Maharashtra News Updates: चिपळूण मनसे सैनिकांकडून एलआयसीच्या कर्मचाऱ्याला कार्यालयात जाऊन चोप

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Feb 2023 06:24 PM
नागपुरात शासकीय सुट्टीच्या दिवशीही महानगरपालिकेचे कर संकलन केंद्र राहणार सुरु

Nagpur Municipal Corporation News :  नागपूर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्टीच्या दिवशी सुद्धा मनपा मुख्यालयासह दहाही झोन कार्यालयातील मालमत्ता कर संकलन केंद्र सुरू राहणार आहेत. कर संकलनाच्या दृष्टीने निर्णयाचे परिपत्रक जारी केले आहे. आर्थिक वर्ष 2022-2023 या वर्षात दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याकरीता तसेच मालमत्ता कर धारकांना कराचा भरणा सोईचे व्हावे म्हणून 4 फेब्रुवारी 2023 पासून 31 मार्च 2023 पर्यंत प्रत्येक शनिवार व रविवार तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशीही (दिनांक 7 मार्च,2023 धुलिवंदन वगळुन ) दहाही झोन कार्यालयातील मालमत्ता कर संकलन केंद्र व सिव्हील कार्यालय मालमत्ता कर संकलन केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात पुण्यात गुप्तबैठक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात पुण्यात एक गुप्तबैठक पार पडणार आहे. या बैठकीत चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करून, ती नावं केंद्राकडे पाठवली जाणार आहेत. अशी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे. हे तिन्ही नेते आज पुण्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आलेले आहेत. त्याच दरम्यान ही बैठक पार पडणार आहे. बैठकीच्या ठिकाणाबाबत मात्र अद्याप स्पष्टता नाही. चिंचवडमध्ये दिवंगत लक्ष्मण जगताप कुटुंबियातील उमेदवारीवरून सुरू झालेला वाद आणखी विकोपाला जाऊ नये. म्हणून ही तातडीची बैठक होत असल्याचं बोललं जातंय. तर कसबा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबा व्यतिरिक्त उमेदवार देण्याबाबत ही या बैठकीत चर्चा होईल, अशी सूत्रांनी माहिती दिलीये.

चिंचवड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस कडून शर्यतीत असणाऱ्या पाच इच्छुकांनी नामनिर्देश पत्र घेतले

चिंचवड विधानसभा इच्छुकांची विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी काल बैठक घेतली अन आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन इच्छुकांनी नामनिर्देश पत्र घेतलेले आहेत. भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे आणि प्रशांत शितोळे यांनी ही उमेदवारीसाठी दावा केला आहे  राष्ट्रवादी काँग्रेस कडून शर्यतीत असणाऱ्या पाच इच्छुकांनी नामनिर्देश पत्र घेतलेत. याआधी राजेंद्र जगताप आणि नाना काटे यांनी उमेदवारीसाठी ईच्छा व्यक्त केलेली आहे. उमेदवार आयात न करता पक्षातीलच द्यावा या मागणीनंतर इच्छुकांची भाऊगर्दी वाढू लागलीये.

Chiplun MNS: चिपळूण मनसे सैनिकांकडून एलआयसीच्या कर्मचाऱ्याला कार्यालयात जाऊन चोप

चिपळूण एल आय सी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला मनसे सैनिकांनी कार्यालयात जाऊन चांगलाच चोप दिला. हा कर्मचारी गेले वर्षेभर चिपळूण खेड येथील ब्यूटीपार्लर व्यावसायिक महिलेला मानसिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून महिलेने चिपळूण पोलिस ठाण्यात दोन वेळा तक्रारही केली होती. या तक्रारीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने शेवटी या महिलेने मनसे सैनिकांची भेट घेऊन तक्रार केली. त्यानंतर मनसैनिकांनी एलआयसीच्या कर्मचाऱ्याला चांगलाच चोप दिला. याबाबत पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूने तक्रार नोंदवण्यात आली आहे. 

VI Network Down : व्हीआयचं नेटवर्क डाऊन, कॉलिंग आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प

Vodafone Idea Network Down : मुंबईत अनेक ठिकाणी व्होडाफोन आयडियाचं (VI - Vodafone Idea) नेटवर्क डाऊन आहे. व्हीआयचा सर्व्हर डाऊन आहे. कॉलिंग आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. सुमारे तासाभरापासून व्होडाफोन आयडिया ग्राहकांची सेवा खंडीत झाली आहे. यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागतोय. 

Kundan Shinde:  कुंदन शिंदेला सीबीआय प्रकरणातही जामीन मंजूर

Kundan Shinde:  कुंदन शिंदेला सीबीआय प्रकरणातही जामीन मंजूर झाला आहे.  मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाचा निर्णय. अनिल देशमुखांशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात  कुंदन शिंदे सहआरोपी होता. ईडीपाठोपाठ सीबीआय कोर्टानंही जामीन मंजूर केल्यानं कुंदन शिंदेचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  

Hindu Jan Akrosh Morcha : हिंदू जनआक्रोश मोर्चामध्ये वादग्रस्त भाषण होणार नाही याची काळजी घेऊ - राज्य सरकार

Hindu Jan Akrosh Morcha : हिंदू जनआक्रोश मोर्चामध्ये वादग्रस्त भाषण होणार नाही याची काळजी घेऊ - राज्य सरकार


हिंदू जनआक्रोश मोर्चाचं व्हिडीओ शूटिंग करा - कोर्ट

हिंदू जनआक्रोश मोर्चाचं व्हिडीओ शूटिंग करा - कोर्ट


SSS Exam Hall ticket : महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्चदरम्यान होणार

SSS Exam Hall ticket : महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्चदरम्यान होणार आहे. दहावी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट 6 फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. 



मविआ सरकारच्या काळातील भरती 'मॅट'कडून रद्द, महावितरणसह सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग आणि राज्य कर विभागातील भरती प्रक्रियेबाबत मॅटचा मोठा निर्णय

Recuritment Cancelled : महाविकास आघाडी सरकारच्या काळातील भरती 'मॅट'कडून रद्द


महावितरणसह सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग आणि राज्य कर विभागातील भरती प्रक्रियेबाबत मॅटचा मोठा निर्णय


ईडब्ल्यूएस उमेदवारांना सुपरन्युमररी पदे देऊ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय बेकायदा 


सुपरन्युमररी पदे द्यायचीच असतील तर ती मराठा आरक्षण गटातून ईडब्ल्यूएस गटात आलेल्यांनाच द्यायला हवी - मॅट 


ईडब्ल्यूएस उमेदवारांच्या मूळ गुणवत्ता यादीनुसारच अंतिम यादी तयार करा


एमपीएससीने चार आठवड्यांच्या आत राज्य सरकारला शिफारस करावी


सार्वजनिक बांधकाम विभागातील 111 पदे, वन विभागातील दहा पदे आणि राज्य कर विभागातील 13 पदे अशा एकूण 134 पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) साल 2019 मध्ये जाहीरात देऊन राबवलेली भरती प्रक्रिया

दादरमध्ये शिवाजी महाराज पार्क फेस्टिव्हलचे बॅनर अज्ञाताने फाडले

Mumbai News : दादरमध्ये शिवाजी महाराज पार्क फेस्टिव्हलचे बॅनर अज्ञाताने फाडले


- काल दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क फेस्टिवलचं उद्घाटन युवा सेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं


- मात्र आज आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनरवर अज्ञाताने कट मारले आहेत


- त्या बॅनरवर कट मारले असून ते बॅनर देखील फाडण्यात आले आहेत


- राजकीय वादातून बैनर फाडले असल्याची चर्चा आहे 


- शिवसेना ठाकरे गट आयोजक साईनाथ दुर्गे पोलिसात तक्रार करणार

Kolhapur News: कोल्हापूर जिल्हा बँकेत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, ईडीने काल पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याने निषेध व्यक्त

Kolhapur News: कोल्हापूर जिल्हा बँकेत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन केले आहे.    ईडीने काल पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याने निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पाच अधिकारी ईडीच्या ताब्यात आहेत. बँकेच्या साखर विभागातील अधिकारी आणि मोठी कागदपत्र  ईडीच्या ताब्यात आहे.

Pune MPSC : MPSC विद्यार्थ्यांचं आज पुन्हा पुण्यात आंदोलन, आता ‘या’ नव्या मागण्या

Pune MPSC :   2025 पासून एमपीएससी नवा पॅटर्न लागू करण्याच्या मागणीसाठी एमपीएससी विद्यार्थ्यांनी राज्यभरात आंदोलन केले होते. मात्र आता नवा पॅटर्न हा यंदाच म्हणजे 2023 पासूनच लागू करावा, यासह यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीची परीक्षा घेतली जावी, अशा नव्या मागणीकरत हे विद्यार्थी आज रस्त्यावर उतरणार आहेत.  पुण्यातील अलका चौकात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या नव्या मागणीनंतर MPSC विद्यार्थ्यांमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. 

Pune MPSC : MPSC विद्यार्थ्यांचं आज पुन्हा पुण्यात आंदोलन, आता ‘या’ नव्या मागण्या

Pune MPSC :   2025 पासून एमपीएससी नवा पॅटर्न लागू करण्याच्या मागणीसाठी एमपीएससी विद्यार्थ्यांनी राज्यभरात आंदोलन केले होते. मात्र आता नवा पॅटर्न हा यंदाच म्हणजे 2023 पासूनच लागू करावा, यासह यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीची परीक्षा घेतली जावी, अशा नव्या मागणीकरत हे विद्यार्थी आज रस्त्यावर उतरणार आहेत.  पुण्यातील अलका चौकात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या नव्या मागणीनंतर MPSC विद्यार्थ्यांमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. 

MPSC:  एमपीएससी परीक्षांवरून पुन्हा एकदा वाद, नवा अभ्यासक्रम 2023 सालापासूनच लागू करण्याच्या मागणी

MPSC:  एमपीएससीचा अभ्यासक्रम आणि परीक्षांवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय. नवा अभ्यासक्रम 2023 सालापासूनच लागू करण्याच्या मागणीसाठी पुण्यात आज आंदोलन करण्यात येणारेय. यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीची परीक्षा घेण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरणार आहेत.  

Satara News: बेकायदा दारु विक्रेतेच्या दुकानावर महिलांचा रुद्रावतार

Satara News: साताऱ्यातील चिलेवाडी या गावातील महिलांचा रुद्रावतार पहायला मिळाला.गावात असणाऱ्या दारुच्या दुकानात बेकायदेशीर दारुची विक्री केली जाते. याच दारुच्या गुत्त्यावर आमचे पती दारुच्या पिण्यासाठी जातात.. यावरुन गावातील महिला चांगल्याच आक्रमक झाल्यात. या महिलांनी आक्रमक पवित्रा घेत दारुच्या दुकानावर हातात दांडकी घेऊन हल्ला केला. या हल्ल्यात दारु विकणाऱ्याला या महिलांनी चांगलाच चोप दिलाय.मारहाणीनंतर या महिलांनी या दुकानदाराला पोलिसांच्या ताब्यात दिलं. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात सध्या चांगलाच व्हायरल झालाय. 

ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

Kokan Teacher Constituncy:  कोकण शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे विजयी उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजयानंतर वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली...मुख्यमंत्र्यांनी विजयाबद्दल म्हात्रे यांचं अभिनंदन केलं.. काल झालेल्या कोकण शिक्षक निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महाविकास आघाडीच्या बाळाराम पाटील यांचा पराभव केला

परभणीचे तापमान 8.2 अंशावर, अचानक तापमानात घट झाल्याने सर्वत्र गारठा वाढला

Parbhani Weather Update : परभणीचे तापमान आज तापमान अचानकपणे घटून थेट 8.2 अंश सेल्सिअसवर आला आहे. यामुळे पुन्हा एकदा सर्वत्र गारठा वाढला असून कडाक्याची थंडी जाणवत आहे. मागच्या महिनाभरापासून जिल्ह्याचे तापमान 12 ते 14 अंश सेल्सिअस दरम्यान कायम आहे. त्यामुळे अगोदरच जिल्ह्यात थंडीचा कडाका असताना आज अचानक तापमानात 4.2 अंश सेल्सिअसने घरसण होऊन थेट 8.2 अंशावर आलं. त्यामुळे थंडीत कमालीची वाढ झाली असून परभणीकरांना पुन्हा एकदा हुडहुडी भरली आहे..

समृद्धी महामार्गावरील प्रवास आणखी सुसाट, वाशिम जिल्ह्यातील 12 किलोमीटरचा रस्ता पूर्ण

Samruddhi Mahamarg : नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण 11 डिसेंबरला करण्यात आले. मात्र वाशीम जिल्ह्यातील वनोजा ते वारंगी दरम्यानचे 12 किलोमीटरच्या रस्त्याचे काम अपूर्ण असताना लोकार्पण करण्याची घाई का असा प्रश्न उपस्थित  करण्यात येत होता. हे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी लागणार होता. मात्र अवघ्या दीड महिन्यात अपूर्ण काम हे पूर्ण करुन प्रवाशांना रस्ता खुल्ला करण्यात आला. यामुळे आता या मार्गावर  शिर्डी ते नागपूरपर्यंतचा प्रवास अडथळ्याशिवाय सुसाट होणार आहे. 

नोटीस मिळाल्यानंतर राजन साळवी यांचे स्वीय सहाय्यक सुभाष मालप आज एसीबी कार्यालयात हजर राहणार

Ratnagiri News : राजन साळवी यांच्या मालमत्तासंदर्भात सध्या अलिबाग येथे चौकशी सुरु आहे. याच प्रकरणामध्ये त्यांचे स्वीय सहाय्यक सुभाष मालप यांना देखील एसीबीने नोटीस पाठवली आहे. साळवी यांच्या सुरु असलेल्या चौकशीबाबत आता मालप यांचाही जबाब नोंदवला जाणार आहे. त्यासाठी राजन साळवी यांचे स्वीय सहाय्यक सकाळी 11 वाजता अलिबाग येथील एसीबी कार्यालयात हजर राहणार आहेत. मालप यांना काल याबाबतची नोटीस मिळाली होती. दरम्यान जिल्ह्यातले आणखी काही जण एसीबीच्या रडारवर असल्याच्या चर्चाना आता सुरुवात झाली आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


वर्धा येथे 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तर पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन असणार आहे. तर कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. कुणाला उमेदवारी मिळणार? याबाबत चर्चा सुरु आहे. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामण सकाळी 9 वाजता भाजपच्या राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांना बजेट संदर्भात माहिती देणार आहेत.


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला वर्ध्यात सुरुवात 


वर्धा - आजपासून 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला वर्ध्यात सुरुवात होत आहे... सकाळी 8 वाजता ग्रंथ दिंडीला सुरुवात होणार असून 10 वाजता संमेलन स्थळी ध्वजारोहण होणार आहे... तर 10.30 वाजता उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे. उद्घाटन सोहळ्यात संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.. 


MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन 


पुणे -  नवीन वर्णनात्मक अभ्यास 2023 पासूनच लागू करावा या मागणीसाठी सकाळी १० वाजता MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन...  आता MPSC च्या विद्यार्थ्यांकडून UPSC च्या धर्तीवर परिक्षा घेण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे… आज सकाळी 10 वाजता पुण्यातील अलका चौकात त्यासाठी विद्यार्थी एकत्र जाणार आहेत… तीनच दिवसांपुर्वी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून युपीएससीच्या धर्तीवर आधारित अभ्यासक्रमानुसार 2025 पर्यंत परिक्षा नकोत यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं… त्यानंतर सरकारकडून 2023 एवजी 2025 पासून नवीन अभ्यासक्रमानुसार परिक्षा घेण्यात येतील असं जाहीर करण्यात आलं… मात्र विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गटाची याच्या नेमकी उलटी मागणी आहे... नवीन अभ्यासक्रमानुसार परिक्षा 2025 पासून नव्हे तर 2023 पासूनच घेण्यात याव्यात अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि त्याचसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे  


महाविकास आघाडीची बैठक 


पुणे - कसबा आणि चिंचवड मतदार संघाचा उमेदवार निश्चीत करण्यासाठी महाविकास आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. तर पुण्यात सकाळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. बैठकीला शिवसेनेच्या उपनेत्या निलम गोऱ्हे आणि सचिन आहिर देखील उपस्थित रहाणार आहेत. दोन्हीही मतदार संघाच्या उमेदवारीबाबत पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. 


भाजपचीही बैठक 


सकाळी 11 वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचीही कसबा पोटनिवडणुकी संदर्भात बैठक होणार आहे. महाविकास आघाडीत जागा मिळाव्यात यासाठी रस्सीखेच असल्याच पहायला मिळतय... दोन्हीही जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय होणार का, बैठकीनंतर तिघेही निर्णयाला पोहचणार का याकडं सर्वांच लक्ष

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.