Maharashtra News Live Updates :मराठा समाजाला मागासवर्गीय आरक्षण देण्याचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत,हंसराज अहिर यांचं वक्तव्य
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
सोलापुरातील हिजामा थेरपी स्पेशलिस्ट तीस वर्षीय तरुण डॉक्टराने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं.डॉ. असद मुन्शी असे मृत तरुण डॉक्टरचे नाव आहे. विष प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आलीय. मात्र डॉ. असद यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्यामागचे नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पण त्यांनी आपल्या व्हाट्सएपवर अतिशय भावनिक असे स्टेटस ही ठेवल्याचे समोर आले आहे.
काल संध्याकाळी डॉ. असद यांची तब्येत अचानक बिघडली. उपचारासाठी त्यांना बेशुद्ध अवस्थेत सोलापुरातील एका सहकारी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना आज त्यांचा मृत्यू झाला. एक हसतमुख असे व्यक्तिमत्व आणि सोलापुरात हिजामा स्पेशालिस्ट म्हणून डॉक्टर मुन्शी यांची ओळख होती.
लांजा, रत्नागिरी - पक्ष बांधणीच्या आड कुणी आल्यास त्याला तुडवा आणि पुढे व्हा, मी मुंबईतून वकिलांची फौज उभी करतो. लांजा येते कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी कार्यकर्ताना दिले आदेश. येत्या काळात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा असा टाईट बांधतो की कुणी हात लावू शकणार नाही, असे देखील यावेळी राज ठाकरे म्हणाले आहेत.
दौंड शहरात कोयत्याने सपासप वार करून तरुणाची हत्या, दौंड शहराच्या मध्यभागी झाली हत्या
मयूर चितारे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव
आरोपी खून करून कोयत्यासहीत पोलिस ठाण्यात झाला हजर
सायंकाळी सात वाजताची घटना
शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यांनंतर आता राजन साळवी यांना अँटी करप्शनची नोटीस
नोटीसीमध्ये मालमत्ते संदर्भाचा उल्लेख
पाच तारखेला अलिबाग येथील अँटी करप्शन कार्यालयात हजर राहण्याचा नोटीसीत उल्लेख
तृतीयपंथी व्यक्ती या समाजाचाच एक भाग आहे. त्यांना कुठलीही उपेक्षेची वागणूक देणे कायद्याने गुन्हा असल्याची माहिती तृतीयपंथी मंडळाचे सदस्या श्रीमती दिलशाद मुजावर यांनी आपल्या मनोगतात दिली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत 6 नोव्हेंबर संविधान दिन ते 6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हा कालावधी सामाजिक न्याय पर्वाचा एक भाग म्हणून तृतीयपंथी व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याण या विषयावर प्रमुख वक्त्या तृतीयपंथी मंडळ सदस्य श्रीमती दिलशाद मुजावर, राज्यस्तर व राष्ट्रीय पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर वरील ओळखपत्र व ओळख प्रमाणपत्र याचे वितरण कार्यक्रम आज हुपरी येथील शेंदुरे महाविद्यालयात करण्यात आला.
कर्जतहून मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा उशिराने सुरू आहे. कर्जतमध्ये सुरू असलेल्या अभियांत्रिकी कामामुळे मुंबईकडे जाणाऱ्या लोकल तब्बल ४५ ते ५० मिनिटे उशिराने धावत आहेत. याचा बदलापूर ते कर्जत पट्ट्यातील प्रवाशांना मोठा त्रास होतोय. कर्जत रेल्वे स्थानकातील कामामुळे लोकल सध्या नेरळ रेल्वे स्थानकापर्यंत चालवल्या जात असून या लोकल ५० मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे नेरळ, शेलु, वांगणी या रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांना मोठा त्रास होतोय. तर बदलापूर आणि अंबरनाथपर्यंत थेट लोकल सेवा असल्यामुळे या दोन रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या लोकल मात्र वेळेवर धावत आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिर्डीत सपत्निक साई दर्शनाला हजेरी लावली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी उदयनराजेंचे समर्थन करत राज्यसरकारवर जोरदार टीका केलीये. पैगंबराविषयी बोललेल्या नुपूर शर्मावर लगेच कारवाई झाली उदयनराजे गेल्या काही दिवसांपासून आक्रमक असून ते महाराष्ट्राच्या भावना व्यक्त करत आहेत. छत्रपतींच्या अपमानामुळे उदयनराजे भावनाविवश असून आम्ही सर्व त्यांच्याशी सहमत आहोत. मात्र त्यांच्याच पक्षाने छत्रपतींचा अपमान केलाय आणि त्याबद्दल पक्ष साधी माफी मागायला तयार नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असलेला वर्सोवा पूल नागरिकांसाठी 20 फेब्रुवारी पर्यंत खुला करण्याचे आश्वासन खासदार राजन विचारे यांनी दिलं आहे. खासदार राजन विचारे यांनी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसह मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर येथील वर्सोवापुलाची पाहणी केली आहे.
जळगाव : धरणगावात उद्धव ठाकरे गट आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात धरणगाव शहरातील विकास कामांवरून श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. धरणगावात उद्यान उभारण्यात आले असून याबद्दलचे आज मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झाले. मात्र या लोकार्पण सोहळ्यांपूर्वीच उद्धव ठाकरे गटाच्या वतीने वाजत गाजत आदल्या दिवशी सायंकाळीच या उद्यानाचे उद्घाटन करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. या उद्यानावरूनच आता शिंदे गटाचे मंत्री आणि धरणगाव शहरातील उद्धव ठाकरे गट यांच्यात श्रेयवादाची लढाई चांगली रंगली असल्याचे पाहायला मिळालं.
औरंगाबाद शहरातून पैठणकडे जाणाऱ्या महानुभाव आश्रम चौकामध्ये रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. एकेक खड्डा किमान 3 फुटाचा असल्यानं दररोज अपघात होत आहे. महानुभाव आश्रम चौकामध्ये औरंगाबाद, बीडवरून येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. या रस्त्यावर मोटरसायकल पासून ते जड वाहने 24 तास असतात त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी हा रस्ता जीवघेणा ठरतोय. सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा महानगरपालिका या दोघांनी या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात आहे.
सोलापूरमध्ये कर्नाटक भवन उभा करण्याबाबत कर्नाटक च्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याने यावरून वादंग उठलं आहे. मात्र कर्नाटक भवन आधीच आपल्या राज्यात उभे राहत आहे. वाशी येथील रेल्वे स्थानका समोर कर्नाटक भवन उभे राहत असून या ठिकाणी अनेक राज्यांची भवने दिमाखात उभी आहेत. या मध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, आसाम, मिझोरम, मेघालय, केरळ अशा बर्याच राज्यांचे भवन बांधण्यात आली आहेत. परराज्यातून मुंबईत येणाऱ्या लोकांची सोय व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारकडून विविध राज्यांना भवन उभे करण्यास भूखंड देण्यात आले होते.
धुळे शहरातील 130 वर्षाहून अधिक जुना असलेला इंग्रज कालीन पूल स्ट्रक्चरल ऑडिट साठी बंद करण्यात आला आहे. मात्र या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट कागदपत्रांच्या पूर्ततेमध्ये अडकले असून पुढील दोन महिने हा पूल बंद राहणार असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. धुळे शहरातील 130 वर्षाहून अधिक जुना असलेला इंग्रज कालीन पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत स्ट्रक्चरल ऑडिटच्या कामासाठी हा पूल गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आला आहे. मात्र अद्यापही पुलाचे ऑडिटचे काम सुरू करण्यात आलेले नाही. कागदपत्रांच्या पूर्तते अभावी हे काम रखडले असून यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. जुना आग्रा रोड हा मुंबई हिंदुस्थान महामार्ग म्हणून ओळखला जात होता. इंग्रजांच्या काळात धुळे गावाच्या बाहेर पांजरा नदीवर हा पूल बांधण्यात आला होता. दगड आणि चुन्याचा वापर करून बांधण्यात आलेल्या या पुलाची लांबी 221 मीटर असून उंची 27.6 फूट आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट अद्यापही सुरू करण्यात आलेले पुढील दोन महिने तरी हा पूल बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असला तरी या ठिकाणी मात्र व्यवसायिकांकडून अतिक्रमण होत असल्याने यावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
खरीप हंगामात नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी केली जात असते ही सोयाबीन काढणीनंतर बाजार समितीत विक्रीसाठी दाखल होत असुन सोयाबीनच्या दरांमध्ये चढउतार होत असल्याने शेतकरी संभ्रमात सापडला आहे. नंदुरबार बाजार समिती मागील आठवड्यात सोयाबीन प्रतिक्विंटल ५ हजार ४७४ रुपयांवर होते. तर या आठवड्यात सोयाबीनची घसरन झाली असून ४ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल सोयाबीनला दर मिळाला आहे. जवळपास ९०० रुपयांनी भावात घसरण झाल्याने शेतकरी सोयाबीन बाजार समितीत आवक कमी झाली आहे. सोयाबीनला जोपर्यंत चांगला दर मिळत नाही तोपर्यंत शेतकरी सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणणार नसल्याच्या चित्र सध्या तरी दिसून येत आहे. जिल्ह्यात २५ हजार ३२६ हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी होत असते मात्र शेतकऱ्यांना मिळणारा भाव मुळे शेतकरी नाराज असल्याने शेतकरी सोयाबीन विक्रीकडे पाठ फिरवला असल्याचे दिसून येत आहे.
वाशिम जिल्ह्यातील होऊ घातलेल्या २८७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हजारो नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर पर्यंत उमेदवारांना आपला नामांकन अर्ज भरण्याची मुदत होती मात्र ऑन लाईन चा वेबसाईट चा खोडा निर्माण झाल्याने पारंपारिक पद्धतीने ऑफलाईन अर्ज दाखल केले या दरम्यान वाशिम जिल्ह्यातील २८७ ग्राम पंचायतीतील ८७२ प्रभागातून २३७२ सदस्य पदासाठी ५४४७ अर्ज दाखल झाले आहेत तर २८७ सरपंच पदासाठी १४३९ अर्ज दाखल झाले आहेत... ५ डिसेंबर पर्यंत अर्ज छाननी केली जाणार आहे तर ७ डिसेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.. यातून किती नामांकन अर्ज अपात्र होतात आणि किती माघार घेणार हे ७ डिसेंबर ला निश्चित होणार आहे.
Thane News: गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असलेला वर्सोवा पूल नागरिकांसाठी २० फेब्रुवारी पर्यंत खुला करण्याचे आश्वासन खासदार राजन विचारे यांनी दिलं आहे. खासदार राजन विचारे यांनी नॅशनल हायवेच्या अधिका-यांना घेवून, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर येथील वर्सोवापुलाची पाहणी केली आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्गाच नागपूर ते शिर्डीच्या रस्त्याच्या कामाचं लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र या महामार्गाच्या पहिला टप्पा क्रमांक 5 चे पुलाचे आणि रस्त्याचे 3 किमीचं काम अपूर्ण आहे. त्यामुळे या पुलाच्या कामविना या रस्त्याचं लोकार्पण कसं होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिर्डीवरून नागपूरकडे जाणाऱ्या एका लेनचं काम अपूर्ण आहे. मात्र नागपूरवरून शिर्डीकडे जाणाऱ्या लेनचं काम पूर्ण झाल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या कामाची पाहणी साठी दौरा करणार आहे.
धुळे जिल्ह्यातील 128 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा अक्षरशः पाऊस पडण्याचे चित्र पाहायला मिळाले जिल्ह्यातील 128 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 446 तर सदस्य पदासाठी तब्बल 2 हजार 322 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच जोर धरू लागली आहे जिल्ह्यातील मुदत संपलेल्या तब्बल 128 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे यात 451 प्रभागातून १ हजार २१२ सदस्यांची आणि 128 सरपंचांची निवड केली जाणार आहे, या निवडणुकीत धुळे तालुक्यातील 33, साक्री तालुक्यातील 55, शिंदखेडा तालुक्यातील 23 तर शिरपूर तालुक्यातील 17 ग्रामपंचायत साठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 28 नोव्हेंबर पासून सुरुवात करण्यात आली मात्र ऑनलाईन अर्ज सादर करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास मंजुरी देण्यात आल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली.
चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातच पोलीस कर्मचारी पत्ते खेळत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. राजुरा पोलीस स्टेशन मधील हा सर्व प्रकार असून युवा स्वाभिमान पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या रोहित बात्ताशंकर या तरुणाने हा व्हिडिओ काढलाय. पोलीस स्टेशन मध्ये काय गैरप्रकार सुरु आहे हे दाखविण्यासाठी हा व्हिडिओ काढल्याचा युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे यांनी दावा केलाय. सोबतच संदीप बुरडकर या पोलिस कर्मचाऱ्याने या तरुणाचा मोबाईल हिसकावल्याचा आणि बेकायदा जप्त केल्याची तक्रार देखील चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांना कऱण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची युवा स्वाभिमान पक्षाने मागणी केली आहे.
मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडिल एका खासगी शाळेत शिकणाऱ्या पंधरा वर्षीय विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थ्याला चाकूने जखमी केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या घटनेचा परिसरातील नागरिकांनी चित्रित केलेला व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे. पोलिसांनी त्या विद्यार्थ्याविरोधात कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवून घेतला आहे.
मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडिल एका खासगी शाळेत शिकणाऱ्या पंधरा वर्षीय विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थ्याला चाकूने जखमी केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या घटनेचा परिसरातील नागरिकांनी चित्रित केलेला व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे. पोलिसांनी त्या विद्यार्थ्याविरोधात कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवून घेतला आहे.
मुंबईतील कुर्ला परिसरात राहणाऱ्या एका महिलेने तिच्यावर तीन जणांनी सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तीन जणांनी तिच्या घरात घुसून बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेने सांगितले की, आरोपींनी तिला घाबरवण्यासाठी चाकूचा धाक दाखवला. महिलेच्या तक्रारीच्या आधारे, कुर्ला पोलिसांनी आयपीसीच्या कलम 376, 376(3), 377, 452, 323, 504 आणि 34 अंतर्गत तीन जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.
किल्ले रायगडावरून उदयनराजे भोसले यांचा 'निर्धार शिवसन्मानाचा' मेळावा
राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी उदयनराजे आक्रमक
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे महापालिका मुख्यालयात विशेष बैठक घेणार आहेत. या बैठकीत त्यात ते शहरातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या हस्ते विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेची बिघडलेली आर्थिक परिस्थिती तसेच आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यातून मोठा पाठींबा मिळाला असून हा जिल्हा त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. पुढील वर्षात महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत कळवा मुंब्रा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे यांचेही आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. ठाण्याचा गड राखण्याचे आव्हान शिंदे यांच्यापुढे असल्यामुळे त्यांनी ठाण्यावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे.
'प्रश्न सीमावर्ती भागातील नागरिकांचे' या कृती समितीकडून देगलूर तालुक्यातील होट्टल ते बिलोली, धर्माबाद, उमरी ,संगम अशी संवाद यात्रा निघणार आहे. महाराष्ट्र तेलंगणा सीमावर्ती भागातील लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी,"प्रश्न सीमावर्ती भागातील नागरिकांचे" या कृती समितीकडून, देगलूर तालुक्यातील चालुक्य कालीन ऐतिहासिक,जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या, होट्टल मधून संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे. ही यात्रा देगलूर होट्टल, बिलोली, उमरी, धर्माबाद ते संगम या सीमावर्ती भागातील नागरिकांशी संवाद साधत ही यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती, प्रश्न सीमावर्ती भागातील नागरिकांचे या कृती समिती कडून देण्यात आली आहे.
ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वार जागेवरच ठार
यवतमाळच्या पुसद शहरातील इटावा वॉर्ड मधील घटना
रस्त्याच्या कामावरील मालवाहू ट्टिप्परने (एमएच 05 डीके 9073) दिली जोरधार धडक
एम एच (30 एवाय 3621) या क्रमांकाच्या दुचाकी दिली धडक
संदीप कृष्णराव खंडार (पुसद) असे मृतक दुचाकी स्वाराचं नाव
मृतक मनोरामार्गे पुसदला येत होता
पक्ष वाढीसाठी भाजप मंत्र्याना दर महिन्याला चार जिल्ह्याचे टार्गेट
पक्ष वाढीसाठी मंत्र्यांनी दर महिन्यात चार जिल्ह्याचा दौरा करण्याचे भाजप मंत्र्यांना आदेश
सरकारी दौर्यासोबतच पक्षवाढीकडे लक्ष द्या
भाजपच्या सर्व मंत्र्यांना सूचना
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे संघटनात्मक बांधणीकडे लक्ष
खासदार उदयनराजे भोसले संपूर्ण महाराष्ट्र दौरा करणार...
'निर्धार शिवसन्मानाचा' ही मोहिम महाराष्ट्रभर राबवणार...
रायगडावरील आजच्या मेळाव्यानंतर मोहिमेला होईल सुरुवात...
देवदर्शनासाठी जाणे एका परिवाराला चांगलेच महागात पडले असून चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याचांदीचे 3 लाख 26 हजार - रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरातील गोवर्धननगरात - उघडकीस आली. तुमसर येथील गोवर्धननगरात विक्की हेमंत जयस्वाल यांचे घर असून बुधवारी कुटुंबासह माडगी येथील नृसिंह मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते. घरात कोणी नाही याच्या फायदा चोरट्यांनी घेत, त्यांनी स्वयंपाकगृहाच्या दरवाजाची सिमेंट काँक्रिटची चौकट काढून घरात प्रवेश करत आलमारीतील सोन्या- चांदीचे दागिने घेऊन पसार झाले. विकी जयस्वाल व त्यांचे कुटुंब सायंकाळी घरी आल्यावर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. जयस्वाल यांनी तात्काळ तुमसर पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी तत्काळ चार पथकाद्वारे तपास सुरु केला आहे. तुमसर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.
परभणी शहरातील देशमुख हॉटेल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर शिकवणी वर्ग तसेच शाळा आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांची मोठी रेलचेल असते अशा या परिसरात अनेक कॉफी शॉप उघडण्यात आलेत ज्या ठिकाणी फक्त कॉफी शॉप च नाव दिलं जातं मात्र आतमध्ये अश्लील चाळ्यांना वाव दिला जातो अशी तक्रार सातत्याने काही नागरिकांकडे येत होती या अनुषंगाने काल स्थानिक नागरिक विश्वजीत बुधवंत,अजिंक्य घोडेस्वार ,प्रशांत शिंदे,विलास टाक आदींनी पोलीस प्रशासनातील भरोसा सेलच्या सहायक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर,करुणा मुंडे सहायक पोलीस निरीक्षक कवाळे यांच्या मदतीने या कॉफी शॉप वर जात हा प्रकार उघडकीस आणला त्यामुळे अशाप्रकारे अश्लीलतेला वाव देणाऱ्या कॉफी शॉप चालकांवर कारवाई करून हे कॉफी शॉप बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
Pune News: बीआरटी रोड मध्ये लक्झरी बस आणि पीएमपीएएल बसची समोरासमोर टक्कर होऊन अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांचे ड्रायव्हर गंभीर जखमी झाले आहेत. तर काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. आज पहाटे 4:30 ला हडपसर परिसरात हा भीषण अपघात झाला. या अपघातामुळे काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती. क्रेनच्या साह्याने गाड्या बीआरटी रोडच्या बाहेर काढल्या आहेत वाहतूक सुरळीत आहे.
भंडारा : उद्धव ठाकरे शिवसेना गट यांची महाप्रबोधन यात्रा आज भंडारा जिल्हात येत असून सुषमा अंधारे यांची जाहीर सभा भंडारा शहारातील गणेश हाईस्कूल येथे दुपारी 4 वाजता होणार आहे. काल गोंदिया येथे झालेल्या सभेत त्यांनी भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे अंधारे आज भंडारा येथे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील उडगी येथे ग्रामस्थांनी फडकवले कर्नाटकचे झेंडे
गळ्यात कर्नाटकचे उपरणे आणखी हातात कर्नाटकचा झेंडा हातात घेऊन कर्नाटकात जाण्याची इच्छा व्यक्त केली
महाराष्ट्र सरकारने 75 वर्षात आम्हाला किमान रस्ते, वीज आणि पाणी देखील पुरवले नाही
मात्र कर्नाटक सरकार आमच्या शेजारील कर्नाटकातील गावांना सर्व सुविधा पुरवते
त्यामुळे सुविधा द्या अन्यथा आम्ही कर्नाटकात सामील होण्याबाबत परवानगी द्या
अक्कलकोट तालुक्यातील उडगी ग्रामस्थांचा इशारा
रत्नागिरी - राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्यात कोकणातला रिफायनरीचा मुद्दा देखील लक्षवेधी ठरत आहे.
कोकणातील रिफायनरी समर्थक आणि विरोधक घेणार राज ठाकरेंची भेट
सकाळी साडेदहा वाजेपर्यंत होणार भेट
भेटीनंतर राज ठाकरे यांची भूमिका ठरू शकते महत्त्वाची
मागच्या काही दिवसांपासून कोकणातल्या रिफायनरचा मुद्दा गाजतोय
घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एका रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याची घटना ताजी असताना घाटकोपरच्या संत मुक्ताबाई रुग्णालयात भटके कुत्रे सर्रास फिरत असल्याचे चित्र समोर येत आहे. घाटकोपरच्या बर्वेनगर विभागात पालिकेचे हे रुग्णालय आहे. यातील पाचव्या मजल्यावर रुग्णांच्या विभागात कुत्रे बिनधास्त फिरताना दिसत आहेत. यामुळे रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे. तर पालिकेच्या रुग्णालयाची स्वच्छता आणि सुरक्षितता यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
जालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 4 तारखेला समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत. 11 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उदघाटन होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार आहेत.
जालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 4 तारखेला समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत. 11 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उदघाटन होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार आहेत.
एसटी महामंडळाच्या शहराच्या मध्यवस्तीत जागा आहेत. त्या जागांवर पोलीस वसाहती बांधण्याचा विचार आहे. एसटीसाठी जागा शिल्लक ठेवून उर्वरित जागेवर पोलीस वसाहती बांधाव्यात असे मुख्य सचिवांच्या बैठकीत ठरलं आहे. तसा उल्लेख बांधकाम विभागाच्या उपमहाव्यवस्थापक काढलेल्या पत्रात आहे. 13 सप्टेंबर 2022 महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकी झाली. बैठकीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जिल्हा मुख्यालयात, इतर शहरातील उपलब्ध जागेत पोलीस वसाहती उभारण्याच्या जागेची यादी तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे. एस.टी. महामंडळाच्या कामांसाठी आणि भविष्यातील वाहतुकीची निकड लक्षात घेऊन राखीव जागा ठेवून उर्वरित मोकळी जागा पोलीस वसाहती बांधण्यासाठी कशी उपलब्ध करून देता येईल, याची माहिती मागवण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात होणारे 123 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायत च्या सरपंच पदासाठी 465 इच्छुक उमेदवार अर्ज दाखल केला आहे. सदस्य पदासाठी तीन हजार 362 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पाच तारखेला अर्ज छाननी होईल आणि सात तारखेला तीन वाजेपर्यंत मुदत असल्याने अनेक इच्छुक उमेदवार आपल्या प्रतिस्पर्धी असलेल्या आपल्या गटातील उमेदवारांच्या मनधरणी करताना दिसून येत आहेत सात तारखेनंतर नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या लढतीचे चित्र स्पष्ट होईल मात्र जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाच्या भूमिका बजावणाऱ्या मोठ्या गावांच्या निवडणुका असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिष्ठा प्राणाला लागल्यात. कडाकाच्या थंडीत ग्रामीण भागात भागात राजकीय वातावरण गरम झाले असून, संवेदनशील भागात पोलिसांच्या वतीने विशेष बंदोबस्त ठेवण्यात येत आहे एकूणच जिल्ह्यातील राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या या निवडणुकीत लढती सात तारखेपर्यंत स्पष्ट होतील.
पंढरपूर : सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते कल्याण काळे यांना सीताराम साखर कारखान्यासाठी गोळा केलेले सभासदांचे भाग भांडवल व्याजासह परत देण्याचे आदेश सेबीने दिल्याने खळबळ उडाली आहे. कल्याण काळे यांनी पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील सीताराम साखर कारखान्याच्या शेअर्स पोटी 17 कोटी रुपयांची रक्कम गोळा करून नंतर हा खाजगी कारखाना विकला होता . यात सभासदांकडून गोळा केलेले रक्कम व्याजासह परत करण्याबाबत दीपक पवार यांनी सेबी कडे तक्रार केली होती. त्यानुसार सीताराम साखर कारखान्याच्या संचालक मंडळा ने व्याजासह एकूण 41 कोटी रुपयांची रक्कम जवळपास 5 हजार सभासदांना 5 जानेवारी पूर्वी परत देण्याचे सेबीचे आदेश दिले आहेत.
मुंबईत पंधरा दिवसांच्या कालावधीसाठी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. ही जमावबंदी 3 डिसेंबर ते 17 डिसेंबर रोजी रात्रीपर्यंत लागू असेल. पोलीस सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार काही कारणाने कायदा आणि सूव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे हा जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. जमावबंदी असेल मात्र संचारबंदी नसेल.
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. रिफायनरी विरोधक आणि समर्थक राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता आहे. सकाळी 11 वाजता राज ठाकरेंच्या हस्ते राजापूर येथे पक्ष कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर राजापूर विधानसभा पदाधिकाऱ्यांची बैठक आणि 200 महिलांचा पक्षप्रवेश होणार आहे. गटबाजी आणि कार्यकर्त्यांमधील समन्वयाचा अभाव पाहता राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्याचा घेतला निर्णय. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या राज ठाकरे यांच्या निर्णयाकडे असणार लक्ष.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर उदयनराजे आक्रमक झाले आहेत. त्या पार्श्वभूवर उदयनराजेंनी शिवसन्मानाचा निर्धार केला. आज ते रायगडावर येणार आहेत. शिरकाई, जगदिश्वर मंदिराला अभिवादन केल्यानंतर उदयनराजे शिवभक्तांना संबोधित करणार आहेत. उदयनराजे आज नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
पार्श्वभूमी
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.
उदयनराजे आज रायगडावर, काय भूमिका घेणार?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर उदयनराजे आक्रमक झाले आहेत. त्या पार्श्वभूवर उदयनराजेंनी शिवसन्मानाचा निर्धार केला. आज ते रायगडावर येणार आहेत. शिरकाई, जगदिश्वर मंदिराला अभिवादन केल्यानंतर उदयनराजे शिवभक्तांना संबोधित करणार आहेत. उदयनराजे आज नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी..महापुरुषांच्या सन्मानासाठी रोहित पवार करणार आत्मक्लेश-
वढू- बुद्रुक येथे संबाजी महाराजांच्या समाधीस्थळी रोहित पवार आज आत्मक्लेश करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वारंवार आक्षेपार्ह विधानं केली जात असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जाणार आहे.
राज ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर -
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. रिफायनरी विरोधक आणि समर्थक राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता आहे. सकाळी 11 वाजता राज ठाकरेंच्या हस्ते राजापूर येथे पक्ष कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर राजापूर विधानसभा पदाधिकाऱ्यांची बैठक आणि 200 महिलांचा पक्षप्रवेश होणार आहे. गटबाजी आणि कार्यकर्त्यांमधील समन्वयाचा अभाव पाहता राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्याचा घेतला निर्णय. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या राज ठाकरे यांच्या निर्णयाकडे असणार लक्ष.
सिनेट निवडणुकीत उडणार धुरळा !!
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पहिल्या ठाकरे गट सिनेटच्या निवडणूकीच्या तयारीला लागलं आहे. या निवडणुकीत आदित्य ठाकरेंनी गतवर्षी 10 पैकी 10 जागा जिंकल्या होत्या. यंदादेखील निवडणूक जिंकण्यासाठी ठाकरेंनी तयारी केली आहे. पण या निवडणुकीत आदित्य ठाकरेंची शिंदे गट, मनसे आणि भाजपशी टक्कर असणार आहे. जानेवारीत ही निवडणूक जाहीर होईल.
अजित पवार यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता -
मुंबई- महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पवारांसह एकूण 75 जणांना दोन वर्षांपूर्वी 'क्लीन चीट' देण्यात आली होती. मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी दाखल केलेला सी-समरी रिपोर्ट आधी रद्द करा, मगच नव्यानं तपास सुरू करा अशी मागणी याप्रकरणातील तक्रारदारांनी कोर्टाकडे केली आहे. तक्रारदार माणिकराव जाधव यांच्यावतीनं तसा रितसर अर्जच कोर्टात सादर करण्यात आला असून शालिनीताई पाटील, जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावतीनंही आज कोर्टात तसे अर्ज करण्यात येणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -