Maharashtra News Updates 22 November 2022 : शिंदे सरकार नव्याने प्रभाग रचना तयार करणार, नगर विकास विभागाचे आदेश
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
नव्या निर्णयानुसार प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता लवकरच महानगरपालिकेच्या निडवणुका होण्याची शक्यता आहे.
महाडमधील ढालकाठी येथे भात गिरणीला भीषण आग लागली आहे. वीज पुरवठा करणाऱ्या ट्रॉन्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्कीट होऊन ही आग लागली आहे. महाड येथील मुक्ताई राईस मिलला ही आग लागली आहे. राईस मिलमधील भात, कोंडा आणि इलेक्ट्रीक साहित्य जळूळ खाक झाले आहे.
Nashik News Update : नाशिकमधील त्रंबकेश्वर रोडवरील आधार तीर्थ आश्रमातील चार वर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू झालाय. साडीने गळफास घेतलेल्या अवशस्थेत या मुलाचा मृतदेह आढळला आहे. या आश्रमात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलांचे संगोपन होते. बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून घटनेचा पंचनामा सुरू आहे.
Pune News Update : पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात झाला आहे. भरधाव वेगात असणारा कंटेनर रस्त्याच्या मधील दुभाजकाला धडकला. या धडकेत दोन चार चाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. हा ट्रक कात्रजच्या दिशेने मुंबईकडे जात होता. रविवारी झालेल्या भीषण अपघातनंतर आज पुन्हा त्याच ठिकाणी हा अपघात झाला आहे.
बैलगाडा शर्यतींबाबत उद्या सुप्रीम कोर्टात घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडूतील प्रकरणं एकत्रित ऐकली जाणार आहेत. डिसेंबर 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने ग्रामीण महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला होता. आता घटनापीठ याबाबत अंतिम निर्णय काय देणार याची उत्सुकता असेल.
पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी भारत सज्ज आहे, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.
नंदुरबार शहर पोलिसांनी मोटर सायकल चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. हे चोरटे नंदुरबारमधून मोटर सायकल चोरी करून गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये विकत होते. पोलिसांनी यांच्याकडून अकरा मोटरसायकली जप्त केल्या आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चीड आणणारे आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध करत नांदेड जिल्हा कांग्रेसकडून आंदोलन करण्यात आला. कोश्यारी यांच्या फोटोला जोडे मारत राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोश्यारी यांचा पुतळा जाळत निषेध केला.
उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या मालमत्तेविरोधातील याचिकेवरील सुनावणीस हायकोर्टाचा नकार,
मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय अहूजा यांच्या खडंपीठाचा सुनावणीस नकार,
गौरी भिडे आणि त्यांच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका दुसऱ्या खंडपीठापुढे नेण्याचे निर्देश.
Mumbai News : उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेविरोधातील याचिकेवरील सुनावणीस हायकोर्टाचा नकार
मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय अहूजा यांच्या खडंपीठाचा सुनावणीस नकार
गौरी भिडे आणि त्यांच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका दुसऱ्या खंडपीठापुढे नेण्याचे निर्देश
Maharashtra News : आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये राजकीय उलथापालथ. चिपळूणमधील 10 नगरसेवक शिंदे गटांच्या संपर्कात असून या नगरसेवकांनी रामदास भाईंचे खंदे समर्थक चिपळूणचे नासिर खोत यांच्या सोबत आमदार योगेश कदामांच्या माध्यमातून घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. यावेळी भेटी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिले भरघोस निधीचे आश्वासन.
Beed News : मागील पाच दिवसापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर जवळपास दहा टक्क्यांनी कमी झाल्याने स्थानिक बाजारात कापसाचे दर क्विंटल मागे दोनशे ते तीनशे रुपयांनी खाली आले आहेत. 9 हजार 500 रुपये क्विंटल कापसाला भाव मिळत होता, मात्र आता आठ हजार सहाशे चाळीस रुपये दराने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाची खरेदी केली जात आहे. एकीकडे कापसाचे दर कमी झाले असले तरी मागील हंगामातील कापूस शिल्लक नसल्याने यावर्षी कापसाचे उत्पन्न कमी प्रमाणात होणार असल्याने कापसाला काही दिवसात स्थिर भाव मिळतील असं जाणकार सांगत आहेत..
शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना राज्य सरकार वाचवतंय; संजय राऊत यांचे टीकास्त्र
Maharashtra Cold Wave : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा घसरल्याचा पाहायला जात आहे. महाराष्ट्रात थंडीची लाटेचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील विविध ठिकाणी पारा खालावल्याचं दिसतं. आज सकाळी सात वाजेपर्यंत नोंदवलेल्या किमान तापमानावर एक नजर टाकूया.
सकाळी 7 पर्यंतची आकडेवारी : (किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये)
मुंबई - 18
महाबळेश्वर - 14
कर्जत - 14.7
लोणावळा - 19.4
तळेगाव - 11.9
जुन्नर - 12.9
पुणे (पाषाण) - 10.5
औरंगाबाद - 11
कोपरगाव - 12.2
अहमदनगर - 13
राहुरी - 13
नंदुरबार - 12.5
बुलढाणा - 10.5
वाशिम - 11.2
नागपूर - 13.9
भंडारा (साकोली) - 12.2
चंद्रपूर - 13.1
सोलापूर - 18.4
उस्मानाबाद - 19.2
Pune News : पुरंदर तालुक्यातील 80 वर्षीय महिलेवर आपल्या वडिलोपार्जित जमिनीसाठी उपोषण करायची वेळ आली आहे. विशेष म्हणजे काहीजण आपल्याला दमदाटी आणि जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा गंभीर आरोप या महिलेने केला आहे. जेजुरी इथल्या पद्मा मोरेश्वर देशमुख आणि त्यांची भाची श्रद्धा कुलकर्णी या सासवड इथल्या तहसील कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या संपूर्ण प्रकरणात जेजुरी पोलीस आणि पोलीस स्टेशनचे अधिकारी त्यांना त्रास देत असल्याचे त्या म्हणत आहेत. त्यांच्या भावाचा मुलगा आणि इतर काही लोक त्यांना त्यांच्या वाहीवाटीच्या जागेतून बेदखल करत असून पोलीसही संबंधित लोकांना मदत करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यामध्ये जेजुरीमधील भाजप नेत्याचा समावेश असल्याचा त्यांचा आरोप आहे.
Aurangabad News: भाजपचे (BJP) राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी दोन दिवसापूर्वी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यभरात त्यांच्या विरोधात मोठा संताप पाहायला मिळत आहे. दरम्यान औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात आज सुधांशू त्रिवेदी यांचा निषेध म्हणून बंदची हाक देण्यात आली आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी या बंदची हाक दिली आहे. विशेष म्हणजे याबाबत जाधव यांनी एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.
Girish Mahajan on Eknath Khadse : मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील वैर हे सर्वश्रूत आहेच. अशातच गिरीश महाजनांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना डिवचलं आहे. एकनाथ खडसेंना त्यांच्या मुलाच्या मृत्यूची आठवण करून देत महाजनांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. एकनाथ खडसेंच्या मुलाचा खून झाला होता की, आत्महत्या? असा प्रश्न महाजनांनी उपस्थित केला आहे. महाजन यांच्या आरोपानंतर एकनाथ खडसेंनी देखील उत्तर दिलं आहे. महाजन यांच्या आरोपांमुळे कुटुंबाच्या भावना दुखावल्याचंही एकनाथ खडसे यांनी म्हंटलं आहे. शिवाय खालच्या पातळीवरचं राजकारण केलं जात असल्याचा आरोपही खडसेंनी महाजनांवर केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गुजरात दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना लढत असलेल्या मणीनगर मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांची सभा
देवेंद्र फडणवीस यांच्या गुजरातमध्ये एकूण चार सभा होणार आहेत
देवेंद्र फडणवीस यांची गुजरात निवडणुकीसाठी स्टार प्रचार म्हणून निवड झाल्यानंतर हा त्यांचा दुसरा दौरा
महाराष्ट्रातील किमान तापमान अंश सोल्सिअसमध्ये
मुंबईत - १८
महाबळेश्वर - १४
कर्जत - १४.७
लोणावळा - १९.४
तळेगाव - ११.९
जुन्नर - १२.९
पुणे (पाषाण) - १०.५
औरंगाबाद - ११
कोपरगाव - १२.२
अहमदनगर - १३
राहुरी - १३
नंदुरबार - १२.५
बुलढाणा - १०.५
वाशिम - ११.२
नागपूर - १३.९
भंडारा (साकोली) - १२.२
चंद्रपूर - १३.१
सोलापूर - १८.४
उस्मानाबाद - १९.२
FIFA WC 2022 Qatar: फिफा विश्वचषक 2022 (FIFA WC 2022) मध्ये नेदरलँडच्या फुटबॉल संघानं (Netherland) आपला पहिला सामाना जिंकत पॉईंट टेबलमध्ये 3 गुणांची आघाडी घेतली आहे. अत्यंत चुरशीच्या सामन्यात नेदरलँड्सनं सेनेगलविरुद्ध (Senegal) 2-0 असा विजय मिळवला आहे. सामन्याची पहिली 85 मिनिटं दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही, मात्र त्यानंतर नेदरलँड्सनं गोल डागत तीन पॉईंट्स आपल्या नावे केले. हा सामना जिंकणं तसं नेदरलँड्ससाठी तसं सोपं नव्हतं, सेनेगलच्या फुटबॉल संघानं त्यांना कडवी झुंज दिली. या सामन्यात नेदरलँड्सला खूप संघर्ष करावा लागला, पण अखेर सेनेगलविरोधात दोन गोल डागत नेदरलँड्सनं विजयाला गवसणी घातलीच.
PM Modi in Rojgar Mela : आज केंद्र सरकारतर्फे दुसऱ्या रोजगार मेळाव्याचे (Rojgar Mela) आयोजन करण्यात येणार आहे. या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) मंगळवारी आज 71 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे देणार आहेत. पीएमओने ही माहिती दिली. यावेळी पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तरुणांना संबोधित करणार असल्याचे पीएमओने सांगितले. याआधीही पंतप्रधानांनी 75 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे दिली होती.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Gadchiroli Crime : कार्यालयीन महिला कर्मचारीचा विनयभंग, जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा अधिकाऱ्यास अटक
कार्यालयीन महिला कर्मचारीचा विनयभंग (Woman Molestation) केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या (Gadchiroli Zilla Prishad) मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्याला गडचिरोली पोलिसांनी सोमवारी अटक केली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Crime News)
पीडित महिलेची गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार
ओंकार रामचंद्र अंबपकर (रा. गुलमोहर कॉलनी, गडचिरोली) असे आरोपी लेखा व वित्त अधिकाऱ्याचे नाव आहे. पीडित महिला ही गडचिरोली जिल्हा परिषदेच्या लेखा विभागात वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. लेखा व वित्त अधिकारी अंबपकर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने पीडित महिलेला आपल्या केबिनमध्ये बोलवून विनयभंग करायचे. 16 ते 20 नोव्हेंबर यादरम्यान कामाच्या बहाण्याने आपल्या केबिनमध्ये चार वेळा बोलून सतत विनयभंग केला, अशी तक्रार पीडित महिलेने गडचिरोली पोलीस ठाण्यात दिली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून लपून बसलेल्या अधिकारी अंबपकर याला मोठ्या शिताफीने अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती गडचिरोलीचे ठाणेदार अरविंद कतलाम यांनी दिली आहे.
पंतप्रधान मोदी रोजगार मेळाव्याला ऑनलाईन संबोधित करणार
पंतप्रधान मोदी ऑनलाईन पद्धतीनं 71 हजार नियुक्तीपत्रे देणार आहेत. देशात 45 ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील तळेगाव येथे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रोजगार मेळावा होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोंदी ऑनलाईन सहभागी होणार आहेत.
बारसू रिफायनरी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
बारसू रिफायनरी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होणार आहे. कोकणातील या रिफायनरच्या मुद्द्यावरून आता ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आलेत. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना पत्र लिहिलं आहे. 'आधी स्थानिकांशी चर्चा करावी, आम्ही स्थानिकांसोबत' असं या पत्रात लिहिलेलं आहे. विनायक राऊत या बैठकीला हजर राहणार नाही असंही त्यांनी या पत्रात म्हटलंय.
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप करत हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप करत हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. गौरी भिडे आणि त्यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
अनिल देशमुखांचा मुलगा सलील देशमुख यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात सुनावणी होणार आहे. देशमुखांशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सलील देशमुखही सहआरोपी आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -