IPO : आयपीओचा बोलबाला संपला? 2024 मध्ये लिस्ट झालेल्या 50 टक्के आयपीओचे शेअर घसरले, काय घडलं पाहा

भारतीय शेअर बाजारातील रिटेल गुंतवणूकदारांनी गेल्या काही दिवसांपासून आयपीओद्वारे गुंतवणुकीला प्राधान्य दिलं होतं. मात्र, 50 टक्के आयपीओच्या शेअरची किंमत त्यांनी निश्चित केलेल्या किंमतपट्ट्याच्या पेक्षा कमी झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2024 मध्ये लिस्ट झालेल्या आयपीओपैकी 50 टक्के आयपीओमध्ये घसरण झालेली पाहायला मिळते. त्यापैकी काही प्रमुख उदाहण आपण पाहणार आहोत.पॉप्युलर व्हेइकलचा आयपीओ ज्यावेळी आला तेव्हा 295 रुपये किंमतपट्टा निश्चित केला होता. सध्या हा शेअर 120.85 रुपयांदरम्यान आहे. बाझार स्टाईल या कंपनीनं आयपीओ निश्चित करताना किंमतपट्टा 398 रुपये होता. सध्या या शेअरमध्ये घसरण सुरु आहे. एनएसईवर सोमवारी या कंपनीचा शेअर 183.20 रुपये होता.

कॅरराओ इंडिया कंपनीनं आयपीओ आणला तेव्हा किंमतपट्टा 704 रुपये निश्चित केला होता. सध्या आयपीओ 334 रुपयांवर पोहोचला आहे. गोदावरी बायो रिफायनरीजचा शेअर 181.55 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनी आयपीओ आणला तेव्हा 352 रुपये निश्चित केला होता.
वेस्टर्न कॅरिअरचा शेअर सध्या 90 रुपयांवर ट्रेड करत आहे. आयपीओनं किंमतपट्टा 172 रुपये निश्चित केला होता. अॅक्मे फिन ट्रेड इंडिया कंपनीनं किंमतपट्टा 120 रुपये निश्चित केल होता. सध्या या कंपनीचा शेअर 67.99 रुपयांवर आहे.
कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक कंपनीचा शेअर 290.95 रुपयांवर पोहोचला आहे. या कंपनीचा आयपीओ आला तेव्हा 468 रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून या कंपनीच्या शेअरमध्ये घसरण सुरु आहे. इकॉस मोबिलीटीचा आयपीओ आला तेव्हा कंपनीनं किंमतट्टा 334 रुपये निश्चित केला होता सध्या शेअर 199.04 रुपयांवर आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)