Maharashtra News Updates: शिवसेना कुणाची? केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी LIVE
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Pune : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46 वी सर्वसाधारण सभा पुण्याजवळील मांजरी येथील संस्थेच्या आवारात आयोजित करण्यात आली आहे. या सभेला संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकारमंत्री अतुल सावे, विरोधी पक्ष नेते अजित पवार, संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह राज्याच्या साखर उद्योगातील नेते हजेरी लावणार आहेत. यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे 2021 - 2022 या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. राज्याच्या साखर उद्योगात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही मध्यवर्ती संस्था म्हणून काम करते.
मागच्या 23 महिन्यांपूर्वी परभणीत कार्यरत असलेले आयकर विभाग कार्यालय अचानक पणे कुठलेही कारण नसताना हिंगोलीला हलवण्यात आले होते या निर्णया विरोधात परभणीत कर सल्लागार आणि सीए संघटनांनी विविध आंदोलन करून केंद्रीय अर्थमंत्र्यां पर्यंत या आवाज उठवला ज्याचे फलित आज झाले असुन 23 महिन्यानी पुन्हा एकदा आयकर कार्यलय परभणीत सुरू झाले ज्यामुळे कर सल्लागार संघटना आणि सीए संघटनांनी आज कार्यलयासमोर फटाके फोडून,पेढे वाटत आनंद साजरा केलाय...
Thackeray Vs Shinde Live: धनुष्यबाण कुणाचा? सोमवारी लेखी उत्तर सादर करावं, आयोगाच्या दोन्ही गटाला सूचना, सोमवारी पुढील सुनावणी https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-news-live-updates-maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-twentieth-january-2022-today-sunday-marathi-headlines-political-news-mumbai-news-national-politics-news-maharashtra-live-updates-1143331
बीडमध्ये अपघातात जखमी झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.. माया जाधव असे या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्या बीडच्या पेठ बीड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होत्या.. काही दिवसापूर्वी आपल्या पतीसोबत घराकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला तेलगाव नाक्यावर अपघात झाला होता यामध्ये गंभीर जखमी झालेल्या माया जाधव यांना उपचारासाठी एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे..या घटनेने बीड पोलीस दलामध्ये सर्वत्रच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे..
चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढणार
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस चा एकमुखाने निर्णय
उद्या शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवारांपुढे प्रस्ताव मांडणार
भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या जागी पोट निडवणूक होत आहे. भाजपचा कोणताही उमेदवार असला तरी निवडणूक लढायची असं स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवल्याची माहिती शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षाच्या कारभाराला वैतागून जिल्हा उपाध्यक्ष राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष महेश माने राजीनामाच्या तयारीत आहेत. दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष बिपिन करजोळे हे मनमानी कारभार करतात. पक्ष विरोधी कारवाया करतं असतात. या संदर्भात आपण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. 4 जानेवारीला इस्लामपूर येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन तालुकाध्यक्ष करजोळे यांना पदावरून हटवावे यासाठी मागणी केली होते. याबाबत प्रदेशाध्यक्षांनी पत्रही दिले मात्र पक्ष निरीक्षकांनी याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे आम्ही पक्षाचा प्रोटोकॉल पाहत बसण्यापेक्षा राजीनामा दिलेला बरा अशी भावना राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष महेश माने यांनी व्यक्त केली. सोमवारी आम्ही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटणार आहे. त्यांनी करावाई केली तर ठीक अन्यथा आम्ही मंगळवारी राजीनामे सुपूर्द करणार आहोत. आम्हाला शिंदे गटाकडून चौकशी झालेले आहे. आता आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. जर पक्षाने आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही निर्णय घेऊ. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष महेश माने यांनी दिली.
रायगड - आमदार राजन साळवी यांची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी सुरू..
गेल्या तीन तासांपासून लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू..
आतापर्यंत आमदार राजन साळवी यांची चौकशी, कुटुंबियांची मालमत्तेची चौकशी सुरू...
आणखी काही तास चौकशी सुरू राहण्याची शक्यता..
भरधाव जाणाऱ्या रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर समोर अचानक रोही आल्याने टिप्पर ला झालेल्या अपघातात दोन मजूर जागीच ठार झाले आहेत. मोताळा तालुक्यातील वडगाव मार्गावर हा अपघात झाला. बोरखेडी पोलिसांनी टिप्पर चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन मुलींना अश्लील मेसेज आणि अश्लील व्हिडिओ पाठवणाऱ्या एका आरोपीला मुंबईच्या मालाड पोलिसांनी अटक केली आहे. हर्ष शांतीलाल गिंद्रा (22) अस अटक करण्यात आलेल्या तिचे नाव असून त्याला मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर 2 महिन्यांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा आरोपी अॅपद्वारे मुलींचे नंबर काढायचा आणि त्यांना अश्लील मेसेज पाठवायचा.मुलीने नंबर ब्लॉक केल्यास आरोपी दुसऱ्या नंबरवरून व्हिडिओ मेसेज पाठवत असे.मालाड पश्चिम येथील एका अल्पवयीन मुलीला अनोळखी नंबर वरून अश्लील मेसेज आणि व्हिडिओ येऊ लागले.त्या अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला.त्यानंतर कुटुंबीयांनी मालाड पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली.1 नोव्हेंबर रोजी मालाड पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. गुन्हा केल्यानंतर आरोपीने त्याचा नंबर बंद केला होता. परंतु पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून आरोपी ला अटक करण्यात आलेल्या आरोपीचा मोबाईल तपासल्यानंतर आरोपीने आणखी अनेक मुलींना अश्लील मेसेज आणि अश्लील व्हिडीओ पाठवल्याचे पोलिसांना समोर आले. यासाठी मालाड पोलिसांचे आवाहन केली आहे की ज्या मुलींना अश्लील मेसेज आणि व्हिडीओ मिळाले आहेत त्यांनी त्यांच्या जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी, त्यानंतर मालाड पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल निवडणूक आयोगात दाखल, सुनावणीला सुरुवात, शिवसेना कुणाची? निर्णयाकडे लक्ष
Anil Desai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणाचा माणूस आहेत हे त्यांनी काल सिद्ध केल्याचे वक्तव्य शिवसेना (ठाकरे गट) अनिल देसाई यांनी केलं. काल महाराष्ट्राला कळालं की कोण कोणाचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बोलताना मी पंतप्रधान मोदींचा माणूस असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ICICI Bank Scam: आयसीआयसीआय बँक व्हिडिओकॉन लोन घोटाळा प्रकरणी वेणूगोपाल धूत यांनाही हायकोर्टाचा दिलासा दिला आहे. एक लाखाच्या जामीनावर तात्काळ कारागृहातून सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. तपासांत सहकार्य करावं, साक्षी पुराव्यांशी कोणतीही छेडछाड करू नये. पासपोर्ट जमा करून विनापरवानगी देशाबाहेर जाण्यास हायकोर्टाची मनाई आहे.
Mantralay News : मंत्रालयातील प्रवेशासाठी देण्यात येणारी पास सेवा ठप्प झाली आहे. पास देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. पाच महिन्यांपासून या कंत्राटी कामगारांचा पगार न झाल्याने संप पुकारण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून हे सर्व कंत्राटी कामगार संपावर गेले आहेत. पास सेवा ठप्प झाल्याने मंत्रालयात प्रवेश करायचा कसा असा सर्वसामान्यांच्या पुढे प्रश्न आहे.
Solapur News : सोलापुरात व्यावसायिकांचा कार्यालयावर आयकर विभागानं छापे टाकले आहेत.
Mahrashtra News: छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आता शासकीय स्तरावर साजरी केली जाणार आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Nandurrbar News : दुर्गम भागातील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावं म्हणून महिला बालकल्याण विभागाच्या वतीने दोन वर्षांपूर्वी अंगणवाडींना आरओ फिल्टर देण्यात आले होते. मात्र अजूनही अनेक अंगणवाडीमध्ये पाण्याचे फिल्टर बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे लहान बालकांना दूषित पाणी प्यावं लागतंय..त्यामुळे सरकारने खर्च केलेले कोट्यावधी रुपये पाण्यात गेल्याचं चित्र नंदुरबार जिल्ह्यात पहायला मिळतंय
Cotton: राज्यात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात झालंय.. पश्चिम विदर्भातील कापूस हा उच्च दर्जाचा असून त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे... मात्र सध्या कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्री न करता घरात साठवून ठेवलाय... शेतकरी कापसाला चांगला भाव मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.. मात्र यामुळे राज्यातील कापसावर प्रक्रिया करणारे जवळपास 80 टक्के जिनिंग बंदच आहेत तर काही 20 टक्के जिनिंग सुरू करण्यात आले होते तेही आता कापसाच्या अभावी बंद पडलेत....त्यामुळे ३ लाख मजूरांवर उपासमारीची वेळ आलीये...
Aurangabad News : औरंगाबादमधील लाडसावंगी,खुलताबाद इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी (19 जानेवारी) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या 107 महिलांना चोवीस तासाचा उपवास घडला. त्यामुळे अनेक महिलांची तब्येत बिघडली. शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर वेळेवर न आल्याने खोळंबा झाला. शस्त्रक्रियेचे नियोजन बिघडल्याने महिला चांगल्याच संतापल्या.
Nashik News: नाशिक शहरातील देवळाली गाव परिसरात शिंदे गट आणि ठाकरे गटात काल बाचाबाची झाली यावेळी शिंदे गटाचे पदाधिकारी सूर्यकांत लवटे यांच्या मुलाने थेट बंदूक काढत हवेत गोळीबार केला... त्यामुळे काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं... पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आगामी शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या देवळाली गाव परिसरात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अध्यक्षपदावरून चर्चा सुरू असतांनाच शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या समर्थकांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर स्वप्निल लवटे याने हवेत गोळीबार केला. याप्रकरणी स्वप्निल लवटे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Sanjay Raut: राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या जम्मूमध्ये आहे. या वेळी त्यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत सहभागी होणार आहेत. त्यासाठी काल ते जम्मूमध्ये दाखल झाले. इथे येताच त्यांनी गेले अनेक दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या काश्मिरी पंडितांची भेट घेतली जर मोदींना काश्मिरी पंडितांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर आम्हाला सत्ता द्या आम्ही सोडवतो असं म्हणत त्यांनी भाजपलव टीका केली होती
Rajan Salvi ACB Inquiry : संपत्ती झालेली वाढ या प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना एसीबीने नोटीस पाठवली आहे. दरम्यान डिसेंबरमध्ये अलिबाग येथील एसीबी कार्यालयात राजन साळवी शक्ती प्रदर्शन करत हजर झाले होते. त्यावेळी जवळपास चार ते पाच तासांची चौकशी झाली होती. यावेळी एसीबीने त्यांना संपत्तीची माहिती सादर करण्यास सांगितलं होतं. तीच माहिती सादर करण्यासाठी राजन साळवे आज अलिबाग येथील एसीबी कार्यालयात सकाळी अकरा वाजता हजर राहणार आहेत.
पार्श्वभूमी
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.
शिवसेना कुणाची, धनुष्यबाण चिन्ह कुणाला? या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणीची दुसरी फेरी मंगळवारी झाली होती. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेनेत फूट पडलीच नसल्याचा दावा करत सध्या दाखवण्यात येणारे चित्र कपोलकल्पित असल्याचा दावा केला. शिंदे गटाने दिलेली शपथपत्रे खोटी असून या सर्वांची ओळखपरेड घ्या, तरच सत्यता समोर येईल, असेही आयोगाला सांगितले. शिंदे गटातील 7 जिल्हाप्रमुखांच्या शपथपत्रावरही आक्षेप नोंदवला. यात विजय चौगुले, राजाभाई केणी, चंद्रकांत रघुवंशी, किरसिंग वसावे, नितीन मते यांच्यासह आणखी दोघांचा समावेश आहे. इतर पदांवर कार्यरत असतानाही या नेत्यांना जिल्हाप्रमुखपदी दाखवण्यात आल्याचे सिब्बल यांनी सांगितले. 10 जानेवारी रोजी झालेल्या पहिल्या सुनावणीत शिंदे गटाचे अॅड. महेश जेठमलानी यांनी उद्धव ठाकरेंचे पक्षप्रमुखपदच बेकायदा आहे. आमच्याकडे आमदार, खासदारांचे बहुमत असल्याने शिंदेंचाच पक्ष खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता. हा दावा खोडून काढताना अॅड. सिब्बल म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा पक्षच खरी शिवसेना आहे. शिंदे गटाचे आमदार, नेते काही लोकांना बाहेर घेऊन स्वत:हून बाहेर पडले आहेत. ते बेकायदा आहेत. त्याचा शिवसेनेवर काहीही परिणाम झालेला नाही. यातील काही आमदारांवर अपात्रतेचा खटला सुरू आहे. दरम्यान, आज पुन्हा यावर सुनावणी होणार आहे.
आजपासून मेट्रो 7 आणि मेट्रो 2 ए चा मार्गावरील मेट्रो सुरु
आजपासून मेट्रो 7 आणि मेट्रो 2 अ चा मार्गावरील मेट्रो खऱ्या अर्थाने सुरु होणार आहे. दुपारी 3 नंतर ही मेट्रो सुरु होईल, अशी माहिती मिळाली आहे. मेट्रो 7 चा मार्ग आणि स्थानकं - या मेट्रो मार्गावर 13 स्टेशनवर थांबा असणार आहे. जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव पूर्व, आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठाणे, देवीपाडा, नॅशनल पार्क, ओवरीपाडा इथे मेट्रो मार्ग थांबेल. मेट्रो 2 ए मार्गावर अंधेरी पश्चिम, ओशिवारा, लोअर ओशिवरा, गोरेगाव पश्चिम, पहाडी गोरेगाव, लोअर मालाड, मालाड पश्चिम, वनराई, डहाणूकरवाडी, कांदिवली पश्चिम, पहाडी एकसर, बोरिवली पश्चिम, खंडारपाडा, आनंदनगर, दहिसर पश्चिम, मांडपेश्वर ही स्टेशन आहेत.
ब्रिजभूषण शरणसिंग यांच्याविरोधात आजही पैलवानांच आंदोलन
दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाविरोधात पैलवानांच आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू होतं. बुधवारी क्रीडा मंत्रालयाच्या सचिवांसोबत आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंची चर्चा झालीय. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंग यांना हटवलं जात नाही तोपर्यंत जंतरमंतरवर आंदोलन सुरु राहणार असल्यांच पैलवानांनी सांगीतलय. आज पुन्हा सकाळी 10 वाजता आंदोलनाला सुरवात होणार आहे. हिमाचल प्रदेशचे सर्व कार्यक्रम रद्द करून केंद्रिय क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर दिल्लीत पोहचलेत.
संजय राऊत आज भारत जोडो यात्रेत सहभागी होणार
जम्मू –संजय राऊत राहुल गांधी सोबत आज भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -