Maharashtra News Updates : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ; राष्ट्रगीताचा अवमान प्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्याला पुढील तपासाच्या सूचना

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Mar 2023 10:34 PM
Mumbai News: वृद्ध महिलेच्या घरी चोरी; पोलिसांकडून लाखोंच्या मुद्देमालासह आरोपी गजाआड

Mumbai News : एका वृद्ध महिलेच्या घरात घरफोडी करणाऱ्या अट्टल चोराला देवनार पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक करून त्याच्याकडून लाखोंचा मुद्देमाल परत मिळविला आहे. साहिल खान असे आता करण्यात आलेल्या या चोराचे नाव आहे. देवनारच्या गौतम नगर विभागात 65 वर्षीय सुनंदा कांबळे एकट्या घरात रहातात. 22 मार्च रोजी सुनंदा या आपल्या मुलीकडे गेल्या होत्या. 23 मार्च रोजी त्या घरी परत आल्या. मात्र त्यांना आपल्या घरात घरफोडी झाल्याचे दिसले.त्यांनी तपास केला असता घरातील 9 लाख 27 हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोराने लंपास केले. या प्रकरणी त्यांनी देवनार पोलीस ठाण्यात तक्रार करून गुन्हा नोंदविला. त्यानंतर पोलिसांनी तपास करत खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे चोराला अटक केली. 

Beed Crime News : कापसाच्या शेतात गांजा लावणाऱ्या फरार आरोपीच्या अंभोरा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Beed News : कापसाच्या शेतामध्ये गांजाची लागवड करून फरार झालेले आरोपीला अंभोरा पोलिसांनी अटक केली आहे. हनुमंत पठारे अस आरोपीचे नाव असून त्याच्या शेतातून पोलिसांनी सात लाख रुपयांचा गांजा जप्त केला होता. यावेळी आरोपी हनुमंत पठारे हा फरार झाला होता आणि तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते.

Bhiwandi News: चोरीचा उद्देशाने घरात घुसून कामगारांवर धारदार शस्त्राने हल्ला ; 4 ते 5 कामगार जखमी

Bhiwandi News:  भिवंडीतील खाडीपार येथील मच्छाह कंपाउंड परिसरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरांच्या टोळक्याने कामगारांच्या घरात घुसून दमदाटी करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्याकडे पैशांची मागणी केली मात्र कामगारांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर या चोरांनी त्यांच्या हातातील धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात चार ते पाच कामगार जखमी झाले आहेत कामगारांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्यानंतर चोर घटनास्थळावरून पसार झाले आहे .

Mumbai News: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ; राष्ट्रगीताचा अवमान प्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्याला पुढील तपासाच्या सूचना

ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ, 


राष्ट्रगीताचा अवमान प्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्याला पुढील तपासाच्या सूचना


28 एप्रिलपर्यंत तपासाचा अहवाल सादर करण्याचे शिवडी दंडाधिकारी कोर्टाचे निर्देश


सकाळीच हायकोर्टानं यासंदर्भात मुंबई सत्र न्यायालयाचे निर्देश कायम ठेवत ममता बॅनर्जींना दिलासा देण्यास दिला होता नकार

दौंड शहराचे सांडपाणी प्रक्रिया न करता भीमा नदीत सोडलं, आम आदमी पक्षाचा आरोप

Daund News : दौंड शहराचे सांडपाणी प्रक्रिया न करता भीमा नदीत सोडल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या राजेंद्र जाधव यांनी केला आहे. 2017 साली 10.5 एमलडीचा 25 कोटींचा सिवेज ट्रीटमेंट प्लांट उभा केला. काही महिने वापरल्यानंतर तो आजतागायत धूळखात पडला आहे. परिणामी दौंड शहराचे सांडपाणी पाणी हे भीमा नदीत सोडले जात आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून एसटीपी पंप धूळखात पडला आहे. अनेक यंत्र सामुग्रीला गंज चढला आहे. नगर परिषदला वारंवार पत्र व्यवहार केला तसेच प्रदूषण मंडळाला पत्र व्यवहार केला परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप रविंद्र जाधव यांनी केला. सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडल्याने नदी प्रदूषित होत आहे. तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी जाधव यांनी केली आहे. तर सदरच्या एसटीपी पंपाच्या दुरुस्तीचे काम गेली 15 दिवस सुरु आहे. तसेच येत्या 45 दिवसांत हा प्रकल्प सुरु करण्यात येईल अस नगरपरिषदेकडून सांगण्यात आले आहे. या कामासाठी जवळपास 50 लाख रुपयांचे टेंडर काढण्यात आल्याचे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई पोलीस भरतीत पुन्हा एकदा गैरप्रकार समोर, आत्ता पर्यंत 16 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल 

मुंबई पोलीस भरतीत पुन्हा एकदा गैरप्रकार समोर 


आत्ता पर्यंत 16 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल 


मुंबई पोलीसांनी केले पाच गुन्हा दाखल 


धावण्याच्या शर्यतीत जास्त गुण मिळवण्याच्या उद्देशाने चीपची अदलाबदल केल्याच उघड 


चीप मधील नोंदवला गेलेला वेळ आणि सीसीटीव्हीची पडताळणी केली असता गैरप्रकार उघड


धावण्याच्या शर्यतीत वेळ अचूक मोजण्यासाठी पहिल्यांदाच चीपचा केला जातोय वापर 


भरती प्रक्रियेत गैर प्रकार टाळण्यासाठी पहिल्यांदाच अत्याधुनिक उपकरणांचा वापर करून डिजिटल पद्धतीनी राबवली जातेय मुंबई पोलीस भरती प्रक्रिया 


8070 शिपाई पदासाठी तब्बल सात लाख उमेदवार रिंगणात आहेत


मरोळ, नायगाव आणि मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील मैदानात सुरू आहे मैदानी चाचणी

मंत्रालयातील आत्महत्या प्रकरणावरून राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मंत्रालयातील आत्महत्या प्रकरणावरून राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय


मंत्रालयातील अभ्यंगतांसाठी भेटण्याची वेळ राखून ठेवण्याबाबत राज्य सरकारचा परिपत्रक जारी


कालच मंत्री भेटले नाही म्हणून आत्महत्या करण्याच्या तीन घटना घडल्या होत्या. त्यापैकी एका महिलेला आपला जीव गमावा लागलाय


अभ्यंगतांना  भेटण्यासाठी मंत्री व राज्यमंत्री यांनी आपला दिवस व त्या दिवसाची वेळ राखून ठेवून त्याबाबतची कल्पना अभ्यंगताना देण्यासाठी कार्यालयाच्या फलकावरती वेळापत्रक लावण्याच्या सूचना


मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते ४ ही वेळ अभ्यंगताना राखून ठेवावी त्याच सोबत कोणतीही बैठक या वेळेत आयोजित करू नये


मंत्रालयाच्या बाहेरील कार्यालयामध्ये आठवड्यातील दोन दिवस आणि त्या दिवसाची वेळ राखून ठेवण्यात यावी

Maharashtra Coronavirus :  राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई कोरोना पॉझिटिव्ह 

Maharashtra Coronavirus :  राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई कोरोना पॉझिटिव्ह 


गेल्या तीन दिवसात जे लोक संपर्कात आले त्यांनी काळजी घेण्याबाबत केले आवाहन


राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण

Bhiwandi News: भिवंडीत रस्त्यावर थुंकणाऱ्यां कडून सव्वा महिन्यात 13 लाखांचा दंड वसूल

Bhiwandi News:  भिवंडी शहर जणू काही अस्वच्छ शहर अशीच ओळख करून दिली जात असताना शहरातील नागरीकांनी स्वछता राखावी यासाठी रस्त्यावर थुंकणे, लघवी करणे ,कचरा टाकणे यास प्रतिबंध करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नेमलेल्या खाजगी क्लिनअप मार्शल यांनी अवघ्या सव्वा महिन्यात 13 लाख 45 हजार 500 रुपयांचा दंड आकारुन नागरिकांवर कारवाई केली आहे .पालिका आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ यांनी शहर स्वच्छतेसाठी रेयान इंटरप्रायझेस या खाजगी ठेकेदार कंपनीस काम सोपवले आहे 

Thane News: ओबीसी समाजाची खर तर भाजपनेच फसवणूक केली; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे शहापूरमध्ये आंदोलन

Thane News : एकीकडे राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला असे सांगत भाजपने देशभर राहुल गांधी विरोधात आंदोलन करीत आहेत, मात्र दुसरीकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आज शहापुरात भाजपाचा जोरदार निषेध करून आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, खरंतर भाजपनेच ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना होऊ नये म्हणून संसदेत ठराव मंजूर केला, मात्र आता हेच भाजपवाले ओबीसी समाजाच्या नावाने राजकारण करून ओबीसी जातनिहा जनगणनेला खोडा घालण्याचे काम करीत आहे, विशेष म्हणजे गेल्या नऊ वर्षापासून ओबीसी समाजाचे मते घेऊन भाजप केंद्रात सत्तेवर आलं, आता मात्र येणाऱ्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हाच ओबीसी समाज भाजपाला सत्तेतून पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन

Nashik News: नाशिक: येवल्यातील अंदरसुल उपबाजार समितीत लिलाव शेतकऱ्यांनी पाडले लीलाव; कांद्याचे भाव गडगडल्याने संताप

Nashik News:  नाशिक: येवल्यातील अंदरसुल उपबाजार समितीत लिलाव शेतकऱ्यांनी पाडले लीलाव; कांद्याचे भाव गडगडल्याने संताप 


- सकाळ सत्रात चढ्या दराने तर सायंकाळी मात्र कांद्याला कवडीमोल भाव
- लाल कांद्याला 300 ते 400 तर उन्हाळ कांद्याला 400 ते 500 रुपये मिळतोय भाव
- तीन तासांपासून बाजार समितीचे लिलाव ठप्प
- व्यापारी, बाजार समिती प्रशासन व शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून डॉक्टरेट; राज्यपाल बैस यांच्या हस्ते डी.लीट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट देण्यात आली. राज्यपाल बैस यांच्या हस्ते डी.लीट पदवी देण्यात आली. सामाजिक कार्य, वैद्यकीय क्षेत्र, राजकारण, आपत्कालीन क्षेत्रात केलेल्या कामगिरी बद्दल डी लीट देण्यात आली आहे. 

सुषमा अंधारेंसारखा कलाकार अजून पाहिला नाही; आमदार संजय शिरसाट यांचे टीकास्त्र

सुषमा अंधारेंसारखा कलाकार अजून पाहिला नाही; आमदार संजय शिरसाट यांचे टीकास्त्र

हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण; विशेष पीएमएलए कोर्ट 5 एप्रिल रोजी देणार निर्णय 

हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण


मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्ट 5 एप्रिलला देणार निर्णय 


ईडी तपास करत असलेल्या प्रकरणांत अटकेपासून दिलासा मागत मुश्रीफांसह त्यांची तिन्ही मुलं आणि सीएची याचिका


हायकोर्टानं मुश्रीफांना अटकेपासून दिलेला अंतरिम दिलासा या आठवड्यांत संपणार

Mumbai : मंत्रालयाच्या मुख्य गेटवरती विष प्राशन केलेल्या दोन महिलांपैकी आणखी एका महिलेची प्रकृती गंभीर

मंत्रालयाच्या मुख्य गेटवरती विष प्राशन केलेल्या दोन महिलांपैकी आणखी एका महिलेची प्रकृती गंभीर.


सोमवारी मंत्रालयाच्या मुख्य वरती दोन वेगवेगळ्या महिलांनी विष प्राशन केल्याची घटना घडली होती.


शितल गादेकर या महिलेचा आज मृत्यू झाला असून संगीता डवरे या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.


शितल गादेकर या धुळे येथून आल्या होत्या. महिला एमआयडीसीच्या प्लॉट संदर्भात फसवणूक झाली म्हणून काल मंत्रालयाच्या गेटवरती विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला होता.


तर त्याचवेळी नवी मुंबईहून आलेल्या संगीता डवरे यांनी हॉस्पिटलमध्ये फसवणूक झाल्याप्रकरणी कारवाई होत नाही म्हणून मंत्रालयाच्या गेटवर विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला होता.


शितल गादेकर यांच्यावरती जे जे रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती तर संगीता डवरे या जेजे रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती.


 

हसन मुश्रीफ यांचे व्यावसायिक भागीदार आणि वादग्रस्त ब्रिक्स कंपनीचे सर्वेसर्वा चंद्रकांत गायकवाड यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भोवतीचा चौकशीचा फास ईडीने आणखी घट्ट केला


मुश्रीफ यांचे व्यावसायिक भागीदार आणि वादग्रस्त ब्रिक्स कंपनीचे सर्वेसर्वा  चंद्रकांत गायकवाड यांना ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावले


चंद्रकात गायकवाड यांच्या नातेवाईकांनादेखील ईडीनं चौकशीसाठी बोलावल्याची माहिती 


30 मार्च रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश

ट्रायकडून सर्व टेलिकाॅम कंपन्यांना नेटवर्क बंद असण्याचा कालावधी कळवण्याचे निर्देश 

ट्रायकडून सर्व टेलिकाॅम कंपन्यांना नेटवर्क बंद असण्याचा कालावधी कळवण्याचे निर्देश 


टेलिकाॅम कंपन्यांकडून तांत्रिक कारणांमुळे किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे नेटवर्कचे मोठे आऊटेज होण्याच्या घटना कळवल्या जात नसल्याचे प्राधिकरणाचे निरीक्षण 


अशात ट्रायकडून जिल्हास्तरावर अशा कोणत्याही बिघाडाची माहिती संकलित करण्याचा घेतला निर्णय 


त्या जिल्ह्यांमध्ये नेटवर्क आऊटेजवेळी पुढील 24 तासात दर चार तासांनी अमूक जिल्ह्यासंदर्भात ट्रायला माहिती देण्याच्या सूचना 


संपूर्ण जिल्ह्यातील नेटवर्क गायब असल्यास 72 तासांच्या आत ते पूर्ववत करत ट्रायला कळवण्याच्या सूचना 


प्रामुख्याने अनेकदा आपत्तीवेळी सीमा भागात आणि डोंगराळ भागात अशा घटना घडतात, अशावेळी ग्राहकांना सूचना मिळावी याकरता ट्रायचे निर्देश

Maharashtra News: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ कोरोना पॉझिटिव्ह

Maharashtra News: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ कोरोना पॉझिटिव्ह


रुग्णालयात काल तपासणी केल्यानंतर अहवालातून स्पष्ट


छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून भुजबळ यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती


भुजबळ पुढचे काही दिवस घरीच विश्रांती घेणार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची हायकोर्टात याचिका, राष्ट्रगीताचा अवमान प्रकरणी कायमचा दिलासा देण्याची याचिकेत मागणी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची हायकोर्टात याचिका


राष्ट्रगीताचा अवमान प्रकरणी कायमचा दिलासा देण्याची याचिकेत मागणी


मुंबई सत्र न्यायालयानं शिवडी कोर्टाचं समन्स रद्द केलं असलं तरी या प्रकरणी पुन्हा नव्याने सुनावणीचे आदेश


मात्र याप्रकरणी गुन्हाच दाखल होत नसल्याने कारवाईची गरजच नसल्याचा याचिकेत दावा


दरम्यान या प्रकरणी उद्या, बुधवारी शिवडी दंडाधिकारी कोर्टात सुनावणी होणार आहे


शिवडी कोर्ट यावर काय निर्देश देत ते पाहिल्यानंतर हायकोर्ट आपले निर्देश जारी करणार


ममता बॅनर्जी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उद्या हायकोर्टात पुन्हा सुनावणी

तळकोकणात हत्ती लोकवस्तीत, वनविभागाची डोकेदुखी वाढली, काल दिवसभरात दोन वेळा हत्तीने मार्ग रोखला

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग मधील तिलारी खोऱ्यात हत्ती आता वस्तीपर्यंत आल्याने वनविभागाची डोकेदुखी वाढली आहे. हत्तींना रोखण्याच्या मागणीसाठी 1 एप्रिलपासून शेतकरी, ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत. मोर्ले-केर मार्गावर दिवसा हत्ती रस्त्यावर आल्यामुळे अनेकांची घाबरगुंडी उडाली. रानटी हत्ती ज्यामध्ये एक नर हत्ती आणि पिल्लू यांचा समावेश आहे. काल दिवसभरात दोन वेळा हत्ती लोकवस्तीत आला. सायंकाळी हत्तीने मार्ग रोखल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. त्यामुळे दोडामार्गमध्ये हत्ती प्रश्न डोकं वर काढत असून वनविभागाची डोकेदुखी ठरत आहे.

Sindhudurg News: तळकोकणात हत्ती लोकवस्तीत, वनविभागाची डोकेदुखी वाढली, काल दिवसभरात दोन वेळा हत्तीने मार्ग रोखला
Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग मधील तिलारी खोऱ्यात हत्ती आता वस्तीपर्यंत आल्याने वनविभागाची डोकेदुखी वाढली आहे. हत्तींना रोखण्याच्या मागणीसाठी 1 एप्रिलपासून शेतकरी, ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत. मोर्ले-केर मार्गावर दिवसा हत्ती रस्त्यावर आल्यामुळे अनेकांची घाबरगुंडी उडाली. रानटी हत्ती ज्यामध्ये एक नर हत्ती आणि पिल्लू यांचा समावेश आहे. काल दिवसभरात दोन वेळा हत्ती लोकवस्तीत आला. सायंकाळी हत्तीने मार्ग रोखल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. त्यामूळे दोडामार्ग मध्ये हत्ती प्रश्न डोकं वर काढत असून वनविभागाची डोकेदुखी ठरत आहे.
शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सुषमा अंधारे यांची महिला आयोगाकडे तक्रार : सूत्र

Mumbai News : शिवसेना आमदार संजय शिरसाट यांना ते वक्तव्य भोवणार


सुषमा अंधारे यांची महिला आयोगाकडे तक्रार


संजय शिरसाट यांची छत्रपती संभाजीनगर येथे मेळाव्यात बोलताना सुषमा अंधारे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य


महिला आयोगाने दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याची सुषमा अंधारे यांची मागणी


एबीपी माझाला विश्वसनी सूत्रांची माहिती

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंच्या तोंडी संजय राऊतांची भाषा शोभत नाही, लोकांना ते बाळासाहेबांचे विचार आहेत असं वाटतं नाही : दीपक केसरकर

Maharashtra Politics: मालेगावच्या सभेमधून केलेल्या टीकेला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंच्या तोंडून संजय राउतांची भाषा शोभत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर जिल्यातील राणें विरोधात राजकीय लढे दिले मात्र ते व्यक्तिगत होऊ दिले नाहीत, हे सांगत राणेंशी राजकिय वैर नसल्याची प्रतिक्रिया दिली. बाळासाहेबांच्या मुलाने बाळासाहेबांसारखं बोलावं ते संजय राऊत यांची भाषा बोलू लागतात तेव्हा लोकांना सुद्धा हे बाळासाहेबांचे विचार नाहीत. आमच्या मनात त्याच्याबद्दल जो आदर आहे तो टिकला पाहिजे तर त्यांनी संजय राऊतांची भाषा सोडली पाहिजे. तर सिंधुदुर्गात राणेंच्या विरोधात राजकिय लढे दिले मात्र राणेंनी ते वैयक्तिक पातळीवर केव्हा घेतले नाहीत. त्यामूळे नीतेश राणे यांच्याशी फोनवर चर्चा होते. ज्यांच्याबरोबर संघर्ष झाला त्यानी समजून घेतलं ही हा राजकीय संघर्ष आहे. 

Maharashtra News: 1 एप्रिलपासून अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत वाढ होणार 

Maharashtra News: 1 एप्रिलपासून अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत वाढ होणार 


पेनकिलर, ॲंटिबायोटिक ते हृदयरोगपर्यंतच्या सर्व औषधांचा समावेश 


महागाईने हैराण असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशावर बोजा वाढणार 


औषधांच्या किंमतीत 12 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात, सलग दुसऱ्या वर्षी औषधांच्या किंमतीत होईल वाढ 


दुसरीकडे, शेड्युल ड्रग्जच्या किंमतीत देखील वाढ होणार, मात्र यासंदर्भात किंमती कितीनं वाढणार याची अद्याप माहिती नाही


वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर फार्मा उद्योग औषधांच्या किमतीत वाढ करण्याची मागणी करत होता 


घाऊक किंमत निर्देशांकांमधील बदलांच्या अनुषंगाने औषध कंपन्यांना दरवाढ करण्याची परवानगी देण्यासाठी सरकार तयार 


अशात नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीकडून परिपत्रक काढत डब्ल्यूपीआयमधील वार्षिक बदलाच्या आधारे किंमती वाढवल्या जाऊ शकतील असं सांगितलंय

Sangli News: कृष्णा नदीत पुन्हा रसायनमिश्रित पाणी सोडले; नागठाणे ओढ्यातून कृष्णेत सोडले रसायनमिश्रित पाणी

Sangli News: कृष्णा नदीत होत असलेले प्रदूषण काही थांबण्याचे नाव घेत नाही. आता कृष्णा नदीत एका औद्योगिक प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रसायनमिश्रित पाणी सोडण्यात आल्याचा प्रकार नागरिकांनी समोर आणलाय. वाळवा तालुक्यातील नागठाणे दरम्यान वाहणाऱ्या ओढ्यातून कृष्णा नदीत एका औद्योगिक प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रसायनमिश्रित पाणी सोडण्यात आलंय. या पाण्याची दुर्गंधी नागठाणे परिसरात दिवसभर पसरली होती. याबाबत काही नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली. नागठाणे परिसरात काहूर उठताच प्रकल्पातून बाहेर पडणारे पाणी थांबवण्यात आले. यामुळे आता यावर प्रदूषण मंडळ काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

Akola News: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका शिवसेनेचा ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी सोबत लढणार

Akola News: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका शिवसेनेचा ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी सोबत लढणार. राज्यात 30 एप्रिलला होत आहेय 257 बाजार समित्यांसाठी निवडणूक. दोन्ही पक्षांचा सोबत निवडणुक लढवत राज्यातील सहकार क्षेत्रात चंचुप्रवेश घेण्याचा प्रयत्न. ठाकरे-आंबेडकरांच्या युतीनंतर राज्यातील सहकार क्षेत्रातील निवडणुकीत दोन्ही पक्ष प्रथमच एकत्र लढणार. प्रत्येक जिल्हा स्तरावर दोन्ही पक्षात वाटाघाटी सुरू. कालपासून बाजार समित्यांत उमेदवारी अर्ज भरण्याला प्रारंभ.

Pune Crime: जन्मदात्या आईनं 4 वर्षीय पोटच्या पोरीची चाकू खुपसून केली निर्घृण हत्या

Pune Crime: आरोपी महिला ही तिच्या मुलीसोबत एकटीच राहत होती. ती बेकरी प्रॉडक्ट विक्रीचा व्यवसाय करत होती. सोमवारी ती भाड्याचे घर खाली करणार होती यासाठी घरमालक तेथे गेले होते. त्यावेळी तिने दरवाजा आतून बंद करून घेतला होता. शेजारच्यांनी महिलेला दरवाजा उघडण्यास सांगितले. दरम्यान, घरमालक व शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तत्काळ याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

Akanksha Vyavahare: जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत आकांक्षा व्यवहारेला कांस्यपदक

Akanksha Vyavahare: मनमाडची आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंगपटू आकांक्षा व्यवहारे हिने दुर्रेस अल्बेनिया येथे सुरु असलेल्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत 45 किलो वजनी गटात कांस्यपदक पटाकावीत दुसऱ्यांदा जागतिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. विविध देशांच्या 12 खेळाडूंमध्ये  चुरशीची लढतीत आकांक्षाने स्नॅचमध्ये 68 किलो तर वजन क्लिन जर्क मध्ये 82 किलो असे एकूण 150 किलो वजन उचलून सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी कांस्यपदक पदक प्राप्त करण्याची किमया साधली आहे. 

Buldhana Crime: बुलढाणा पोलिसांनी आवळल्या 'छर्रा गँग' सराईत आंतरराज्य गुन्हेगारी टोळीच्या मुसक्या

Buldhana Crime: गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात बँकेतून मोठी रक्कम काढणाऱ्या व्यक्ती कडून लुटमार करून रक्कम लुटणे, कार किंवा दुचाकीच्या डिक्कितील रक्कम लंपास करणे, असे गुन्हे वाढले होते. त्यानुसार शेगाव परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना बाळापूर मार्गावर रात्री काही इसम संशयास्पद आढळले असताना त्यातील दोघांची चौकशी केली असता एका अंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी या टोळीतील अनेकजण हे गुजरातमधील अहमदाबाद येथील छर्रा नगर येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन या परिसरात गुप्त कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेऊन बुलढाण्यात आणून अटक केली आहे. या अंतरराज्यीय टोळीने अनेक ठिकाणी बँकेतील रक्कम काढणाऱ्या ग्राहकांना लुटून तसचं कार किंवा दुचाकीच्या डिकीत ठेवलेली रक्कम चोरणे अशी अनेक गुन्हे केलेली आहेत.

Mumbai News: वीर सावरकर यांच्या समर्थनात भाजप युवा मोर्चा कडून मुंबई बॅनरबाजी

Mumbai News: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समर्थनार्थ भाजप युवा मोर्चाकडून मुंबईत अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. भापज युवा मोर्चानं आम्ही सारे सावरकर अशी मोहीमच सुरू केलीये. मुंबईचा अंधेरी- घाटकोपर रस्त्यावर साकीनाका जंक्शन, चांदीवली,असाल्फा मेट्रो स्टेशन आणि घाटकोपर रेल्वे स्टेशन परिसरात ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. 

Nashik News : नाशिक शहरातील 6 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या शहर अंतर्गत बदल्या

  • नाशिक शहरातील 6 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या शहर अंतर्गत बदल्या 

  • पंचवटी, सातपूर, नाशिकरोड, अंबड आणि इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा समावेश 

  • पोलीस आयुक्त अंकुश शिंदेंनी काढले बदलीचे आदेश 

  • प्रशासकीय कारण दिले जात असले तरी मात्र वाढत्या गुन्हेगारीमुळे  निर्णय घेतला असल्याची चर्चा

Sangli Crime News: मिरज सिव्हिलमध्ये रुग्णाला मृत घोषित केल्यानं रुग्णांच्या भावाची डॉक्टरांना मारहाण

Sangli Crime News: मिरज सिव्हिलमध्ये डॉक्टरांनी तपासणी करून रुग्णाला मृत घोषित केल्यानं मृताच्या  भावानं डॉक्टरांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याबाबत गांधी चौक पोलिसांत संदीप गोटे (वय 40) याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


मिरज शासकीय रुग्णालय व महाविद्यालयात अतिदक्षता विभागात रविवारी विनोद ज्ञानबा गोटे (वय 45, रा. अण्णाभाऊ साठेनगर, मिरज) यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना उपचारासाठी सिव्हिलमध्ये अतिदक्षता विभागात आणले होते. यावेळी रुग्णालयात डॉ. कदम हे कर्तव्यावर होते. आपल्या भावाला मृत घोषित केल्याने विनोद गोटे यांचा भाऊ संदीप गोटे याचा राग अनावर होऊन डॉक्टरांच्या अंगावर धावून जात 'तू पेशंटला पाहिले आहेस का?', असे विचारत त्यांचा गळा दाबून मागे ढकलल्याने डॉ. कदम यांच्या उजव्या हाताला लागून ते जखमी झाले. अतिदक्षता विभागात कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरला मारहाण केल्याबद्दल संदीप गोटे याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा गांधी चौकी पोलिसांनी दाखल केला आहे.
Shahaji Bapu Patil on Uddhav Thackray: उद्धव ठाकरेंचं एक दिवस भांडं फुटणार : शहाजीबापू पाटील

Shahaji Bapu Patil on Uddhav Thackray: काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (Nationalist Congress Party) सोबत जाऊन उद्धव ठाकरे यांची केवळ ससेहोलपटच झालीये. त्यामुळे यांचे एक दिवस भांडे फुटणार, असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. सभेतील गर्दी काँग्रेस-राष्ट्रवादीनं पाठवलेली आहे, या गर्दीचं मतात रूपांतर होणार नाही, अशी टिकाही शहाजीबापू पाटील यांनी केली आहे. 

Crime News: ठाणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून चैन स्नेचिंगच्या गुन्ह्यात वाढ

Kalyan Crime News: ठाणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून चैन स्नेचिंगच्या गुन्ह्यात वाढ झाली होती. हे गुन्हे उघडकीस आणून आरोपींना जेरबंद करण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. विविध पोलीस ठाण्यातील पथकांसह कल्याण गुन्हे शाखा देखील या चोरट्यांच्या मागावर होती. कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाट यांनी या गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन केलं.


या पथकातील प्रशांत वानखेडे यांना जिल्ह्यात विविध परिसरात चैन स्नेचिंगसह बतावणी करत नागरिकांना लुबाडनारे चोरटे टिटवाळा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर आणि त्यांच्या पथकाने टिटवाळा परिसरात सापळा रचत या सराईत चारही चोरट्यांना  विविध ठिकाणाहून ताब्यात घेतले. यामधील सलमान उर्फ राजकुमार इराणी, हसन सय्यद हे दोघे चैन स्नेचिंग करायचे तर सावर इराणी, मस्तानअली इराणी हे दोघे नागरिकांना बतावणी करत त्यांना लुबडत होते. हे चौघे देखील कल्याण जवळच्या आंबिवली येथील इराणी वस्तीत राहणारे आहेत. या चौघांकडून पोलिसांनी आतापर्यंत पाच लाख पंधरा हजार किमतीचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल हस्तगत केलेत.

Baramati Crime News: बारामतीतील एका पेढ्याच्या दुकानावर वनविभागाची कारवाई


Baramati Crime News: बारामतीतील एका पेढ्याच्या दुकानावर वनविभागाने कारवाई केली आहे. बारामती शहरातील कसबा परिसरातील प्रसिद्ध असलेल्या के. के. पेढा दुकानावर वन विभागाने कारवाई केली आहे. पेढा बनवण्यासाठी या दुकान मालकाने वनविभागाच्या अनुसूचीतील कडुलिंब वृक्षाच्या लाकडाची विनापरवाना तोड करून वाहतूक केल्याबद्दल वनविभागाला तक्रार प्राप्त झाली होती. सदरचे लाकूड हे पेढा बनवण्यासाठी वापरले जात होते. वन विभागाला प्राप्त झालेल्या तक्रारीवरून वनविभागाने पेढ्याच्या दुकान मालकाला वाहतुकीचा परवाना विचारला असता त्यांच्याकडे हा परवाना नव्हता. वनविभागाने दुकानदारांकडून एक टन कडुलिंबाचे लाकूड जप्त केले आहे. साठा जप्त करून वनपरिक्षेत्र कार्यालयात आणून ठेवला आहे. सदर प्रकरणी  वन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

 


Maharashtra News: महाराष्ट्र सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सक्षम : खा. प्रताप पाटील चिखलीकर

Maharashtra News: महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी शिंदे फडवणीस सरकार समर्थ असून तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी आपलं राज्य सांभाळावे, असा टोला नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लगावला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नांदेडमध्ये येऊन फडवणीस यांचे नाव घेत तेलंगणा मॉडेल महाराष्ट्रात राबवा मी इकडे येणार नाही, असे आव्हान दिले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना खासदार चिखलीकर यांनी त्यांना तेलंगणा राज्य सांभाळावे असे आव्हान दिले आहे.

Ratnagiri News: राहुल गांधींविरोधातील तक्रारीवर आज सुनावणी

Ratnagiri News: दिल्ली येथे काही वर्षांपुर्वी झालेल्या बलात्कार प्रकरणी पीडितेची ओळख सार्वजनिक ठिकाणी केल्या प्रकरणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत. याबाबत दापोली भाजप तालुका अध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांनी दिल्ली न्यायालय तक्रार दाखल केली होती. दरम्यान, या प्रकरणी गांधींविरोधात फौजदारी कारवाई करण्याची आग्रही मागणी ही त्यांनी केली आहे.


काही वर्षांपूर्वी दिल्ली येथे एक अल्पवयीन मुलगी बलात्काराला बळी पडली होती. तिच्या घरी जाऊन राहुल गांधी यांनी तिच्या कुटुंबियांचे सांत्वन केले होते. यानंतर गांधी यांनी सांत्वन करतानाचे कुटुंबियांसमवेतचे फोटो आपल्या ट्विटरवरून सार्वजनिक केले होते. यामुळे या पिडितेची ओळख सार्वजनिक झाली, असा म्हादलेकर यांनी आक्षेप घेत याबाबत न्यायालयात धाव घेतली होती.
Nashik News: गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या नाशकात गुन्हेगारीचा कळस

Nashik News: गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या नाशिक शहरात गुन्हेगारीने सध्या कळस गाठला आहे. गोळीबार, खूनापाठोपाठ पुण्याच्या कोयता गॅंगचे लोन नाशिकमध्येही पसरल्याचं दिसून येत आहे. गेल्या 20 दिवसांत कोयत्याने मारहाण आणि दहशत माजवण्याचा 9 घटना, प्राणघातक हल्ला करून 2 खून तर सराईत गुन्हेगारांकडून सिनेस्टाईल पद्धतीने गोळीबाराच्या 2 घटना समोर आल्या आहेत. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचकच राहिला नसल्याचं बघायला मिळत असतांना दुसरीकडे आता पोलीसही ऍक्शन मोडवर आले आहेत. मध्यरात्री 12 वाजता पोलिसांनी शहरभर कोंबिंग ऑपरेशन राबवत सराईत गुन्हेगारांची शोध मोहीम हाती घेतली होती, झोपडपट्टीमध्ये घुसून अनेकांच्या घराची झडतीही घेण्यात आली. गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त, झोन वन उपायुक्तांसह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरले होते.

Baramati News : बारामती तालुक्यातील 69 दुष्काळी गावांना पाणी द्या, विजय शिवतारेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Baramati News : बारामती (Baramati) तालुक्यातील 69 दुष्काळी गावातील लोकांना जानाई शिरसाई योजनेतून पाणी द्यावे, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्रही शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. शिवतारे हे दोन दिवसीय बारामती तालुक्यातील दुष्काळी (drought) गावांच्या गावभेट दौऱ्यावर होते. मात्र, दौरा करत असतानाच त्यांची मुंबईत बैठक लागल्यामुळं त्यांना जावे लागले. बैठक झाल्यानंतर शिवतारेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत ही मागणी केली. 

Maharashtra Jalgaon Dudh Sangh: जळगाव दूध संघ अपहार केल्या प्रकरणी तात्कालीन संचालक मंडळाच्या विरोधात पुन्हा गुन्हा दाखल करण्याचे गिरीश महाजनांचे संकेत

Maharashtra Jalgaon Dudh Sangh: जळगाव जिल्हा दूध संघाच्या (Jalgaon Dudh Sangh) गैरव्यवहार प्रकरणी आधीच एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या समर्थक संचालक तथा दूध संघाच्या माजी अध्यक्षा मंदा खडसे (Manda khadse) यांच्याविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता आणखी दुसरा गुन्हा दाखल होणार असल्याचे संकेत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिले आहेत. यामुळे एकनाथ खडसेंच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. पाच ते साडेपाच कोटींचा हा घोटाळा असून पैसे भरण्यासंदर्भात माजी सदस्यांना सांगण्यात आलं आहे, पैसे न भरल्यामुळे नाईलाजास्तव येत्या दोन ते तीन दिवसांत गुन्हा दाखल करणार असल्याचंही मंत्री गिरीश महाजन यांनी कुणाचंही नाव न घेता म्हटलं आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


हसन मुश्रीफांसह त्यांची तिन्ही मुलं आणि सीएच्या अटकपूर्व जामीनावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद पुर्ण झाला असून ईडीतर्फे एएसजी अनिल सिंह आपला युक्तिवाद कोर्टात सादर करतील. ईडीनं सर्वांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे.


आशिष शेलार यांची पत्रकार परिषद


मुंबई - मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांची सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद... मुंबई भाजपा कार्यालय, वसंत स्मृती, दादर येथे पत्रकार परिषदेच आयोजन


अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या याचिकेवर आज सुनावणी


अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकरता मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. वारंवार आंदोलनं करूनही सरकार मागण्या मान्य करत नसल्यानं हायकोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली आहे


मुंबई : भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतील जी-20 व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची पहिली बैठक आजपासून सुरु होत आहे. येत्या 28 ते 30 मार्च दरम्यान ही बैठक मुंबईत पार पडणार आहे. या तीन दिवसीय बैठकीत जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीला गती देण्याविषयक चर्चेत, जी-20 सदस्य गटांचे शंभरहून अधिक प्रतिनिधी, निमंत्रित देशांचे प्रतिनिधी, प्रादेशिक समूहांचे तसेच आंतरराष्ट्रीय संस्थाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सकाळी 10 वाजता हॉटेल ताज लँड अँड वांद्रे येथे कार्यक्रम होणार आहे.


पुणे  : भारत आणि आफ्रिकन देशातील संयुक्त लष्करी सरावादरम्यान आयोजित परिषदेला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह उपस्थित राहणार आहेत. दुपारी 3 वाजता पुण्यातील सिंबायोसिस शिक्षण संस्थेत आयोजित फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ व्याख्यानमालेत राजनाथसिंह यांचे व्याख्यान संध्याकाळी 4 वाजता होणार. 


उमेश पाल अपहरण केसमध्ये स्पेशल कोर्ट आज निकाल देणार


प्रयागराज – उमेश पाल अपहरण केसमध्ये स्पेशल कोर्ट आज निकाल देणार आहे. माफिया अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्यासह इतर आरोपी आहेत. आतिकला काल गुजरातच्या साबरमती जेलमधून प्रयागराजला आणलं गेलय. सकाळी 11 वाजता त्यांना कोर्टात हजर करतील.


भाजपच्या संसदिय बोर्डाची आज बैठक 


दिल्ली : भाजपच्या संसदिय बोर्डाची आज सकाळी 9.30 वाजता बैठक. संसद भवन लायब्ररी बिल्डींगमध्ये बैठकीच आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर भाजपचे खासदार बैठकीला उपस्थित रहातील


दिल्ली : संसदेत अदाणी प्रकरणावरून गोंधळ सुरू आहे. विरोधी पक्षांनी राहुल गांधी यांची सदस्यता रद्द केल्यानंतर सुरू केलेलं आदोंलन सुरू आहे.


दिल्ली : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर आज दिल्लीच्या लाल किल्यापासून टाऊन हॉलपर्यंत मशाल मोर्चाच आयोजन करण्याची तयारी सुरूय. या मोर्चाच नेतृत्व प्रियंका गांधी करू शकतात.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.