Maharashtra News LIVE Updates : सोलापूर MIDC परिसरातील टेक्सटाईल कंपनीला भीषण आग
Maharashtra Updates News LIVE : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Loksabha Election News : लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आलीय. यामध्ये वैशाली दरेकर यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीय. तर सत्यजित पाटील यांना हातकणंगले मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीय. करण पवार यांना जळगाव मतदारसंघातून तर भारती कामडी यांना पालघर मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे.
भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. उन्मेश पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयकडून देण्यात आली आहे.
Accident News : मुंबई गोवा महामार्गावर कोलाड येथे सेलेरो कारला ट्रेलरची जोरदार धडक लागून अपघात घडल्याची घटना समोर आली आहे या अपघातात सेलेरो कारचा चेदामेंदा झाला आहे ही घटना 2 एप्रिल रात्री 11:30 ते 12 दरम्यान घडली सेलेरो कार मधील असणारे दोन तरुणाचा या अपघातात जागीच मृत्यू झाला तर यातील एका तरुणाला गंभीर दुखापत होऊन पुढील उपचार करिता मुंबई येथे हलवण्यात आलेले आहे.
यामध्ये योगेश सुधाकर गुरव वय 34 राहणार वरसे भुनेश्वर व परेश नामदेव खांडेकर वय 35 राहणार अष्टमी रोहा या तरुणांचा जागेच मृत्यू झाला यामध्ये योगेश पाटील याला मुंबई येथे हलवण्यात आले आहे पुढील तपास कोलाड पोलीस स्टेशन व उपयोगी अधिकारी शैलेश काळे करत आहेत.
Accident News : मुंबई गोवा महामार्गावर कोलाड येथे सेलेरो कारला ट्रेलरची जोरदार धडक लागून अपघात घडल्याची घटना समोर आली आहे या अपघातात सेलेरो कारचा चेदामेंदा झाला आहे ही घटना 2 एप्रिल रात्री 11:30 ते 12 दरम्यान घडली सेलेरो कार मधील असणारे दोन तरुणाचा या अपघातात जागीच मृत्यू झाला तर यातील एका तरुणाला गंभीर दुखापत होऊन पुढील उपचार करिता मुंबई येथे हलवण्यात आलेले आहे.
यामध्ये योगेश सुधाकर गुरव वय 34 राहणार वरसे भुनेश्वर व परेश नामदेव खांडेकर वय 35 राहणार अष्टमी रोहा या तरुणांचा जागेच मृत्यू झाला यामध्ये योगेश पाटील याला मुंबई येथे हलवण्यात आले आहे पुढील तपास कोलाड पोलीस स्टेशन व उपयोगी अधिकारी शैलेश काळे करत आहेत. करत
वादग्रस्त साई रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामाच्या पाडकामाला झाली सुरुवात
पुण्यातील कंपनीला दिले गेले आहे पाडकामाचे काम
साई रिसॉर्टच्या तिसऱ्या मजल्यावरील भिंती पाडण्याचं काम सुरू
अनधिकृत बांधकाम मी स्वतः तोडणार; मालक सदानंद कदम यांनी कोर्टामध्ये प्रतिज्ञा पत्राद्वारे दिली होती माहिती
साई रिसॉर्टच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त
तिसऱ्या मजल्यावरील भिंत पाडून त्या ठिकाणी पत्रा शेडची घेण्यात आली आहे परवानगी
सोलापूर MIDC परिसरातील एका टेक्सटाईल कंपनीला भीषण आग
सोलापुरातील अक्कलकोट रोडवरील एमआयडी भागातील टॉवेल उत्पादन करणाऱ्या कारखान्याला आग
अन्नपूर्णा टेक्स्टाईल असे आग लागलेल्या कारखान्याचे नाव
सोलापूर अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू
कारखान्याला लागलेल्या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आठ आमदार आमच्या संपर्कात आहेत. मी त्यांची नावे देखील सांगू शकतो, असे वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं. मात्र, त्यांनी आमदारांची नावे सांगणं टाळलं आहे.
राजन साळवी यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी आता 18 एप्रिलला होणार आहे. यापूर्वी दिलेला अंतरिम जामीन पूर्वीच्याच अटी आणि शर्तीसह कायम राहील.
जर मला नागपूर लोकसभा मतदारसंघातून संधी दिली असती.. तर मी निश्चित निवडणूक लढविली असती आणि जिंकून ही दाखविली असती, आणि ती निवडणूक नितीन विरुद्ध नितीन अशी झाली असती, असे मत काँग्रेसचे वरिष्ठ नेते नितीन राऊत यांनी व्यक्त केले आहे.. त्यामुळे आज जरी नितीन राऊत काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा देत त्यांचा प्रचार करत असले, तरी नितीन राऊत यांच्या मनामध्ये ही नागपुरातून निवडणूक लढवण्याची सुप्त इच्छा होती हे आता समोर आले आहे....
नागपूर माझा मतदारसंघ आहे... त्यामुळे माझी मानसिक तयारी नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची होती... रामटेक ची जागा मी कधीच मागितली नव्हती असे स्पष्टीकरण ही नितीन राऊत यांनी दिले...
शिवसेनेच्या आमदाराच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतलेल्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलेले आहे.
सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे आणि इतर या याचिकेवर शुक्रवार 5 एप्रिल रोजी सुनावणी होणार होती.
पण आता संगणकीय तारीख 23 एप्रिल दर्शविते आहे
गेल्या सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टाने स्पीकर कार्यालयातून मूळ रेकॉर्ड मागवले होते आणि पुढील तारखेला या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय करणार का यावर निर्णय होणार होता.
अर्थातच ही तारीख संगणकीय प्रणालीद्वारे मिळालेली असून तात्पुरत्या स्वरूपाची आहे, कदाचित ठरलेल्या दिवशी म्हणजे 5 एप्रिल ला सुद्धा सुनावणी होऊ शकते
छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) छावणी परिसरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे.
ट्रक दुचाकीच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू एक गंभीर.... निर्दयी ट्रक चालकानं दुचाकी दोन किलोमीटर फरफटत नेली...
नागपूरकडून आलेल्या भरधाव ट्रक चालकानं राष्ट्रीय महामार्ग ओलांडणाऱ्या दुचाकीस्वारांना जबर धडक दिली. यानंतर अपघातग्रस्त दुचाकी निर्दयी ट्रक चालकानं सुमारे दोन किलोमीटरपर्यंत फरफटत नेली. या भीषण अपघातात दुचाकीवरील एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, अन्य एक गंभीर जखमी झाला. हा अपघात राष्ट्रीय महामार्गावरील बेला या गावाजवळ रात्री घडला. देवेंद्र मोरेश्वर काळे (38) असं मृतकाचं नावं असून प्रकाश तितिरमारे (46) असं गंभीर जखमी व्यक्तीचं नावं आहे. हे दोघेही दुचाकीनं शेतावरून गुंजेपार या स्वगावाकडं परत जात असताना हा भीषण अपघात घडला. या थरारक अपघातानंतर अपघातग्रस्त दुचाकीनं पेट घेतल्यानं राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काहीकाळ खोळंबली होती.
विदर्भाचा पारा 42 अंश सेसिअसच्या पार ...
काल विदर्भात सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी येथे 42.3 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
वर्धा, यवतमाळ, वाशीम व अकोल्याचे तापमान 41 अंश सेल्सिअस च्या वर होते
आज कडक उन्हात वर्धा व अकोला येथे आपल्या उमेदवारांचे देवेंद्र फडणवीस नामांकन अर्ज भरायला उपस्थित राहणार असल्याने भर उन्हात शक्तीप्रदर्शन होईल.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -