Maharashtra Live Update : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, विदर्भ, मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Sangali : सांगलीमध्ये पूर्ववैमनस्यातून खून झालेल्या मधील संशयित हल्लेखोरांच्या घरावर जमावाचा हल्ला; घराचे नुकसान
काल रात्री राहुल साळुंखे या युवकाचा झाला होता सांगली मधील गणपती मंदिरासमोर खुन
खुनाच्या घटनेनंतर मयताच्या नातेवाईकांनी संशयित हल्लेखोरांच्या घरावर दगडफेक करीत तोडफोड केली
साळुंखे यांच्या खुनातील संशयित हल्लेखोरांच्या घरावर हल्ला चढविला
घटनेची माहिती समजताच शहर पोलिस घटनास्थळी धाव घेतली
या घटनेत संशयितांच्या घरांचे मोठे नुकसान झाले
Sanjay Shirsath : संजय राऊत आंतरराष्ट्रीय माणूस - संजय शिरसाठ, प्रवक्ते, शिवसेना
भारताच्या पंतप्रधानांची तुलना पुतीन बरोबर केलीय
राऊत हे सद्दाम हुसैनसोबत बसतील, कधी पुतीनबरोबर जातील
निवडणुका येतील आणि जातील
एकीकडे जपानमध्ये राहुल गांधी लेक्चर देतात तशी हा महाराष्ट्रात लेक्चर देतो
मोदींचा अशाप्रकारे अपमान करणं चुकीचं
संजय राऊत वायफळ बडबड करतात
Bajrang Sonawane : माझ्यामुळे तीन वेळा जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिली..
धनंजय मुंडे यांच्या आरोपाला बजरंग सोनवणे यांचे उत्तर..
जिल्हा परिषद निवडून आणण येड्या गबाळ्याचे काम नाही
बजरंग सोनवणे यांनी अजित पवार गटाची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना बीडच्या लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे
आणि बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर टीका करत आम्ही त्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केलं
लोकसभेचे देखील तिकीट मिळवून दिलं होतं मात्र सोनवणे यांनी ऐन वेळेला धोका दिला अशी टीका केली होती
आणि याच टीकेला बजरंग सोनवणे यांनी देखील थेट उत्तर देत तीन वेळा माझ्यामुळेच जिल्हा परिषद ही राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिली
त्यामुळे धनंजय मुंडे यांनी यावर बोलू नये जिल्हा परिषद निवडून आणणं हे येड्या गाभाऱ्याचं काम नाही असे देखील बजरंग सोनवणे म्हणाले आहेत
Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महाराष्ट्रात एकही खासदार निवडून येणार नसल्याचा दावा केला आहे.
कणकवलीत ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलले.
बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेसला विरोध केला.
राष्ट्रवादीची ताकद नाही, शिवसेना संपली, काँगेससाठी राहुल गांधी वणवण भटकत आहे.
मोदी बोलतात ते करून दाखवतात, भारत महासत्ता बनण्याचा संकल्प केलाय.
Prakash Mahajan : प्रकाश महाजन यांची राज ठाकरेंवर भूमिका, सोशल मीडिया ट्रोलिंग, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
विरोधकांची टीका आणि सोशल मीडियावर होणारे ट्रोलिंग वर मनसेचे म्हणणे काय? पत्रकारांचा सवाल
महाजन म्हणाले, राज ठाकरे यांनी भूमिका खूप विचार करून घेतली आहे, काही कार्यकर्त्यांना ती भूमिका समजून घ्यायला काही वेळ लागेल
ज्याप्रकारे राज ठाकरेंनी भूमिका घेतली त्यामुळे विरोधकांचा अपेक्षाभंग झाला आणि त्यांची ही कोलेकुई सुरू झाली
ट्रोलिंग विरोधकच करतात बाकी कोण करणार, तुम्हाला माहिती आहे राज ठाकरेंचं महत्त्व काय आहे म्हणून ट्रोलिंग केलं जातंय
Sanjay Shirsath : महायुतीच्या जागांचं वाटप झालंय, फक्त घोषणा होणं बाकी आहे - संजय शिरसाट, प्रवक्ते, शिवसेना
उद्या जागा वाटपाच्या सूत्रांची घोषणा होण्याची शक्यता आहे
प्रचाराला आम्ही गती घेतली आहे, त्यामुळे संभ्रम जागावाटपात नाही
श्रीकांत शिंदेंनी केलेलं विधान योग्य आहे
फडणवीस यांनी उमेदवारी घोषित केली मात्र अधिकृत नियमानुसार होईल अशी अपेक्षा आहे
उलट फडणवीस यांचे श्रीकांत शिंदेंनी आभार मानले
रवींद्र चव्हाण यांनी आश्वासन दिलंय की बहुमताने जागा निवडून आणू
शिवसेनेला जागा मिळावी असा बेस आहे
नाशिक, पालघर, मुंबईचा तिढा सुटलेला आहे आणि उद्या घोषणा होईल
Devendra Fadnavis : गडचिरोलीत देवेंद्र फडणवीसांचा पत्रकारांशी संवाद
विदर्भातील 10 जागा अम्ही प्रचंड बहुमताने जिंकू..
मोदींजींचा आकर्षण त्यामुळे लोक सकारात्मक..
जिल्ह्या विकासाच्या मार्गावर..
जिल्ह्याचे चित्र बदलणार आहे ..
रेल्वे पासून विमानतळ आणि समृद्धी महामार्ग गडचिरोली पर्यत येणार आहे
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहे
चंद्रपूर ची जागा मागे आम्ही काही मतानी हरलो होतो
मात्र यंदा चंद्रपूर गडचिरोलीची जागा जिंकू
मालेगाव ( नाशिक ) ब्रेकिंग...
धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी घेतली डॉ.तुषार शेवाळे यांची मालेगावमध्येच भेट...
डॉ.शेवाळे यांनी कॉग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्षपदा राजीनामा देताच माजी आ. गोटे भेटीला..
राजीनाम्यानंतर लगेचच आ.गोटेंनी भेट घेतल्याने भेटीला महत्व...
Wardha : खासदार रामदास तडस यांच्या सुनेने भरला नामांकन अर्ज
नामनिर्देशन अर्ज छाननी नंतर अर्ज ठरलाय वैध
पूजा पंकज तडस (शेंदरे)असे नामांकन अर्ज दाखल करणाऱ्या तडस यांच्या सुनेचे नाव
खासदार तडस यांच्या विरुद्ध सुनबाई अशी लढत
Puja Tadas : तडस कुटुंबीयांनी मला न्याय दिला नाही.. म्हणून मी लोकांच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे... - पूजा तडस
सुषमा अंधारे म्हणाल्या,
पूजा तडस यांच्या संवेदना समजूनच मी इथे आली आहे.. - सुषमा अंधारे
हा मुद्दा पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन उचलत आहे.. - सुषमा अंधारे
एक परिवार उध्वस्त होत असून तो परिवार मोदींच्या परिवारातला परिवार आहे.. - सुषमा अंधारे
म्हणून मोदी वीस तारखेला त्याच उमेदवाराच्या प्रचाराला येत असतील - सुषमा अंधारे
तर त्यांनी आधी त्या उमेदवाराचा परिवार सुरक्षित आहे का हे पाहायला पाहिजे, मग भाषणबाजी केली पाहिजे - सुषमा अंधारे
Puja Tadas : सुषमा अंधारे यांची नागपूरतील प्रेस क्लब मध्ये पत्रकार परिषद
सुषमा अंधारे या रामदास तडस यांच्या सून पूजा तडस यांना घेऊन पत्रकार परिषदेत आल्या आहेत
पूजा तडस यांचा पत्रकारांशी संवाद, त्या म्हणाल्या..
लग्नानंतर मला एका फ्लॅटवर ठेवलं मला उपभोगाची वस्तू म्हणून वापरण्यात आला.. त्याच्यातून बाळाचा जन्म झाला.. - पूजा तडस
खासदार आणि कुटुंबीय म्हणतात बाळाची डीएनए चाचणी करण्यास सांगितले जाते... - पूजा तडस
खासदार म्हणतात मी मुलाला बेधखल केला बेबी फल केल्यानंतर मुलाला घरातून काढला नाही मग मला एकटीलाच का काढला माझ्याशी राजकारण करता... - पूजा तडस
मी डीएनए चाचणीसाठी तयार आहे... मात्र माझी विनंती आहे ती कोर्टाच्या माध्यमातून करा... - पूजा तडस
मला दोन वेळचा अन्न ही दिलं जात नाही... - पूजा तडस
मोदीजी तुम्ही रामदास तडस यांची 20 तारखेला सभा घेण्यासाठी वर्ध्यात येणार आहात.. तेव्हा मला दोन मिनिटांचा वेळ द्या... - पूजा तडस
Sushma Andhare : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची नागपूरतील प्रेस क्लब मध्ये पत्रकार परिषद होत आहे...
विशेष म्हणजे सुषमा अंधारे या रामदास तडस यांच्या सून पूजा तडस यांना घेऊन पत्रकार परिषदेत आल्या आहेत
पूजा यांच्याशी खासदार रामदास तडस यांच्या मुलाने कोणत्या परिस्थितीमध्ये लग्न केले हे सर्वांना माहिती आहे..
लग्नानंतर तिला ज्या फ्लॅटवर ठेवले गेले, नंतर तो फ्लॅट ही विकून दिला..
त्यामुळे तिला रस्त्यावर यावं लागलं..
आज मुलाची सांभाळ करायला ही तिच्याकडे आर्थिक तरतूद नाही...
मोदीचा परिवार असं भाजपचे नेते दावा करतात, मग हा कसला मोदीचा परिवार?? जिथे सोन्याची काळजी
घेतली जात नाही...
Ambadas Danve : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची वर्षा गायकवाड यांच्यावर टीका
सगळ्यात पक्षात नाराजीची भावना असते
शिवसेनेच्या जागा देखील गेल्या आमची देखील नाराजी होती
मात्र आघाडी आहे, युती आहे
दक्षिण मध्य जागा आमची होती, आमचे खासदार होते
अमरावतीची जागा कांग्रेसला दिलीय
वरीष्ठ नेतृत्वाने सारासार विचार करत जागा वाटपाचा विषय आता संपलेला आहे
Nagpur : बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची आज नागपुरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
नागपूरच्या बेझनबाग मैदानात ही सभा आयोजित करण्यात आलीय
महाराष्ट्रात निवडणूक प्रचाराची मायावती यांची ही पहिलीच जाहीर सभा असणार आहे..
दरम्यान नागपुरात आज सकाळपासूनच पावसाची रीपरीप सुरू असून
हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे,
त्यामुळे मायावती यांच्या सभेवर पावसाचं सावट आहे.
Raigad : रायगडच्या रोहा मध्ये ईद-उल-फितरत ची नमाज संपन्न
रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांनकडून नमाज अदा
मशिदी बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक जोपासल जाईल
मुस्लिम बांधवांकडून सणाचे पावित्र्य कायम
रायगड जिल्हातील रोहा शहरात आज रमजान ईद मोठया उत्साहात साजरी झाली
यावेळेस सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन रमजान महिन्याची शेवटची नमाज अदा केली यावेळी मुस्लिम बांधवांनी ईदच्या शुभेच्छा देत एकमेकांना गळा भेट घेतली
मालेगाव ( नाशिक ) : ब्रेकिंग...
मालेगावात जिल्हा काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांचा राजीनामा...
- धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ.शोभा बच्छाव यांना उमेदवारी...
- मालेगावात नाराजी नाट्य...
- पत्रकार परिषद घेत डॉ.शेवाळे यांनी राजीनामा दिला..
- धुळे लोकसभा मतदारसंघातील दिलेली उमेदवारी बदलावी ; उमेदवारी बाबत फेरविचार करावा अशी मागणी...
- लादलेला उमेदवार नको ; मतदारसंघातील उमेदवार द्यावा ही मागणी...
- डॉ.तुषार शेवाळे हे गेल्या २० वर्षांपासून काँग्रेसचे एकनिष्ठ..
Latur Accident : पिता पुत्राचा अपघाती मृत्यू.... तीन जण जखमी ... लातूर बीड महामार्गावरील कोळगाव तांडा येथील घटना...
लातूर शहरातील कनडे परिवारातील अनेक जण हे बाहेरगावी गेले होते.
काल पहाटे लातूर कडे येत असताना अपघात झाला आहे .
लातूर बीड महा मार्गावरील कोळगाव तांडा जवळ आल्यानंतर त्यांच्या गाडीला एका ट्रकने कट मारला.
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटलं... गाडी रस्त्यावरील डिव्हायडर ला जाऊन धडकली.
या भीषण अपघातात मल्लिकार्जुन मनमतआप्पा कनडे...आणि राहुल मल्लिकार्जुन कनडे या पिता पुत्राचा जागीच मृत्यू झाला
गाडीतील इतर चार जण जखमी झाले आहेत.. पाठीमागून त्यांच्याच परिवारातील दुसरी गाडी येत असल्याने जखमींना ततडीने लातूरमध्ये उपचार साठी हलविण्यात आले होते... याबाबत रेणापूर पोलिसात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.
BJP : भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर
गोंदिया येथे 12 एप्रिलला घेणार जाहीर सभा
गोंदियात सायंकाळी 4.30 वाजता सभा
भंडारामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची 14 एप्रिलला होणार सभा
भंडारा येथील साकोलीमध्ये सायंकाळी 4.30 वाजता शाहांची सभा
Political : फलटणच्या निंबाळकर घराण्याची भाजपच्या उमेदवाराबद्दलची नाराजी अद्याप कायम?
फलटणच्या रामराजे निंबाळकर घराण्याची महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा छुपा प्रचार करण्याची भूमिका
सध्या तरी निंबाळकर घराण्यातील कोणीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार नाही - सूत्र
तिघाही भावांचे अजित पवारांना न सोडता महाविकास आघाडीचे उमेदवार असणाऱ्या व्यक्तीला पाठिंबा देण्याची भूमिका
माढा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना तुतारी वाजवण्याचे निंबाळकर घराण्याकडून सूचना
सध्या रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार तर संजीवराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष, तिसरे भाऊ रघुनाथ राजे नाईक निंबाळकर मार्केट कमिटीचे चेअरमन
रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी यापूर्वीच मरेपर्यंत शरद पवारांची साथ देणार अशी भूमिका आपल्या फेसबुक अकाउंट वरून जाहीर केली
Sanjay Raut : पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा ज्या पद्धतीने खाली आणली आहे - संजय राऊत
ती अत्यंत देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी धोकादायक आहे - संजय राऊत
पंतप्रधान यांनी इतकं खोटं बोलू नये या मताचे आम्ही आहोत राजकारणात खोटं बोलतात लोक - संजय राऊत
पण प्रधानमंत्री पदावरील व्यक्तींना मर्यादा पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा पाहिली पाहिजे राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये संसदेमध्ये देखील विरोधकांना महत्त्व आहे हे मोदी मानायला तयार नाही हा संविधानाला खतरा आहे - संजय राऊत
मोदींना लोकसभा विधानसभा या विरोधकांशिवाय हवे आहेत - संजय राऊत
मोदिना देशामध्ये पुतीन मॉडेल आणायचे आहे- संजय राऊत
विरोधक नको विरोधक जेलमध्ये - संजय राऊत
संविधानाला सर्वात मोठा खतरा असेल ते म्हणजे मोदींची विचारसरणी मोदींचे भूमिका- संजय राऊत
खोटं बोलायचं विरोधकांना बदनाम करायचं विरोधकांना तुरुंगात टाकायचा धमका द्यायचं - संजय राऊत
सर्व भ्रष्टाचारी आणि खंडणीखोर आपल्या पक्षात घ्यायचे हाच सर्वात मोठा आपल्या देशाच्या संविधानाला खतरा आहे. - संजय राऊत
Parbhani Rain : परभणीच्या सोनपेठ मध्ये वादळी वाऱ्याचे थैमान
वादळात अनेक वृक्ष उन्मळून पडली तर दुकाने ही उडाल्याने व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान
अर्धे सोनपेठ अजुनही अंधारात
परभणीत मागच्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस बरसतोय
काल संध्याकाळी सोनपेठ शहर आणि परिसरात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचे वृक्ष उन्मळून पडले
महत्त्वाचं म्हणजे मोठया संख्येने दुकानांचे नुकसान झालं आहे
सोनपेठ शहरातील शिरसाळा रस्ता तसेच शहरातील विविध भागांतील अनेक दुकान या वादळात अक्षरशः उडव्हस्त झाली आहेत
Yogi Adityanath : हिंदू आणि उत्तर भारतीय मते मिळवण्यासाठी भाजपच राज्यात योगी कार्ड
राज्यासह मुंबईत योगी आदित्यनाथ यांच्या प्रचाराचा धडाका
पूर्व विदर्भात योगी यांच्या तीन सभा झाल्यानंतर आता दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातही होणार योगी आदित्य नाथ यांच्या सभा
प्रत्येक टप्प्यात योगी यांच्या चार ते पाच सभाचे नियोजन
मुंबईतही योगी आदित्यनाथ यांच्या पाच सभा होणार
Nagpur : नागपुरात आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे...
काल रात्री जोरदार मेघगर्जनेसह नागपूर जिल्ह्यातील अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता..
त्यानंतर सकाळपासून सूर्यदर्शन झालेले नाही आणि अधून मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत...
हवामान विभागाने आज नागपूर सह गोंदिया, अमरावती, अकोला व बुलढाणा या पाच जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट दिला आहे...
तर गडचिरोली चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम आणि भंडारा या सहा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे...
Dhule : महाविकास आघाडीकडून काँग्रेसने काल डॉ शोभा बच्छाव यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेस मधून नाराजी नाट्य सुरू
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी आपल्या पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला आहे,
गेल्या अनेक वर्षांपासून आपण पक्षाशी एकनिष्ठ असून आपल्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया श्याम सनेर यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी श्याम सनेर यांचा कंठ दाटून आला होता.
पक्षाने बाहेरील उमेदवाराला संधी दिल्याने आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत आपण राजीनामा दिला
पुढील दोन दिवसात उमेदवार बदलाबाबत कुठलाही निर्णय न झाल्यास आपण कठोर भूमिका घेणार असल्याची प्रतिक्रिया शाम सनेर यांनी व्यक्त केली आहे
Amravati : अमरावतीत रमजान ईदचा उत्साह.. पठाण चौक आणि काँग्रेस नगर मधील मैदानावर रमजान ईदची नमाज अदा... यावेळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव हजर..
नमाज अदा झाल्यावर पोलीस आयुक्त आणि इतर मंडळी कडून मुस्लिम बांधवांना पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देणार...
यावेळी लोकसभा निवडणूक असल्याने राजकीय नेत्यांची मांदियाळी सुद्धा पाहायला मिळाली..
काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे, आमदार यशोमती ठाकूर आणि प्रहारचे उमेदवार दिनेश बुब, आमदार बच्चू कडू देखील शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित..
Jammu Kashmir : पुलवामात सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक
- पोलीस आणि सुरक्षा रक्षक अतिरेक्यांच्या मागावर
- पुलावामातील फ्रासिपुर भागातील कारवाई
Ramzan Eid : छत्रपती संभाजीनगर मध्ये रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण
खासदार इम्तियाज जलील यांचाही समावेश.
चंद्रकांत खैरे यांच्याकडून रमजान ईदच्या शुभेच्छा.
देशभरात आज रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून छत्रपती संभाजी नगर मध्ये देखील आज छावणीच्या इदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले. यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील यामध्ये सहभाग घेतला तर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या आहे
Malegaon - मालेगावच्या ईदगाह मैदानावर फडकविला ' पॅलेस्टाईन ' झेंडा..
मालेगाव ईदची नमाज सुरू असतांना एका तरुणाने पॅलेस्टाईन ध्वज फडकवला...
- त्याचेशी माझा काहीही संबंध नाही - मौलाना मुफ्ती..
नाशिकच्या पोलीस कवायत मैदानावर नमाज पठण सुरू असतांना एका मुस्लिम बांधवाने मैदानावर गर्दीतून चालत येत ' पॅलेस्टाईन ' चा ध्वज फडकवला..हा पॅलेस्टाईन ध्वज फडकावत तो थेट इदगाह मैदानाच्या दिशेने चालत आला..यावेळी मुस्लिम धर्मगुरू तथा आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल हे मुस्लिम बांधवांना संबोधित करत होते..दरम्यान, याविषयी धर्मगुरू मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांना विचारले असता ' त्याचेशी माझा काहीही संबंध नाही ' असे उत्तर दिले..
Lok Sabha Election 2024 : हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांनी इस्लामपुर मधील सभेत कार्यकर्त्यांना भरला दम..
कोणाच्या घरी,कोणी चहा पिऊन गेलेले, मला चालणार नाही.
आले,घरात बसले,आम्ही काय करू, असला धंदा बंद करा..
हातकणंगले लोकसभेचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात जयंत पाटील यांचे वक्तव्य
हातकणंगले मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा सर्वांनी घासून-पुसून काम करायचं.
अचानक कोणी घरी आले तर,तुम्ही घरी जाऊ नका,बाहेर जावा..
सध्या इलेक्शन सुरू आहे,त्यामुळे तुमचे कोण,काय संबंध असतील,
ते इलेक्शन नंतर..
ही विधानसभेच्या आधीची रंगीत तालीम आहे,बुथचे नियोजन करा असेही कार्यकर्त्यांना केले आवाहन
News - बुद्ध धर्म स्वतंत्र धर्मपंथ, हिंदू धर्माचा भाग नाही - गुजरात सरकार
- बुद्ध धर्मात धर्मांतर करून घेण्यासाठी गुजरातमध्ये कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागणार
- गुजरात धर्म स्वातंत्र्याच्या कायद्याखाली नवे परिपत्रक जारी
- त्यानुसार बुद्ध धर्मात प्रवेश करण्यापूर्वी करावी लागणार कायदेशीर प्रक्रिया
- जिल्हाधिकाऱ्यांना ३० दिवस आधी पूर्वसूचना द्यावी लागणार
Wardha Rain : वर्ध्यात पावसाची रिपरिप
वर्ध्यात ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस
वर्ध्याच्या सेलू,वर्धा, देवळी, आर्वी भागात सकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.
सकाळपासून सतत रिपरिप पाऊस सुरु आहे
कालपासून वर्ध्यात ढगाळ वातावरण आहे.
काही भागात जोरदार पाऊस पडत आहेत तर कुठे रिपरिप पावसाला सुरुवात झाली आहे
पावसामुळे उकड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी
अवकाळी पावसामुळे शेतातील बागायती पिकांना तसेच उन्हाळी पिकांना काही प्रमाणात फटका बसलाय.
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मणिपूर दौऱ्यावर
15 एप्रिलला अमित शहा मणिपूर दौऱ्यावर
लोकसभा निवडणुकी संदर्भात जाहीर सभेचे आयोजन
Ramadan Eid : भिवंडीत ठिकठिकाणी सामूहिक नमाज प्रार्थना अदा करीत रमजान ईद उत्साहात साजरी ,
मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण रमजान ईद भिवंडी शहरात उत्साहात साजरी करण्यात आली
या निमित्त शहरातील सुमारे 113 मस्जिदीं मधून सामूहिक नमाज प्रार्थना अदा करण्यात आली.
भिवंडी शहरात या निमित्त विशेष उत्साह लहानथोरांपासून सर्वांमध्ये दिसून आला
Malegaon : नाशिकमधील मालेगावात रमजान ईदचा उत्साह...
- थोड्या वेळात होणार पोलीस कवायत मैदानावर रमजान ईद ची नमाज अदा...
- 3 ते 4 लाख मुस्लिम बांधव पोलीस कवायत मैदानावर हजर...
- मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल देताहेत धार्मिक प्रवचन...
Kolhapur Crime : बनावट नोटा छापून त्या चलनात आणणा-या रॅकेटचा कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला.
याप्रकरणी कोल्हापूर, कराड आणि पुण्यातील सात जणांना पोलिसांनी अटक केली...
त्यांच्याकडून नोटा छापण्यासाठी वापरलेला प्रिंटर, कागद, लॅपटॉप, वाहने असे साहित्य जप्त केले.
ताराराणी चौकातील एका खासगी सावकाराच्या मुलाचाही यात समावेश आहे...
मित्राला मदत करण्यासाठी आणि चैनीसाठी पैसे उपलब्ध व्हावेत,
यासाठी बनावट नोटा छापल्याची कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली..
Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर कार आणि ट्रकचा अपघात.
ट्रक चालकाने अचानक लेन बदलल्याने भरधाव कार ट्रकवर धडकली.
अपघातात कार मधील तिघे गंभीर जखमी.
समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉर वरील चेनेज 301 जवळ समोर
ट्रक चालकाने अचानक लेन बदलल्याने मागून येणारी भरधाव कार या ट्रकवर आदळली.
या झालेल्या अपघातात कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत
तिघांवर मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे
तर दोघांचे प्रकृती गंभीर असल्याने त्यांना संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे
समृद्धी महामार्गावर ट्रक चालक कुठलाही इशारा न देता अचानक लेन बदलवत असतात
त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत.
Gondia Rain : सलग तिसऱ्या दिवसीही विजांच्या कडकडाटासह गोंदियात दमदार पावसाची हजेरी...
फळ भाज्यांसह धान पिकाचे नुकसान..
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार गोंदियात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
सलग तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे.
यामुळे आंबा पिकासह फळभाजी आणि धान पिकाला देखील याचा मोठा फटका बसला आहे.
Washim Fire : वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वाडीरायताल येथील घटना
गैस सिलेंडर स्फोट झाल्याने दोन घरानां आग मोठं आर्थिक नुकसान जीवित हानिटळली..
गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घराला लागली आग
सुदैवाने कोणतीही कोणतीही जीवित हानी नाही.
सुभाष सदाशिव पुंड यांच्या घरात झाला सिलेंडर चा स्फोट.
शेजारी मोहन त्रिंबक पुंड यांच्या घरालाही लागली आग.
घरातील 70 क्विंटल सोयाबीन सह संसार उपयोगी साहित्य जळून खाक.
Ravikant Tupkar : 'समृद्धी महामार्गाच्या नावावर शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांना मी सोडणार नाही
रविकांत तुपकर यांचा इशारा कुणीकडे..?
बुलढाणात समृद्धी महामार्गाच बांधकाम सुरू असताना शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेतजमिनी या प्रकल्पात गेल्या आहेत.
फडणवीस आणि गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या प्रकल्पात शेतजमिनी गेलेल्या
शेतकऱ्यांच्या नावावर काही नेत्यांनी कोट्यावधी रुपये हडप केल्याचा आरोप
शेतकरी नेते व बुलढाणा लोकसभेचे उमेदवार रविकांत तुपकर यांनी केला आहे.
या प्रस्थापितांशी माझी लढत असून यात मी जिंकणार असल्याच तुपकर म्हणाले.
मात्र यामुळे पुन्हा समृद्धी महामार्ग चर्चेत आला असून " ते " प्रस्थापित कोण याबाबत आता तर्कवितर्क लढविले जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांच्या नावावर भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Pune : महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त पुण्यातील महात्मा फुले वाड्यात वीस हजार किलो मिसळ बनवण्यात येतेय.
प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर ही मिसळ बनवतायत.
रात्री दोन वाजेपासून ही मिसळ बनवण्यात येतेय.
महात्मा फुलेंना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लोकांना ही मिसळ वाटण्यात येणार आहे.
Sunil Tatkare : सुनील तटकरे ऑन मनसे अध्यक्ष राज ठाकरे निर्णय
राज ठाकरे यांचा निर्णय राज्यातील महायुतीला मदतशीर ठरेल
मनसेचा रायगड मध्ये यश प्राप्त करण्यासाठी फायदा होइल.
मतदानामधे वाढ होईल मोठ्या फरकाने यश मिळवण्यासाठी देखील फायदेकारक ठरेल.
Nagpur : नागपूर सह देशभरात घरफोडी करणाऱ्या दोन कुख्यात चोरट्यांना नागपूर पोलिसांनी हैदराबाद मधून अटक केली आहे...
अटक झालेल्या दोन्ही चोरांपैकी एकावर तब्बल 213 घरफोड्या करण्याचा तर दुसऱ्यावर 25 पेक्षा जास्त घर फोडण्याचा आरोप आहे...
Elon Musk : टेस्लाचे सीईओ एलन मस्क भारत दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी भारताला भेट देणार
भारतात गुंतवणूक करण्याच्या आणि नवा कारखाना उघडण्याच्या त्यांच्या योजनांवर चर्चा करण्याची अपेक्षा
एलन मस्क22 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात भारत दौऱ्यावर असतील.
एलन मस्क नवी दिल्लीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ शकतात.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -