याच HAL चा डिमांड वाढली आहे
- हे तेच लोक आहेत ज्यांनी सर्जिकल स्ट्राईक नंतर भारतीय लष्कराच्या पराक्रमावर प्रश्न उपस्थित केले

Narendra Modi - भारत पहिल्या तीन अर्थव्यवस्थेत येणं म्हणजे भारतातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणे

Narendra Modi - भारत पहिल्या तीन अर्थव्यवस्थेत येणं म्हणजे भारतातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणे
- आम्ही विकसित भारताच्या संकल्पसाठी दीड वर्ष काम करतोय
- सरकारी व्यवस्था लावली आहे
- 15 लाख लोकांनी आपल्या कल्पना सांगितल्या आहेत
- यामध्ये निम्म्याहून जास्त ३५ खालील युवकांचा समावेश

Narendra Modi - आम्ही शतकांची प्रतीक्षा संपवली, राम मंदिर बनवलं

Narendra Modi - आम्ही शतकांची प्रतीक्षा संपवली, राम मंदिर बनवलं
धर्मध्वजा फडकवली, 370 हटवलं
- अंदमान नामकरण केलं
- दांडी येथे स्मारक बनवला
- सरदार पटेलांना समर्पित statue of unity तयार केलं
-१४ ऑगस्ट विभाजन विभिषिका दिवस आम्ही घोषणा केली
- वीर बाल दिवस आम्ही घोषणा केली
- संविधान दिनाची घोषणा आम्ही केली
- अंतरराष्ट्रीय योगा दीन आम्ही साजरा केला

Narendra Modi - आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना लाभ झाला, महिलांसाठी केलेल्या योजनांचा मोदींकडून विशेष उल्लेख

Narendra Modi - आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना लाभ झाला


महिलांसाठी केलेल्या योजनांचा मोदींकडून विशेष उल्लेख


1 करोड लखपती दिदी तयार केल्या


आम्ही गरोदरपणाच्या सुट्टी वाढवली 


आम्ही निमलष्करी दलात महिला भरती 50 टक्केहून जास्त केली


आम्ही मुलींसाठी सैनिकी शाळा उघडल्या


 3 करोड महिलांना लखपती दिदी बनवणार

Ajit Pawar : मुस्लीम मुलींचं उच्च शिक्षण राज्य सरकार करेल, अजित पवारांची अल्पसंख्याक मेळाव्यात ग्वाही

Ajit Pawar : मी तुम्हाला सर्वांना अश्वस्त करतो आपल्या सुरक्षेची जबाबदारी आम्ही करू


मुस्लिम बंधू महाराजांसोबत ही होते


आम्ही देखील अनेकांना कॅबिनेट मध्ये आणि पक्षात पदाधिकारी हे मुस्लिम अल्पसंख्याक बांधवना केलंय


आम्ही फक्त बोलत नाही करून दाखवतो


करून दाखवतो तसंच बोलतो हेच आमचं असतं


अल्पसंख्याक मुलींना शिकण्यासाठी आम्ही प्राथमिकता देतोय


वफ्फ बोर्डाचे जे प्रश्न आहेत ते ही सोडवू


महामंडळाला 500 कोटी दिले


अनेक ठिकाणी उर्दू घर करणार आहोत


मी आपल्या शब्दाला पक्का आहे, खोटं बोलत नाही


अनेक मुस्लिम मुली आर्थिक परिस्थिती नसल्याने कॉलेजला जात नाहीत, त्यामुळे आम्ही निर्णय घेतलाय ज्यांचं उत्पन्न घरात आठ लाखाच्या आत आहे, त्या घरातील मुलींचं उच्च शिक्षण राज्य सरकार करेल


हा निर्णय येत्या जुन पासून आपण लागू करतोय

Narendra Modi : आम्ही सत्ता उपभोगण्यासाठी घेतली असती, तर गरिबांची घर नसती बांधली

Narendra Modi : आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक
- शिवाजी महाराजांनी राज्यभिषेक झाला आणि त्यानंतरही भरपूर काम केलं
- भाजपची तिसरी टर्म मी सत्ता उपभोगण्यासाठी मागत नाहीये
- आम्ही सत्ता उपभोगण्यासाठी घेतली असती तर गरिबांची घर नसती बांधली
- गरिबांचे स्वप्न मोदीचा संकल्प आहे

Narendra Modi : नरेंद्र मोदी यांचा पुन्हा 370 पेक्षा जास्त जागांचा नारा

Narendra Modi : नरेंद्र मोदी यांचा पुन्हा 370 पेक्षा जास्त जागांचा नारा


- विरोधी पक्ष NDA चारसो पार नारा देत आहे
- त्यासाठी भाजपला 370 पार यश मिळवावेच लागेल

Narendra Modi : भारताने ज्या गतीने प्रगती सुरू केली आहे... नरेंद्र मोदींचे भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनात वक्तव्य

Narendra Modi : भारताने ज्या गतीने प्रगती सुरू केली आहे


सगळ जग वाजतगाजत हे सांगतोय


सपने भी विराट होंगे.. संकल्प भी विराट होंगे


नरेंद्र मोदींचे भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनात वक्तव्य

Amravati : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर‎ अमरावती शहरात पोलिसांचा रूटमार्च 

Amravati : अमरावती शहरात मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे, अमरावती शहरात रॅली देखील काढण्यात येणार असल्याने शहरात शांतता रहावी आणि कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अमरावती शहर पोलिसांनी शक्ती प्रदर्शन करत रूट मार्च काढला, राजकमल चौकातुन हा रूट मार्च काढण्यात आला होता तर उद्या ठीक ठिकाणी पोलिसांचा कडक पोलीस बंदोबस्त शिवजयंतीच्या निमित्ताने असणार आहे तर आज या रूट मार्च मध्ये दंगा नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दल, बँड पथक तसेच बंदुकधारी पोलिसांनी रस्त्यावर उतरले होते...

Ritesh Deshmukh : विलासरावांचं नाव घेताच रितेश देशमुख झाले भावूक, लातूरमध्ये स्मृती सोहळ्यात भावना व्यक्त केल्या

Ritesh Deshmukh : विलासरावांचं नाव घेताच रितेश देशमुख झाले भावूक,


लातूरमध्ये स्मृती सोहळ्यात भावना व्यक्त केल्या


आजकाल राजकारणात खालच्या पातळीवर जाऊन भाषणं होतात, हे पाहून दुःख वाटतं. 


जो महाराष्ट्र एकेकाळी दिग्गज नेत्यांनी गाजवला, तो काळ आपल्याला आज दिसत नाही. तो काळ परत आणण्याची गरज आहे


अभिनेते रितेश देशमुख यांनी व्यक्त केली भावना. 


लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना परिसरात विलासराव देशमुख स्मृती सोहळा


 विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ 


या कार्यक्रमाला काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. 


वडील विलासराव आणि त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांच्या संबंधाबद्दल बोलत असताना रितेश देशमुख भावूक झाले

Ulhas Pawar : "आज विलासराव देशमुख असते तर..."; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे मोठे वक्तव्य

Ulhas Pawar : आज विलासराव असते तर...असा विचार सर्व सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांना येत असतो.


देशात आता ज्या प्रमाणे स्थिती निर्माण झाली आहे त्याची पार्श्वभूमी आहे.


सध्या काँग्रेसचे विचार सर्व सामान्य लोकांपर्यंत नेणारा एक नेता आढळून येत नाही,


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांचे वक्तव्य.


लातूरमध्ये विलास सहकारी साखर कारखाना प्रांगणात उभारण्यात आलेल्या


विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याप्रसंगी उल्हास पवार बोलत होते. 

Sports : भारताच्या यशस्वी जैस्वालचं लागोपाठ दुसऱ्या कसोटीत द्विशतक साजरं

Sports : भारताच्या यशस्वी जैस्वालचं लागोपाठ दुसऱ्या कसोटीत द्विशतक साजरं


यशस्वी जैस्वालनं इंग्लंडविरुद्ध राजकोटच्या तिसऱ्या कसोटीत
झळकावलं द्विशतक


यशस्वी जैस्वालनं 231 चेंडूंत फटकावलं द्विशतक


यशस्वीच्या द्विशतकाला 14 चौकार आणि 10 षटकारांचा साज


यशस्वीनं विशाखापट्टणमच्या दुसऱ्या कसोटीतही ठोकलं होतं द्विशतक


शुभमन गिलचं शतक नऊ धावांनी हुकलं, तर सरफराज खानचं राजकोट कसोटीच्या दुसऱ्या डावातही अर्धशतक

Beed : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीडच्या लिंबागणेश येथे रास्ता रोको

Beed : मराठा समाजाला तात्काळ आरक्षण जाहीर करून सगळे सोयरे कायदा लागू करण्यात यावा, या मागणीसाठी विविध लिंबागणेश येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आरक्षणाच्या प्रश्नावरून संतप्त झालेल्या मराठा बांधवांनी अहमदनगर ते अहमदपूर रस्ता एक तास आडून धरला होता, त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या, तर दुसरीकडे म्हणून तरंगे पाटील यांच्या बद्दल नारायण राणे यांनी जे वक्तव्य केले आहे त्याचा देखील निषेध मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला असून सरकारने तात्काळ मराठा आरक्षण जाहीर करून सगळे सोयरे हा कायदा लागू करावा अशी मागणी मराठा बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे

Nashik : नाशिकच्या एकलहरे रोडवर अनोळखी मृतदेह आढळल्याने खळबळ; खून झाल्याचा संशय

Nashik : नाशिकरोड  पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकलहरे परिसरात तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. धारदार शास्त्राने वार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून वरिष्ठ पोलीस अधिकारीनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून मृतदेहाची ओळख पटविणे आणि हल्लेखोराचा तपास सुरू झालाय. पंचवीस ते तीस वयोगटातील तरुणाचा मृतदेह रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना दिसून आल्यानं खळबळ उडाली होती.. घटनेची माहिती पोलीसा समजताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय

Parbhani : परभणी मध्ये मराठा आंदोलन आक्रमक, बस पेटवली, चारही आगाराची एसटी सेवा केली बंद

Parbhani :  परभणी जिल्ह्यात मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुक्कामी असलेली बस पेटवून देण्यात आली आहे. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे इथली ही घटना असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.


मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा आणि मराठा आरक्षणासाठी परभणी जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून शांततेने विविध आंदोलन सुरू आहेत मात्र या आंदोलनाला आता गालबोट लागले परभणीच्या पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे या गावात रात्री मुक्कामाला असलेली बस पहाटे जाळली . घटना कळल्यानंतर परभणीतील पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गावात भेट दिली असून खबरदारी म्हणून परभणी जिल्ह्यातील चारही आगारांची वाहतूक एस टी महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांनी बंद केली आहे.

Prakash Ambedkar : संतांच्या विचारावर आधारित जे संविधान आहे, त्याच्या विरोधात भाजपा, RSS दिसतेय

Prakash Ambedkar :  भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस म्हणतात की आम्ही हिंदू धर्माचे प्रतिनिधी आहे


मेजारीटी जनता पूर्णपणे हिंदू आहे मग धार्मिक राजकारण कशासाठी


जे काही दहा वर्षात झाले त्यातून इतिहासातील भांडण आहे, वैदिक परंपरा विरुद्ध संत परंपरा याचीच पुनरावृत्ती आताही दिसायला लागली आहे,


संतांनी ज्या विचारांची मांडणी केली ती सामूहिक आणि व्यक्ती स्वतंत्र या दोन मुद्द्याला आधारित होती, दुर्दैवाने वैदिक धर्मतील सामाजिक रचना

संतांच्या विचारावर आधारित जे संविधान आहे त्याच्या विरोधात बीजेपी आणि आर एस एस दिसते आहे


 संविधान कसे असेल यावर ते विचार करत नाही पण जे सूचक वक्तव्य येते त्यातून हिटलर शाहीला पुरस्कृत करणारी घटना असेल यावर विचार होतो आहे


आम्ही सांगू तीच घटना असा पुढील काळात घटनेची रचना असेल असा प्रयत्न होत आहे.

Jyoti Waghmare : संजय राऊत यांच्या मुख्यमंत्र्यांवरील शिवराळ टीकेला ज्योती वाघमारेंचे सडेतोड उत्तर 


Jyoti Waghmare : संजय राऊत यांच्या मुख्यमंत्र्यांवरील शिवराळ टीकेला शिंदे गटाच्या शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारेंचे सडेतोड उत्तर दिलंय. 'संजय राऊत यांना आधी वेड लागले होते, आता ते पुरते पिसाळलेले आहेत. महाराष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी त्यांना लवकरात लवकर मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं पाहिजे. संजय राऊत कधी माइक वर थुंकतात तर रोज माइक वर भुंकतात. पिसाळलेला कुत्रा अंगावर आला की अहो हाड म्हणून चालत नाही तर ए हाड असेच म्हणावे लागते.

Navi Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विकास मेळाव्याला नवी मुंबईत सुरुवात

Navi Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विकास मेळाव्याला सुरुवात होत आहे. 


शिक्षण, आरक्षण व संरक्षणाच्या प्रश्नावर राज्यस्तरीय 'अल्पसंख्याक विश्वास मेळाव्या'चे आयोजन आज सिडको कन्वेक्शन सेंटर वाशी (नवीमुंबई) इथे आयोजित करण्यात आले आहे.


राज्यभरातून मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव या मेळाव्याला उपस्थित आहेत 


अल्पसंख्याक विश्वास मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि इतर नेते उपस्थित आहेत


या अल्पसंख्याक मेळाव्यात अजित पवार आणि राष्ट्रवादी नेते काय भूमिका मांडतात, हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे

Prakash Ambedkar : वर्ध्यात प्रकाश आंबेडकरांची तोफ दुपारी धडाडणार, वंचितची आज महाएल्गार सभा
Prakash Ambedkar :  वंचितची आज महाएल्गार सभा

 

सभेतून काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

 

वर्धेत आज वंचित बहुजन आघाडीची महाएल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे.

 

दुपारी दोन वाजता या सभेला ऍड. प्रकाश आंबेडकर संबोधित करणार आहे.

 

सभेपूर्वी प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषद घेणार आहे.

 

या सभेची आयोजकांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे
Chandrapur : मऱ्हेगाव येथे वाघाचा धुमाकूळ, 3 पाळीव जनावरांचा मृत्यू तर 1 गंभीर जखमी

Chandrapur : मूल तालुक्यातील मऱ्हेगाव येथे वाघाचा धुमाकूळ... वाघाने आज पहाटे गावात शिरून केलेल्या हल्ल्यात 3 पाळीव जनावरांचा मृत्यू तर 1 गंभीर जखमी, काल दुपारी याच गावातील शेतशिवारात वाघाने केलेल्या हल्ल्यात आशिष दुधकुवर (१७) हा तरुण किरकोळ जखमी, वाघाच्या हल्ल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण, वनविभागाने या भागात कॅमेरा ट्रॅप लावून सुरू केली गस्त

Sanjay Raut : अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा, संजय राऊत म्हणतात...

Sanjay Raut : संजय राऊत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका


मुख्यमंत्री ज्या पदावर ती बसलेली व्यक्ती आहे त्यांना काहीही बोलण्याचं लायसन्स दिले गेलेले नाही या महाराष्ट्रात


महाशय बोलत असताना अधिवेशातून लोकं उठून जात होते त्याचे व्हिडीओ आले आहेत


महाशय असे म्हणत आहे की अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची बंद दारा आड चर्चा झाली नाही


मग मिस्टर अमित शहा मातोश्री मध्ये आले होते कशाला?


अमित शहा मातोश्री च्या पायऱ्या चढून स्वतः का आले हा प्रश्न हा स्वतः महाशय यांनी स्वतःला विचारावा, 


त्यावेळेस ते मातोश्री वर होते का मी होतो ,.


बंद दारा आड चर्चे वेळी मी होतो ते न्हवते


त्यांना तेव्हा काय स्थान होते हे तेव्हा पक्षाचे नेते देखील नव्हते.


त्यांना पक्षाचा नेता आम्ही आता केला सर्वांनी मिळून..


अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा बाळासाहेबांच्या खोलीत काय चर्चा झाली हे अमित शहांनी सांगावे..

Manoj Jarange : 20 तारखेनंतर पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार

Manoj Jarange : शिवरायांची जयंती ती आदर्श व्हायला पाहिजे, शांततेत साजरी करावी


20 तारखेनंतर एक समाज एक मागणी घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार


विद्यार्थ्यांना आंदोलनाची भीती वाटली नाही पाहिजे, याची समाजाने काळजी घेतली पाहिजे


मराठयाना आरक्षण ओबीसी मधूनच पाहिजे


20 तारखेला अंमलबजावणी केली पाहिजे त्या शिवाय आंदोलन थांबणार नाही,


20 तारखेला अधिवेशनात अंदाज आला की सरकार करणार नाही, 


किंवा 20 च्या आत तर सग्या सोयऱ्या स्पष्टता केली नाही


20 ला संध्याकाळी किंवा 21 ला पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार,


 


 

Manoj Jarange : 20 तारखेनंतर पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार

Manoj Jarange : शिवरायांची जयंती ती आदर्श व्हायला पाहिजे, शांततेत साजरी करावी


20 तारखेनंतर एक समाज एक मागणी घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार


विद्यार्थ्यांना आंदोलनाची भीती वाटली नाही पाहिजे, याची समाजाने काळजी घेतली पाहिजे


मराठयाना आरक्षण ओबीसी मधूनच पाहिजे


20 तारखेला अंमलबजावणी केली पाहिजे त्या शिवाय आंदोलन थांबणार नाही,


20 तारखेला अधिवेशनात अंदाज आला की सरकार करणार नाही, 


किंवा 20 च्या आत तर सग्या सोयऱ्या स्पष्टता केली नाही


20 ला संध्याकाळी किंवा 21 ला पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार,


 


 

Pune Weather : पुणे जिल्ह्यात पुढील चार दिवस असणार ढगाळ वातावरण

Pune Weather : पुणे जिल्ह्यात पुढील चार दिवस असणार ढगाळ वातावरण


पुणे शहरासह जिल्ह्यातील तापमानाचा पारा 35 अंशावर राहणार असल्याचा अंदाज


पुढील चार दिवस पुणेकरांना सहन करावा लागणार उकाड्याचा त्रास


शहरात लागली उन्हाळ्याची चाहूल अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढला


तर पुढील तीन ते चार दिवस तापमान पुन्हा वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेचा अंदाज

Pune Megablock : पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक, लोकल गाड्या रद्द

Pune Megablock : पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक


पुणे-लोणावळा मार्गावर अत्यावश्यक अभियांत्रिकी व देखभालीची कामे करण्यासाठी घेणात येणार मेगाब्लॉक


आज पुणे लोणावळा दरम्यानच्या सर्व लोकल गाड्या रद्द


एकूण 14 लोकल रेल्वे गाड्या आज राहणार बंद


तर अनेक रेल्वे धावणार उशिराने


प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय

Amravati : अमरावतीत ट्रॅव्हलर आणि सिमेंट काँक्रीट मिक्सर मशीनचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू, तर 10 गंभीर जखमी

Amravati : अमरावती येथील नांदगाव खंडेश्वर रोडवर ट्रॅव्हलर आणि सिमेंट काँक्रीट मिक्सर मशीन वाहनाचा भीषण अपघात...


अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू, तर 10 गंभीर जखमी..


आज सकाळी 8च्या सुमारास झाला अपघात...


यवतमाळ येथे क्रिकेट मॅच खेळण्यासाठी हे 14 तरुण अमरावती वरून यवतमाळ साठी जात असताना नांदगाव खंडेश्वर जवळ शिंगणापूर जवळ झाला अपघात...


जखमीना नांदगाव खंडेश्वर येथील तालुका आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचारासाठी केले दाखल..


नांदगाव खंडेश्वर येथे जखमींवर उपचार सुरू ...तर काही गंभीर जखमींना अमरावती येथे पुढील  उपचारासाठी केले रेफर...

Maharashtra : अयोध्येतील राम मंदिरात आज महाराष्ट्राचे कीर्तनकार ह.भ.प. डॉ पंकज महाराज गावडे यांचे कीर्तन होणार

Maharashtra : रामजन्मभूमी अयोध्या राम मंदिर प्रांगणात सर्वप्रथम किर्तनाचा मान महाराष्ट्रातील कीर्तनकार ह.भ.प. डॉ पंकज महाराज गावडे यांना लाभला आहे. आज हे किर्तन सादर केले जाणार असून या साठी मोठ्या प्रमाणात भाविक आणि न्यासाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. गावडे हे शिवजन्मभुमी जुन्नरचे सुपुत्र आहेत. अयोध्येत पंकज महाराजांना किर्तनासाठी न्यासाकडून निमंत्रण आले होते. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी श्रीराम लल्लाच्या प्रतिष्ठापनेनंतर प्रथमच होणाऱ्या किर्तन सोहळ्याचा मान महाराष्ट्राला मिळत आहे.

Shirdi : चहा विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला, शिर्डीतील धक्कादायक घटना

Shirdi : चहा विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला
शिर्डीतील धक्कादायक घटना.
साईमंदिराच्या गेट नंबर एक समोरची घटना
सिगारेटचे पैसे मागीतले म्हणून चाकूने वार
बाळासाहेब मोकाटे गंभीर जखमी
अंगावर अनेक ठिकाणी चाकूचे वार
शिर्डीतील गुंड प्रवृत्तीच्या तरूणांनी केला हल्ला.
पहाटे चार वाजेच्या दरम्यान घडली घटना
बाळासाहेब मोकाटे यांच्यावर साईबाबा रूग्णालयात उपचार सुरू

Navi Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज नवी मुंबईमध्ये अल्पसंख्याक विश्वास मेळावा

Navi Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्यावतीने शिक्षण, आरक्षण व संरक्षणाच्या प्रश्नावर राज्यस्तरीय 'अल्पसंख्याक विश्वास मेळाव्या' चे आयोजन आज सिडको कन्वेक्शन सेंटर वाशी (नवीमुंबई) इथे आयोजित करण्यात आले आहे.राज्यभरातून मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.अल्पसंख्याक विश्वास मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि इतर नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करत पक्षाचे अल्पसंख्यांक विभागासाठी काय धोरण याविषयी भूमिका स्पष्ट करतील. 

Weather Update : पुढील 48 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, IMD चा अंदाज

Weather Update : वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशात काही भागात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी असेल. 


आयएमडी (IMD) चा अंदाज


पंजाबमध्ये 18 ते 20 फेब्रुवारी, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान


 इतर राज्यांमध्ये 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता


देशात 18 फेब्रुवारीपासून 22 फेब्रुवारीपर्यंत विविध भागात पावसाचा अंदाज


काश्मीर खोऱ्यातही पुढील काही दिवस पावसाची शक्यता


उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, चंडीगड, लडाखमध्ये 18 ते 22 या काळात पाऊस पडण्याची शक्यता


 


 


 

Rashmi Shukla : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला गडचिरोली दौऱ्यावर, दुर्गम भागातील पोलीस मदत केंद्राला भेट

Rashmi Shukla : राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 


शनिवारी गडचिरोलीच्या अतिदुर्गम छत्तीसगड सीमेवरील गर्देवाडा भागात पोहोचल्या.


नवीन पोलीस ठाणे परिसराची पाहणी केली


पोलीस दलातर्फे आयोजित जनजागरण मेळाव्याला संबोधित केले


आदिवासी नागरिकांना शेती, घरगुती, शालेय, क्रीडा साहित्याचे वाटप केले. 


आदिवासी नागरिकांना पोलीस दलाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. 


 

Jammu Kashmir : PM मोदी 20 फेब्रुवारीला जम्मू दौऱ्यावर, दौऱ्यापूर्वी जम्मूत सुरक्षा वाढवली

PM modi Jammu Kashmir Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 फेब्रुवारीला जम्मू दौऱ्यावर जाणार


 फ्लाइंग ड्रोन, पॅराग्लायडर आणि रिमोट-नियंत्रित मायक्रो-लाइट एअरक्राफ्टवर तात्पुरती बंदी 


फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 अंतर्गत हा आदेश जारी 

जैन धर्मियांचे दिगंबर पंथीयाचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं निधन, आज दुपारी 1 वाजता अंत्यसंस्कार होणार

जैन धर्मियांचे दिगंबर पंथीयाचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं रात्री 2 वाजून 35 मिनिटांनी वृद्धपकाळाने निधन झालं. छत्तीसगडच्या डोंगरगड इथं त्यांचं निधन झालं. ते 77 वर्षाचे होते. आचार्य विद्यासागरजी महाराज यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1946 कर्नाटकमध्ये झाला. दिगंबर जैन आचार्य (दार्शनिक साधू) आहे. त्यांच्या शिष्यवृत्ती आणि तपस्यासाठी त्यांची ओळख  ध्यानधारणा करण्याच्या त्याच्या दीर्घ काळासाठी ते ओळखले जातात.  झाला आणि त्यांनी राजस्थानमध्ये दीक्षा घेतली, छत्तीसगडच्या डोंगरगड इथं त्यांच्यावर आज दुपारी 1 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला खिंडार, कमलनाथ 'कमळ' हातात घेण्याची शक्यता

Kamal Nath Joined BJP: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चेला वेग


कमलनाथ हे त्यांचे पुत्र खासदार नकुलनाथ यांच्यासह अनेक आमदारांना सोबत घेत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त 


याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही, 


पण आज संध्याकाळी पाच वाजता कमलनाथ समर्थक नेत्यांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता 

Sangali : सांगलीच्या कासेगाव मध्ये जयंत केसरी बैलगाडी शर्यत संपन्न, विजेत्याने वन बीएचके फ्लॅट जिंकला

Sangali : लाखो प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शर्यतीत सातारच्या रायफल आणि शंभू बैलजोडीने पहिला क्रमांक पटकावत वन बीएचके फ्लॅट जिंकला आहे. माजी मंत्री जयंत पाटलांच्या वाढदिवसानिमित्ताने शरद लाहीगडे फाउंडेशनच्यावतीने या बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. वीस एकर माळरानावर पार पडलेल्या या भव्य बैलगाडी शर्यतीसाठी चक्क वन बीएचके फ्लॅट सह लाखो रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. महाराष्ट्र, कर्नाटक मध्य प्रदेश येथून सुमारे अडीचशे अधिक बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. 

Ajit Pawar : रायगडची जागा आपलीच, कामाला लागा, अजित पवारांनी सुनील तटकरेंच्या प्रचाराचा फोडला नारळ! 

Raigad Lok Sabha constituency Election 2024 : रायगडच्या लोकसभेच्या जागेवरून महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद 


 वादाला आता पूर्ण विराम मिळण्याची शक्यता


रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळणार,


उपमुख्यमंत्री अजित पवारांचं शनिवारी स्पष्टीकरण  


म्हसळा यथील सभेत अजित पवार यांनी रायगड लोकसभा मतदारसंघ सुनील तटकरे यांचाच असं सांगितलं 


कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देशही दिले. 


शनिवारी अजित पवार यांनी एकप्रकारे सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा नारळच फोडला. 

Rahul Gandhi : भारत जोडो न्याय यात्रा पुन्हा स्थगित, प्रवास अर्ध्यावर सोडून राहुल गांधी वायनाडला रवाना

Bharat Jodo Nyaya Yatra : काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा 


सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशमधून जात आहे. 


शनिवारी राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा अर्धवट सोडून अचानक वायनाडला रवाना झाले. 


राहुल गांधी यांचा यात्रेचा मार्ग वाराणसी ते उत्तर प्रदेशातील भदोही असा होता. 


राहुल गांधी अचानक वायनाडला गेले असून, त्यांनी प्रवास अर्ध्यावरच थांबवला आहे. 


राहुल गांधी यात्रेमधूनच अचानक निघून गेले. 


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी राहुल गांधी वायनाडला जाणार असल्याची माहिती दिली आहे.


 


 

Farmers Protest : दिल्लीकडे कूच की घरी परतणार? केंद्र आणि शेतकरी संघटनांची आज महत्त्वाची बैठक

Farmers Protest : शेतकरी आणि सरकारमध्ये बैठकांच्या तीन फेऱ्या झाल्या.


मात्र, या बैठकांमध्ये एकमत होऊ शकले नाही.


यानंतर आज पुन्हा एकदा शेतकरी आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये चर्चेची चौथी फेरी होणार आहे.


अशा स्थितीत या बैठकीत तोडगा निघेल, अशी आशा आहे.

Marathon : अटल सेतूवरून मॅरेथॉनला पहाटे पाच वाजल्यापासून सुरुवात, सिनेकलाकार अक्षय कुमारने दाखवला हिरवा झेंडा

Marathon : नवी मुंबईमधील प्रवास सुलभ करणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवर आज, रविवारी 'द टाइम्स ऑफ इंडिया' आणि 'एमएमआरडीए'च्या सहयोगाने लार्सन अँड टुब्रो सी-ब्रीज मॅरेथॉनला पहाटे पाच वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. सागरी पुलावरील ही पहिली मॅरेथॉन असून ती 42 किमी, 21 किमी, 10 किमी आणि पाच किमी अशी पार पडणार आहे.


सकाळ पासून या मॅरेथॉनला धावपटूंनी उपस्थिती लावली आहे. या मॅरेथॉनमुळे वाहनधारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी अटलसेतूवरील मार्गात बदल करण्यात आला आहे. यासह, वाहतूक पोलिस व पोलिसांनीही पुरेशी तयारी केली आहे.


या मॅरेथॉनला सिनेकलाकार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत

Mumbai Local MegaBlock : आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

Mumbai Local MegaBlock : आज विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक


ठाणे -कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत तर सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे मार्गावर 11.10 ते 4.40 या दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Marathon Updates : अटल सेतूवरून सी-ब्रीज मॅरेथॉनला सुरुवात, मोठ्या संख्येने धावपटूंचा सहभाग

Marathon Updates : देशातील पहिला सागरी पूल असलेल्या अटल सेतूवरून 'द टाइम्स ऑफ इंडिया' आणि एमएमआरडीएच्या सहयोगाने लार्सन आणि टुब्रो सी-ब्रीज मॅरेथॉनला सुरुवात 


मोठ्या संख्येने या मॅरेथॉनमध्ये धावपटूंनी सहभाग घेतला


सकाळी सहा वाजता (21 किमी) मॅरेथॉनला सुरूवात झाली


सकाळी सहाच्या मॅरेथॉनला टाइम्स ऑफ इंडिया आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी झेंडा दाखवला...

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.