Maharashtra News Live Updates : वंदे भारत एक्सप्रेस धावण्याआधी रेल्वेच्या ट्रॅकची तपासणी करताना रेल्वेच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
गोंदिया : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवरून 11 डिसेंबरपासून नागपूर - बिलासपूर दरम्यान 'वंदे भारत एक्सप्रेस' धावणार आहे. या हायस्पीड ट्रेनच्या ऑपरेशन पूर्वी गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागातून जाणाऱ्या सालेकसा ते दरेकसा दरम्यान जाणाऱ्या रेल्वे रुळांची पाहणी आज सुरू असताना गोंदिया पोलीस विभागातील बॉम्ब शोध पथकातील पोलीस कर्मचारी विजय नंदकिशोर नशिने (वय 45) यांना याचवेळी रुळावर आलेल्या दरभंगा एक्सप्रेसची जोरदार धडक बसली. यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. छत्तीसगडच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.
महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाईफेकीचा प्रयत्न करण्यात आला आहे. महापुरुषांबद्दल केलेल्या बदनामीकारक वक्तव्यावरुन कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आंदोलकांची धरपकड सुरु आहे.
गुजरात मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अधिकृत निमंत्रण.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शपथविधीला उपस्थित राहणार
NDA चा मित्रपक्ष म्हणून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भुपेन पटेल यांच्या शपथविधीसाठी निमंत्रण.
मातोश्री एैवजी आता ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शपथविधीसाठी निमंत्रण.
शिवसेना मित्र पक्ष असला तरी ती बाळासाबांची शिवसेना पळा बाबतच गुजरात सरकारकडून विशेष काळजी.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एैवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच गुजरात राज्य सरकारकडून निमंत्रण.
बुलढाणा जिल्ह्यातील आंबाशी येथील ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवरच "अंबाशी गाव विकणे आहे" चा फलक लावून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. मागील दीड वर्षापूर्वी झालेल्या ढगफुटीमुळे चिखली तालुक्यातील अंबाशी आणि आमखेड येथील दोन्ही धरण फुटल्याने शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. तेव्हापासून नुकसानग्रस्त शेतकरी शासनाकडे धरण आणि शेती दुरुस्तीची मागणी करत आहेत, मात्र शासन अद्यापही याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आपलं गावच विकायचं असल्याचा फलक गावाच्या वेशीवर लावलाय.
अमरावतीच्या परतवाडा शहरात गेल्या काही महिण्यापासुन दुचाकी चोरीच्या घटनेत सतत वाढ झाली होती. पोलिस स्टेशन येथे वाहनचोरीच्या अनुषंगाने वाढत्या तक्रारीचा ओघ पाहता नवीन आलेले ठाणेदारांनी तपासाचे चक्र गतीमान केली. परतवाडा शहरातील अल्पवयीन युवकांच्या टोळी आणि त्याचे वेगवेगळे पार्ट काढून विकणारी टोळी जेरबंद केली आहे. पोलिसांनी चोरलेल्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात सांगाडे मेळघाटच्या जंगलातून ताब्यात घेतले आहे.
भंडारा : भरधाव येणाऱ्या बस आणि ट्रकच्यामध्ये झालेल्या अपघातात बसमधील 27 प्रवाशी किरकोळ जखमी झाले. हा भीषण अपघात भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील खापा चौकात झाला. नागपूर जिल्ह्यातील रामटेककडून गोंदियाकड़े निघालेला ट्रक आणि तुमसरकडून अकोलाकडे निघालेल्या बसमध्ये हा अपघात झाला. ट्रक अचानक आल्याने बस अनियांत्रित झाली, मात्र बस चालकने वेळीच बसवर नियत्रंण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. नशीब बलवत्तर होते म्हणून या अपघातात 27 प्रवासी किरकोळ जखमी झाले. तुमसर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.
पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर परिसरात अनेक पुरातन मंदिरे, वारकरी संप्रदायाच्या प्राचीन श्रद्धा असणारे वाडे आणि इतर वास्तू उध्वस्त करून बनविण्यात येणाऱ्या माउली कॉरिडॉरच्या विरोधात आता डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी उडी घेतली आहे. या कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी वेळ पडल्यास न्यायालयीन लढाई लढू असा इशारा स्वामी यांनी दिला आहे. ज्या पद्धतीने काशी येथे देखील पुरातन मंदिरे पडून मोदी यांनी वाराणसी कॉरिडॉर केला त्यावरून त्यांच्या मानसिकता असल्याचा संताप स्वामी यांनी व्यक्त केला. आज सकाळी वारकरी संप्रदायाचे प्रमुख पदाधिकारी आणि नागरिकांनी मुंबई येथील यंशवंतराव चव्हाण सभागृहात स्वामी यांची भेट घेऊन माउली कॉरिडॉर कोणालाच नको असल्याच्या सांगितलं. यावेळी स्वामी यांनी प्रथम राज्य सरकारशी बोलू मात्र त्यांनी न ऐकल्यास थेट न्यायालयातून हा रद्द करायला लावू अशी ठाम भूमिका घेतली आहे.
Sulochana Chavan Passes Away : साठ वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण याचं आज निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण याचं निधन, वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास
कल्याण रेल्वे स्थानकाच्या तिकीट बुकिंग कार्यालयात लांब पल्ल्याची गाडी पडकण्यासाठी आलेला एक प्रवसी झोपला असता त्यांच्या खिशातून एक मोबाईल चोरी करणाऱ्या तरुणाला आरपीएफने अटक केली आहे. प्रेमलाल यादव असे या चोरट्याचे नाव आहे. ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्रेमलालने या आधी असे काही गुन्हे केले आहेत का याचा तपास सुरू आहे.
सोलापूर : मंत्री चंद्रकांत पाटलांच्या वादग्रस्त विधानानंतर आंबेडकरी संघटना आक्रमक
सोलापुरात भीम आर्मी आणि युवा भिमसेने तर्फे दोन ठिकाणी चंद्रकांत पाटलांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भीम आर्मीने जाळला मंत्री चंद्रकांत पाटील यांचा प्रतीकात्मक पुतळा
तर युवा भीमसेनेने भाजप कार्यालयासमोरच जाळला चंद्रकांत पाटील यांचा प्रतिकात्मक पुतळा
Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांनी फुले, आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे, माझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी काय काम केलं, हे मला कोणी शिकवू नये त्यांचा मला आदर आहे असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. सोबतच भीक मागणं हा शब्द अर्थोअर्थी घ्यायचा नव्हता देणगी किंवा वर्गणी याचाशी संबंधित घ्यायचा होता मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असाही आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. आता मी दिलगिरी व्यक्त करतोय माफी मागतोय, मात्र विरोधकांना मी माफी मागितली आहे दिलगिरी व्यक्त केली आहे हे तरी कळेल का असा टोलाही त्यांनी लावला.
आज कोल्हापुरात महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन... सीमावासियांसाठी मविआ आक्रमक
आंतरजातीय प्रेमप्रकरणात कुटुंबापासून दुरावलेल्या मुलींसाठी राज्य सरकार समिती गठण करणार
श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणानंतर राज्य सरकारचे महत्वपूर्ण पाऊल
महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती
प्रेमविवाह केलेल्या मुलींच्या समस्यांचे करणार निराकरण
सात दिवसात दहा सदस्यांची समिती गठीत करणार
ही समिती आंतरजातीय प्रेमप्रकरणामुळे ज्या मुली कुटुंबापासून दूर गेलेल्या आहेत त्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे
जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीत सकाळी 10.30 वाजेपर्यंत 18% मतदान झालं आहेत. त्यातील साडेदहा वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान जळगाव मतदान व अमळनेर येथील मतदान केंद्रावर झाले आहे.
अंबरनाथ येथून जाणाऱ्या डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन रोडवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पालेगाव ते नेवाळी दरम्यान या रस्त्यावर पडलेले खड्डे एमआयडीसीने अजूनही बुजवलेले नाहीत. त्यामुळे या पट्ट्यात अपघातांची मालिकाच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. काल रात्रीपासून या रस्त्यावर दोन गाड्यांचे अपघात झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पालेगाव ते नेवाळी दरम्यान एमआयडीसीने रस्त्यासाठी शेतकऱ्यांची जागा घेतली होती. मात्र या जागेचा मोबदला अजूनही शेतकऱ्यांना देण्यात आलेला नसल्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजवायला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. मात्र यामुळे अपघातांचं सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे एमआयडीसीनं यावर तोडगा काढून वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी हे खड्डे बुजवणं गरजेचं बनलं आहे.
अहमदनगर : राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या आमरण उपोषणाचा 4 था दिवस...
विरोधी पक्ष नेते अजित पवार थोड्या वेळात भेट द्यायला येणार...
अनेकदा चर्चा करून मार्ग निघत नसल्यानं लंके आंदोलनावर ठाम..
वैद्यकीय पथकाने केली लंके याची तपासणी...
गेल्या तीन दिवसात लंके याच वजन 4 किलोने घटले
घनसावंगी येथे 42 व्या मराठवाडा संमेलनस्थळी उद्धव ठाकरे यांचे आगमन...
महदंबा नगरीत साहित्यिकांचा मेळा...
सांगली : महाराष्ट्रातील सीमावर्ती गावे कर्नाटकात सामील करण्याच्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या आक्रमक भूमिकेमुळे वातावरण तापलं आहे. बोम्मई यांचा हाच आक्रमकपणा अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत देखील असून तसा तो अनेकवेळा बोलून देखील दाखवला आहे. अलमट्टी धरणाची उंची प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तरीही उंची वाढवणार, असे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री करतात. कर्नाटक सरकारचे धोरण पाहता, ते काही जुमानायचे नाही, अशा मानसिकतेत आहेत. त्याअर्थी महाराष्ट्र सरकारने सावध राहिले पाहिजे, अलमट्टी उंचीविरोधात प्रभावीपणे लढा द्यावा, महापूर आता सांगलीला परवडणार नाही अशी भूमिका आणि मागणी सांगलीतील व्यापारी एकता असोसिएशनने घेतलीय. यामुळे सीमावादा बरोबरच राज्य सरकारने अलमट्टी' उंचीविरोधात सावध राहून त्याविरुद्ध समर्थपणे लढा दिला पाहिजे अशी मागणी सांगलीतील व्यापाऱ्यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री कार्यालयाकडे केलीय.
Naxal PLGA celebration Exclusive Video : छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पीएलजीए सप्ताहाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ जारी केला, व्हिडिओमध्ये गणवेशधारी नक्षलवादी उपस्थित आहेत, या कार्यक्रमात मोठ्या संख्येने गावकरीही सहभागी झाले होते. बीजापूर आणि सुकमा या सीमावर्ती भागात 2 ते 8 डिसेंबर पर्यत पीएलजीए सप्ताह संपूर्ण दंडकारण्यात साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर नक्षल्यानी हा सप्ताह जोरदार साजरा केल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये दोन रांगेत मोठ्या संख्येत नागरिक नारे देत जाताना दिसत आहे तर, कार्यक्रमस्थळी क्रांतीकारी गाण्यावर नाचताना नक्षली पुरुष आणि महिला दिसत आहे, सोबत बंदूकधारी नक्षल देखील दिसत आहे.
आंतरजातीय प्रेमप्रकरणात कुटुंबापासून दुरावलेल्या मुलींसाठी राज्य सरकार समिती गठन करणार
श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणानंतर राज्य सरकारचे महत्वपूर्ण पाऊल
महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती
प्रेमविवाह केलेल्या मुलींच्या समस्यांचे करणार निराकरण
सात दिवसात दहा सदस्यांची समिती गठीत करणार
ही समिती आंतरजातीय प्रेमप्रकरणामुळे ज्या मुली कुटुंबापासून दूर गेलेल्या आहेत त्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे
Mumbai News : गर्भवती महिलेचा पाठलाग करुन तिची छेड काढणाऱ्या युवकास मुंब्रा पोलिसांनी ताब्यात घेतले. महिलेसमोर नको ते कृत्य करणाऱ्या आकिब युसूफ काश्मिरी (वय 19 वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 8 डिसेंबर रोजी दुपारी घडली असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. यामुळे पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यात मदत झाली. "चल मेरे साथ मे एक जगह पे लेके चलता हूँ, असं बोलून आरोपीने महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केलं. त्या महिलेने आरडाओरड केल्याने हा युवकाने तिथून पळून जात असताना त्या महिलेस शिवीगाळ करुन मैं तुझे देख लूंगा अशी धमकी दिली. मुंब्रा पोलीस ठाण्यात भा.दं.वि.कलम 354 (ड), 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांचे आदेशाने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या सपोनिरी कृपाली बोरसे यांनी विविध पथक तयार करुन गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात देण्यात आले आहे.
61 व्या राज्य नाट्य स्पर्धेत भाजपचा सांस्कृतिक दहशतवाद सुरु असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाने केला आहे. राज्य नाट्य स्पर्धा पुन्हा नव्याने घ्या अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाने दिला आहे. राज्य नाट्य स्पर्धेतील विविध केंद्रांवर भाजप आणि संघाशी संबंधित संस्कार भारतीची माणसं परीक्षक असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. अहमदनगर केंद्रावर परीक्षक असलेले पिंपरी चिंचवडचे नरेंद्र आमले, नागपूर केंद्रावरच्या परीक्षक असलेल्या सुषमा कोठीकार या भाजपच्या सांस्कृतिक आघाडीच्या पदाधिकारी असल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. राज्य नाट्यस्पर्धेपूर्वी संस्कार भारतीच्या माध्यमातून परीक्षकांची सूची नाट्य संचालनायाला पाठवली जाते आणि त्यानंतर भाजपच्याच मर्जीतील विचारधारा मानणारे कार्यकर्ते परीक्षकपदी नेमण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. नाट्य परिषदेने याबाबत दखल न घेतल्यास लवकरच रस्त्यावरुन उतरुन आंदोलन करण्याचा इशारा सांस्कृतिक विभागाचे प्रमुख बाबासाहेब पाटील यांनी दिला आहे.
Akola News : अकोला पोलिसांच्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेने एक अनोखी कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांनी शहरात फटाक्यांचा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट गाड्यांवर वर्षभरापासून कारवाई सुरु केली आहे. यात आतापर्यंत 1206 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी काल संध्याकाळी जप्त डुप्लिकेट सायलेंसरचा रोड रोलरखाली चुराडा केला. यात 200 वर जप्त केलेले सायलेंसर नष्ट करण्यात आले आहेत. आजही ही कारवाई होणार आहे.
नागपूर : नागपुरात पोहचली वंदे भारत ट्रेन, शुक्रवारी रात्री ट्रेन नागपूर रेल्वे स्टेशनवर दाखल झाली...
रविवारी पंतप्रधान मोदी दाखवणार नागपूर - बिलासपूर वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा...
16 कोचेस असलेली वंदे भारत चेन्नई येथून परवा बल्लारशाह-गोंदिया मार्गे बिलासपूरला पोहचली होती...
बिलासपूरहून काल रात्री नागपुरात झाली दाखल
Kolhapur News : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधानावर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी टीका केली आहे. एकीकडे शांततेबाबत बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला अशी वक्तव्य करायची हे सुरू आहे. केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत. महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी 24 तासात आपली भूमिका स्पष्ट करावी.
- मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांचे आज उद्घाटन
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी सुशोभीकरण प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज उपनगरातील सुशोभीकरण कामांचा शुभारंभ होणार आहे
- 500 प्रकल्पांचा भव्य भूमिपूजन सोहळा
- मुंबई महापालिका निवडणुकींसाठी राज्य सरकारला ही कामं महत्वाची ठरणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिक या पालिकेच्या मोफत क्लिनिकची उभारणी ठिकठिकाणी सुरू आहे. मात्र पवईमध्ये मुंबई मनपा आणि काही भूमाफियांमध्ये गेले दोन दिवस याच क्लिनिकच्या जागेवरून जोरदार संघर्ष सुरू आहे. पवई येथील साकी विहार रोड येथे मुंबई मनपा एल विभागातर्फे हे क्लिनिक उभे केले गेले आहे. मात्र त्याचा ताबा इथले काही भूमाफिया यांनी घेण्याचा प्रयत्न केला. या पालिकेच्या क्लिनिकमध्ये त्यांनी बाऊन्सर घुसवले आणि डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पवई पोलिसांकडे मदत मागण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांकडून पालिकेला अपेक्षित सहकार्य मिळाले नाही.आणि या बाऊन्सर नी या क्लिनिक मध्ये घुसून ताबा घेत तिथे बसून आहेत. तर पालिकेचे सुरक्षा रक्षक ही आतमध्ये बसून आहेत.या प्रकरणी मध्यरात्री पालिकेच्या अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दबाव दिल्यानंतर अखेर पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र पुढे कारवाई झालेली नाही. यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
भंडारा जिल्ह्यात शासकीय आधारभूत धान खरेदीला प्रारंभ झाला आहे, परंतु अद्यापही भंडारा जिल्ह्यातील बहुतेक शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता शासनाने धान खरेदीसाठी नोंदणीला 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. भंडारा जिल्ह्यात सध्या धान खरेदी सुरु असली तरी अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असून त्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केले आहे.
गोंदियात पोलिसांनी केलेल्या दोन कारवाई 11 लाख 77 हजारांचा तंबाखू जप्त करण्यात आला असून दोघावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत वाहनासह 27 लाख 36 हजार 247 मुद्देमाल जप्त केला आहे. पहिली कारवाई गोरेगाव पोलीस स्टेशन हद्दीत करण्यात आली. तर, दुसरी कारवाई गोंदिया शहर हद्दीतील नांगपुरा मुर्री येथील गोडावूनमध्ये विनापरवाना साठवणूक करून ठेवलेल्या ठिकाणी पथकाने छापा टाकून केली. यात एक मालवाहू वाहन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी वाहन चालक राजेश राजगडे वय 26 वर्षे रा. सिव्हील लाईन, गोविंदपुर, गोंदिया व मासुम चंदु आसवानी, वय 24 वर्षे, रा. सिंधी कॉलोनी, गोंदिया यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
IPS Amit Lodha Suspended : बिहारमधील (Bihar) आयपीएस अधिकारी अमित लोढा (IPS Officer Amit Lodha) यांचं निलंबन करण्यात आलं आहे. बिहारच्या दक्षता विभागाने लोढा यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. नेटफ्लिक्सवरील (Netflix) खाकी: द बिहार चॅप्टर (Khakee The Bihar Chapter) या वेब सीरिजमुळे (Web Series) अमित लोढा चर्चेत आहेत. अमित लोढा यांनी लिहिलेल्या पुस्तकावर ही वेब सीरिज बनवण्यात आली आहे. ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सला (Netflix) मदत केल्याच्या आरोपांखाली विशेष दक्षता विभागाने अमित लोढा यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
नायजेरीयन व्यक्तीला कोकेन या अंमली पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी केली अटक
व्यक्तीचं 22 वर्षांपासून भारतात वास्तव्य
या नायजेरीयन व्यक्तीकडून दोन कोटी 20 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे
पुणे शहर पाेलिसांच्या अमली पदार्थ विराेधी पथकाने उंड्री भागातून अटक केली
फाॅलरिन अब्दुल अजीज अंडाेई ( वय 50 ) असं अटक केलेल्या आराेपीचे नाव
काेंढवा पाेलीस ठाण्यात त्याच्याविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला
एसटी बसमधील प्रवाशांना लुटणारी आंतरराज्य महिलांच्या टोळीचा विटा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. त्यांच्याकडून दोन गुन्ह्यातील तब्बल 9 लाख 51 हजार 350 रुपये किंमतीचे 179.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या प्रकरणी आर. ईश्वरी (वय 28) आणि एम.दिपा (वय 22, रा. दोघीही रा. टूमकूर, कर्नाटक, सध्या रा. तासवडे, ता. कराड) या महिलांना अटक केली. या महिलांसोबत आणखी काही महिला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या महिला कडून 5 तोळे 5 ग्रॅमचे सोन्याचे गंठण, पाच तोळेचा सोन्याचा हार, एक तोळे वजनाचे झुमके आणि टॉप्स, सात ग्रॅमच्या लहान मुलीच्या दोन बांगडया, सहा ग्रॅमची गणपतीचे पेंडन्ट असलेली सोनसाखळी आणि सोन्याच्या तीन अंगठ्या असा एकूण नऊ लाख 51 हजार 350 किंमतीचे 179.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले.
Jalgaon Dudh Sangh Election : जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज जळगाव जिल्हा दूध संघासाठी मतदान (Jalgaon zilla Dudh Sangh Election) होणार आहे. एकूण 20 जागांसाठी आज सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे. दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse), भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao patil) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.
Maharashtra Police Constable Recruitment : तृतीयपंथीयांसाठी (Transgender) मुंबई उच्च न्यायालयाचा (Bombay High Court) ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पोलीस भरतीत (Police Bharti) आता तृतीयपंथीयांसाठीही संधी मिळणार आहे. तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्यास तयारी असल्याची माहिती राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयाला दिली. त्यानंतर आता न्यायालयाने सरकारला नियमावली सुधारण्याचे आदेश दिले आहेत. फेब्रुवारी 2023 पर्यंत राज्य सरकार पोलीस भरतीत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र नियमावली बनवणार आहे
Maharashtra Karnataka Border Dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचलं आहे. महाराष्ट्राच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने काहीही फरक पडत नाही. सीमाप्रश्नावर तडजोड नाही, असं ट्वीट बोम्मई यांनी केलं.
Mumbai MVA Morcha : येत्या 17 डिसेंबरला महाविकास आघाडीचा मुंबईत मोर्चा... मविआची जय्यत तयारी...
मुंबई पालिका निवडणुकीसाठी मविआची जय्यत तयारी?
Amravati News : अमरावतीमधील दर्यापूर इथल्या अल्पवयीन आणि दिव्यांग असलेल्या मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना घडली आहे. आपल्या घराच्या अंगणात बसलेली असताना शेजारी राहणाऱ्या आरोपी प्रशांत नागोराव सोळंके (वय २५ वर्षे) याने तिला उचलून घरात नेऊन अतिप्रसंग केला. पीडित मुलगी ही पोलिओग्रस्त आहे. यासंबंधात पीडित युवतीने दर्यापूर पोलिसात आपबिती सांगत तक्रार दाखल केली आहे. दर्यापूर शहरातील एका भागात राहणाऱ्या 17 वर्षीय युवती आपल्या घराच्या अंगणात काम करत होती. यावेळी तिच्या घराच्या परिसरात राहणारा ओळखीचा युवक घरी आला आणि घरी कोणी नाही हे कळल्यावर त्याने युवतीला उचलून घरात नेऊन अतिप्रसंग केला आणि कुणाला सांगू नको अशी धमकी सुद्धा दिली. यासंबंधी पीडित युवतीने दर्यापूर पोलिसांना तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी प्रशांत नागोराव सोळंके याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करुन बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई सुद्धा केली. याप्रकरणी युवकास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Sangli News : एसटी बसमधील प्रवाशांना लुटणारी आंतरराज्यीय महिलांच्या टोळीचा विटा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून दोन गुन्ह्यातील तब्बल 9 लाख 51 हजार 350 रुपये किंमतीचे 179.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या प्रकरणी आर. ईश्वरी (वय 28 वर्षे) आणि एम.दीपा (वय 22 वर्षे, रा. दोघीही रा. टूमकूर, कर्नाटक, सध्या रा. तासवडे, ता. कराड) या महिलांना अटक केली. या महिलांसोबत आणखी काही महिला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या महिलांकडून 5 तोळे 5 ग्रॅमचे सोन्याचे गंठण, 5 तोळेचा सोन्याचा हार, 1 तोळे वजनाचे झुमके आणि टॉप्स, 7 ग्रॅमच्या लहान मुलीच्या दोन बांगड्या, 6 ग्रॅमची गणपतीचे पेंडन्ट असलेली सोनसाखळी आणि सोन्याच्या 3 अंगठ्या असा एकूण 9 लाख 51 हजार 350 किंमतीचे 179.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले.
अहमदनगर : राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी नगर जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेकडे कलश वेधण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी सुरू केलेल्या आमरण उपोषण आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चार वेळा बैठक होऊनही यावर तोडगा निघालेला नाही...काल जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनीही आमदार निलेश लंके यांच्यासोबत चर्चा केली मात्र, जोपर्यंत प्रत्यक्ष काम सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याची भूमिका आमदार लंके यांनी घेतलीये...याचबद्दल बोलण्यासाठी आमचे अहमदनगर प्रतिनिधी सुनिल भोंगळ आपल्यासोबत जोडले गेले आहेत.
Nanded Earthquake : नांदेडमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. नांदेडमध्ये 3 रिस्टरस्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे.
गोंदिया जिल्ह्याचा पारा वर जात असतानाच अचानक दोन दिवसापासून त्यात घसरण होत आहे. गोंदिया जिल्ह्यात सध्याचा तापमान 8.8 अंशावर असून एक दिवसाआधी गोंदिया जिल्हाचा तापमान 10.2 अंशावर होते. तर, आज पुन्हा तापमानात घसरण झाली आणि गोंदिया जिल्हा विदर्भात सर्वात थंडगारर ठरला आहे. जिल्ह्यात थंडीचा जोर अधिकचा वाढल्याने जिल्ह्यतील अनेकजन शेकोटीचा सहारा घेत असून उबदार कपड्याचाही उपयोग करत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर (Mumbai City News) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत आज 10 डिसेंबर रोजी राणीचा बाग, ईएस पाटनवाला मार्ग, भायखळा (पूर्व), मुंबई येथे सकाळी 10 वाजेपासून 'पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध नामवंत कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र, सेवा क्षेत्र यामधील 8 हजार 608 इतके रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. मेळाव्यात या नोकऱ्यांसाठी कंपन्यांकडून थेट मुलाखती घेतल्या जाणार असून नोकरीइच्छूक उमेदवारांनी मेळाव्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी केले आहे.
पार्श्वभूमी
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.
मंदोस चक्रीवादळाचे संकट
दक्षिण भारतावर मंदोस चक्रीवादळाचं (Cyclone Mandos) संकट घोंगावत आहे. तामिळनाडू, पद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश या राज्याला हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय. या तिन्ही राज्यात हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय. तिन्ही राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तुफान वाऱ्यासह समुद्र किनाऱ्यावर पाऊस कोसळत आहे. अस्मानी संकटामुळे प्रशासन सतर्क झालं असून एनडीआरएफसह इतर पथके तैणात करण्यात आली आहे. दक्षिण भारतामध्ये येणाऱ्या मंदोस चक्रीवादळाचा फटका शेजारी असणाऱ्या राज्यांना बसण्याची शक्यता आहे. कर्नाटक, केरळमधील हवामानात बदल झालाय. महाराष्ट्र, गुजरातमध्येही पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
जळगाव दूध संघासाठी आज मतदान
जळगाव दूध संघातील (Jalgaon Milk) वीस जागांसाठी आज सकाळी आठ ते सायंकाळी पाचवाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत एकनाथ खडसे, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून या दूध संघाच्या निवडणुकीसाठी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
मुंबईत आज महारोजगार मेळावा; साडेआठ हजार रोजगारांची उपलब्धता
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर (Mumbai City News) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत आज 10 डिसेंबर रोजी राणीचा बाग, ईएस पाटनवाला मार्ग, भायखळा (पूर्व), मुंबई येथे सकाळी 10 वाजेपासून 'पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध नामवंत कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र, सेवा क्षेत्र यामधील 8 हजार 608 इतके रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. मेळाव्यात या नोकऱ्यांसाठी कंपन्यांकडून थेट मुलाखती घेतल्या जाणार असून नोकरीइच्छूक उमेदवारांनी मेळाव्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी केले आहे.
फिफामध्ये धक्कादायक निकाल, पाच वेळच्या चॅम्पियन ब्राझीलला पराभवाची 'किक'
BRA vs CRO, FIFA WC Quarter Final: फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये धक्कादायक निकाल लागला आहे. विजेतेपदाचा दावेदार ब्राझीलला उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. क्रोएशियाने पाच वेळच्या चॅम्पियन ब्राझीलला पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत केलेय. या विजयासह क्रोएशियानं उपांत्य फेरीत स्थान पटकावलेय. (Croatia vs Brazil FIFA World Cup 2022 Quater Final)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -