Maharashtra News Updates 19 December 2022 :  आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीला होणाऱ्या विरोधाची महिला आयोगाकडून दखल, अभ्यासानंतर सरकारला अहवाल देणार

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Dec 2022 10:48 PM
विक्रोळीमध्ये एनजीओत 17 जणांना विषबाधा

विक्रोळी कन्नमवार नगरमध्ये मैना फाउंडेशन नावाच्या संस्थेत आज दुपारी जेवणातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे.13 मुली आणि 4 पुरुषांना ही विषबाधा झाली आहे. या सर्वांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महिलांच्या आरोग्य आणि रोजगारवर काम करणारी ही फाउंडेशन असून विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आहे.

"फिरते पथक" प्रकल्प आता महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणार

रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची काळजी म्हणून व संरक्षणासाठी "फिरते पथक" प्रकल्प आता महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणार आहे


रस्त्यावरील बालकांना शिक्षणाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा प्रकल्प सरकारकडून राबविण्यात येणार आहे


प्रकल्प सध्या मुंबई शहर , मुंबई उपनगर , ठाणे,पुणे, नाशिक आणि नागपूर या सहा जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपूरच्या रस्त्यांवर गॅंगवॉर?? अवैध दारूच्या वादातून दोघांची हत्या

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण राज्य सरकार नागपुरात आहे... अधिवेशन सुरक्षित दृष्ट्या पार पडावा यासाठी हजारो पोलिसांची तैनाती नागपूरच्या विविध रस्त्यांवर करण्यात आली आहे... असे असतानाही गुंडांना मात्र पोलिसांची थोडी ही भीती नाही... कारण आज नागपूरच्या रस्त्यांवर गुंडांमध्ये गँगवॉर झाल्याचे दिसून आले.. अवैध दारूच्या वादातून नागपूर अमरावती महामार्गावर वडधामना येथे दोघांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली.. योगेश मेश्राम आणि महेश गजभिये असे मृतकांचे नाव असून दोघेही दारूचा अवैध व्यवसाय करायचे.. दारूच्या अवैध व्यवसायात स्पर्धक टोळीच्या अब्बास नावाच्या गुंडाने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आज सकाळी योगेश आणि महेशला अमरावती महामार्गावर गाठले... त्यांच्या दुचाकीला कारने धडक दिली... जेव्हा दोघेही जखमी अवस्थेत रस्त्यावर कोसळले... तेव्हा अब्बास टोळीच्या गुंडांनी तीक्ष्ण हत्याराने वार करत योगेश आणि महेश ची हत्या केली... विशेष म्हणजे जेव्हा ही हत्या झाली तेव्हाही योगेश आणि महेश  काळया रंगाच्या एका बॅगमध्ये अवैधरित्या दारू नागपुरात घेऊन येत होते... हत्ये नंतर सर्व आरोपी तिथून पसार झाले... अद्याप पर्यंत कोणालाही अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही... दोन्ही मृतक तसेच अब्बास टोळीविरोधात अवैध दारू संदर्भातले अनेक गुन्हे दाखल असून अवैध दारूच्या व्यवसायातील स्पर्धेतूनच हे दुहेरी हत्याकांड झाले आहे असा संशय व्यक्त केला जात आहे...

दिलेला शब्द पाळतो म्हणून माझ्यावर विश्वास दाखवला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दिलेला शब्द पाळतो म्हणून माझ्यावर विश्वास दाखवला व सत्तातंर झाले, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेय. 


 एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला काम करायची संधी मिळाली. मी स्वतःला भाग्यवान समजतो. या वाटचालीत मला मराठा समाजाचे साथ प्रेम लाभले आहे. अनेक प्रसंग आले परंतु मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला, असे मुख्यमंत्री म्हणाले.  


अनंत अडचणीवर मात करत इथवर पोहचलोय. कुठेही काही संकट आली आपदा आली कोविड महापूर असो ज्याला ज्याला आवश्यकता भासली त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला मला अभिमान न समाधान आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीला होणाऱ्या विरोधाची महिला आयोगाकडून दखल, अभ्यासानंतर सरकारला अहवाल देणार

आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीला होणाऱ्या विरोधाची महिला आयोगाने दखल घेतली आहे. अनेक समाज सेविकांनी आणि सामाजिक संस्थांनी ही समिती बरखास्त करण्याची महिला आयोगाकडे मागणी केली आहे. शासनाने केलेली समिती घटनेने दिलेल्या अधिकारांचे उल्लंघन करत असल्याचं मत या संस्थांचं आहे. सरकार अधिकारांचा गैरवापर करतं असल्यामुळे महिला आयोगाने याची दखल घेण्याची मागमई समाजसेवी संस्थांनी केलीय. समाजसेवी संस्था आणि जेष्ठ समाजसेविकांनी केलेल्या मागणीनुसार आयोग अभ्यास करून लवकरच अहवाल सरकारला देणार असल्याची माहिती आयोगाचा अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.  

सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी : देवेंद्र फडणवीस 

महाराष्ट्रातील लकवा असणारे सरकार गेले आहे. अडीच वर्ष महाराष्ट्रात कोणताही मोठा निर्णय घेण्यात आला नाही. परंतु, आताच्या सरकारने शेतकरी नुकसानग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत केली. शेतकऱ्यांना मदत करणारं सरकार आपल्या पाठीशी उभं आहे. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापायचं नाही असा निर्णय घेण्यात आलाय. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. आपली गती गाठता येत नाही, त्यामुळे विरोधक लहान गोष्टी मोठ्या करत आहेत. महापुरुष आमच्यासाठी काल, आज आणि उद्याही आदर्श आहेत. पण काही शब्द पकडून चुकीचं ठरवलं जातंय.  ज्यांनी शिवाजी महाराज यांच्या वांशजांचे पुरावे मागितले ते आता बोलत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी विरोधकांवर केलीय. 

Mumbai News : दु:खद घटना! तीन वर्षांच्या मुलाचा पाचव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू

Mumbai News : 18 डिसेंबर रोजी गरवारे क्लब हाऊस येथे सहाव्या मजल्याच्या गच्चीवर गरवारे क्लबच्या सदस्यांकरता वर्ल्ड कप फुटबॉल बघण्यासाठीचे आयोजन करण्यात आले होते. सदर वेळी क्लबचे अविनाश राठोड हे त्यांचे पत्नी आणि मुलासह तेथे आले होते. त्यांचा मुलगा हृद्यांश वय 3 वर्ष हा 22:46 वा. च्या सुमारास दुसऱ्या एका मुलासह सहाव्या मजल्यावरून पाचव्या मजल्यावर बाथरूमकरिता गेला होता. तो पाचव्या मजल्यावरून वर येत असताना खाली पडला. त्यामुळे त्याला तात्काळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सदर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना 2 वाजता डॉक्टरांनी त्या मुलास मयत घोषित केले. सदरचा संदेश प्राप्त झाल्याने रुग्णालयात जाऊन त्याचे वडील नामे अवनिश राठोड यांचा जबाब नोंद करून, दोन पांचांसमक्ष इंक्वेस्ट पंचनामा करण्यात आला. सदर मुलाचा मृतदेह पोस्ट मोर्टमकरिता पाठविण्यात आला. त्यानंतर कॉज ऑफ डेथ प्राप्त झाल्याने मृतदेह अंत्यविधीसाठी पालकांच्या ताब्यात देण्यात आला. सदर प्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद कलम 174 अन्वये नोंद घेण्यात आली.

उद्धव ठाकरे नागपुरात दाखल, कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत

राज्यातील हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे हे नागपुरात दाखल झाले आहे. यावेळी विमानतळाबाहेर ठाकरे गटाच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, कल्याणमध्ये रूग्णालयाची तोडफोड  

कल्याण पश्चिम बिर्ला कॉलेज रोड वरील साई संजिवनी हॉस्पिटल मध्ये तोड फोड करण्यात आलीय. विष प्राशन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने नातेवाईक आक्रमक झाले आहेत. गंगा शिंदे असे मयत महिलेचे नाव आहे. उपचारासाठी गुरुवारी त्यांना रूग्णालयात दाखल केले होते. परंतु, आज त्यांचा मृत्यू झाला. उपचारात हलगर्जीपणा केल्याचा कुटुंबीयांनी आरोप केला. याच रागातून संतप्त मयत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोड फोड केली. यावेळी नातेवाईकांनी डॉकटर आणि नर्स मारहाण केल्याचा आरोप रूग्णालय प्रशासनाकडून करण्यात आलाय. पोलिस घटना स्थळी दाखल झाले असून चौकशी करू कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.   

Dadar: दादर टिटी पुलावर टेम्पो उलटला

दादर टिटी पुलावर एक टेम्पो उलटल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गावर  मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. नवी मुंबई वरून क्रॉफर्ड मार्केटच्या दिशेने कुरियरच्या बॅग घेऊन हा टेम्पो निघाला होता. दादर टिटी पुलावर या टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा टेम्पो उलटला.

दादरच्या टिटी पुलावर टेम्पो उलटला, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

दादर येथील टिटी पुलावर कुरियरचे साहित्य घेऊन जाणाला टेम्पो उलटला आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झालीय. क्रेनच्या सहाय्यने टेम्पो काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

कुर्ल्यातील त्या तिघी बहिणी निघाल्या चोर, मुंबईतील अनेक पोलिस ठाण्यात डझनभर गुन्हे दाखल

मुंबईतील कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या गुन्ह्याची उकल करताना गुन्हे शाखा युनिट-12 ने कुर्ला परिसरातून तीन सख्ख्या बहिणींना अटक केली आहे. ज्यांच्यावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात चोरीचे डझनभर गुन्हे दाखल आहेत. या तिन्ही बहिणी अतिशय हुशार असल्याचं म्हटलं जातं. ते दिवसाढवळ्या निर्जन वसाहतीत घुसून चोरी करून पळून जात असता.गुन्हे शाखेने त्यांच्याकडून चोरीच्या 4 सोन्याच्या अंगठ्या, 4 मोबाईल फोन आणि 24 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. सुजाता शंकर सकट (35), सारिका शंकर सकट (30) आणि मिना उमेश इंगळे (28) अशी अटक केलेल्या तीन बहिणींची नावे आहेत.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी चांगला निर्णय घेतला - अण्णा हजारे

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हा चांगला निर्णय घेतला त्याबद्दल तुमचं अभिनंदन तुम्ही आता कायदा करत आहे याचं महत्त्व तुम्हाला आज पटणार नाही कायदा झाल्यानंतर लोक जेव्हा त्याची अंमलबजावणी करतील तेंव्हा तुमच्या लक्षात येईल की हा कायदा किती क्रांतिकारक आहे... माहितीचा अधिकार कायदा केला तेव्हा लोकांनी मला वेड्यात काढलं होतं आज मात्र त्या कायद्याचा फायदा नागरिकांना होत आहे असे मत ज्येष्ठ समाजसेवकांना अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं...लोकायुक्त कायद्याला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाल्यानंतर हे बिल संसदेत मांडले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिल्यानंतर अण्णांनी माध्यमांशी संवाद साधला.भारताचे महाराष्ट्राचे परंपरा समाजासाठी राज्यासाठी देशाचे देशासाठी काही चांगलं काम करायचं असेल तर तप करावा लागते.  ती महाराष्ट्राची परंपरा आहे  आणि म्हणून आज बरोबर बारा वर्षे झाले आंदोलनाला त्याचा फायदा  देशातील नागरिकांना होईल...असंही अण्णा म्हणाले फडणवीस सरकारच्या काळात लोकायुक्त बाबत आम्ही मागणी केली पुढे हे सरकार गेलं त्यानंतर  ठाकरे सरकारच्या काळातही हा कायदा आला नाही मात्र आता पुन्हा शिंदे फडणवीस सरकारच्या काळात हा कायदा येत असल्याने समाधान वाटत असल्याचे अण्णांनी म्हटले.

महामेळाव्याला परवानगी नाकारून पोलिसांनी लोकशाहीची पायमल्ली केली

पोलिसांनी बेळगावातील महाराष्ट्र  एकीकरण समितीतर्फे आयोजित महामेळाव्याला परवानगी नाकारून नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांना अटक केली. महामेळाव्याला येण्यासाठी आलेल्या मराठी भाषिकांना परत पाठवण्यात आले.त्यामुळे अनेक ठिकाणी महामेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या मराठी भाषिकांनी एकत्र जमून पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध केला.ग्रामीण भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी टिळकवाडी येथील मंडोळी क्रॉस येथे जमून पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध केला.खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांनी खानापुरला परत जाऊन पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध केला. महामेळाव्याला परवानगी नाकारून पोलिसांनी लोकशाहीची पायमल्ली केली आहे असे मत मराठी भाषिकांनी व्यक्त केले.

Solapur News: सोलापुरात आज शेतकऱ्यांचा विरट मोर्चा, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना बचाव आणि बोरामणी विमानतळ सुरु करा या मागणीसाठी हा मोर्चा

Solapur News: सोलापुरात आज शेतकऱ्यांचा विरट मोर्चा निघाला. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना बचाव आणि बोरामणी विमानतळ सुरु करा, या मागणीसाठी हा मोर्चा निघाला. सिद्धेश्वर कारखाना बचाव कृती समितीतर्फे आयोजित या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. 

Pandharpur News: राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करून चंद्रकांत पाटील, राम कदम यांच्यावर अट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल; पंढरपूरमध्ये निघाला सर्व पक्षीय मोर्चा

Pandharpur News: महापुरुषांच्या अपमानाचा विरोधात आज सकाळी अकरा वाजता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सर्व पक्षीय मोर्चाला सुरुवात झाली. या मोरच्यात भाजप सरकार आणि मंत्री आमदारांच्या निषेधाचे फलक घेऊन शेकडो कार्यकर्ते सामील झाले होते . आम्ही भारतीय असे फाकल घेऊन या नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, संभाजी ब्रिगेडसह सर्व आंबेडकरवादी संघटना सामील झाला आहेत. या मोर्चा च्या पार्श्वभूमीवर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. 

राज्यातील दहा वारकरी संघटना उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार, सुषमा अंधारे यांच्या साधु-संतांवरील कथित वादग्रस्त वक्तव्याच्या मुद्द्यावर भेट घेणार

राज्यातील दहा वारकरी संघटना उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या साधु-संतांवरील कथित वादग्रस्त वक्तव्याच्या मुद्द्यावर वारकरी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट. उद्या दुपारी 4 वाजता विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात होणार भेट. भेटीसाठी शिंदे गटाची अध्यात्मिक आघाडी असलेल्या 'धर्मवीर अध्यात्मिक सेने'चा पुढाकार. वारकरी संघटना महापुरूषांबद्दल होत असलेल्या अवमानकारक वक्तव्यांचाही मुद्दा मांडणार. चार दिवसांपासून उद्धव ठाकरेंना भेटीची वेळ मागितल्यावरही ठाकरेंनी भेटीची वेळ दिली नसल्याची विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष गणेश महाराज शेटेंचा आरोप.

राज्यातील दहा वारकरी संघटना उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार, सुषमा अंधारे यांच्या साधु-संतांवरील कथित वादग्रस्त वक्तव्याच्या मुद्द्यावर भेट घेणार

राज्यातील दहा वारकरी संघटना उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या साधु-संतांवरील कथित वादग्रस्त वक्तव्याच्या मुद्द्यावर वारकरी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट. उद्या दुपारी 4 वाजता विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात होणार भेट. भेटीसाठी शिंदे गटाची अध्यात्मिक आघाडी असलेल्या 'धर्मवीर अध्यात्मिक सेने'चा पुढाकार. वारकरी संघटना महापुरूषांबद्दल होत असलेल्या अवमानकारक वक्तव्यांचाही मुद्दा मांडणार. चार दिवसांपासून उद्धव ठाकरेंना भेटीची वेळ मागितल्यावरही ठाकरेंनी भेटीची वेळ दिली नसल्याची विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष गणेश महाराज शेटेंचा आरोप.

तिकीट विचारलं म्हणून टीसीवर ब्लेडने वार करीत प्राणघातक हल्ला; आंबिवली रेल्वे स्थानकावरील धककदायक घटना

Kalyan Crime News: कल्याणजवळ असलेल्या आंबिवली स्थानकात तिकीट तपासत असताना टीसीवर प्रवाशाने ब्लेडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय.सुनील कुमार गुप्ता असं जखमी झालेल्या टीसीचे नाव आहे.  सकाळी नऊच्या सुमारास आंबिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर दोनवर तर तिकीट तपासत होते.यावेळी एका प्रवाशाला त्यांनी तिकीट दाखवायला सांगितले. या प्रवाशाने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला याच दरम्यान टीसीने या प्रवाशाला पकडण्याचा प्रयत्न केला याचवेळी प्रवाशाने खिशातले ब्लेड काढत त्यांच्या मानेवर वार करीत प्राण घातक हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या गुप्ता यांना तात्काळ रेल्वेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने या हल्ल्यत सुनील गुप्ता यांचा जीव बचावला असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सरकार सीमावासियांच्या पाठिशी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात स्पष्ट केली भूमिका

CM Eknath Shinde: सीमा प्रश्नाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात सरकारची भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकारने पहिल्यांदात या प्रकरणात पहिल्यांदा हस्तक्षेप करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. केंद्रीय गृहमंत्री यांनी केंद्र सरकारची भूमिका माध्यमांसमोर मांडली आहे. याचे तुम्ही स्वागत करायला हवे असेही त्यांनी म्हटले. मागील अडीच वर्षात आधीच्या सरकारने निधी आणि योजना बंद केल्या होत्या त्या आम्ही सुरु केल्या असल्याचे त्यांनी म्हटले.

Pune News: पुण्यातील फुरसुंगी मधील नागरिकांनी रास्ता रोको केला.

Pune News: पुण्यातील फुरसुंगी मधील नागरिकांनी रास्ता रोको केला.


या परिसराला होणारा दूषित पाणीपुरवठा याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय व स्थानिक नागरिकांनी पुणे सासवड रोडवर आंदोलन केलं.


या परिसराला दूषित पाणीपुरवठा होत आहे गढूळ पाणी पुरवठा होत असल्यामुळे संतप्त नागरिकांनी भेकराईनगर चौकात ठाण मांडून पुणे सासवड रोड अडवून धरला


या आंदोलनामुळे दुतर्फा वाहतूक कोंडी झालेली.

Pune News:

Pune News: पुण्यातील फुरसुंगी मधील नागरिकांनी रास्ता रोको केला.


या परिसराला होणारा दूषित पाणीपुरवठा याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय व स्थानिक नागरिकांनी पुणे सासवड रोडवर आंदोलन केलं.


या परिसराला दूषित पाणीपुरवठा होत आहे गढूळ पाणी पुरवठा होत असल्यामुळे संतप्त नागरिकांनी भेकराईनगर चौकात ठाण मांडून पुणे सासवड रोड अडवून धरला


या आंदोलनामुळे दुतर्फा वाहतूक कोंडी झालेली.

Mumbai News: मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई आयोजक विरेंद्र पवार शिवाजी पार्क पोलीस स्थानकात दाखल 

मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई आयोजक विरेंद्र पवार शिवाजी पार्क पोलीस स्थानकात दाखल 


खासदार संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पवार पोलीस स्थानकात 


ट्वीटमधून मराठा मोर्चाचा व्हिडीओ वापरल्याची तक्रार देत, गुन्हा दाखल व्हावा यासाठी मागणी करणार

Beed News: गेवराईत मतदान केंद्रातला गोंधळ रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक

Beed News: बीडच्या गेवराई तालुक्यातील केकत पांगरी तांड्यावर मतदान सुरू असताना अचानक ईव्हीएम मशीन बंद पडली यावेळी काही काळ मतदान केंद्रामध्ये गोंधळ झाला आणि हाच गोंधळ रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्या ठिकाणच्या काही लोकांनी दगडफेक केली आणि यामध्ये गेवराई पोलीस ठाण्याचे सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर बीडमध्ये उपचार सुरू असून याप्रकरणी पहाटे 20 हून अधिक लोकांवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गेवराई तालुक्यातला केकत पांगरी गावात अचानक ईव्हीएम मशीन बंद पडली. त्यामुळे साडेपाच वाजल्यानंतरही मतदानाची प्रक्रिया सुरू होती आणि याच वेळी मतदान केंद्रात गोंधळ सुरू होता आणि हाच गोंधळ रोखण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी पोहोचले होते मात्र पोलिसांवरच काही लोकांनी दगडफेक केली आणि यामध्ये पोलीस  जखमी झाले आहेत.
Pandharpur News: पंढरपुरात कडकडीत बंद मात्र एकादशीमुळे मंदिर परिसर सुरू

Pandharpur News: महापुरुषांच्या बाबत सातत्यानं होत असलेल्या बदनामीकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज पंढरपूरमध्ये  कडकडीत बंद पाळण्यात आला असला तरी मार्गशीर्ष वद्य एकादशीमुळे मंदिर परिसरात मात्र सर्व व्यवहार सुरळीत सुरु असल्यानं भाविकांना या बंडाचा फटका बसलेला नाही. आज पंढरपूरमधील भाजप, शिंदे सेना आणि मनसे वगळता इतर सर्व पक्षांनी पुकारलेल्या सर्व पक्षीय बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र आज मार्गशीर्ष वद्य एकादशी असल्याने शहरात जवळपास 2 लाख भाविकांची गर्दी असून मंदिर परिसरातील प्रासादिक साहित्याची दुकाने मात्र उघडी ठेवण्यात आली आहेत. आज सकाळी शहरातील महात्मा फुले पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली असून शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळत या वक्तव्यांचा निषेध केला आहे. 

Buldhana News: थोरल्या भावाची आभाळ माया, धाकटयाला भेट दिला दिवंगत वडीलांचा सिलिकॉनचा पुतळा

Buldhana News: कोरोना संकटाला आता तीन वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र अजुनही कोरोनामुळे बाधित झालेल्या अनेक कुटुंबाच्या व्यथा समोर येत आहेत. कोरोना महामारीत कोरोनाची लागण होऊन मृत्यू पावलेल्या वडीलांचा सिलिकॉनपासून हुबेहुब पुतळा थोरल्या भावानाने धाकट्या भावाला त्याच्या वाढदिवसीच भेट दिलाय. भावाने दिलेली ही हद्यस्पर्षी भेट सध्या चिखलीत सामाजिक स्थरावर चर्चेचा विषय ठरत आहे. वडीलांच्या आकस्मिक निधनामुळे धाकटया भावावर विरहातुन मानसीक आघात झाला होता. या परिस्थीतीतुन त्याला बाहेर काढण्याकरीता कुटुंबियांनी शर्थीचे प्रयत्न केले, अखेर त्याच्या वाढदिवसानिमित्त दिवंगत वडीलांचा हुबेहुब दिसणारा सिलिकॉन चां पुतळा पाहुन धाकटयाने अश्रुंना वाट मोकळी करून दिलीय.

Sanjay Raut: मोर्चांना नॅनो मोर्चा म्हणण्याची भाजपची प्रथा, राऊत यांचे टीकास्त्र

Sanjay Raut:  इतरांच्या मोर्चांना नॅनो मोर्चा म्हणण्याची भाजपची प्रथा आहे. मराठा क्रांती मोर्चा आणि मविआचा मोर्चा हा न्यायहक्कांचा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. 

Sanjay Raut: ट्वीटमधील तो मोर्चा महाविकास आघाडीचा मोर्चा आहे, असे मी म्हटले नाही; संजय राऊत यांचे स्पष्टीकरण 

Sanjay Raut: ट्वीटमधील तो मोर्चा महाविकास आघाडीचा मोर्चा आहे, असे मी म्हटले नाही असे स्पष्टीकरण शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले. 

बेळगावात कर्नाटक सरकारची मराठी बांधवांवर दडपशाही, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना घरातून अटक

बेळगावात कर्नाटक सरकारची मराठी बांधवांवर दडपशाही सुरू केल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना घरातून अटक करण्यात आली आहे.  आजच्या मेळाव्यास परवानगी नाकारल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी माजी आमदार मनोहर किनेकर, रविंद्र साळुंखे, शुभम शेळके, नेताजी जाधव यांना राहत्या घरातून अटक करण्यात आली.

Maharashtra News: राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या शिराळ गावात ग्रामपंचायत निवडणुकीवरून हाणामारी
Maharashtra News: राष्ट्रवादी काँग्रेसचे आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या शिराळ गावात ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट लागलाय परवा दिवशी जुन्या वादातून दोन गटात मारामारी झाली. सचिन आजबे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिराळ मधल्या चौकामध्ये संग्राम आजबे महेश आवे आणि आमदार बाळासाहेब आजबे यांचे पुत्र यश यांच्यासह 50 जणांनी मारहाणी केल्याचा आरोप आहे. बाळासाहेब आजबे गटाकडून सुद्धा सचिन आजबे च्या विरोधात मारहाणीच्या तक्रार दिली आहे त्यानुसार सचिन आजबे ज्ञानेश्वर आजबे यांच्यासह 32 जनावर गुन्हे दाखल झाले आहेत. 
Maharashtra Karnataka Border Dispute:  महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मेळाव्यासाठी उभारण्यात येत असलेल्या स्टेजच्या उभारणीचे काम थांबवले

Maharashtra Karnataka Border Dispute:  महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आयोजित मेळाव्यासाठी उभारण्यात येत असलेल्या स्टेजच्या उभारणीचे काम थांबवले. काल मेळाव्यास कर्नाटक पोलिसांकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र आत्ता अचानक काम थांबविण्यात आले आहे.  बेळगावमध्ये कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच  महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आयोजित मेळाव्यास परवानगी देखील नाकारण्यात आली आहे. 

Mumbai- Pune Expressway Accident: बोरघाटात बसला अपघात, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai- Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर खासगी बसचा अपघात झाला आहे. भरधाव टेम्पोने बसला मागून धडक दिल्याने अपघात झाला आहे. ढेकू गावानजीक बोरघाटात अपघात झाला आहे. बसमध्ये 35 प्रवासी होते, तीन प्रवासी साधारण जखमी तर एक गंभीर जखमी आहे. जखमींना एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अपघातामुळे  मुंबईकडे येणाऱ्य वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.  


 





Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर कोगनोळी टोल नाका येथे कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर कोगनोळी टोल नाका येथे कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कर्नाटक पोलिसांच्या कडून कसून चौकशी सुरू आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेश बंदी आहे. 

Pandharpur Band: महापुरूषांच्या अपमानाच्या निषेधार्थ आज पंढरपूर बंद, भाविकांचे हाल होण्याची शक्यता

Pandharpur Band: सातत्याने महापुरुषांबाबत होत असलेल्या अवमानकारक वक्तव्याचा विरोध करण्यासाठी आज सर्वपक्षीय पंढरपूर बंदची हाक देण्यात आली आहे . या बंदमध्ये भाजप , शिंदेसेना आणि मनसे सामील नसली तरी इतर प्रमुख पक्षांसह सर्व सामाजिक संघटना यात सहभागी असल्याने हा बंद कडकडीत होणार आहे . आज मार्गशीर्ष वाद्य एकादशी असून नाताळ सुट्ट्या सुरू होत असल्याने सध्या हजारोंच्या संख्येने रोज भाविक विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला येत असून त्यांना या बंदचा फटका बसण्याची शक्यता आहे 

Winter Assembly Session: राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुर होणार

Winter Assembly Session: राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुर होणार आहे. लोकायुक्त कायद्याचं बील अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मविआच्या आमदारांची आज बैठक होणार आहे. नागपूर विधान भवनात सकाळी 10 आणि दुपारी चार वाजता ही बैठक होईल. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुर होणार आहे. लोकायुक्त कायद्याचं बील अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.   महापुरुषांच्या अपमानाच्या निषेधार्थ आज पंढरपूर बंद असणार आहे. तेसच रिक्षा चालक मालकांचे पुण्यात आंदोलन होणार आहे. 


राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुर होणार
राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुर होणार आहे. लोकायुक्त कायद्याचं बील अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.  


हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मविआच्या आमदारांची बैठक 
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मविआच्या आमदारांची आज बैठक होणार आहे. नागपूर विधान भवनात सकाळी 10 आणि दुपारी चार वाजता ही बैठक होईल.


विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज सहा मोर्चे निघणार 


विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज सहा मोर्चे निघणार आहेत. त्यामध्ये धनगर समाजाचा मोर्चा, विदर्भ जन आंदोलन समितीचा मोर्चा तसेच आशा गटप्रवर्तकांचा मोर्चा महत्त्वाचा ठरणार आहे. 
 
महापुरुषांच्या अपमानाच्या निषेधार्थ आज पंढरपूर बंद 
 महापुरुषांच्या अपमानाच्या निषेधार्थ आज पंढरपूर बंद असणार. आजा मार्गशीर्ष वद्य एकादशी असून या बंद मुळे भाविकांचे हाल होण्याची शक्यता आहे. 


जालन्यात होमिओपॅथी डॉक्टर्स अँड विद्यार्थ्यांचा मोर्चा


अंबड चौफुली ते कलेक्टर ऑफिस होमिओपॅथी डॉक्टर्स अँड स्टुडंट्स असोसिएशन पायी मोर्चा काढणार आहेत. सी एच ओ पदभरती प्रक्रियात होमिओपॅथिक डॉक्टरांना समाविष्ट करत नाही तोपर्यंत भरती प्रक्रियाला स्थगिती देण्यासंदर्भात जिल्हाभरातील होमिओपॅथिक डॉक्टरांच्या वतीने आज सकाळी 11वाजता होमिओपॅथिक डॉक्टर्स अँड स्टुडंट्स असोसिएशनच्या वतीने अंबड चौफुली ते कलेक्टर ऑफिस पायी मोर्चा काढणार आहेत. 


एकीकरण समितीचा बेळगावात महामेळावा 
आज एकीकरण समितीचा बेळगावात महामेळावा होणार आहे. कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन बेळगावात सोमवारपासुन सुरु होत आहे. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर मेळावा आयोजित करण्यात आलाय.  या मेळाव्यास महाराष्ट्रातील नेत्यांना आमंत्रित करण्यात आलय.कर्नाटक सरकारने मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश देणार नसल्याच जाहीर केलय.  


रिक्षा चालक मालकांचे पुण्यात आंदोलन
 
 टू व्हिलर प्रवासी वाहतूकीच्या विरोधात कौन्सिल हॉल येथे रिक्षा चालक मालकांचे सकाळी 11.30 वाजता आंदोलन होणार आहे. 


श्मी शुक्ला यांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी
 
फोन टैपिंग प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठा रश्मी शुक्ला यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी. रश्मी शुक्लांविरोधात तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे हायकोर्टाचे निर्दोश. 
 
नवी मुंबईतील पार्किंगच्या समस्येवर हायकोर्टात सुनावणी


नवी मुंबईतील पार्किंगच्या समस्येवर हायकोर्टात सुनावणी होईल. आरटीआय कार्यकर्ता संदीप ठाकूर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होईल. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.