Maharashtra News Updates 16 October 2022 : मुंबईमध्ये 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी पावसाचा यलो अलर्ट जारी, जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Oct 2022 11:55 PM
रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानीव बोलावलेली भाजप नेत्यांची बैठक संपली,  भाजप नेते आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचे भाजप उमेदवार मुरजी पटेलही उपस्थित

मुख्यमंत्र्यांनी उद्या दुपारी ३ः३० वाजता कारशेडबाबत निर्णय घेण्यासंबंधी बैठक बोलवली  

मुख्यमंत्र्यांनी उद्या दुपारी ३ः३० वाजता कारशेडबाबत निर्णय घेण्यासंबंधी बैठक बोलवली  

मोगरपाडा, कांजुरमार्ग आणि राई, मुर्धे येथील कारशेडसंदर्भात सह्याद्री अतिथिगृहात बैठकीचं आयोजन 

कांजूर मार्गमधील मेट्रो ६ आणि मोगरपाडातील मेट्रो ४ बाबतच्या कारशेडबाबत बैठकीत चर्चा होणार  

उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव- महसूल, महानगर आयुक्त एमएमआरडीए, ठाणे जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीसाठी निमंत्रण

अल्पवयीन मुलीने एका मुलाला घरातच जन्म दिला, नंतर त्या बालकाल दुसऱ्या मजल्यावरून टाकून दिलं, पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Crime: पुण्यातील कोंडवे धावडे परिसरामध्ये अल्पवयीन सतरा वर्षीय मुलीने एका मुलाला घरातच जन्म दिल्यानंतर त्याला दुसऱ्या मजल्यावरून टाकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी पोलिसांना त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सदर अल्पवयीन मुलगी गरोदर असताना ती तपासणीसाठी गेली असताना तिची माहिती डॉक्टरांनी संबंधित यंत्रणेला दिली आहे की नाही याची जबाबदारी निश्चित करून डॉक्टरांवरही कार्यवाही करण्याचे निर्देश पोलीस यंत्रणेला दिले आहेत. जन्म दिलेले दोन दिवसीय नवजात अर्भक ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून बाळाच्या तब्येतीवर आयोग लक्ष देत आहे.

अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करा, शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांचं पत्र

अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करा हीच रमेश लटके यांच्यासाठी खरी श्रद्धांजली असेल असं मत शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केलं आहे..

एमसीए बैठकीला मुख्यमंत्री पोचले

एमसीए बैठकीला मुख्यमंत्री पोचले, याठिकाणी जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, आणि एमसीए निवडणुकीला उभे असलेले सदस्य उपस्थित आहेत 

राज ठाकरे यांच्या पत्रानंतर आज रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक होणार

राज ठाकरे यांच्या पत्रानंतर आज रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक होणार

राज ठाकरे यांच्या पत्रानंतर भाजप नेते आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक

रात्री दहाच्या सुमारास भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाणार

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भात चर्चा करण्यासाठी भाजपच्या नेत्यांची बैठक

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज मोठा अनर्थ टळला

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज मोठा अनर्थ टळला. बोरघाट चढताना अमृतांजन पुलाजवळच एक ट्रेलर कंटेनरला मागून धडकला. त्यानंतर ट्रेलरचा ब्रेकफेल झाला. अन ट्रेलर उताराच्या दिशेने निघाला. तिथंच उपस्थित मार्शलने धावत जाऊन मागून येणाऱ्या वाहनांना थांबण्याच्या सूचना केल्या, या सुचनांचे पालन झाले अन ट्रेलर काही अंतरावर जाऊन थांबला. त्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला.

Mumbai Rains Updates: मुंबईमध्ये 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी पावसाचा यलो अलर्ट जारी, जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज 

Mumbai Rains Updates: मुंबईमध्ये 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी पावसाचा यलो अलर्ट जारी, जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज 

परभणीत एका दिवसाच्या विश्रांती नंतर पुन्हा जोरदार पाऊस

एक दिवसांच्या विश्रांतीनंतर परत एकदा आज परभणीत जोरदार पावसाळा सुरुवात झाली आहे. परभणी आणि सेलू तालुक्यात पावसाचा जोर जास्त होता, तर इतर तालुक्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. 

उद्धव ठाकरे यांनी आपल्या अहंकारामुळे वडिलांचे सर्व गमावले : प्रवीण दरेकर

उद्धव ठाकरे यांचा अहंकार येवढा मोठा की त्यांनी सांगितले तरी पाहिजे निवडणूक बिनविरोध करा म्हणून यांचा अहंकारामुळे पक्ष रसातळाला गेला. 54 आमदारांपैकी 40 जण यांना सोडून गेले, तरी यांचा अहंकार जात नाही. उद्धव ठाकरे यांनी आपल्या अहंकारामुळे वडिलांचे सर्व गमावले, असे भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले.

हालसिद्धनाथ यात्रेची सांगता,लाखो भक्तांनी घेतले दर्शन
कर्नाटक महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हालसिद्धनाथ देवाची यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात सांगता झाली. हालसिद्धनाथ महाराज की जय चांगभलं, खारीक खोबरे, भंडाऱ्याची उधळण करत पाच दिवसांमध्ये लाखो भाविकांनी हालसिद्धनाथ देवाचे दर्शन घेतले. मंदिरात मानकरी व पुजारी यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.पाच दिवसात दररोज आरती आणि महापूजा करण्यात येत होती. रोज रात्री ढोल जागर (वालंग) झाला. हेडम खेळवण्यात आले. 

Aurangabad: औरंगाबाद शहरात उद्धव ठाकरे गटाकडून निष्ठा यात्रेला सुरवात

Aurangabad: औरंगाबाद येथे उद्धव ठाकरे गटाकडून निष्ठा यात्रा काढण्यात आली आहे. यावेळी विरोधी पक्षनेते या यात्रेच नेतृत्व करत आहे. आज दिवसभर हि यात्रा शहरातील विविध भागातून जाणार आहे. यावेळी मोठ्याप्रमाणावर शिवसैनिकांची हजेरी पाहायला मिळत आहे.

बोरिवली-ठाणे दीड तासाचा प्रवास 20 मिनिटांत पार होणार

बोरिवली- ठाणे हा दीड तासाचा प्रवास 15 ते 20 मिनिटांवर आणण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या भुयारी मार्ग प्रकल्पाची प्रतीक्षा संपणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणाऱ्या या भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामासाठी पुढील दोन महिन्यांत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून  निविदा काढल्या जाणार आहेत. त्यासाठी सुमारे सात हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा भारतातील सर्वांत मोठा भुयारी मार्ग ठरणार आहे.

राहूल लोणीकर यांची भाजयुमोच्या प्रदेशाध्यपदाच्या निवडीवर युवक काँग्रेसची टीका

अकोला :  सातत्याने काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपच्या ट्रोलर्स टोळीने भाजप युवा मोर्चाचे नवनियुक्त अध्यक्ष राहुल लोणीकरांचे वडील बबनराव लोणिकर हे काय करतात? हा प्रश्न आपल्या नेतृत्वाला विचारला पाहीजे असा सवाल महाराष्ट्र युवक काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते कपिल ढोकेंनी केलाय.  काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे हे सांगणाऱ्यांनी आधी भाजपमध्ये असणारी सर्वाधिक घराणेशाही पहावी असा टोला ढोकेंनी भाजपला लगावलाय. ते अकोला येथे बोलत होतेय.

संघाची अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या चार दिवसीय बैठकीला आज सुरुवात होणार आहे. सकाळी नऊ वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. आरएएस प्रमुख मोहन भागत या बैठकीला उपस्थित असणार आहेत. 

हिंदी भाषेतून वैदकीय शिक्षणाचा शुभारंभ

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या भोपाळ दौऱ्यावर आहेत. यावेळी ते वैदकीय शिक्षणाचा हिंदी भाषेतून शुभारंभ करणार आहे. भारतामध्ये मेडिकल शिक्षण पहिल्यांदाच हिंदीमधून होणार आहे. दुपारी 12 वाजता एका कार्यक्रमातून याचा शुभारंभ होणार आहे. यावेळी अमित शाह उपस्थितांना संबोधित करणार आहेत. 

दिल्लीत पहिली राष्ट्रीय कोळसा परिषद आणि प्रदर्शन

कोळसा मंत्रालयाच्या सहकार्याने जागतिक खनिकर्म काँग्रेसच्या भारतीय राष्ट्रीय समितीने  'भारतीय कोळसा क्षेत्र-आत्मनिर्भर भारताच्या दिशेने शाश्वत खनिकर्म  ” या संकल्पनेतून पहिल्या राष्ट्रीय कोळसा परिषदेचे आणि प्रदर्शनाचे आयोजन नवी दिल्ली येथे 16 आणि 17 ऑक्टोबर 2022 रोजी केले आहे.  केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आणि कोळसा, खाण आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे या परिषदेला संबोधित करणार आहेत.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते 75 जिल्ह्यांमधील 75 डिजिटल बँकिंग युनिट्सचे लोकार्पण

पंतप्रधान  नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 75 डिजिटल बँकिंग युनिट्सचे  (डीबीयू ) लोकार्पण करणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही  करणार आहेत. वर्ष 2022-23 च्या केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणाचा भाग म्हणून, अर्थमंत्र्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करण्यासाठी देशातील 75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँकिंग युनिट्स स्थापन  करण्याची घोषणा केली होती. डिजीटल बँकिंगचे फायदे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावेत आणि सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यात समाविष्ट होतील या उद्देशाने डीबीयूची स्थापना केली जात आहे.  सार्वजनिक क्षेत्रातील 11 बँका, खाजगी क्षेत्रातील 12 बँका आणि एक लघु वित्त बँक यात सहभागी होत आहेत.

शेफ विष्णू मनोहर नागपूरमध्ये दोन हजार किलोचा कुरकुरीत महाचिवडा तयार करणार

जागतिक खाद्यान्नदिनी आज प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर नागपूरमध्ये दोन हजार किलोचा कुरकुरीत महाचिवडा तयार करणार आहे. नंतर ते खयय्यांना मोफत वितरण केले जाणार आहे. रामदासपेठ येथील विष्णूजीकी रसोई येथे सहा हजार किलोच्या अवाढव्य कढईत सकाळी 9 ते 11 दरम्यान चिवडा तयार करण्यात येईल. नंतर कांचन गडकरी आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते चिवड्याचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.. या चिवड्याचा उपक्रमाच्या माध्यमातून विष्णू मनोहर यांचा आजवरचा 14 वा विश्व विक्रम ठरणार आहे. 

उदय लळीत सोलापूर दौऱ्यावर

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरातल्या हुतात्मा सभागृह येथे महाराष्ट्राने गोवा बार कौन्सिल यांच्या वतीने आयोजित  राज्यस्तरीय वकील परिषदेचे उद्घाटन सरन्यायाधीशांच्या हस्ते होणार आहे. सरन्यायाधीश यांचा जन्मगाव सोलापूर असल्याने सोलापुरात त्यांच्या स्वागताची भव्य तयारी करण्यात आली आहे. सरन्यायाधीशांसह मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता, न्यायाधीश एम एस कर्णिक, न्यायाधीश एन जे जमादार, न्यायाधीश विनय जोशी, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी,  विशेष सरकारी वकील उज्वल निकम  इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सकाळी दहा वाजता या वकील परिषदेचे उद्घाटन होणार आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 मधील विजयी करंडक घेऊन पथक प्रमुख व खेळाडू महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या स्वाधीन करणार आहेत. सांयकाळी 5 वाजता जुनी पुणे जिल्हा परिषद पुणे येथे कार्यक्रम होणार आहे. 

ठाण्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य जाहीर सत्कार आज होणार आहे. अखिल भारतीय बंजारा समाजातर्फे ठाण्याच्या हायलेंड मैदानात सत्काराचा कार्यक्रम होणार. यासाठी कॅबिनेट मिनिस्टर संजय राठोड यांच्या सह अनेक नेते उपस्थित असणार आहेत. दरम्यान, चेकनाका कोपरी ते हायलँड मैदान ढोकाळी अशी रिक्षा रॅली काढण्यात येणार आहे, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रिक्षा रॅलीमधून मैदानात पोहोचणार आहेत. रॅलीमध्ये 300 रिक्षा, 200 बाईक चा समावेश असणार आहे. 

Akola Election : पंचायत समिती सभापती-उपसभापती पदाची निवडणूक

Akola Election : अकोला जिल्ह्यातील सातही पंचायत समिती सभापती-उपसभापती पदाची निवडणुक होतेये. सातही पंचायत समित्यांवर वंचितचा वरचष्मा आहे. मात्र, वंचित पुर्ण बहूमत असलेल्या सर्वात मोठ्या अकोला पंचायत समितीत भाजपला लॉटरी लागती. कारण एसटी महिला राखीव  उमेदवार त्यांच्याकडेच आहे. याशिवाय आज वेळेवर काही नवी समिकरणं उदयास येतात का?, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Gram Panchayat Election : 18 जिल्ह्यामध्ये 1165 ग्रामपंचायतीसाठी मतदान

Gram Panchayat Election : राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 16 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे. तर सोमवारी मतमोजणी होणार आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाची निवडणूक थेट जनतेमधून होणार आहे. सकाळी 7.00 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. 

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.  

18 जिल्ह्यामध्ये 1165 ग्रामपंचायतीसाठी मतदान
राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 16 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे. तर सोमवारी मतमोजणी होणार आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाची निवडणूक थेट जनतेमधून होणार आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. 

अकोला - पंचायत समिती सभापती-उपसभापती पदाची निवडणूक
अकोला जिल्ह्यातील सातही पंचायत समिती सभापती-उपसभापती पदाची निवडणुक होतेये. सातही पंचायत समित्यांवर वंचितचा वरचष्मा आहे. मात्र, वंचित पुर्ण बहूमत असलेल्या सर्वात मोठ्या अकोला पंचायत समितीत भाजपला लॉटरी लागती. कारण एसटी महिला राखीव  उमेदवार त्यांच्याकडेच आहे. याशिवाय आज वेळेवर काही नवी समिकरणं उदयास येतात का?, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ठाण्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य जाहीर सत्कार आज होणार आहे. अखिल भारतीय बंजारा समाजातर्फे ठाण्याच्या हायलेंड मैदानात सत्काराचा कार्यक्रम होणार. यासाठी कॅबिनेट मिनिस्टर संजय राठोड यांच्या सह अनेक नेते उपस्थित असणार आहेत. दरम्यान, चेकनाका कोपरी ते हायलँड मैदान ढोकाळी अशी रिक्षा रॅली काढण्यात येणार आहे, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रिक्षा रॅलीमधून मैदानात पोहोचणार आहेत. रॅलीमध्ये 300 रिक्षा, 200 बाईक चा समावेश असणार आहे.

उदय लळीत सोलापूर दौऱ्यावर 
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरातल्या हुतात्मा सभागृह येथे महाराष्ट्राने गोवा बार कौन्सिल यांच्या वतीने आयोजित  राज्यस्तरीय वकील परिषदेचे उद्घाटन सरन्यायाधीशांच्या हस्ते होणार आहे. सरन्यायाधीश यांचा जन्मगाव सोलापूर असल्याने सोलापुरात त्यांच्या स्वागताची भव्य तयारी करण्यात आली आहे. सरन्यायाधीशांसह मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता, न्यायाधीश एम एस कर्णिक, न्यायाधीश एन जे जमादार, न्यायाधीश विनय जोशी, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी,  विशेष सरकारी वकील उज्वल निकम  इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सकाळी दहा वाजता या वकील परिषदेचे उद्घाटन होणार आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 मधील विजयी करंडक घेऊन पथक प्रमुख व खेळाडू महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या स्वाधीन करणार आहेत. सांयकाळी 5 वाजता जुनी पुणे जिल्हा परिषद पुणे येथे कार्यक्रम होणार आहे. 

शेफ विष्णू मनोहर नागपूरमध्ये दोन हजार किलोचा कुरकुरीत महाचिवडा तयार करणार 
जागतिक खाद्यान्नदिनी आज प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर नागपूरमध्ये दोन हजार किलोचा कुरकुरीत महाचिवडा तयार करणार आहे... नंतर ते खयय्यांना मोफत वितरण केले जाणार आहे. रामदासपेठ येथील विष्णूजीकी रसोई येथे सहा हजार किलोच्या अवाढव्य कढईत सकाळी 9 ते 11 दरम्यान चिवडा तयार करण्यात येईल. नंतर कांचन गडकरी आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते चिवड्याचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.. या चिवड्याचा उपक्रमाच्या माध्यमातून विष्णू मनोहर यांचा आजवरचा 14 वा विश्व विक्रम ठरणार आहे. 

पंतप्रधान मोदींच्या हस्ते 75 जिल्ह्यांमधील 75 डिजिटल बँकिंग युनिट्सचे लोकार्पण
पंतप्रधान  नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 75 डिजिटल बँकिंग युनिट्सचे  (डीबीयू ) लोकार्पण करणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही  करणार आहेत. वर्ष 2022-23 च्या केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणाचा भाग म्हणून, अर्थमंत्र्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करण्यासाठी देशातील 75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँकिंग युनिट्स स्थापन  करण्याची घोषणा केली होती. डिजीटल बँकिंगचे फायदे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावेत आणि सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यात समाविष्ट होतील या उद्देशाने डीबीयूची स्थापना केली जात आहे.  सार्वजनिक क्षेत्रातील 11 बँका, खाजगी क्षेत्रातील 12 बँका आणि एक लघु वित्त बँक यात सहभागी होत आहेत.

दिल्लीत पहिली राष्ट्रीय कोळसा परिषद आणि प्रदर्शन 
कोळसा मंत्रालयाच्या सहकार्याने जागतिक खनिकर्म काँग्रेसच्या भारतीय राष्ट्रीय समितीने  'भारतीय कोळसा क्षेत्र-आत्मनिर्भर भारताच्या दिशेने शाश्वत खनिकर्म  ” या संकल्पनेतून पहिल्या राष्ट्रीय कोळसा परिषदेचे  आणि प्रदर्शनाचे आयोजन नवी दिल्ली येथे 16 आणि 17 ऑक्टोबर 2022 रोजी केले आहे.  केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री   प्रल्हाद जोशी आणि कोळसा, खाण आणि रेल्वे राज्यमंत्री  रावसाहेब पाटील दानवे या परिषदेला संबोधित करणार आहेत.

हिंदी भाषेतून वैदकीय शिक्षणाचा शुभारंभ 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या भोपाळ दौऱ्यावर आहेत. यावेळी ते वैदकीय शिक्षणाचा हिंदी भाषेतून शुभारंभ करणार आहे. भारतामध्ये मेडिकल शिक्षण पहिल्यांदाच हिंदीमधून होणार आहे. दुपारी 12 वाजता एका कार्यक्रमातून याचा शुभारंभ होणार आहे. यावेळी अमित शाह उपस्थितांना संबोधित करणार आहेत. 
 
संघाची अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या चार दिवसीय बैठकीला आज सुरुवात होणार आहे. सकाळी नऊ वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. आरएएस प्रमुख मोहन भागत या बैठकीला उपस्थित असणार आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.