Maharashtra News Updates 2nd April 2023: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Apr 2023 01:58 PM
Rohit Pawar : भोंदूंच्या आडून ट्रायल घेण्यापेक्षा अधिकृत भूमिका घेण्याचं धाडस दाखवा, रोहित पवारांचा रोख कुणाकडं? 

Rohit Pawar : श्री साईबाबा आणि महात्मा गांधी यांच्याबाबत दोन भोंदू बाबांनी केलेल्या वक्तव्याचा मी तीव्र निषेध करतो. पण यानिमित्तानं महाराष्ट्रात (Maharashtra) होऊ घातलेल्या निवडणुका कोणत्या दिशेला नेण्यात येत आहेत, याचा अंदाज येऊ लागल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP Mla Rohit Pawar) यांनी व्यक्त केले. हिंमत असेल तर भोंदूंच्या आडून ट्रायल घेण्यापेक्षा अधिकृत भूमिका घेण्याचं धाडस त्यांनी दाखवावं असे रोहित पवार म्हणाले. बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. श्री साईबाबा देव नाहीत असं वक्तव्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra krishna shastri) यांनी केल्यानं साईभक्तांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे.

Sangli News : जतमध्ये खुनाची मलिका सुरूच, मध्यरात्री तरुणाचा खून

Sangli News : जतमध्ये खुनाची मलिका सुरूच, मध्यरात्री तरुणाचा खून


15 दिवसात आणखी एकाची निर्घृण हत्या.


जत शहरा पासून काही अंतरावर असलेल्या यल्लमा रोड जवळ झाला खून.


शशिकांत बिरा मदने ,वय 28 ,असे तरुणाचे नाव.


खुनाचे कारण मात्र अस्पष्ट,घटनास्थळी जत पोलीस दाखल.


जत तालुक्यातील खुनाचे सत्र थांबता थांबेना...

Washim Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक; प्रवाशांमध्ये भीतीची वातावरण

Washim Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गा हा नेहमी वाढत्या अपघातामुळे चर्चेत आहे. मात्र आता याच समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर ते जालनाच्या  प्रवासा दरम्यान नागपूरकडे जात असणाऱ्या वाहनावर 31 मार्चला रात्रीदरम्यान अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. या दगडफेकीमध्ये दोन ते तीन वाहनाचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही दुखापतग्रस्त झाले नाही. मात्र वाहनाचे किरकोळ नुकसान झाले. संबंधित वाहनधारकांनी आयसी 09 वनोजा टोल प्लाझा येथे येऊन माहिती दिली  या घटनेमध्ये एकआयशर कंपनीचा ट्रक आणि एका चार चाकी गाडी असल्याची माहिती कळते. मात्र महामार्ग पोलिसांनी असा काही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले.

Beed Crime : गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशाचे 75 हजार रुपये चोरणाऱ्या आरोपीला बीड पोलिसांनी केली अटक
Beed Crime : बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशाच्या खिशातले पैसे लुटणाऱ्या एक आरोपीला बीड पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसापूर्वी बीड बस स्थानकात एका प्रवासाच्या खिशातून 75 हजार रुपये काढून घेतल्याची घटना घडली होती. यावेळी सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता. सचिन लोखंडे नावाच्या आरोपीला पोलिसांनी बीड शहरातून अटक केली आहे. त्याच्याकडून 75 हजार रुपयाची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.

 
Beed News: बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आतापर्यंत 409 उमेदवारांचे अर्ज दाखल

Beed News: बीड जिल्ह्यामध्ये होत असलेल्या नऊ बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून आतापर्यंत 409 उमेद्वारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. जिल्ह्यामधील बाजार समितीमध्ये 18 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहेत यामध्ये एकूण 162 जागांसाठी 409 अर्ज दाखल झाले आहेत तर हे अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख असून पाच एप्रिलला या अर्जाची छाननी करण्यात येणार आहे.


बाजार समितीच्या या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच शेतकरी मित्रांनी मोठा सहभाग घेतला असून ही निवडणूक रंगत होणार असल्याच चित्र पाहायला मिळतंय. 

 
Beed News: प्रियकराचा प्रेयसीवर धारदार शास्त्राने हल्ला हल्ला करणारा आरोपी अटक राज्य महिला आयोगाने घेतली गंभीर दखल

Beed News: बीडच्या नगरपालिकेत लिपिक म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीवर प्रियकराने धारदार शास्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बीड पोलिसांनी हल्ला करणाऱ्या लखन वाङमारे याला अटक केली आहे. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दाखल घेतली असून यापूर्वी देखील या तरुणीने हल्ला करणाऱ्या तरुनविरोधात पोलिसात तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी कुठलीच करावाई न केल्याने या संदर्भातला अहवाल रूपाली चाकणकर यांनी तात्काळ मागितला आहे.


हल्ला करणारा आरोपी आणि या तरुणीचे पूर्वी प्रेम संबंध होते मात्र काही दिवसापूर्वी त्यांच्यामध्ये वाद झाला आणि दोघेही एकमेकांपासून दूर राहत होते. रात्रीच्या वेळी अचानक लखन याने या तरुणीच्या घरी जाऊन तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले यामध्ये तिच्या चेहऱ्याला जबर दुखापत झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर बीड शहर पोलीसानी आरोपी लखन याला अटक केली आहे.

 
Buldhana News: बुलढाण्यात भरल पहिलंच राज्यस्तरीय आदिवासी भील साहित्य संमेलन

Buldhana News: आज आद्यक्रांतिकारक तंट्या भील सहित्यनगरी, भिल्लठाणा (बुलढाणा) येथे पहिले राज्यस्तरीय आदिवासी भिल साहित्य संमेलन साजर होत आहे. पुरस्कार वितरण आणि आदिवासी भील जनजागरण मेळावा ही यानिमित्त आयोजित करण्यात आला आहे. या साहित्य संमेलनाला राज्यभरातील आदिवासी भील समाजातील साहित्यिक उपस्थित  आहेत. आज सकाळी भिलठाना अर्थात बुलढाणा शहरातून भव्य आदिवासी संस्कृतीची ओळख होईल अशी शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर साहित्य नगरी असलेल्या तंट्या भील सहित्यानगरित साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं. आज दिवसभर आदिवासी साहित्यिकांची याठिकाणी मांदियाळी बघायला मिळणार आहे.

Mumbai News: मुंबईच्या वरळी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून "काळजी आरोग्याची जबाबदारी शिवसेनेची" या नावाने मेडिकल कॅम्पचं आयोजन

Mumbai News: मुंबईच्या वरळी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून "काळजी आरोग्याची जबाबदारी शिवसेनेची" या नावाने मेडिकल कॅम्पचं आयोजन करण्यात आला आहे. 


या मेडिकल कॅम्पमध्ये विविध आजारांवर डॉक्टरांकडून मोफत चेकअप केली जात आहे. 


ठाकरे गटाचे या मेडिकल मेडिकल कॅम्प मध्ये थोडक्यात वेळाने वरळी मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे येणार आहेत. 

Solapur News: सोलापुरात बनावट वाहन विम्या द्वारे देशातील सतराशे ग्राहकांना तब्बल तीन कोटीची टोपी

Solapur News: सोलापुरात बनावट वाहन विम्या द्वारे देशातील सतराशे ग्राहकांना तब्बल तीन कोटीची टोपी


कमी किमतीत वाहनांची पॉलिसी उतरण्याचे आमिष, एका इन्शुरन्स कंपनीच्या असिस्टंट जनरल मॅनेजरच्या फिर्यादीवरून सोलापूरच्या दोघांवर गुन्हा दाखल. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थानमधील मोटार वाहन धारकांना गंडवलं


बनावट पॉलिसी काढून वाहन धारकाची आणि कंपनीची एकूण दोन कोटी 93 लाख रुपयाची फसवणूक


एन्शुरस कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेजर विनय मंत्री यांची सोलापुरातील विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद, पोलिसांनी अजय कोरवार आणि प्रवीण सावंत यांच्यावर केला गुन्हा दाखल


गुन्ह्याचा तपास सोलापूर पोलीस आयुक्तालायच्या आर्थिक गुन्हे शखेकडे वर्ग

Pandharpur News: चार लाख भाविकांच्या उपस्थितीत चैत्री यात्रा सोहळा संपन्न, आज देवाची लंगडी एकादशी

Pandharpur News: हरी हरा नाही भेद हि शिकावं देणारी मराठी महिन्यातील पहिली यात्रा म्हणजे चैत्री अर्थात कामदा एकादशीचा सोहळा असतो. आज चार लाखापेक्षा जास्त भाविकांच्या उपस्थितीत चैत्री यात्रेचा सोहळा संपन्न झाला. आज शिखर शिंगणापूर येथे मोठा देव अर्थात महादेवाचा विवाह सोहळा होत असल्याने वारकरी संप्रदायात हरी हरा नाही भेद ची शिकावं देणारी ही यात्रा मानली जाते. आजच्या एकादशीचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक काळ दुपारीपासून दर्शन रांगेत असून दुपारी चार वाजता रांगेत उभारलेले भाविक आज 12 तासानंतर विठ्ठल मंदिरात पोचत आहेत. 


आज चैत्री यात्रा असल्याने लाखो वारकरी उपवास करीत असताना देवाला मात्र आज पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात येतो. सकाळी पुरणपोळी आणि संध्याकाळी उपवासाचे पदार्थ देवाला दाखविण्याची शेकडो वर्षाची परंपरा असून यामुळे आज देवाची लंगडी एकादशी मानली जाते. महादेवाच्या विवाहाला गेलेले देव तेथे पुरणपोळीचे भोजन करून आल्याने देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. रुक्मिणी मातेला मात्र आज दिवसभर उपवासाच्या पदार्थांचा महानैवेद्य दाखविण्यात येत असतो. आज चैत्री एकादशीनिमित्त पुणे येथील भाविक अमोल शेरे यांनी प्रथमच विठ्ठल मंदिरात सूर्यफुलाची सजावट सेवा अर्पण केल्याने विठ्ठल मंदिराला सुवर्णरूप प्राप्त झाले आहे. 
Buldhana News: सोन साखळी चोरांवर बुलढाणा पोलीस मेहेरबान?

Buldhana News: बुलढाण्यात गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. असाच एक प्रकार बुलढाणा शहरात घडला असताना तक्रार देण्यासाठी बुलढाणा शहर पोलिसात गेलेल्या महिलेला येथील ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी तक्रार नोंदवून घेण्यास 24 तास विलंब केला. याशिवाय आपण आधी चोर शोधू त्यानंतर एफ आय आर दाखल करू असे म्हटले.. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जात आहे. गेल्या आठवड्याभरात बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. यामधील एकाही सोनसाखळी चोरीच्या घटनेचा छडा पोलिसांना लावता आला नाही. त्यामुळे बुलढाणा पोलीसच या सोनसाखळी चोरांना अभय देतात की काय ? असा प्रश्न बुलढाणा जिल्ह्यात उपस्थित केला जातोय.  या प्रकाराविरोधात बुलढाणा येथील एका महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांची तक्रार केली आहे. आणि चौकशी करून तात्काळ सोनसाखळी चोरांना पकडून न्याय देण्याची मागणी केली आहे.

Shikhar Shinganapur Yatra : हर हर महादेव! शिखर शिंगणापुरात शंभु महादेव यात्रेचा उत्साह

Shikhar Shinganapur Yatra : लाखो भविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर (Shikhar Shinganapur) येथील शंभु महादेव यात्रेचा (Yatra) आज मुख्य दिवस आहे. हर हर महादेवच्या जयघोषात हजारो भाविक गडावर दाखल झाले आहेत. हजारोंचा संख्येने कावडी गडावर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. शंकराची पत्नी पार्वती यांचा पुनर्विवाह याचं गडावर झाला. या गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावाच्या नावानं म्हणजेच शिखर शिंगणापूर या नावानं हा डोंगर प्रचलित झाला आहे.

Maharashtra Politics: खासदार नवनीत राणा यांच्या बॅनरवर उद्धव ठाकरे यांना टोलेबाजी

Maharashtra Politics: खासदार नवनीत राणा यांच्या बॅनरवर उद्धव ठाकरे यांना टोलेबाजी


6 एप्रिलला हनुमान जयंती आणि नवनीत राणा यांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्याने अमरावतीत हजारोंच्या उपस्थितीत खासदार नवनीत राणा यांचा हनुमान चालीसा पठण


यावेळी 'हिंदू शेरणी' या नावाने सगळीकडे बॅनर लागले आता उद्धव ठाकरे यांना डीवचण्यासाठी नवीन बॅनर


अहंकारी उद्धव ठाकरेनी हनुमान चालीसेचा विरोध केला. धनुष्यबाण गेला, हिंदुत्ववादी आमदार ही गेले, पक्ष गेला, मुख्यमंत्री पद पण गेले आणि सरकार सुद्धा गेली.


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गेल्या नंतर उद्धवनी हिंदुत्व सोडले, एका महिला खासदाराला हनुमान चालीसा वाचल्यामुळे जेलमध्ये टाकले. यासाठी बाळासाहेब सुद्धा उद्धवला माफ करणार नाही..


जो प्रभु श्री राम का नहीं, श्री हनुमान का नही, वो किसी काम का नहीं.


असं बॅनरवर लिहण्यात आले.

Mumbai News: कुर्ल्याच्या दंडाधिकारी न्यायालयात आरोपीनं न्यायाधिशांनाच चप्पल मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायकबाब घडली

Mumbai News: कुर्ल्याच्या दंडाधिकारी न्यायालयात आरोपीनं न्यायाधिशांनाच चप्पल मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायकबाब शनिवारी घडली


या प्रकरणी आरोपी जावेद सुभाष शेख उर्फ प्रदीप तायडे या 39 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

 

तायडेवर यापूर्वीच 2016 आणि 2011 मध्ये ना म जोशी मार्ग, ट्राॅम्बे पोलिस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न व मारहाणीसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद होती.

 

याच गुन्ह्यात तारखेसाठी तायडेला न्यायालयात हजर केले असता. आपल्यावरील प्रलंबित असलेल्या खटल्याचा लवकरात लवकर निकाल लावून कोर्टाच्या फेर्यातून मुक्त करावे ही मागणी करत आरडा ओरड करू लागला. त्यावेळी अचानक न्यायाधिशांच्या दिशेने त्याने पायातली चप्पल मारण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

 

तायडेवर कुर्ला पोलिस ठाण्यात 353, 328, 189, 506, 504 भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या प्रकरणी कुर्ला पोलिस अधिक तपास करत आहेत.
Maharashtra News: महाराष्ट्र कारागृहातील कैद्यांनी बनवलेली विविध उत्पादनं ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध होणार

Maharashtra News: लवकरच महाराष्ट्र कारागृहातील कैद्यांनी बनवलेली विविध उत्पादने ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध होणार आहेत. 


तुरुंग अधिकारी उत्पादने लाँच करण्यासाठी सज्ज आहेत आणि त्याचा दर चार्ट ही तयार केला आहे.


 उत्पादनामध्ये लाकडी उत्पादने, सँडल, शर्ट, टॉवेल, नऊवारी साड्या यांचा समावेश आहे. 


अशी 400 हून अधिक उत्पादने कैद्यांनी बनवली आहेत.


महाराष्ट्र कारागृह प्रशासनाने जाहीर केलेल्या उत्पादनांच्या ताज्या यादीमध्ये जवळपास 437 प्रकारच्या उत्पादनांचा समावेश आहे.  


5 रुपयांपासून सुरू होणाऱ्या उत्पादनाची श्रेणी नागरिकांच्या आवडीनुसार 65,000 रुपयांपर्यंत आहे.


महाराष्ट्र तुरुंग विभागाचे अतिरिक्त महासंचालक अमिताभ गुप्ता, इतर तुरुंग कर्मचाऱ्यांसह उत्पादने ऑनलाइन पोर्टल तयार करण्याची आणि विक्रीनंतर चांगला परतावा मिळणाऱ्या कैद्यांचे कार्य प्रदर्शित करण्याची योजना आखत आहेत.

Ratnagiri News: मोरवणे गावचे सुपुत्र अजय ढगळे शहीद

Ratnagiri News: भारत चीन सीमेवर रस्ता बनविण्यासाठि जागेची रेकि करण्यासाठी मोरवणे गावचे सुपुत्र आणि माजी सैनिकि मुलांचे वसतीगृह चिपळूणचे छात्र सुभेदार अजय  शांताराम ढगळे हे गेले होते. त्याचवेळी  सततच्या पावसामुळे  बर्फवृष्टिमुळे 24 मार्च रोजी सिक्किम मधे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. त्यात  सुभेदार अजय ढगळे व त्यांच्या बरोबर असलेले चार जवान शहीद झाले ते मातीच्या व बर्फाच्या ढिगार्या खाली गाडले गेले. याची माहिती मिळताच भारतीय सेना दल यांनी सहा दिवस त्यांना शोधले आणि अथक प्रयत्न करून भारतिय सेनेच्या जांबाज बहादुर सैनिकांनी भल्या मोठ्या चिखल दगड बर्फाच्या खाली असलेल्या बहादुर शहिद सुभेदार अजय ढगळे आणि इतर चार जवानांना  आपल्या प्राणांची बाजी लाउन शोधुन काढले. शहिद अजय ढगळे हे कारगिल लढाई मधे टायगर हिल जिंकणार्या जांबाज बहादुर टिम चा सुद्धा हिस्सा होते. त्यांचा पार्थिव देह सोमवारी मोरवने गावी आणण्यात येणार आहे.

Maharashtra Politics: शिवाजी पार्कात शिवसेनेच्या वतीनं ठाकरे गटाला डिवचत बॅनरबाजी

Maharashtra Politics: दादर परिसरामध्ये शिवसेना : ठाकरे गटाला डीवचणारे बॅनर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने लावण्यात आलेले आहेत.


"सत्तेसाठी आहेत लाचार, सोडून दिला सावरकरांचा विचार, आम्हाला आहे बाळासाहेबांची साथ, सावरकर विरोधकांच्या घालू पेकटात लाथ", असे बॅनर शिवाजी पार्क परिसरात झळकावण्यात आले आहेत. 


आम्ही सावरकर यात्रा शिवसेना आणि भाजपच्या वतीने सर्वत्र  काढण्यात येत आहे.


 या पार्श्वभूमीवर हे बॅनर सर्वत्र लावण्यात आलेले आहेत.


 हे बॅनर दादर परिसरामध्ये शिवसेना भवन, शिवाजी पार्क, दादासाहेब फाळके रोड आणि इतर  परिसरात लावण्यात आले होते.


  या बॅनरला परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी तात्काळ बॅनर हटवले आहेत.

Maharashtra Heat Wave: राज्यात एप्रिलमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता, एप्रिलमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील तापमान वाढण्याचा अंदाज

Maharashtra Heat Wave: राज्यात एप्रिलमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. एप्रिल महिन्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात तापमान वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर एप्रिलनंतर जूनपर्यंत कमाल तापमान सरासरी राहण्याची शक्यता आहे.

Kamada Ekadashi 2023: आज चैत्र शुद्ध एकादशी... पंढरीत भाविकांची गर्दी

Kamada Ekadashi 2023: आज चैत्र शुद्ध एकादशी... या निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला सुर्यफुलांची आकर्षक सजावट करण्यात आलीये. चैत्र शुद्ध एकादशी ही मराठी महिन्यातील पहिली मोठी यात्रा असते. यावेळी शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाचा विवाह सोहळा संपन्न झाला. यासोबतचं आज सकाळी विठूरायाला पुरणपोळीचा नैवैद्य दाखवण्यात आला. आज दिवसभर रुक्मिणी मातेला उपवासाचा नैवेद्य असतो तर संध्याकाळी देवालाही उपवासाचा नैवेद्य दाखविण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे . त्यामुळे आज देवाची लंगडी एकादशी मानली जाते. या एकादशीनिमित्त हजारो भाविक पंढरपूरमध्ये गर्दी करत असतात. 

Mumbai News: मुंबई विमानतळावर कार पार्किंगवरून कारचालक आणि खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये वाद

Mumbai News: मुंबई विमानतळावर कार पार्किंगवरून कारचालक आणि खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याची घटना घडली. यावेळीा कार चालकाला खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. मारहाणीप्रकरणी एकूण 6 जणांना अटक करण्यात आलेय.

Mumbai News: मोटरसायकलवर स्टंटबाजी करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा

Mumbai News: मोटरसायकलवर स्टंटबाजी करणाऱ्या चौघांविरु्दध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सजवळ मोटरसायकलस्वार तरुणाने पुढे दोन तरुणी आणि मागे एका तरुणीला बसवून स्टंट केला आणि हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय. या व्हिडीओवरून पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

Maha Vikas Aghadi: छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मविआची जाहीर सभा

Maha Vikas Aghadi: संभाजीनगरमध्ये अजूनही तणावपूर्ण शांतता आहे. मात्र तरीही शहरात नाही राम आणि नेतेमंडळी सभा, यात्रांवर ठाम अशी स्थिती पाहायला मिळतेय...आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ  सभा होणार आहे. सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक मंडळ मैदानावर ही  सभा होणार आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार असून, सभेला मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे. संभाजीनगरमध्ये नुकत्याच झालेल्या तणावग्रस्त वातावरणानंतर महाविकास आघाडीची ही पहिलीच सभा होत आहे..त्यामुळं या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. दरम्यान संभाजीनगरमध्ये शांतता नसताना सभा यात्रांमुळे वातावरण आणखी तापवण्याचा प्रयत्न होतोय का? राजकीय पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेऊन सभा, यात्रा पुढे का ढकलल्या नाहीत असाही प्रश्न उपस्थित होतोय

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


महाविकास आघाडीची पहिली सभा आज संध्याकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये सांस्कृतिक मंडळ मैदानवर होणार आहे. महाविकास आघाडीचे सर्व नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. आजपासून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) च्या सावरकर गौरव यात्रेला सुरूवात होणार आहे, त्याशिवाय शिखर शिंगणापूर यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. जाणून घ्या आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी...


महाविकास आघाडीची पहिली सभा


महाविकास आघाडीची पहिली सभा आज संध्याकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये सांस्कृतिक मंडळ मैदानवर होणार आहे. महाविकास आघाडीचे सर्व नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेला मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे. संभाजीनगरमध्ये नुकत्याच झालेल्या तणावग्रस्त वातावरणानंतर महाविकास आघाडीची ही सभा होत आहे. त्यामुळे या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेय. 


महाविकास आघाडीचे कोण कोण नेते उपस्थित राहणार


-  शिवसेना – उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर (दुपारी 4 वाजता पोहचतील.) सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, खासदार बंडु जाधव, खासदार ओमराजे निंबाळकर, अनिल परब, सुनील प्रभू.


- राष्ट्रवादी – अजित पवार, जयंत पाटील, धंनंजय मुंडे, राजेश टोपे, संजय बनसोडे, जयप्रकाश दांडेगावकर


-   कॉग्रेस – नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अमित देशमुख
 
सावरकर गौरव यात्रा


आजपासून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) च्या सावरकर गौरव यात्रेला मुंबईत सुरूवात होणार आहे. मुंबईतील उत्तर पश्चिम, ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य, उत्तर मध्य मुंबई अशा सर्व विभागात निघणार आहे. या यात्रेत केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे असणार आहेत. 


ठाणे – मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात सावरकर गौरव यात्रा निघणार आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. 


सोलापूर – सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघ भाजपवतीने संध्याकाळी 5 वाजता, रंगभवन चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास अभिवादन करून वीर सावरकर गौरव यात्रेला सुरूवात होणार आहे.


 शिखर शिंगणापूर यात्रेचा आज मुख्य दिवस


शिखर शिंगणापूरची यात्रा बारा दिवस चालते. यात्रेला गुढीपाडव्यापासून म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरूवात होते. शिखर शिंगणापूर यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. पंचमीला शंभू महादेवाला आणि पार्वती मातेला हळद लावली जाते. अष्टमीला रात्री बारा वाजता देवाची लग्न लावली जातात. एकादशीच्या दिवशी इंदूरच्या राज घराण्यातील युवराज किव्हा राजा शिखर शिंगणापूरला येतो आणि देवस्थानातर्फे राजाचा सत्कार समारंभ केला जातो. असे म्हणतात कि देवाच्या लग्नाच्या वेळी चुकून राजाला आमंत्रण गेले नाही. राजा रागावून घोड्यावरून निघाला आणि तडक शिखर शिंगणापूरला आला. एकादशीचा उपवास असूनही देवावर रागावला आणि कांदा भाकरी खाऊन व पायात जोडे ठेऊन देवाच्या लग्नाला आला. महादेवाने राजाची समजूत काढली, राजाचा राग शांत केला आणि राजाचा सत्कार केला. आजही हीच परंपरा राखली जाते. शिखर शिंगणापूरची यात्रा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उमाबन येथे भरली जाते. या उमाबनात प्रत्येक गावासाठी एक झाड दिले आहे. गावकरी आपापल्या झाडापाशी जमा होऊन यात्रेचा आनंद लुटतात. अशा प्रकारे झाडे नेमून देणारी हि पहिलीच यात्रा असावी. शिखर शिंगणापूरच्या यात्रेतील सर्वात अदभूत सोहळा म्हणजे पालखी सोहळा. देवाला अभिषेक घालण्यासाठी विविध तीर्थ क्षेत्राचे पाणी कावडीतून आणले जाते.   या कावडींमध्ये तेल्या भुत्याची मानाची असते. रात्री 12 वाजता सप्त नद्या आणि शिंगणापूर परिसरातील पुष्कर तलावातील पाण्यानं शंभू महादेवाला जलाभिषेक घातला जातो.


पुणे – एमपीएससीसी मार्फत घेण्यात येणाऱ्या टायपींग परिक्षेचे निकष बदलल्याने विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येणार आहे.


मुंबई – यशवंतराव चव्हाण सेंटरचे विश्वस्त शरद काळे यांचे पार्थिव आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दुपारी 12 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवल जाणार आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 
 
नाशिक – रामनवमीला रामजन्माचा उत्सव उत्साहात पार पडल्यानंतर दोन दिवसांनी येणाऱ्या कामदा एकादशीला श्रीराम आणि गरुड रथ काढण्याची जवळपास 250 वर्षाची परंपरा आजही नाशिकमध्ये कायम असून आज संध्याकाळी 5 वाजता काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा गजर, महाआरती आणि रामनामाचा जयघोष करत रामरथ आणि गरुड रथाची मिरवणूक मार्गस्थ होणार आहे. रथयात्रा सुरु होण्यापूर्वी राममंदिरातून रामाच्या भोगमूर्ती आणि पादुकांची परिसरातून सवाद्य मिरवणूक काढली जाते.


मध्य प्रदेश – आदिवासी अधिकारी परिषदेसाठी शरद पवार आज मध्य प्रदेशच्या सिवनी येथे जाणार आहे.


पंढरपूर – आज चैत्री एकादशी सोहळा असून हजारो वारकरी दाखल झालेत. या यात्रेला पळती वारी देखील म्हणतात. शिखर शिंगणापूर येथे शंभो महादेवाचा विवाह सोहळा असल्याने साक्षात विठुराया या विवाहास जातात अशी अख्यायिका असल्याने वारकरी शिखर शिंगणापूर येथे जात असतात. खरे तर आज एकादशी असल्याने सर्व भाविकांचा उपवास असला तरी विठुरायला मात्र पूरणपोळीचा नैवेद्य दाखवतात.


कोल्हापूर – मुरगुड गावातील अश्लील व्हिडीओ प्रकरणातील डॉक्टरवर पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. डॉक्टर फरार झाला असून त्याचा शोध सुरु आहे.


चिपळूण (रत्नागिरी) – लोटे येथे भास्कर जाधव यांनी शिवसेनेचा मेळावा आयोजित केला आहे. 
 
नाशिक – नाशिक शिवसेना कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याला सकाळी 11 वाजता खासदार श्रीकांत शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे उपस्थित राहणार आहेत.


अहमदनगर –   ईपीएस 95 पेंशनर्सची पेंशन वाढ आणि इतर मागण्यांसाठी आजपासून खासदारांच्या कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह होणार आहे. अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या अहमदनगर शहरातील कार्यालयासमोर सकाळी हा सत्याग्रह सुरू होणार असून यावेळी भजन - कीर्तन करून हे आंदोलन केले जाणार आहे. हे आंदोलन संसदेचे अधिवेशन सुरू असेपर्यंत चालू असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


जळगाव – कापूस पिकासह सर्वच शेतमालाला भाव मिळावा यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या वतीने आज मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघातील नेरी चौफुलीवर शेतकऱ्यांच्या तर्फे रस्ता रोको आणि धरणे आंदोलन केलं जाणार आहे.


धुळे –  गेल्या काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीनंतर आज जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस भरतीची लेखी परीक्षा पार पडणार आहे. यासाठी सकाळी 6 वाजेपर्यंत पोलीस भरतीची लेखी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे.


लातूर – राजू शेट्टी लातूर दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न संदर्भात जनजागृती करण्यासाठी राजू शेट्टी आज शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथे संध्याकाळी 6 वाजता शेतकरी मेळावा घेणार आहेत.


चंद्रपूर – "आमदार आपल्या गावी मुक्कामाला" ही अभिनव संकल्पना चिमूरचे आमदार बंटी भांगडीया यांनी राबविण्याचा निर्णय घेतलाय. या संकल्पने अंतर्गत आमदार बंटी भांगडीया हे त्यांच्या मतदारसंघातील प्रत्येक गावात रात्री मुक्काम करणार आहेत. यासाठी पहिल्या टप्प्यात 50 गावं निवडण्यात आलेत. या मोहिमेला आजपासून चंद्रपूर जिल्ह्यातील सातारा या गावातून सुरुवात होणार आहे. गावातील समस्या जाणून घेण्यासाठी ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.


 अमरावती – शहरातील रवी नगर परिसरात आज हनुमान चालीसा पठण केलं जाणार आहे, संध्याकाळी 5 वाजता. मागील 10 वर्षांपासून रवी नगर परिसरातील संकट मोचन हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावेळी खासदार नवनीत राणासह तब्बल 5 हजाराच्या वरती महिला सहभागी होणार आहेत.


यवतमाळ – पोलीस भरतीसाठी आज 6 केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी 2405 पुरुष तर 715 महिला पात्र आहे. असे एकूण 3120 जण परीक्षा देणार आहे. पात्र उमेदवार यांना सकाळी 6.30 केंद्रावर यावे लागणार असून त्यांना तपासून आत सोडण्यात येणार आहे. तर सकाळी 9 ते 10.30 दरम्यान दीड तासाचा पेपर राहणार आहे.


गोंदिया – संपूर्ण महाराष्ट्रासह गोंदिया-भंडारा जिल्ह्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा निघणार आहे. 6 एप्रिल पर्यंत संपूर्ण गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचे विधानसभा क्षेत्र कव्हर करण्याचा भाजपचा मानस आहे. या गौरव यात्रे दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर बद्दल संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे.


मुंबई आणि आरसीबीमध्ये लढत होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता बेंगलोरमध्ये सामना रंगणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.