Sangli Assembly Constituency : लोकसभा निवडणुकीवेळी राज्यभर गाजलेल्या सांगली पॅटर्नची चर्चा आता विधानसभेला देखील आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी प्रतिनिधीत्व केलेल्या मतदारसंघात, म्हणजे सांगलीत यंदा तिरंगी लढत आहे. वसंतदादा पाटील घराण्यातील जयश्री पाटील यांनीच बंडखोरी केल्यामुळे ही लढत तिरंगी होणार आहे. भाजपकडून आमदार सुधीर गाडगीळ तर काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. त्यामुळे भाजपचे सुधीर गाडगीळ हॅट्रिक करणार की पृथ्वीराज पाटील पराभवाचा बदला घेणार किंवा जयश्री पाटील मैदान मारणार हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.
या आधी आमदार सुधीर गाडगीळ यांनी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं होतं. पण लोकसभेच्या निकालानंतर भाजपकडे या मतदारसंघात तेवढा तगडा उमेदवार सापडला नसल्याने पुन्हा एकदा सुधीर गाडगीळांनाच उमेदवारी देण्यात आली. तर दुसरीकडे सांगलीचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराज झालेल्या जयश्री पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. जयश्री पाटील या खासदार विशाल पाटील यांच्या चुलत वहिनी असून मदन पाटील यांच्या निधनानंतर पाटील गटाची सूत्रे त्यांनीच हाती घेतली होती.
लोकसभेला काँग्रेस नेते विश्वजीत कदमांनी महाविकास आघाडीचा आदेश धुडकावून सर्व ताकद अपक्ष असलेल्या विशाल पाटलांच्या मागे लावली होती. विशाल पाटील यांनी ही निवडणूक जिंकली. त्यानंतर जयश्री पाटील या विधानसभेसाठी इच्छुक होत्या. पण त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली.
सांगलीतील निवडणुकांमध्ये वसंतदादा घराण्याचा दबदबा
सांगली विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत 16 निवडणुका काँग्रेसने जिंकले आहेत. त्यापैकी पाच निवडणुका वसंतदादा पाटील यांच्या सहकार्याने जिंकल्या. 1980 मध्ये वसंतदादा पाटील यांनी स्वतः इंदिरा गांधी यांच्या आग्रहामुळे निवडणूक लढवली होती. त्यानंतर सलग दहा निवडणुका वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील सदस्यांनी लढवल्या आणि जिंकल्या. वसंतदादा पाटील यांच्याबरोबर शालिनीताई पाटील, प्रकाश बापू पाटील, मदन पाटील, प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांनी आतापर्यंत लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत.
2019 सालच्या निवडणुकीचा निकाल काय?
सुधीर गाडगीळ (भाजप) - 93,636
पृथ्वीराज पाटील (काँग्रेस) - 86,697
ही बातमी वाचा: