Maharashtra News Live Updates : सांगलीची प्रतीक्षा बागडी पहिली महाराष्ट्र केसरी, कल्याणच्या वैष्णवी पाटीलला चितपट करत मिळवली चांदीची गदा

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Mar 2023 10:29 PM
Thane Bribe : 50 हजारांची लाच घेणाऱ्या जलसंधारण लघुपाटबंधारे जिल्हा परिषद अधिकाऱ्यास अटक

बंधाऱ्याच्या बांधकामासाठी मंजूर निधीच्या एक टक्के म्हणजे 50 हजारांची लाच स्वीकारणारे ठाणे जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी राजेंद्र पाटील यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली. त्यांच्याविरुद्ध ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Thane Bribe : 50 हजारांची लाच घेणाऱ्या जलसंधारण लघुपाटबंधारे जिल्हा परिषद अधिकाऱ्यास अटक

बंधाऱ्याच्या बांधकामासाठी मंजूर निधीच्या एक टक्के म्हणजे 50 हजारांची लाच स्वीकारणारे ठाणे जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी राजेंद्र पाटील यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली. त्यांच्याविरुद्ध ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Mumbai ED : गोपनीय कागदपत्रे लीक केल्याच्या आरोपाखाली मुंबई ईडी कार्यालयातील दोन ऑफिसबॉयना अटक

मुंबई ईडीची मोठी कारवाई, मुंबईतील ईडी कार्यालयात काम करणाऱ्या दोन ऑफिस बॉयना अटक,


ईडी प्रकरणांशी संबंधित गोपनीय कागदपत्रे लीक केल्याप्रकरणी अटक,


ईडीला त्यांच्या तपासात असे आढळून आले की काही गोपनीय कागदपत्रे पुण्यातील व्यापारी अमर मुलचंदानी यांना विकण्यात आली होती. 

First Women Maharashtra Kesari: सांगलीची प्रतीक्षा बागडी पहिली महाराष्ट्र केसरी, मिळवली चांदीची गदा

पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगलीच्या प्रतीक्षा बागडी हिने जिंकली आहे. तिने कल्याणच्या वैष्णवी पाटीलला तिने काही मिनिटांमध्येच चितपट केली. 

Mumbai Fire : चुनाभट्टीतील गोदरेज इमारतीला आग

चुनाभट्टीतील गोदरेज इमारतीला आग लागली असून त्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही आग 11 व्या मजल्याला लागली असून 13 व्या मजल्यावर पोहोचली असल्याचं सांगितलं जातंय. 

Rahul Gandhi Disqualifaction : सुरत न्यायालयाचा निकाल ऐतिहासिक; राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर सुरत न्यायालयाचा निकाल हा ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया भाजपने दिली आहे. काँग्रेसला वाटतं की त्यांच्यासाठी वेगळा कायदा असावा, आपण कायद्यापेक्षा मोठं असल्याचं त्यांना वाटतंय, पण कायदा हा सर्वांसाठी समान आहे असं भाजपच्या वतीनं स्पष्ट करण्यता आलं आहे. 

Nana Patole : ''मोदी सरकार फक्त नीरव मोदी, ललित मोदी या मित्रांसाठीच'', पटोलेंचा गंभीर आरोप

मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागत म्हटलं की, ''लोकसभा सचिवालयाचा निर्णय लोकशाहीविरोधात आहे. गेल्या 9 वर्षांमध्ये मोदी सरकार त्यांच्या मित्रांसाठी... नीरव मोदी, ललित मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या अशा लोकांसाठी... हे लोक जनतेचे हजारो कोटी रुपये घेऊन फरार झाले. अशा लोकांना सपोर्ट करण्याचं काम भाजप आणि मोदींचं सरकार करतंय. त्यांच्या विरोधात राहुल गांधी आवाज उचवतात. लोकसभेत त्यांना बोलू दिलं जात नाही. रस्त्यावरही बोलू देत नाही.'' असं म्हणत पटोले यांनी मोदी सरकार आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द ... दोन वर्षांची शिक्षा झाल्याने लोकसभा सचिवालयाची मोठी कारवाई...


काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. सुरत न्यायालयाने त्यांना काल दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 10 जुलै 2013 च्या निकालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.


 





नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर, घरी रेनवॉटर हार्वेस्टिंग, सोलर आणि घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्यांना मालमत्ता करात 5 टक्के सूट

Nagpur Municipal Corporation Budget : आपल्या घरीच रेनवॉटर हार्वेस्टिंग, सोलर आणि घनकचरा व्यस्थापन करणाऱ्या नागरिकांना नागपूर महानगरपालिकेकडून मालमत्ता करात पाच टक्के सूट देण्यात येणार आहे. पालिका आयुक्त बी राधाकृष्णन यांनी आज नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर केला, त्यात त्यांनी याची माहिती दिली. या वर्षी पालिकेने आपल्या मालमत्ता करात कोणतीही वाढ केलेली नाही. सोबतच साथ रोग प्रदुर्भाव आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागासाठी विशेष निधीची तरतूद केली. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात नागपूर महानगर पालिकेचा वर्ष 2023-24 साठी एकूण उत्पन 3 हजार 336 कोटींचा उत्पन्नाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून एकूण खर्च 3 हजार 267 कोटींचा होणार असल्याचे दाखवण्यात आले. यात एकूण महसुली खर्च 1901 कोटी असून भांडवली खर्च 1226 कोटी इतका असणार आहे. हा नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल आहे. 2023-2024 या वर्षातील हाती घ्यावयाच्या विकासकामाचे नियोजन करताना त्या कामाची तात्काळ उपयोगिता आणि गरज आहे त्याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. यामध्ये विशेष महत्त्वाचे आणि तात्काळ हाती घ्यावयाच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. विशेष म्हणजे शेळी कत्तलखान्याला विकसित करण्यासाठी देखील या अर्थसंकल्पात चार कोटीची विशेष तरतूद करण्यात आली. 

Mumbai Crime: मुंबईतील NRI धमकी प्रकरणाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन; जावेद चिकनाच्या नावाने खंडणीसाठी फोन

1993 Blast Accuse in Extortion Case : मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट (Mumbai Serial Blast 1993) प्रकरणातील एका फरार आरोपीने मुंबईत राहणाऱ्या एका NRI ला फोन करून खंडणीची धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई क्राईम ब्रांचच्या खंडणी विरोधी सेलनं एका 60 वर्षीय व्यावसायिकाला अटक केली आहे. या प्रकरणात जावेद चिकना (Javed Chikna) या आरोपीचा हात असल्याची माहिती आहे. जावेद चिकना हा मुंबईतील 1993 बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी असून तो फरार आहे. 

माथेरानच्या घाटात दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू, तीव्र वळणावर नियंत्रण सुटल्यामुळे अपघात
Matheran News : माथेरानच्या घाटात एका दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जुमापट्टी परिसरात तीव्र वळणावर स्कूटरवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. कल्याण तालुक्यातील वरप इथे राहणारा विनय संजय भोईर हा 27 वर्षीय तरुण माथेरानला आला होता. जुमापट्टी परिसरात एका तीव्र वळणावर त्याचा स्कूटरवरील ताबा सुटला आणि त्याच्या स्कूटरने संरक्षक लोखंडी रेलिंगला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे विनय हा उडून लोखंडी रेलिंगला धडकला आणि त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तर त्याच्या मागे बसलेली व्यक्ती किरकोळ जखमी झाली. या अपघातानंतर नेरळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विनय याला नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या अपघाताबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Govt. Job Privatization : अखेर सरकारी नोकऱ्यांच्या खाजगीकरणास सुरुवात, पाच शिपाई पुरविण्यासाठी ठेकेदाराला निविदा देण्याची पहिली जाहिरात

अखेर सरकारी नोकऱ्यांच्या खाजगीकरणास सुरुवात , पाच शिपाई पुरविण्यासाठी ठेकेदाराला निविदा देण्याची पहिली जाहिरात प्रसिद्ध झाल्याने शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात सुशिक्षित बेरोजगार तरुणात असंतोष पाहायला मिळत आहे. एका बाजूला लाखोंच्या संख्येने सुशिक्षित बेरोजगार नोकऱ्यांसाठी वणवण फिरत असताना महाराष्ट्र शासनाने शासकीय नोकऱ्या खाजगीकरणातून भरण्याची अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे आता 5 शिपायांची पदे खाजगीकरणातून भरण्यासाठी पहिली जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात 5 शिपायांची पदे ठेकेदार पद्धतीने भरली जाणार असून याची जाहिरात 21 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

Corona Lockdown : तीन वर्षापूर्वी याच दिवशी झाली कोरोनामुळे देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा

Corona Lockdown : देशात तीन वर्षांपूर्वी कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढायला लागल्यानंतर 24 मार्च रोजी लॉकडाऊन (Lockdown) लावण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. हा लॉकडाऊन 21 दिवसांचा असेल असं स्पष्ट करण्यात आलं. देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही 500 च्या वरती गेल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. लॉकडाऊन लावल्यानंतर अत्यावश्यक सेवा सोडल्या तर इतर सर्व सेवा, रस्ते, रेल्वे आणि हवाई सेवा बंद करण्यात आल्या.


 

Coronavirus Cases : देशात 1249 नवे कोरोना रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 8 हजारांजवळ

Coronavirus Cases Today : भारतात कोरोना विषाणू पुन्हा एकदा वेगाने हात-पाय पसरताना दिसत आहे. देशात पुन्हा एकदा हजारहुन अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. देशात शुक्रवारी 1249 नवीन कोरोनाबाधिक सापडले आहेत.  देशात सलग चौथ्या दिवशी नव्या कोरोना रुग्णांचा आकडा एक हजारहुन जास्त आहे. देशात आतापर्यंत एकूण कोरोना संक्रमित रुग्णाची संख्या चार कोटींच्या पुढे गेली आहे. 

Navi Mumbai Darga :पारगांव डोंगरावर असलेल्या दर्गावर कारवाई करावी, मनसेची मागणी 

नवी मुंबई : पनवेल येथील पारगांव डोंगरावर असलेल्या दर्गावर कारवाई करावी मनसेची मागणी 


पनवेल मनसे कडून पोलीस आणि सिडको प्रशासनाला पत्र पाठवून कारवाईची मागणी 


पारगांव डोंगरावर अनधिकृत दर्गा उभा केल्याचा मनसेचा दावा


दर्गावर कारवाई न केल्यास आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे मनसेकडून आवाहन


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शेजारी असलेल्या डोंगरावर उभा राहत आहे दर्गा


दर्ग्याजवळ सहा ते सात अनधिकृत रूम बांधण्यात आल्या आहेत

Nashik Car Fire : पार्किंगच्या क्षुल्लक वादातून शेजाऱ्याने कार पेटवली, नागपुरातील घटना

नागपूरच्या गणेश पेठ परिसरामध्ये राहणारे प्रशांत लोहकरे यांची कार 20 मार्चला रात्री पेट्रोल टाकून पेटवण्यात आली होती. कार पेटवताना काही तरुण सीसीटीव्ही ती चित्रित झाले होते. याप्रकरणी तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता   शेजारीच राहणारा शिवा बुंदेले यांच्यावर संशय गेला. शिवा आणि त्याच्या दोन साथीदारांनी पेट्रोल टाकून कार पेटवल्याचे तपासात उघडकीस आले. पार्किंग वरून प्रशांत आणि शिवा बुंदेले यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. शिवा बुंदेले ची दुचाकी प्रशांत यांच्या घरासमोर पार्क केली असता ती त्यांनी पंचर केल्याचा संशय शिवाला होता. त्याच रागातून त्याने हे कृत केल्याची प्राथमिक तपासात पुढे आले आहे. त्यामुळे नागपूरच्या काही भागात पार्किंगचा वाद किती तीव्र स्वरूप घेत आहे हे पुढे आले आहे.

Chhatrapati Sambhajinagar : औरंगाबाद नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यास स्थगिती देणारा खटला, न्यायालयाने याचिका फेटाळली

औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे करण्यास स्थगिती देणारा खटला माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर सरन्यायाधीश, माननीय न्यायमूर्ती नरसिंह आणि माननीय न्यायमूर्ती पार्डीवाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. प्रकरण अंतिम सुनावणीसाठी असल्यामुळे न्यायालयाने याचिका फेटाळली आहे.

Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांनी दाखल केला अटकपूर्व जामीन अर्ज

राष्ट्रवादी काँग्रेस नेते हसन मुश्रीफ यांनी दाखल केला अटकपूर्व जामीन अर्ज


मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात दाखल केला अर्ज


हायकोर्टाच्या निर्देशांनुसार होणार तातडीची सुनावणी

Department of Atomic Energy Exam : भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेत गोंधळ 

कासारवडवली येथील एम बी सी इन्फोटेक पार्कमध्ये गोंधळ 
भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेत गोंधळ 
सर्वर डाऊन झाल्याने परीक्षेला आलेल्या परीक्षार्थींचा हिरमोड 
परीक्षा केंद्रात सुरू केले ठिय्या आंदोलन 
पाचशे पेक्षा जास्त परीक्षार्थी आले होते परीक्षेला, मात्र सर्वर डाऊन झाल्याने सकाळी 9 चा पेपर सुरू होऊ शकला नाही, 
पुन्हा कधी पेपर होणार याबद्दल माहिती दिली जात नसल्याने परीक्षार्थी राहिले अडून

Akola Crop Insurance Company Fraud : अकोला जिल्ह्यात 'आयसीआयसीआय लोंबार्ड' विमा कंपनीच्या 10 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल

Akola Crop Insurance Company Fraud : राज्यातील शेतकऱ्यांना यावर्षी अस्मानी'सोबतच 'सुल्तानी' संकटाला सामोरं जावं लागतंये. ही 'सुल्तानी' आहेय राज्यातील पीकविमा कंपन्यांच्या बदमाशीची. अकोला जिल्ह्यात 'आयसीआयसीआय लोंबार्ड' विमा कंपनीच्या 10 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कंपनीनं जिल्ह्यातील शेतकऱ्यांची 3 कोटी 96 लाखांनी फसवणूक केल्याचं समोर आलंय. पीक नुकसानीचं क्षेत्र आणि टक्केवारी कमी दाखवत राज्यभरात शेतकऱ्यांना लुटण्याचा गोरखधंदा पीकविमा कंपन्या करतायेत.

Latur Bus Fire : सात ट्रॅव्हल्स जुळून खाक, शॉर्ट सर्किटमुळे लागली आग

Latur Bus Fire : लातूरमद्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लातूर शहरातील रिंग रोड भागात डेटिंग आणि पेंटिंग करणाऱ्या एका दुकानातील सात ट्रॅव्हल्स अक्षरश जळून खाक झाल्या आहेत. या ठिकाणी या सात ट्रॅव्हल्स काम सुरू होतं.  मध्यरात्री दोन वाजल्यानंतर या ठिकाणी असलेल्या हाय टेन्शन तार तुटल्याने शॉर्ट सर्किट झालं, त्यातून खाली उभा असलेल्या ट्रॅव्हल्सला आग लागली. पाहता पाहता या ठिकाणी उभ्या असलेल्या सात ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्या आहेत.

BJP Protest : भाजपकडून राहुल गांधी यांच्या प्रतिमेला 'जोडे मारो' आंदोलन
BJP Jode Maro Andolan : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच ओबीसी समाजाविषयी गरळ ओकली असून या प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावली. असं काँग्रेसकडून त्यांच्या बचावासाठी निदर्शने केली जात असल्याचा आरोप करत या भाजपकडून निषेध करण्यात आला आहे. याचं निषेधार्थ आज परभणीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

 
Raigad Road Politics :अलिबाग - रोहा रस्त्याच्या कामावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई
Raigad Road Politics : अलिबाग - रोहा रस्त्याच्या कामावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. 200 कोटी रुपयांच्या या कामाचा नारळ गुढीपाडव्याला भाजपच्या वतीने फोडण्यात आला. त्यानंतर शिवसेनेकडूनही नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेले हे काम अनेक कारणांमुळे रखडले होते. 
Nashik Crime : कंपनी मॅनेजर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात, रिक्षावाल्याची माणुसकी, दवाखान्यात नेलं, मात्र....

Nashik Crime : नाशिक शहरात (Nashik)  पुन्हा एकदा खुनाची घटना घडली असून पाथर्डी फाटा नजीक असलेल्या पांडवलेणी परिसरात हा प्रकार घडला आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात संशयितांनी कंपनी व्यवस्थापकावर धारदार शस्त्राने वार करत रस्त्यावर फेकून दिले. त्यानंतर नाशिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. मात्र या घटनेने नाशिक शहर हादरले आहे. 

Beed Nuksan : बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही पूर्ण नाहीत
बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे शेती पिकासह फळबागांच देखील मोठ नुकसान झालं होतं या नुकसानीनंतर पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र बीड जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 13 टक्के क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले असून अध्यापही बहुतांश शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी काही काळ वाट पहावी लागणार आहे. अतिवृष्टी आणि गारपीट झाली तेव्हा महसूल आणि कृषी विभागाचे कर्मचारी संपावर असल्याने हे पंचनामा करण्यासाठी विलंब होत असून पुढील काही दिवसात पंचनामे पूर्ण करून त्याचा अहवाल सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

 
NDBR MAHILA BACHAT GAT MELAVA : महिला बचत गटातील तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्धतेसाठी नंदुरबारमध्ये उद्योग प्रबोधिनीचे आयोजन
जागतिक महिला दिन आणि आंतरराष्ट्रीय तृणधान्य धान्य वर्ष या निमित्ताने नंदुरबार जिल्ह्यामध्ये तेजस्विनी उद्योग प्रबोधनीचं आयोजन करण्यात आला आहे. त्या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ नाबार्ड कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आला आहे. पौष्टिक तृणधान्याबाबत जनमानसात जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यामध्ये ज्या महिला महिला बचत गट विविध प्रकारचे उत्पादन तयार करत आहेत. त्यांना बाजारपेठ तयार करून देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनीमध्ये विविध प्रकारचे स्वयंसहाय्य महिला बचत गट ग्रामीण महिला आहेत आणि शहरी महिला आहेत. यांना मार्केटिंगसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सोबतच मार्केटिंग प्रशिक्षण त्यांचं आत्मविश्वास वाढवून देणे, या उद्देशाने या चार दिवसीय शिबिराच आयोजन करण्यात आल आहे. या प्रदर्शनीकरिता नाबार्ड कृषी विभाग कृषी विज्ञान केंद्र यांच्या सहकार्यातून या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रदर्शनीत 55 बचत गटांनी आपले स्टॉल लावले असून 200 हुन अधिक महिलांनी यात सहभाग नोंदवला आहे.
Raj Thackeray Complaint : राज ठाकरेंविरोधात पिंपरी चिंचवड न्यायालयात याचिका, गुढी पाडव्यादिवशीच्या वक्तव्यावर कारवाईची मागणी

Pimpri Raj Thackeray Complaint : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढी पाडव्यादिवशी प्रक्षोभक वक्तव्य केले, असा आरोप करत कारवाई करावी. यासाठी पिंपरी चिंचवड न्यायालयात अशी याचिका दाखल करण्यात आलीये. वाजीद सय्यद असं तक्रारदाराचे नाव असून त्यांनी वाकड पोलिसांकडे ही तशी तक्रार दाखल केली आहे. वाजीद हे सामान्य व्यावसायिक असून सामाजिक कार्य हे करतात. राज ठाकरे गुढी पाडव्यादिवशी वक्तव्य करून समाजाची दिशाभूल करत आहेत. त्यांच्या वक्तव्यांमुळं राज्यभर प्रतिसाद उमटू शकतात. भाषणात मुस्लिम धर्मीयांबद्दल अनेकदा अपशब्द वापरल्याचा आरोप वाजीद यांनी न्यायालयाकडे दाखल केलेल्या याचिकेत केले आहेत. राज ठाकरेंनी अशी वक्तव्य यापुढं करू नयेत म्हणूनच त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि न्याय द्यावा. अशी मागणी वाजीद यांनी न्यायालयाकडे केलेली आहे. 

Khed Bomb : भरणे गावात सापडले 80 हुन अधिक घातक गावठी बॉम्ब 
खेडमधील मुंबई-गोवा महामार्गलगत असणाऱ्या भरणे गावात एक घरात 80 हुन अधिक घातक गावठी बॉम्ब सापडले आहेत. शिकारीसाठी सर्रास वापर केला जाणारे जीवघेणे गावठी बॉम्ब एक घरातून खेड पोलिसांनी ताब्यात घेतले. गेल्या आठवड्यात खेडमधील पन्हाळजे गावात प्रमुख जिल्हा मार्गावरून जाणाऱ्या एसटी बसच्या टायर खाली गावठी बॉम्ब फुटला होता. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याद्दष्टीने तपास करत असताना गावठी बॉम्ब एक घरात मोठ्या संख्येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

 
परभणीच्या सेलूतील हदगाव तलावावर विविध पक्षांचं दर्शन

परभणीच्या सेलु तालुक्यातील हदगाव येथील तलाव पक्षांनी फुलला असुन तब्बल 20 पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी या तलावावर वास्तव्यास आहेत त्यामुळे पक्षीप्रेमींना हा तलाव खुनावतोय. सेलुपासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या हदगाव परिसरात आठ मोठ्या खदानी आणि एक तलाव आहे. या तलावातील पाणी उथळ असून बेशरम,लव्हाळाचे बरेचसे बेट यामध्ये आढळून येतात तर वेगवेगळ्या प्रकारच्या पान वनस्पती असल्याने या पक्ष्यांना खाद्य आणि पाणी उपलब्ध होत असल्याने त्यांच्या पुढच्या पिढ्यांना जन्म देण्याच्या दृष्टीने आवश्यक अधिवास येथे उपलब्ध असल्याने शेकडो वारकरी, छोटे अडई बदक याठिकाणी कायम वास्तव्य करताना आढळून येत आहेत.

Beed Collector Hospital Visit : जिल्हाधिकाऱ्यांची परळीच्या उपजिल्हा रुग्णालयाला भेट, फिजिशियन अभावी अती दक्षता विभाग बंद
Beed Collector Hospital Visit : बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी परळी येथील उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली असता त्या ठिकाणी फिजिशियन अभावी अतिदक्षता विभाग बंद असल्याच आढळून आलं. तर बालरोग विभागात देखील कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तर या रुग्णालयामध्ये सीबीसी करण्यासाठी अद्यावत मशीन उपलब्ध असल्याने अनेक रुग्णांना बाहेरून सीबीसी तपासणी करावी लागत आहे. त्यामुळे तात्काळ सीबीसी मशीन उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

 
Nanded Success Story : माळरानावरच्या यशस्वी फळबागेतून सुमनबाईनी साधला लखपतीचा मार्ग
Nanded Success Story : नांदेडच्या सिमा ओलांडून भोकर तालुका लागला की लहान डोंगरांची माळ सुरू होते. भोकरच्या पायथ्याला मुदखेड-अर्धापूर तालुक्यातील जमिनीचा पोत हा केळी, ऊस, हळद आणि इतर फळबागांसाठी पोषक आहे. त्या तुलनेत भोकरच्या माळरानावर शेतीला फुलवणे हे तसे आव्हानात्मक आहे. भोसी येथील सौ. सुमनबाई दिगंबर गायकवाड या महिलेने आपल्या माळरानावर असलेल्या शेतीसाठी स्वप्न पाहिले. ते सुद्धा फळबाग शेतीची. या स्वप्नाला आकार देण्यासाठी तेथील कृषि सहाय्यक, कृषि अधिकारी पुढे सरसावले. उराशी स्वप्न घेऊन माळरानावर फळबागेसाठी खड्डे खोदणे, त्यात काळी माती, शेणखत भरून झाडांसाठी हे खड्डे तयार करणे, पाण्याचे नियोजन करणे आदी एकापाठोपाठ एक गायकवाड कुटुंबाने काम हाती घेतले. पाण्याशिवाय शेती नाही, कष्टाशिवाय पाणी नाही हे गणित सुमनबाईने बरोबर ओळखले. त्यांनी कृषि विभागाशी संपर्क साधला. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्गंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वालंबन योजनेच्या माध्यमातून त्यांना विहिर मिळाली. या विहिरीवर सुरू झाली त्यांची फळबाग शेती 

 
Share Market : बँकिंग शेअर्समध्ये घसरण सुरूच, सेन्सेक्स-निफ्टीची संथ सुरुवात; आयटी शेअर्समध्ये तेजी

Share Market Opening 24 March : आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात (Stock Market) संथ सुरुवात पाहायला मिळत आहे. संमिश्र जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार आज सलग दुसऱ्या दिवशी दबावाखाली आहेत. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी व्यवहारात संथ व्यवहार पाहायला मिळत आहे.

Twitter चा यूजर्सना झटका! पेड सबस्क्रिप्शन नसणाऱ्यांचं ब्लू टिक हटवणार, 1 एप्रिलपासून नवे नियम लागू

1 एप्रिलपासून सशुल्क सबस्क्रिप्शन नसणाऱ्या ट्विटर वापरकर्त्यांच्या अकाऊंट्सचे ब्लू टिक काढण्यास सुरुवात करणार आहे. ट्विटरकडून परिपत्रक जारी करत नवीन सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार, अनपेड ट्विटर अकाऊंटचं ब्लू टिक सबस्क्रिप्शन हटवण्यात येईल. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Mahajyoti PhD Fellowship : महाज्योती पीएचडी फेलोशिपची दोन्ही सरकारकडून नुसतीच घोषणा
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने ओबीसी आणि व्हीजेएनटी वर्गातील पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाज्योती फेलोशिप (अधिछात्रवृति) देण्याचा निर्णय 2019 मध्ये घेण्यात आला. फेब्रुवारी 2022 मध्ये 2022-23 च्या फेलोशिपसाठी अर्ज भरण्यात आले त्यानंतर सरकार बदलले नव्या सरकारने पुन्हा विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेतले. शिवाय नोव्हेंबर 2022 मध्ये या फेलोशिपसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी जारी केली. त्यांना अवॉर्ड लेटर देण्यात आले.  मात्र अद्याप पाच महिन्यांपासून बाराशेपेक्षा अधिक विद्यार्थी फेलोशिपचे रक्कम दर महिन्याला कधी जमा होणार याची वाट पाहत आहेत. जेणेकरून पीएचडी करत असताना विद्यार्थ्यांना काही प्रमाणात अर्थसहाय्य होईल. परंतु मागासवर्ग आणि बहुजन कल्याण विभाग यांच्याकडे पाठपुरावा करून सुद्धा कुठल्याही प्रकारे यावर निर्णय होत नाहीय.
Washim Road Issue : कंत्राटदार इंजीनीयरचा अजब कारनामा, रस्त्याच्या मधोमध खांब उभे ठेवत नवीन रस्ता केला तयार

वाशीम जिल्ह्यातील एका रस्ता सध्या  चांगलाच  चर्चेत  आलाय. त्याच कारण म्हणजे कंत्राटदाराच  दुर्लक्ष  म्हणावं  की, त्यांनी केलेली चूक. त्यामुळे 3.35  कोटी खर्चून तयार केलेल्या रस्त्याची त्यांच्या चुकीमुळे वाट लागल्याचं चित्र आहे. वाशीमच्या बाभूळगाव ते मसला या रस्त्याचे काम होऊन काहीच दिवस झाले. मात्र सुविधेसाठी निर्माण केलेला रस्ता कंत्राटदाराच्या चुकीमुळे अडचणीचा ठरत आहे .  

Beed Cotton Rate : कापसाच्या दरामध्ये 55 रुपयांची वाढ अद्यापही शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा
कापसाच्या दरामध्ये फक्त 55 रुपयांची दर वाढ झाल्याने अजूनही कापूस उत्पादक शेतकरी कापसाच्या दर वाढीच्या प्रतीक्षेत आहेत.. गेल्या वर्षी कापसाला 12 ते 13 हजार रुपयांचा भाव मिळाला होता मात्र यावर्षी सात हजार आठशे रुपये एवढाच भाव कापसाला मिळत असून कापसाच्या दरामध्ये फक्त 55 रुपयांची वाढ झाल्याने अद्यापही काही शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे.. काही ठिकाणी कापसाच्या दरामध्ये 40 रुपयांची वाढ झाली तर काही ठिकाणी 55 रुपयाची दरवाढ मिळते मात्र एवढ्या कमी प्रमाणात कापसाच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्याची चिंता अजूनही कायम आहे

 
Sangli Krida Sankul : महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरलेल्या सांगली जिल्हा क्रीडा संकुलाचा परिसर अंधारात
महिलांच्या पहिल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरलेल्या सांगलीतील जिल्हा क्रीडा संकुलचा परिसर अंधारात दिसून आला. यामुळे महिला मल्लांना कुस्त्या आटपून मुक्कामाच्या ठिकाणी जाताना अंधारातून आणि मोबाईलच्या टॉर्चवर वाट काढावी लागली. यामुळे मुलींची गैरसोय झाल्याचा प्रकार घडलाय. कालपासून महिलाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा क्रीडा संकुल परिसरात सुरू झाल्या. क्रीडा संकुलमधून कुस्त्या आटपून मुक्कामाची सोय केलेल्या ठिकाणी जात असताना क्रीडा संकुलचा परिसर, संपूर्ण रस्ता  केवळ लाईट बिल न भरल्याने अंधारात राहिला. कुस्ती स्पर्धेसाठी महिला क्रीडा संकुलात आल्याअसताना देखील संपूर्ण परिसर अंधारात राहिल्याने कुस्तीप्रेमींच्या मधून नाराजी व्यक्त होते आहे. 

 
Wardha Suicide Attempt : नदीत उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या महिलेस ट्रक चालकांनी वाचवले
Wardha Suicide Attempt : वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातील राष्ट्रीय महामार्गावर वना नदीच्या पुलावरून चाळीस फूट खाली नदीपात्रात उडी घेत महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. यात ही महिला नदीपात्रातील पाण्यात पडल्याने पाण्यात बुडत होती. यादरम्यान राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या ट्रक चालकांनी आपल्या ट्रकचा दोरखंड नदी पात्रात फेकला आणि महिलेस तो पकडण्यास सांगून महिलेचे प्राण वाचविले. यादरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील वना नदीच्या पुलावर मोठे ट्रॅफिक जाम झाले होते. यातीलच एक नागरिक हा नदीपात्राजवळ नदीत उडी घेऊन महिलेला वाचवण्यासाठी पोहोचला. या दरम्यान दोर खंडाच्या सहाय्याने महिलेस नदीपात्राच्या बाहेर काढून तिचे प्राण वाचवण्यात आले. ही महिला हिंगणघाट येथील तुकडोजी नगर येथील रहवासी असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
Raigad Boat Compitation : एकवीरा देवीच्या मानाच्या पालखीचा सोहळा संपन्न, शिड होड्यांच्या स्पर्धेचं आयोजन

रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील आग्राव या गावातून दरवर्षीप्रमाणे यंदाही एकवीरा देवीच्या मानाच्या पालखीचा सोहळा संपन्न झाला. त्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे आग्राव येथे गुरुवारी पारंपारीक शिड होड्यांच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होत. हा स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले होते. एकवीरा देवीची पालखी प्रथम आग्राव गावातुन निघते. त्यानंतर या पालखीला होळीमध्ये बसवून फिरवण्याची प्रथा आहे. पुढचं फिरवण्याची प्रथा संपन्न झाल्यानंतर पालखी पदयात्रेने लोणावळ्यातील  कारला येथील एकवीरा देवीच्या मंदिराकडे प्रस्थान करते. पालखीला होडीतून फिरताना पाहण्यासाठी आणि शिड होडी स्पर्धा पाहण्यासाठी राज्यभरातुन हजारो भावीक रेवदंडा येथील आग्राव या गावी जमा झाले होते.

Vasunde Shetakari Melava : खासदार सुजय विखेंची राहुल गांधींवर टीका

Sujay Vikhe-Patil : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे, याबाबत बोलताना भाजप खासदार सुजय विखे यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत न्यायालयाने निर्णय दिला आहे. तो भाजपने दिलेला नाही मात्र, आता विरोधकांची अशी परिस्थिती झाली आहे, त्यांचा न्यायालयावरती विश्वास नाही पोलिसांवर विश्वास नाही, महसूल वरती देखील विश्वास नाही आणि परमेश्वरावरही विश्वास नाही ते मागचे तीन वर्ष जे परमेश्वर म्हणून राहत होते. त्याचा भ्रमनिराश झाल्याने ते असे वागत असल्याचं खासदार सुजय विखे म्हणाले. जनता येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही राहुल गांधींवर बोलण्यात का माझ्यावरती वेळ नाही असंही खासदार सुजय विखे म्हणाले. पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे शेतकरी मेळावा आणि सुजित झावरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

Hingoli Tokai : टोकाईची मालमत्ता विका आणि शेतकऱ्यांना एफआरपी द्या 
हिंगोली जिल्ह्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकीत  एफआरपीची रक्कम कारखान्यातील साखर मोलॅसिस, बगॅस  विक्री करून वसूल करावी त्याच बरोबर बँकेकडे तारण नसलेली स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करून विहित पध्दतीने विक्री करत त्यातून शेतकऱ्यांना थकीत एफआरपी द्यावा असे आदेश आदेश देण्यात आले आहेत. टोकाई सहकारी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचा 21 कोटी रुपये एफआरपी थकीत आहे थकीत एफआरपी कारखान्याची मालमत्ता विक्री करावी  विलंब कालावधीसाठी 15 टक्के व्याजासहित थकीत एफआरपी  शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
Rajan Salvi ACB Case Update : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबीयांची एसीबी चौकशी

रत्नागिरी - ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबीयांची आज अलिबाग येथे एसीबी कार्यालयात होणार चौकशी


संध्याकाळी पाच वाजता साळवी यांचे कुटुंबीय चौकशीसाठी राहणार हजर

 

पत्नी, दोन मुले आणि मोठा भाऊ आपल्या वकिलासह अलिबागमध्ये दाखल
Rahul Gandhi Convicted : 'डरो मत'...राहुल गांधी यांना शिक्षा मिळाल्यानंतर काँग्रेस आणि नेत्यांनी बदलला सोशल मीडिया प्रोफाईल फोटो

Congress Social Media Profile Photo : मोदीच्या आडनावावर टिप्पणी केल्याबद्दल गुजरातच्या सुरत कोर्टाने (Surat Court) काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र, ही शिक्षा 30 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना जामीनही मिळाला. राहुल गांधी कोर्टाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात. न्यायालयाचा निर्णय येताच एकीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यास सुरुवात केली, तर दुसरीकडे काँग्रेसने (Congress) आपल्या अधिकृत सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवरील प्रोफाईल फोटो (Profile Photo) बदलला. त्यानंतर सर्व काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनीही आपले प्रोफाईल फोटो बदलण्यास सुरुवात केली. काँग्रेसने ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट यांसारख्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवीन प्रोफाईल फोटो अपलोड केला आहे. हा ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यानचा आहे, ज्यावर लिहिलं आहे की 'डरो मत'.

आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबीयांची आज अलिबाग इथल्या एसीबी कार्यालयात चौकशी

Ratnagiri News : रत्नागिरीतील ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबीयांची आज अलिबाग येथे एसीबी कार्यालयात चौकशी होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता साळवी यांचे कुटुंबीय चौकशीसाठी हजर राहणार आहे. राजन साळवी यांच्या पत्नी, दोन मुले आणि मोठा भाऊ आपल्या वकिलासह अलिबागमध्ये दाखल झाले आहेत.

Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस बाकी

Maharashtra Budget Session : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session) शेवटचा आठवडा सुरु आहे. उद्या (25 मार्च) अधिवेशनाचा शेवटचा दिवस असणार आहे. दरम्यान, आज विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होणार आहे. काल (23 मार्च) हा प्रस्ताव सादर होऊ न शकल्याने आज सादर केला जाणार आहे. या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवरती चर्चा केली जाणार आहे. यावेळी आज विरोधकांकडून गंभीर आरोप केले जाण्याची शक्यता आहे.

Vijay Mallya : विजय माल्याविरोधात विशेष सीबीआय कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल, 17 बँकांचे 900 कोटी रुपयांचे थकीत कर्ज

Vijay Mallya : प्रसिद्ध उद्योगपती आणि फरार असलेला आर्थिक गुन्हेगार विजय माल्याविरोधात (Vijay Mallya) मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai court) विशेष सीबीआय कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल झाले आहे. तब्बल 17 भारतीय बँकांचे (Bank) कर्ज कर्जबुडवल्या प्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. विजय मल्याकडे कर्ज फेडण्यासाठी पुरेसा पैसा होता, तरीही त्यानं कर्ज फेडलं नसल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज विरोधकांकडून अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे सूरत कोर्टाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेवरून आज काँग्रेस संसदेत आक्रमक होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर केलेली टिप्पणी ही ओबीसी समाजाचा अपमान करणारी असून त्याविरोधात आंदोलन करण्याची घोषणा भाजपने केली आहे. एक नजर आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर...
 


दिल्ली 
- राहुल गांधी प्रकरणावर काँग्रेसचा संसद भवन ते विजय चौक असा मोर्चा निघणार आहे. यात काँग्रेसचे लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य सहभागी होणार आहेत.



विधिमंडळ अधिवेशन
- विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव गुरुवारी होऊ न शकल्याने आज सादर होण्याची शक्यता आहे.
- या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवरती चर्चा केली जाईल. यावेळी विरोधकांकडून गंभीर आरोप केले जाण्याची शक्यता आहे
- विधान परिषदेमध्ये अंतिम आठवडा प्रस्ताव यावर चर्चेला सुरुवात होणार. 



मुंबई
- अमृता फडणवीस प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानीची पोलीस कोठडी संपत असल्यानं तिला पुन्हा आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.


- राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी येणार आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी होणार आहे.


- हसन मुश्रीफांची तिन्ही मुलं आणि सीएनं अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी.


- भाजपचे राहुल गांधींविरोधात राज्यभरात आंदोलनाची हाक, राहुल यांनी ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप 


छत्रपती संभाजीनगर : 
-  भाजपा लावणार पाच लाख गाड्यावर छत्रपती संभाजी नगरची स्टिकर फोटो. क्रांती चौकातून होणार सुरूवात


पुणे 
- पुण्यातील पुण्येश्वर, नारायणेश्वर आणि शनिवार वाड्याच्या आतमध्ये असलेल्या दर्ग्याबाबत मनसेची पत्रकार परिषद


- पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेकडून मोर्चा, महावितरणने एप्रिल महिन्यापासून चालू वर्षाकरिता 37 टक्के आणि पुढील वर्षी 41 टक्के वीज दर वाढवण्याचा प्रस्ताव दिल्याच्या निषेधार्थ महावितरण कार्यालयावर मोर्चा
 


सांगली 
- पहिली महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धेची आज अंतिम फेरी होणार आहे. महाराष्ट्र केसरी विजेत्याला चांदीची गदा देण्यात येणार आहे. 
 


रत्नागिरी 
- ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचे कुटुंबीय संध्याकाळी अलिबाग येथील एसीबी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहणार आहेत.


 कोल्हापूर 
- केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे जोतिबा डोंगरावर जाणार आहे. शिंदे कुटुंब जोतिबा देवाचे ते हक्कदार असून भाविकांसोबत महाप्रसाद घेणार आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.